AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

72 वर्षीय माऊलीची आभाळमाया, 15 दिवसापासून 300 पोलिसांना भरवतेय घास

बीडमधल्या अशाच पोलिस बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी एका 72 वर्षीय माऊलींनी पुढाकार घेतला आहे (Beed Grandmother serving tiffin to Police).

72 वर्षीय माऊलीची आभाळमाया, 15 दिवसापासून 300 पोलिसांना भरवतेय घास
| Updated on: Apr 13, 2020 | 8:48 PM
Share

बीड: महाराष्ट्र पोलिस ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन कोरोना व्हायरसशी लढा देत आहेत. देशावर कुठलंही संकट आलं तर सर्वात प्रथम आपल्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणारे पोलिसच असतात. आता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातल्या आणि गावातल्या चौका-चौकामध्ये पोलिस आपलं कर्तव्य बजावत असताना अनेक पोलिस बांधवाना आपल्या घरी देखील जाता येत नाही. बीडमधल्या अशाच पोलिस बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी एका 72 वर्षीय माऊलींनी पुढाकार घेतला आहे (Beed Grandmother serving tiffin to Police).

निलावती जगताप असं या आजींचं नाव असून त्यांनी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसाठी खास रुचकर आणि गरम गरम जेवणाची व्यवस्था केली आहे. बीड शहरातील विविध ठिकाणी दिवस-रात्र कर्तव्यावर असलेल्या या पोलिसांना त्या गरमागरम जेवणाचा डब्बा पुरवत आहेत. यासाठी निलावती आजींनी त्यांच्या घरात भव्य स्वयंपाक घर तयार केलं आहे. तेथेच हे सर्व जेवण तयार केलं जातं. त्या दररोज न चुकता आपल्या भव्य अशा स्वयंपाक घरात येतात आणि आपल्या तीन सुनांसमवेत तब्बल 300 हून जास्त डब्बे तयार करतात.

जेव्हापासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्या दिवसापासून निलावतीबाई यांचं संपूर्ण कुटुंब पोलिस बांधवासाठी एकत्र येऊन स्वतःच स्वयंपाक बनवतात. सुरुवातीला फक्त 80 डब्याचा स्वयंपाक केला जायचा. मात्र, आता 300 पेक्षाही जास्त डब्बे पोलिस बांधवाना पुरवले जात आहेत. या कामात निलावती बाईंच्या तिन्ही सुना मदत करत आहेत.

विशेष म्हणजे येथे दररोज रुचकर जेवण देताना उद्या काय पौष्टिक जेवण द्यायचे यावर संपूर्ण कुटुंब एकत्रित बसून विचार मंथन करतं आणि मगच निर्णय घेतला जातो. पोलिसांना पोटभर जेवण देण्याची संकल्पना निलावतीबाई यांचीच असून त्यांचे तीन मुलं स्वतः हे डब्बे पोलिसांना पोहच करतात.

80 डब्यावरुन सुरू झालेला हा प्रवास आज 300 हून जास्त डब्यांच्यावर गेला आहे. संकट काळात सर्वच मदतीसाठी धावून येतात. मात्र, रणरणत्या उन्हात कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांना पौष्टिक आणि गरमागरम जेवण मिळावं हाच उद्देश जगताप कुटुंबांचा आहे. यासाठी दिवसाकाठी हजारो रुपयांचा खर्च येतोय मात्र जेव्हा खर्च किती येतो असं विचारलं त्यावर या माऊलींचं उत्तर आश्चर्यचकीत करणारं होतं.

कोरोना नावाच्या महाभयंकर राक्षसाने देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलंय. शहरात आणि गावखेड्यात ही स्मशान शांतता पाहायला मिळतेय. गेल्या अनेक दिवसापासून उन्हातान्हात महाराष्ट्र पोलिस कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खडा पहारा देत आहेत. त्याच ठिकाणी त्यांना आता जेवणदेखील मिळत असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांना सध्या तरी मोठा आधार मिळाला आहे हे निश्चित!

संबंधित बातम्या :

पिंपरीत मुलगा 9 महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर, लॉकडाऊनमध्ये पोलिस पित्याचा संघर्ष

MPSC-UPSC विद्यार्थ्यांना दिलासा, यंदा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना आणखी 1 वर्ष संधी मिळणार?

ऑटिझमग्रस्त मुलासाठी सांडणीच्या दुधाची गरज, मातेची मोदींना हाक, राजस्थानवरुन मुंबईत दूध दाखल

इथे ओशाळला मृत्यू, ‘कोरोना’च्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाने प्राण सोडले

भाटिया रुग्णालयातील 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, वॉकहार्ट, शुश्रुषा, जसलोकनंतर भाटिया रुग्णालयही सील

Beed Grandmother serving tiffin to Police amid corona

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.