AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठमोळी फायटर आज्जी… 8 फूट लांब खतरनाक साप हातात पकडला, गळ्यात घातला; वयाच्या 70 व्या वर्षी ना डर, ना भीती, Video पाहा

पुण्यातील 70 वर्षांच्या आजी शकुंतला सुतार यांच्या घरात 8 फूट लांबीचा साप शिरला. पण तो पाहून घाबरण्याऐवजी किंवा मदतीसाठी कोणालाही हाक मारण्याऐवजी या मराठमोळ्या आज्जीने सापासोबत जे केले ते पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला. त्यांचा व्हिडीओ बघता बघता वेगाने व्हायर झालाय.

मराठमोळी फायटर आज्जी... 8 फूट लांब खतरनाक साप हातात पकडला, गळ्यात घातला; वयाच्या 70 व्या वर्षी ना डर, ना भीती, Video पाहा
आजीने हाताने पकडला 8 फूट लांबीचा सापImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 28, 2025 | 2:13 PM
Share

समोर साप दिसला की अनेकांची हवा टाईटहोते, त त प प सुरू होतं अनेकांचं. भीतीने शब्दच फुटत नाही, अक्षरश: बोबडी वळते एकेकाची. पण घरात घुसलेला तब्बल 8 फूट लांबीचा साप पाहूनही 70 वर्षांची आज्जी जराही घाबरली नाही, त्या उलट सापाला पाहून तिने जे केलं, ते पाहून भलेभलेही थक्क झाले. सोशल मीडियावर 70 वर्षांच्या फायटर आज्जीचा एक व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून तो पाहून नेटकरीदेखील अवाक् झालेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ‘फायटर आज्जी’ने निर्भयपणे 8 फूट लांबीचा तो साप सहज, उघड्या हातांनी पकडला (Old Woman caught Snake With Bare Hand)आणि एवढंच नव्हे तर तिने तो साप गळ्यातही गुंडाळला.

कुठे घडला खतरनाक प्रकार ?

हैराण करारी ही थराराक घटना पुण्यातील मुळशी तालुक्यातील कासार आंबोली गावात घडली आहे. तिथे राहणाऱ्या 70 वर्षीय शकुंतला सुतार यांची ही कहाणी आहे. शकुंतला सुतार यांच्या घरात चक्क रॅट स्नेक म्हणजेच धामण घुसला होता. थोडाथोडका नव्हे तो साप चक्क 8 फूट लांबीचा होता. मात्र तो साप पाहून शकुंतला आज्जी घाबरली नाही ना मदतीसाठी कोणालाही हाक मारली. त्या सापाला त्यांनी स्वत:च्या हातानेच पकडलं. ज्यांनी ज्यांनी हे पाहिलं, आज्जीचं ते धाडस पाहून ते लोक अवाक् झाले.

70 वर्षाच्या आजीने पकडला भला मोठा साप

पण शकुंतला सुतार यांचं साप पकडण्यामागचं उद्दिष्ट केवळ धाडस दाखवणं नव्हते तर लोकांमध्ये सापांविषयी जागरूकता पसरवणे आणि अंधश्रद्धा दूर करणे हे देखील होतं. हा धामण साप आहे, तो विषारी नाही. पण भीतीमुळे आपण या सापांना मारतो. तो (साप) उंदीर आणि कीटक खाऊन जगतो, गुजारण करतो आणि आपल्या शेतांची राखण करतो. पण अंधविश्वासाला बळी पडून अनेक लोकं अशा सापांना मारून टाकतात, जे चुकीचं आहे, असं शकुंतला सुतार म्हणाल्या.

फायटर आज्जीचा डेरिंगबाज व्हिडीओ

'फायटर आज्जी'चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय. तो पाहून अनेक लोकं त्या आजीच्या हिमतीचं, धाडसाचं कौतुक देखील करत आहे. भारतात लोक सापाच्या विषामुळे नाही तर वेळेवर उपचार न मिळाल्याने मरतात,अशी कमेंट एकाने केली. आजी, तुम्ही पसरवलेली जागरूकता कौतुकास्पद आहे असं दुसऱ्याने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहीलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.