AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनायक राऊत यांच्या जागी सर्वसामान्य व्यक्ती असता तर… अंजली दमानिया यांची जोरदार टीका..

शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत चांगल्याच मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सून गिरीजा राऊत हिने गंभीर आरोप केले आहेत. त्यामध्येच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.

विनायक राऊत यांच्या जागी सर्वसामान्य व्यक्ती असता तर... अंजली दमानिया यांची जोरदार टीका..
Anjali Damania
| Updated on: Jul 16, 2026 | 11:35 AM
Share

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राजकीय स्थितीवर मोठे भाष्य केले. यावेळी त्यांनी विनायक राऊत यांना अटक झाली पाहिजे, अशी थेट मागणीच करून टाकली. विनायक राऊत प्रकरणावर बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की, विनायक राऊत यांना अटक होणे गरजेचं होतं पण सामान्य माणूस असता तर त्याला अटक केली असती पण इथे तसं घडताना दिसत नाही. नेत्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. फिरोज बाबा, काझी बाबा यांना अटक करणं गरजेचे आहे. सोनम वांगचूक यांच्याकडे नेत्यांचं दुर्लक्ष आहे, भावना शुन्य सरकार आहे, राजकीय भेद असू शकतात पण माणूस म्हणून त्यांची स्थिती पाहायला हवी.

पुढे अंजली दमानिया यांनी म्हटले की, डब्ल्युबीसी, शुगर, बीपी ड्राॅप झालंय. पत्नीचंही ऐकत नाहीयेत… मी एका कारणासाठी केलंय ते सारथ्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी त्यांची भुमिका आहे. त्यांची प्रकृती खालावतेय, आणि निर्दयी सरकारला काही घेण देणं नाही, काहीच लाज नाही… असंवेदनशील सरकार आहे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

हे आंदोलन चिघळले असं दिसत नाही ही मुलं तशी दिसत नाहीत पण संताप हा येणारच… मी स्वतः दिल्लीला जाऊन काल रात्री दोनला परत आले. यादरम्यान सिया गोयल हिच्या कुटुंबाबद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की,  सियाचं कुटूंब निकृष्ट दर्जाचं सामान विकून मोठी झाली असतील अभिनंदन तुकाराम मुंढे यांचे. सुधीर मुनगंटीवार यांना डावललं जातंय, यापुर्वीही डावललं जातं होते, अतिशय दुर्दैवी आहे.

प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे कपटी नेते, जेवढं लवकर हे सुनेत्रा पवार यांना कळेल तेवढं चांगल. सुनेत्रा पवारांकडे सगळे रेड फ्लॅग्स आहेत… योग्य ती कार्यवाही त्यांनी करावी, असेही यादरम्यान बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांना कोर्टाकडून दिला मिळाला नाही. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत हिने संपूर्ण कुटुंबावर गंभीर आरोप केले.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक