AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐनवेळी AB फॉर्मचा घोळ झाला, पण शिंदेंची लय भारी चाल; अहिल्यानगरात शिवसेनेची मास्टरस्ट्रोक खेळी

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या ५ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाने १० अपक्ष उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या या निवडणुकीसाठी शिवसेनेची नवी रणनीती काय आहे, ते जाणून घ्या

ऐनवेळी AB फॉर्मचा घोळ झाला, पण शिंदेंची लय भारी चाल; अहिल्यानगरात शिवसेनेची मास्टरस्ट्रोक खेळी
Eknath Shinde
| Updated on: Jan 07, 2026 | 4:00 PM
Share

महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. त्यातच आता अहिल्यानगरमध्ये सत्ता मिळवण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महापालिकेच्या या लढाईत प्रत्येक प्रभाग जिंकण्यासाठी व्यूहरचना आखली जात असतानाच अहिल्यानगरमध्ये शिवसेनेने एकनाथ शिंदे गटाने मोठी राजकीय खेळी खेळली आहे.

निवडणुकीत चुरस

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आता मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५ उमेदवारांना दिलेले एबी फॉर्म तांत्रिक कारणास्तव बाद झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र आता शिवसेनेने रणनीती बदलत या ५ जणांसह अन्य ५ अशा एकूण १० अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत जाहीर केले आहे. यामुळे अपक्ष म्हणून लढणाऱ्या या उमेदवारांची ताकद वाढली असून या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून एकूण ५४ उमेदवारांच्या अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यात आले होते. मात्र, छाननी दरम्यान त्यातील ५ उमेदवारांचे फॉर्म बाद ठरवण्यात आले. यामुळे हे उमेदवार अधिकृत पक्ष चिन्हापासून वंचित राहिले. त्यामुळे आता पक्षाने या पाचही उमेदवारांना आणि अन्य पाच समर्थकांना अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला आहे.

पुरस्कृत करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे

  • अश्विनी विलास सांगळे
  • उषा मंगेश भिंगारदिवे
  • संदीप यादव
  • अशोक शामराव दहिफळे
  • धनश्री सागर साठे
  • अमित दत्तात्रय खामकर
  • मंगल गोरख
  • हर्षवर्धन कोतकर
  • गौरी गणेश ननावरे
  • दत्तात्रय खैरे

अधिकृत उमेदवारांच्या प्रचारालाही जोरदार सुरुवात

एकीकडे अपक्षांना पाठिंबा दिला जात असतानाच दुसरीकडे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारालाही जोरदार सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेनेचे उमेदवार संजय शेंडगे, सचिन शिंदे, रुपाली दातरंगे आणि वैशाली नळकांडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी शिवसेनेचा नक्की विजय होईल, असा १०० टक्के विश्वास व्यक्त केला. तसेच लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी जाहीर सभा अहिल्यानगर शहरात होणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. यामुळे आता अहिल्यानगरच्या राजकीय मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि विरोधक यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.

समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण...
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण....
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा.
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम.
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल.
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं.