Aurangabad | औरंगाबादेत पाणी प्रश्नावरून नागरिक संतप्त, ज्वलनशील पदार्थ अंगावर घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न

शहरातील आंबेडकर नगर परिसरातील पाण्याच्या टाकीच्या परिसरात झालेल्या आंदोलनात एका नागरिकाने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली.

Aurangabad | औरंगाबादेत पाणी प्रश्नावरून नागरिक संतप्त, ज्वलनशील पदार्थ अंगावर घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न
Image Credit source: tv9 marathi
दत्ता कानवटे

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

May 06, 2022 | 1:59 PM

औरंगाबादः आठ दिवसांनी येणाऱ्या पाण्यावरून औरंगाबादचे नागरिक (Aurangabad citizens) पुन्हा एकदा संतप्त झाले. आज आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर (Water tank ) हल्लाबोल केला. शहराला अनेक वर्षांपासून सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्यामुळे (Summer) आधीच तापमान वाढीचा त्रास आहे. त्यात महावितरण अघोषित लोडशेडिंग करत असल्यामुळे या पाणीपुरवठ्यातही अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अनेक भागातील नागरिक संतप्त आहेत. अखेर हा ताण सहन न झाल्यानं शहरातील आंबेडकर नगर परिसरातील आज आंदोलन छेडलं. शहरातील नागरिकांनी एकत्र येत या परिसरातील पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलं. त्यातच एका नागरिकाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेण्याचा प्रय्तन केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत

महापालिकेच्या नावानं घोषणाबाजी

शहरात अत्यंत विलंबाने होणाऱ्या पाणी वितरणाला कंटाळलेल्या नागरिकांनी आज आंदोलन केलं. यावेळी महापालिका आणि महावितरणच्या नावाने नागरिकांनी घोषणाबाजी केली. या आंदोलनात पुरुष आणि महिलांनीही सहभाग नोंदवला. काही महिलांनी या आंदोलनात रिकाम्या घागरी आणून स्थानिक प्रशासनाचा निषेध केला.

आंदोलक आणि पोलिसांत झटापट

शहरातील आंबेडकर नगर परिसरातील पाण्याच्या टाकीच्या परिसरात झालेल्या आंदोलनात एका नागरिकाने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी या नागरिकाच्या हातातील ज्वलनशील पदार्थ हस्तगत करून आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतलं आहे. शहरात मागील महिन्यातदेखील सिडको तसेच हाडको परिसरातील नागरिकांनी सकाळच्या वेळीच पाण्याच्या टाकीवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय सक्रिय झाले असून त्यांनी शहराला आठ नव्हे तर किमान चार दिवसांनी तरी पाणी मिळावे, यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. यासंबंधीची प्रक्रिया लवकर कऱण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें