11th Admission : मुंबई, पुणे वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील 11वी प्रवेश कसे होणार?

मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागासाठी 11 वी प्रवेश प्रक्रिया असून, राज्यातील उर्वरित भागात महाविद्यालय पातळीवर प्रवेश होतील. दरम्यान, मुंबई, पुणे वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील 11वी प्रवेश कसे होणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. त्याबाबतही वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

11th Admission : मुंबई, पुणे वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील 11वी प्रवेश कसे होणार?
कोरोनामध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. MMRDA विभागासाठीच्या प्रक्रियेची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शेअर केली आहे. गायकवाड यांनी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागासाठी 11 वी प्रवेश प्रक्रिया असून, राज्यातील उर्वरित भागात महाविद्यालय पातळीवर प्रवेश होतील. दरम्यान, मुंबई, पुणे वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील 11वी प्रवेश कसे होणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. त्याबाबतही वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. (11th admission process be implemented in the rest of Maharashtra except Mumbai and Pune)

राज्यातील, मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील 11वीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. सदर 5 ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलग्न आहे. उक्त 5 क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत चालत आलेल्या पद्धतीनुसारच 11वी चे प्रवेश होणार आहेत.

प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा 14 ऑगस्टपासून

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील 11वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते. न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणेसाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा 14 ऑगस्ट, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापूढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

11वी प्रवेश परीक्षा रद्द, शिक्षणमंत्र्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारनं अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.

संबंधित बातम्या :

11th Admission : 10वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, एमएमआरडीएसह कोणत्या जिल्ह्यात 11वी प्रवेश प्रक्रिया सुरु?

विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास मान्यता रद्द करु, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा शाळांना इशारा

11th admission process be implemented in the rest of Maharashtra except Mumbai and Pune

Published On - 4:22 pm, Fri, 13 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI