Bachhu Kadu : ना महायुती ना महाविकास आघाडी; राज्यात कुणाचं सरकार येणार? बच्चू कडूंचा 100 टक्के दावा काय?

Bachhu Kadu Big Statement : बच्चू कडू हे राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करत आहे. त्यांना राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे यांची साथ मिळाली आहे. राज्यातील राजकारणात 30 वर्षांपूर्वी एक प्रयोग झाला होता. तसाच काहीसा प्रकार या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळण्याचा दावा करण्यात येत आहे.

Bachhu Kadu : ना महायुती ना महाविकास आघाडी; राज्यात कुणाचं सरकार येणार? बच्चू कडूंचा 100 टक्के दावा काय?
बच्चू कडूंचा दावा काय
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 2:28 PM

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत महामुकाबला होत आहे. दोन्हीकडली तीन पक्ष आणि घटक पक्षांना घेऊन सर्वच जण मैदानात उतरले आहे. राज्यात कुणाचे सरकार येणार याविषयी दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. जनतेचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार हे निकाल लागल्यानंतर समोर येईल. पण प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी यापेक्षा वेगळा दावा केला आहे. त्यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केला आहे. काय आहे त्यांचा दावा?

100 टक्के अपक्षांचं सरकार

राज्यात महाविकास आघाडी अथवा महायुतीचे नाही तर अपक्षांचे सरकार येईल असे बच्चू कडू यांना वाटत आहे. राज्यात 100 टक्के अपक्षांचं सरकार येईल असा दावा त्यांनी केला आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांचं सरकार येईल शंभर टक्के येईल. एक तर मोठ्या पक्षांना अपक्ष बाहेरून पाठिंबा देतील अथवा अपक्षांच्या सरकारमध्ये आताचे बडे पक्ष सामील होतील असा दावा त्यांनी केला आहे. यंदा राज्यात खिचडी सरकारचा प्रयोग होण्याचे मोठे संकेत बच्चू कडू यांनी दिले.

हे सुद्धा वाचा

भाजपामध्ये असंतोष

रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या टीकेवर उत्तर देताना त्यांना एक दिवस लक्षात येईल आणि ते माझ्याबद्दल चांगले बोलायला लागतील, असा दावी त्यांनी केला. रवी राणा हे त्यांचा पक्ष वाढवत आहेत. त्यांनी पद्धतशीरपणे भाजपा कमी केली आहे. येथील अनेक मोठ्या नेत्यांची भाजपामधून हाकलपट्टी झाली आहे. ज्यांनी पक्षासाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या ते भाजपचे नेत दयनीय अवस्थेत आहेत. तर आता राणा दाम्पत्याने भाजपा संपवल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी डॉ. अनिल बोंडे यांच्यावर खरपूस टीका केली.

जोडेंगे और जितेंगे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटोगे तो कटोगे या विधानाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. जोडेंगे और जितेंगे हा आमचा नारा असल्याचे ते म्हणाले. आमच्यावर अजून तरी असं जातीच्या आधारावर राजकारण करण्याची वेळी आली नाही, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. इतक्या खालच्या पातळीवरील राजकारण आम्ही कधीच करणार नसल्याचे ते म्हणाले.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.