AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवनीत राणा 3 लाख मतांनी विजयी नव्हे तर पराभूत होतील; ‘त्या’ नेत्याचं वक्तव्य चर्चेत

Balwant Wankhede on Navneet Rana and Loksabha Election 2024 : जात प्रमाणपत्र तर खोटं आहेच आणि नातीही खोट सांगतात...; 'त्या' नेत्याचा थेट हल्लाबोल... नवनीर राणा यांच्यावर टीका करणाऱ्या 'त्या' नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या... वाचा सविस्तर.....

नवनीत राणा 3 लाख मतांनी विजयी नव्हे तर पराभूत होतील; 'त्या' नेत्याचं वक्तव्य चर्चेत
| Updated on: Mar 30, 2024 | 10:44 AM
Share

नवनीत राणा या कालपर्यंत अमरावती जिल्ह्याच्या सून होत्या. आता म्हणतात मी मेळघाटची बेटी झाल्या आहेत… पाच वर्षांत कसं नात बदलू शकतात? जात प्रमाणपत्र तर खोटं आहेच आणि नातं ही खोटं सांगतात… अमरावती मधील ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे.त्यात जनशक्तीचा विजय होईल. खासदार नवनीत राणा 3 लाख मतांनी विजयी नाही तर पराभूत होतील. आता विजय सत्याचा होईल. अमरावतीत परिवर्तन होईल, असं म्हणत महाविकास आघाडीचे अमरावतीचे उमदवार बळवंत वानखडे यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

नवनीत राणांवर टीकास्त्र

अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीची काय ताकद आहे. हे आज विरोधकांना दाखवून देऊ. कोणाला उमेदवारी द्यावी हा भाजपचा अंतर्गत विषय आहे कोणाचेही आव्हान माझ्या समोर नाही. पाच वर्षे राणांची केवळ अरेरावी सुरु होती. त्यांनी नौटंकी केली. या निवडणुकीत एकतफरी माझा विजय होणार आहे. विकासाचे मुद्दे घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पुर्ण झाले नाहीत. त्यामुळे लोकांना आता परिवर्तन हवं आहे. त्यामुळे लोक महाविकास आघाडीला मतदान करतील. विजय माझाच असेल, असं वानखेडे म्हणालेत.

वानखेडे आज अर्ज दाखल करणार

अमरावती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बळवंत वानखडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राहणार उपस्थित आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढली जाणार आहे. आज अमरावतीत महाविकास आघाडी अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.

नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध

नवनीत राणा यांच्या विरोधात महायुतीतीलच नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार बच्चू कडू यांच्याकडून अमरावतीमध्ये उमेदवार देण्यात आलाय. अमरावतीमधील ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांचा आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत प्रहारमध्ये प्रवेश केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बूब प्रहार पक्षाकडून निवडणूक लढणार आहेत. माझ्यासोबत सर्वच पक्षाचे कार्यकर्ते राहतील. काही प्रमाणात युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते देखील माझ्यासाठी काम करतील, असा दावा दिनेश बूब यांनी केला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.