अजित पवार यांच्याकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा, महायुतीच्या जागावाटपावर मोठं वक्तव्य

महायुतीच्या जागावाटपावर तिढा कधी सुटेल? हा प्रश्न सध्या चर्चेला कारण ठरला आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका पार पडत आहे. महायुतीचे नेते जागावाटप ठरवण्यासाठी दिल्लीलादेखील बैठकीला जावून आले आहेत. त्यानंतर आज अजित पवारांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या पहिल्या उमेदवाराचीदेखील घोषणा केली आहे. अजित पवार गटाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली.

अजित पवार यांच्याकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा, महायुतीच्या जागावाटपावर मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महत्त्वाची घोषणा
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 3:06 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांसोबत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. रायगडमधून खासदार सुनील तटकरे हे उमेदवार असतील, असं त्यांनी जाहीर केलं. विशेष म्हणजे शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांचा आज संध्याकाळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल, असं त्यांनी जाहीर केलं. तसेच आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर शिरुरच्या जागेच्या उमेदवाराची घोषणा करु, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. अजित पवार यांनी यावेळी महायुतीच्या जागावाटपाबाबतही महत्त्वाची माहिती दिली.

“आम्ही एकत्रपणे चर्चा करुन जवळपास महायुतीच्या 48 जागांबद्दल महाराष्ट्रात कुणी कोणत्या जागा लढवायच्या त्याबद्दल ठरवलं आहे. जवळपास 99 टक्के काम पूर्ण केलेलं आहे. फक्त आमचं ठरलं आहे की, 28 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे बसून मुंबईला पत्रकार परिषद घेऊ. आता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांकडून लोकसभेच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा

“मी आज पहिल्यांदा रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवार जाहीर करतो. सुनील तटकरे तिथे महायुतीचे उमेदवार असतील. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, तसेच रामदास आठवले, कवाडे, सदाशिव खोत, रासपचे महादेव जानकर, विनायक गोरे, सचिन असे सगळे सहकारी मिळून आम्ही महाराष्ट्रातील 48 जागा लढवत आहोत. काहींनी फॉर्म भरले आहेत. विदर्भात पहिल्या टप्प्यात निवडणुका आहेत. इतर जागांबाबत 28 तारखेला माहिती देईन”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

‘आढळराव पाटील यांचा पुन्हा पक्षप्रवेश होईल’

“आम्ही थोड्या वेळात आंबेगाव जाणार आहोत. आंबेगावात शिवाजी आढळराव पाटील जे 20 वर्षांपूर्वी आपल्या पक्षातून शिवसेनेत गेले होते. त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश देत आहोत. तो पक्षप्रवेश दिल्यानंतर दुसरी जागा मी तिथे पक्षप्रवेश झाल्यानंतर जाहीर करने. त्यानंतर 28 तारखेला महायुतीच्या जागावाटपाबबात माहिती दिली जाईल. पाच वर्षांपूर्वी आम्ही आघाडीच्या बाजूने लढलो. तर देवेंद्रे फडणवीस, शिवसेना महायुती म्हणून लढले. त्यावेळी भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 4, काँग्रेस, नवनीत राणा 1, राणांना आम्ही पुरस्कृत केलं होतं, त्या निवडून आल्या होत्या. तर एमआयएमची 1 जागा छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आल्या होत्या”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.