AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 30 मिनिटांत जुना फ्रिज होईल फ्रेश! खर्च न करता वापरा हे 3 घरगुती उपाय

जर तुमच्याकडे जुना, 8-10 वर्षांपूर्वी घेतलेला फ्रिज आहे आणि तो नीट थंड करत नसेल, वाजत असेल, बर्फ नीट जमत नसेल तर नवीन फ्रिज घेण्याआधी हे 3 उपाय नक्की करून पहा. हे उपाय खर्चविरहित असून घरी सहज करता येण्यासारखे आहेत.

फक्त 30 मिनिटांत जुना फ्रिज होईल फ्रेश! खर्च न करता वापरा हे 3 घरगुती उपाय
FridgeImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 06, 2025 | 1:43 PM
Share

घरात जुना फ्रिज असेल आणि तो न वाजवता वाजतोय, बर्फ नीट जमत नाही, किंवा कूलिंगसुद्धा एवढी कमी झाली आहे की वाटतं, “बास, आता नवीन घ्यावाच लागेल!”… पण थांबा! नवीन फ्रिजवर हजारो रुपये खर्च करण्याआधी हे वाचा. एका अनुभवी प्रोफेशनल टेक्नीशियनने असे काही खास उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे तुमचा 10-12 वर्ष जुना फ्रिज पुन्हा नवीनासारखा दिसू शकतो आणि कामही तसंच करेल.

हे सर्व उपाय अत्यंत सोपे असून, घरबसल्या तुम्ही स्वतः करू शकता आणि त्यासाठी खर्चही काही नाही. चला, बघूया काय आहेत हे ‘सीक्रेट टिप्स’, ज्यामुळे फ्रिज होईल पुन्हा सुपर कूल.

1. डीप क्लीनिंग

तज्ञ सांगतात की जुन्या फ्रिजची 70% समस्या फक्त नियमित सफाई न केल्यामुळे होतात. फ्रिजच्या आतल्या ट्रे, रॅक, गॅसकेट आणि वॉल्स यांची बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि पाण्याच्या मिश्रणाने स्वच्छता करा. तसेच फ्रिजच्या बाह्य भागासाठी मायक्रोफायबर कपड्याचा वापर करा. जर पेंट उडालं असेल, तर आकर्षक स्टिकर किंवा कवर वापरून तुम्ही त्याला नवीन लुक देऊ शकता. ह्या संपूर्ण कामासाठी जेमतेम 30 मिनिटं लागतील आणि तुमचा फ्रिज दिसेल बिलकुल नव्यासारखा.

2. डोअर गॅसकेट बदला

फ्रिजचा दरवाजा नीट बंद होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डोअरच्या आजूबाजूला असणारी रबरची पट्टी, ज्याला गॅसकेट म्हणतात, जर ती सैल झाली असेल किंवा फाटलेली असेल, तर थंड हवा बाहेर जाऊ लागते. त्यामुळे कूलिंग कमी होतं आणि वीजेचा वापर वाढतो. एक नवीन गॅसकेट लावल्याने फ्रिजची सीलिंग नीट होते आणि थंडी आतच राहते.

3. कूलिंग कॉइल आणि कंप्रेसरची नियमित सफाई करा

फ्रिजच्या मागील भागात असलेली कूलिंग कॉईल वर धूळ साचते आणि त्यामुळे थंड होण्याची प्रक्रिया मंदावते. ब्रश किंवा हलक्या हाताने वैक्यूम क्लीनरने ही धूळ हटवा. कंप्रेसरजवळ उष्णता साचू नये याची काळजी घ्या. दर काही महिन्यांनी एकदा ही देखभाल केली, तर फ्रिजची कार्यक्षमता टिकून राहते.

रोज फ्रिज वापरासाठी 5 सोप्या टिप्स

  1.  फ्रिजचे दरवाजे उघडे ठेवू नका ( थंडी वाया जाते आणि वीज वाढते)
  2. गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवण्याआधी थंड होऊ द्या.
  3. आवश्यकतेनुसारच वस्तू ठेवा कारण ओव्हरलोड केल्याने कूलिंग कमी होते.
  4. दर 15 दिवसांनी फ्रिजमधील नको असलेले पदार्थ काढा.
  5. गॅसकेट आणि कूलिंग कॉईलची नियमित स्वच्छता करा.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.