AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : सरकारची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट…, लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांचं मोठं विधान

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, परंतु या योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला आता अपात्र ठरल्याने विरोधकांकडून या योजनेवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana : सरकारची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट..., लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांचं मोठं विधान
aditi tatkareImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 18, 2026 | 4:18 PM
Share

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजना ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा केले जातात. महिलांमध्ये देखील ही योजना चांगलीच लोकप्रिय ठरल्याचं पहायला मिळत आहे. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं देखील बोललं जातं. परंतु सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी सक्तीची केली होती. ई-केवायसीनंतर अनेक महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे, त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

दरम्यान यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं असून, केवळ निवडणुकीसाठीच ही योजना सुरू केली होती का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.  विरोधकांच्या या टीकेला आता मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  लाडकी बहीण योजनेची घोषणा 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात झाल्यापासूनच विरोधकांनी सातत्याने टीका केली आहे, असं यावेळी त्यांनी म्हटलं.

नेमकं काय म्हणाल्या तटकरे? 

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. विरोधकही टीका करत आहेत. काय सांगाल? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  लाडकी बहीण योजनेची घोषणा 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात झाल्यापासूनच विरोधकांनी सातत्याने टीका केली आहे. सुरुवातीला महिलांना फॉर्म भरू नका, लाभ मिळणार नाही असा प्रचार करण्यात आला. योजना सुरू होताच काही विरोधकांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती,  आजही त्याच भूमिकेतून विविध प्रकारची टीका केली जात आहे, असं यावेळी आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  सरकारची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट आहे. जास्तीत जास्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. ई-केवायसी आणि डीबीटी प्रक्रिया सर्व शासकीय योजनांसाठी बंधनकारक आहे.  लाडकी बहीण, नमो शेतकरी, नुकसानभरपाई अशा सर्व योजनांमध्ये हीच पद्धत आहे. लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सहा ते आठ महिन्यांचा पुरेसा कालावधी देण्यात आला होता.

ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाही किंवा योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरतात उदा. वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त किंवा वाहनासंदर्भातील पात्रतेचे निकष पूर्ण न होणे, त्यांनाच अपात्र ठरवण्यात आले आहे. योजनेच्या सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या कोणत्याही पात्र महिलेवर अन्याय झालेला नाही, असं यावेळी तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow Us
धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
बाळाल घेऊन तो निघाला, टोकाचं पाऊल उचलणार पण...शिवसेनेच्या
बाळाल घेऊन तो निघाला, टोकाचं पाऊल उचलणार पण...शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यामुळे जीव वाचला; काय घडलं?
अंधाधुंद गोळीबार! मध्यरात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर भयंकर घडलं;
अंधाधुंद गोळीबार! मध्यरात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर भयंकर घडलं; अंगावर काटा आणणारी घटना
सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर?
Aamir Khan Threat | सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर? व्हायरल पोस्ट-ऑडिओमागचं सत्य काय?
माझा फोनदेखील... सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या
माझा फोनदेखील... सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या; रुग्णालय परिसरात असं काय घडलं?
हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस!
Amit Thackeray | हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस! सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून अमित ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट?
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट? पडद्याआड हालचाली वाढल्या
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट लॉन्च
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च; पहा व्हिडीओ
अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?
Uddhav Thackeray | अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? सरकारने जाहीर करावं; उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल!
मोठी बातमी! जंतर मंतरवर मोठा गोंधळ, अभिजित दीपके यांच्यावर थेट…नेमकं काय घडलं?.

मोठी बातमी! जंतर मंतरवर मोठा गोंधळ, अभिजित दीपके यांच्यावर थेट…नेमकं काय घडलं?

तुम्ही बोलणं टाळा… डॉक्टरांचा सुप्रिया सुळेंना सल्ला; ट्विटमध्ये काय म्हटलं?.

तुम्ही बोलणं टाळा… डॉक्टरांचा सुप्रिया सुळेंना सल्ला; ट्विटमध्ये काय म्हटलं?

सोनम वांगचुक यांचा औषध घेण्यास नकार, डॉक्टरांनी हेल्थ बुलेटीन जाहीर केले.

सोनम वांगचुक यांचा औषध घेण्यास नकार, डॉक्टरांनी हेल्थ बुलेटीन जाहीर केले

ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाविरोधात नवनीत राणांचे मोठे पाऊल, आता अमरावतीत होणार हनुमान चालिसा पठण!.

ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाविरोधात नवनीत राणांचे मोठे पाऊल, आता अमरावतीत होणार हनुमान चालिसा पठण!

Ashish Shelar : प्रभू राम चंद्रांनी स्वतःच्या भावाला सत्ता दिली आणि उद्धव ठाकरे यांनी..आशिष शेलारांचा मनाला लागेल असा वार.

Ashish Shelar : प्रभू राम चंद्रांनी स्वतःच्या भावाला सत्ता दिली आणि उद्धव ठाकरे यांनी..आशिष शेलारांचा मनाला लागेल असा वार

10 चेंडूत 0..! क्रिकेटच्या पंढरीत रोहित शर्माचा रेकॉर्ड कसा? जाणून घ्या लॉर्ड्सवरील कहाणी.

10 चेंडूत 0..! क्रिकेटच्या पंढरीत रोहित शर्माचा रेकॉर्ड कसा? जाणून घ्या लॉर्ड्सवरील कहाणी