CM Bhandara Visit LIVE | चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरुन डॉ. साधना तायडे यांना हटवले

| Updated on: Jan 10, 2021 | 4:46 PM

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी भंडाऱ्याच्या दौऱ्यावर आहेत

CM Bhandara Visit LIVE | चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरुन डॉ. साधना तायडे यांना हटवले

मुंबई : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डला (CM Uddhav Thackeray Bhandara Visit) शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत 17 नवजात बाळांपैकी 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी भंडाऱ्याच्या दौऱ्यावर आहेत (CM Uddhav Thackeray Bhandara Visit).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी 10.10 वाजता वर्षा बंगल्यावरुन भंडाराकडे रवाना झाले. दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांनी दुर्घटनाग्रस्त बेहरे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर ते भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. यानंतर ते नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करुन त्यांना दिलासा देतील.

मुख्यमंत्र्यांचा भंडारा दौरा कसा असेल?

>> 10.10 वाजता मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान येथून सांताक्रूझ विमानतळाकडे रवाना

>> 11.00 वाजता विमानाने नागपूरकडे रवाना होतील

>> 12.15 वाजता मुख्यमंत्री नागपूर विमानतळावर पोहोचतील

>> 12.20 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शहापूरकडे निघतील

>> 12.40 वाजता ते मौजा शहापूरला पोहोचतील

>> 12.55 वाजता मुख्यमंत्री भंडारा येथे पोहोचून नवजात बालकं गमावलेल्या भोजापूर येथील पालकांची भेट घेतील

>> 1.20 वाजता मुख्यमंत्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचतील, तिथे ते पालकांची भेट घेतील आणि घटनास्थळाचं निरिक्षण करतील

नेमकं प्रकरणं काय?

भंडारा इथं सरकारी रुग्णालयात मध्यरात्री अग्नितांडव झालं. भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही आग लागली. या आगीतून 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला.

CM Uddhav Thackeray Bhandara Visit

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Jan 2021 03:34 PM (IST)

    भंडारा दुर्घटनेच्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून डॉ. साधना तायडे यांना हटवले

    भंडारा दुर्घटनेच्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून डॉ. साधना तायडे यांना हटवले, नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची अध्यक्षपदी नियुक्ती

  • 10 Jan 2021 02:48 PM (IST)

    पुन्हा एकही जीव अशा कारणामुळे जाऊ द्यायचा नाही, या निश्चियाने सरकार काम करेल – मुख्यमंत्री

    दुर्दैवाने ही घटना घडल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या, त्यातून एक धडा घेवून, पुन्हा एकही जीव अशा कारणामुळे जाऊ द्यायचा नाही, या निश्चियाने सरकार काम करेल

  • 10 Jan 2021 02:42 PM (IST)

    आम्ही राज्याची जबाबदारी घेतली आहे - मुख्यमंत्री

    नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वात समिती बनविली आहे, मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी त्यात असतील, राज्याच्या सर्व रुग्णालयाच्या फायर अॅण्ड सेफ्टी ऑडिटचे आदेश दिले आहे, जरी ऑडिट झाले असले तरी पुन्हा करायला लावू, थेट राज्याच्या आरोग्याच्या स्थितीवर जाऊ नका, आम्ही राज्याची जबाबदारी घेतली आहे

  • 10 Jan 2021 02:41 PM (IST)

    दोषींना सोडणार नाही, कारवाई होणार - मुख्यमंत्री

    गेल्या वर्षभरापासून राज्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त आहे, कोरोना संदर्भात काम करताना आरोग्य यंत्रानेबद्दल काही दुर्लक्ष झाले आहे का हे अहवालात समोर येईल, कोणाला ही आरोपी करणार नाही, मात्र दोषींना सोडणार नाही

  • 10 Jan 2021 02:39 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांकडून भंडारा जिल्हा रुग्णालयाची पाहणी

    ही अतिशय भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे, जिथे ही घटना घडली त्या रुग्णालयाची मी आताच पाहणी केली, हे घडलं कशामुळे हे बघावं लागेल, आधी त्या विशिष्ट उपकरणाबाबत काही मागमी करण्यात आली होती का, कुठली तक्रार आली होती का?, हे पाहावं लागेल

  • 10 Jan 2021 01:58 PM (IST)

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे भंडारा जिल्हा सामान्य रुगणालयात पोहचले

    भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात मुलांच्या एसएनसीयु कक्षात लागलेल्या आगीत 10 नवजात मुलांचा होरपळुन मृत्यू झाला, या प्रकणाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे भंडारा जिल्हा सामान्य रुगणालयात पोहचले आहेत

  • 10 Jan 2021 01:50 PM (IST)

    भंडारा दुर्घटनेची चौकशी करणार, दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री

    गेलं वर्षभर कोरोनाचा सामना करताना इतर गोष्टींकडे डोळेझाक केली गेली का?, याची चौकशी करण्याचे आदेशमी काल दिले आहेत, संपूर्ण राज्यातील रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट हे लवकरात लवकर करण्याचे आदेश दिलेले आहेत, या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी एक टीम तयार केली आहे, त्यामध्ये विभागीय आयुक्तांना जबाबदारी देण्यात आली आहे, मुंबईतून अग्निशमन दलाचे प्रमुख राम दळे त्यांचीही नेमणुक या टीममध्ये करण्यात आली आहे, कुठेही कसर राहणार नाही, सत्या पुढे येईल आणि त्यात जर कुणी जबाबदार आढळून आलं तर त्याच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही,

  • 10 Jan 2021 01:46 PM (IST)

    भंडारा दुर्घटनेची चौकशी करणार, दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री

    या घटनेनंतर एक चौकशी तर झालीच पाहिजे, यामध्ये हा अपघात अचानक घडला आहे, की अहवाल आल्यानंतरही दुर्लक्ष झालं आहे हेही तपासलं जाईल

  • 10 Jan 2021 01:44 PM (IST)

    मी त्या कुटुंबीयांना भेटलो, हात जोडू उभं राहण्याशिवाय माझ्याकडे आणखी काहीही शब्द नव्हते : मुख्यमंत्री

    आपण पाहिलं असेल की दुर्घटना आम्ही गांभीर्याने घेतली आहे, मी इथे आलो आहे, माझ्यासोबत इतरही मंत्री आहेत, जी दुर्घटना घडली त्यात नेमकं काय घडलं हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही, मी आज त्या कुटुंबीयांना भेटलो, हात जोडू उभं राहण्याशिवाय माझ्याकडे आणखी काहीही शब्द नव्हते कारण सांत्वन करता येईल असे कोणतेही शब्द माझ्याकडे नाहीत

  • 10 Jan 2021 01:40 PM (IST)

    मुख्यमंत्री बेहरे कुटुंबीयांच्या भेटीला

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बेहरे कुटुंबीयांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांसोबत नाना पटोलेही उपस्थित

  • 10 Jan 2021 12:44 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर दाखल, हेलिकॅप्टरने भंडाऱ्याकडे रवाना होणार

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर दाखल, हेलिकॅप्टर ने होणार भंडाराकडे रवाना, भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात 10 बालकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार, त्यानंतर भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार

  • 10 Jan 2021 10:14 AM (IST)

    दहा बालकांचा गुदमरुन मृत्यू सरकारी अनास्थेचे बळी : चित्रा वाघ

    भंडारा जळीतकांडाप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, दहा बालकांचा गुदमरुन मृत्यू सरकारी अनास्थेचे बळी, भंडारा दुरघटनेत आम्ही राजकारण करणार नाही, मात्र, चौकशी करुन दोषीवर कारवाई झाली पाहीजे, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट

  • 10 Jan 2021 09:53 AM (IST)

    भंडारा भोजापूर गिता बेहरे कुटुंबीयांची आरोग्य तपासणी सुरु, दोन महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

    भंडारा भोजापूर गिता बेहरे कुटुंबीयांची आरोग्य तपासणी सुरु, भंडारा सामान्य रुग्णालयात त्यांच्या दोन महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू, आज मुख्यमंत्री घेणार बेहरे परिवाराची भेट, मृतक चिमुकलीच्या वडीलांना पैसे नको, केली सरकारी नोकरीची मागणी

Published On - Jan 10,2021 3:34 PM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.