PHOTO: मराठवाड्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं, औरंगाबादेत डेपोत अर्धनग्र आंदोलन

राज्यभरात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद मराठवाड्यातील औरंगाबादसह, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली जिल्ह्यातही दिसून येत आहेत.

| Updated on: Nov 09, 2021 | 12:38 PM
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन आता चांगलंच चिघळलं आहे. या संपात सहभागी झालेल्या औरंगाबाद आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन सुरु केलं आहे. मंगळवारी सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी तीव्र निदर्शनं सुरु केली आहेत.

1 / 6
 कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मराठवाड्यातील 47 आगारातील तब्बल 4 हजार बसची सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचा दररोज सरासरी 1 कोटी 50 लाख रुपयांचा महसूल बुडत आहे.

2 / 6
ऐन दिवाळीत संप असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत आहे. ग्रामीण भागातून खासगी वाहनांनी लोक बस स्थानकात पोहोचत आहे, मात्र बसच बंद असल्यामुळे खासगी वाहनांनी प्रवाशांना जावे लागत आहे. जालना जिल्ह्यात 1700 कर्मचारी संपावर गेल्यामुळे दोन दिवसांपासून 287 बस बंद आहेत. यामुळे जिल्ह्याला 36 लाख रुपयांचा फटका बसला आहे.

3 / 6
बीडः बसचालक आणि वाहकांचा संप सलग चौथ्या दिवशीही सुरु असल्याने बीडमधील प्रवाशांचेही हाल झाले. दिवसभरात विभागातील 1085 फेऱ्या रद्द झाल्याने 51 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. बस बंद असल्याने प्रवाशांनी खासगी वाहतुकीचा आधार घेतला. मात्र संपाच्या संधीचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी मनमानी करत तिप्पट ते चौपट भाडे आकारले. सणानिमित्त गावी गेलेल्या प्रवाशांना मात्र यामुळे मोठा मनःस्ताप सहन करावा लागला.

4 / 6
हिंगोलीतही 1 नोव्हेंबर पासून एसटी महामंडळातील चालक, वाहक आणि यांत्रिक विभागातील कर्चमाऱ्यांनी लढा विलिनीकरणाचा हे आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

5 / 6
bus

bus

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.