AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: … तर आम्ही एकत्र येऊ शकतो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? रोहित पवारांच्या वक्तव्याने कुणाच्या आशा वाढल्या?

Rohit Pawar on NCP Merger: अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी एकच वेग घेतला. दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे करण्यात आले. अखेरीस दोन्ही पक्ष काही एकत्र आले नाही. कुटुंब म्हणून पवारांची पॉवर दिसून आली. पण पक्ष आणि संघटना वेगळ्या असल्याचे दिसले.

Rohit Pawar: ... तर आम्ही एकत्र येऊ शकतो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? रोहित पवारांच्या वक्तव्याने कुणाच्या आशा वाढल्या?
रोहित पवार, अजितदादा, सुनेत्रा पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 01, 2026 | 1:44 PM
Share

Rohit Pawar on NCP Merger: माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी वातावरण भारावले. दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे करण्यात आले. बैठकीतील फोटो, व्हिडिओही समोर आले. दादांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणायच्या असल्याचा दावा झाला. दोन्ही पक्ष एकत्र काही आले नाही. कुटुंब म्हणून पवारांची पॉवर नेहमी दिसते. आता आमदार रोहित पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादी विलीनि‍करणाच्या चर्चांना हवा दिली आहे. अहिल्यानगरमधील कर्जत मतदारसंघात त्यांनी नागरी प्रश्नांवर आंदोलन छेडले. त्यावेळी त्यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले.

तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपची साथ सोडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो, असे मोठे वक्तव्य शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. शेवटच्या टप्प्यात अजित पवार देखील भाजपच्या विरोधात बोलत होते. अजित पवारांचा पक्ष भाजपच्या मांडीला मांडी लावून बसत असेल तर आम्ही एकत्र कसे येणार? असा सवाल त्यांनी केला. या एकमेव अटीवरच राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाचे घोडे अडलेले आहे. सत्ताधाऱ्यांसोबत जायचे की महाविकास आघाडीत राहायचे यावरून दोन्ही राष्ट्रवादीतील मतभेद यापूर्वी सु्द्धा उफाळून आले होते. तर अजितदादांनी विकासासाठी सत्तेत असणे आवश्यक असल्याचे सांगत राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांसह महायुतीत प्रवेश केला होता.

बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना

बारामती विधानसभा पोटनिवडणूक यंदा बिनविरोध करण्याचा प्रयत्न पवार कुटुंबियांनी केला. प्रमुख पक्षांनी उमेदवार दिले नाही. काँग्रेसने उमेदवार मागे घेतला. पवार विरुद्ध पवार असा सामना झाला नाही. पण भविष्यात पवार विरुद्ध पवार असा सामना टाळता येईल का याविषयी भाष्य करणे घाईचे ठरेल असे रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर म्हणावे लागेल. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी भविष्यात पवार विरुद्ध पवार नको असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी पवार विरुद्ध पवार असा सामना होऊ देणार नाही असे वक्तव्य केले. तर त्यांच्या वक्तव्यानंतर लागलीच त्यांच्याच पक्षाचे आणि कुटुंबातील सदस्य रोहित पवार यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपची साथ न सोडल्यास आगामी विधानसभेत पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला. जर त्यांनी साथ सोडली तर बारामतीकरांना पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला भेटणार नाही, असे सांगायला ही ते विसरले नाहीत.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!