‘महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच महाभारत, महायुती 4 जूनला विखुरली जाणार’, नाना पटोलेंचा मोठा दावा

"महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच महाभारत होत आहे. आताही आहे आणि ते आणखीनही वाढेल. नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या आधारवर देशाच्या अनेक राजकीय पक्षांना फोडून जी हालत केली, आणि त्यांच्याबरोबर गेलेल्यांची हालत 4 तारखेला बारा वाजेपर्यंत कळणार", असं नाना पटोले म्हणाले आहेत.

'महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच महाभारत, महायुती 4 जूनला विखुरली जाणार', नाना पटोलेंचा मोठा दावा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 9:02 PM

“महायुतीमध्ये महाभारत सुरुवातीपासूनच होतं. आताही आहे आणि अजून ते वाढेल. 4 तारखेला जेव्हा निकाल येतील तर दुपारी बारा वाजेपर्यंत महायुती ही विखुरलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे”, असा मोठा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. “आम्ही मधल्या काळातही सांगत होतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अग्निविर योजना जी आखलेली आहे ती फक्त मिलिटरीमध्येच नाही तर राजकीय व्यवस्थांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे ना शहिदांचा दर्जा, ना पेन्शन अशी परिस्थिती अनेक राजकीय पक्षांची आहे. नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या आधारावर देशाच्या अनेक राजकीय पक्षांना फोडून ज्या पद्धतीने महायुती निर्माण केली, आणि जे त्यांच्याबरोबर गेले त्यांची हालत काय होणार आहे हे 4 तारखेला आपल्याला दुपारच्या 12 वाजेपर्यंत कळणार आहे”, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

भिवंडी येथील भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात बोगस मतदान झाल्याच आरोप केलाय. याच मुद्द्यावरुन त्यांची मतदान केंद्राबाहेर पोलिसासोबत बाचाबाची होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिओवर नाना पटोले यांनी टीका केली आहे. “भाजपला सत्तेची मस्ती आहे, आणि ती मस्ती अजूनही उतरलेली नाही. लोकांचा कौल हा त्यांच्या विरोधात आहे. ते सत्तेच्या मस्तीमुळे पोलिसांनाही शिव्या घालायला मागेपुढे पाहत नाहीत, असे चित्र आपण पाहतो आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

पुण्याच्या घटनेवरुनही पटोलेंचा भाजपवर निशाणा

पुण्याच्या हिट अँड रन केसवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “न्यायालयाच्या निर्णयाला आक्षेप घेण्याचे कुठलेही कारण नाही. पण राज्यात ज्याप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, आणि राज्याच्या सरकारने एक्साईज वाढवण्यासाठी दारूची दुकानं,‌ मोठ्या प्रमाणात ड्रग्स जो गुजरातमधून महाराष्ट्रात आणायची व्यवस्था केली. त्याचे परिणाम आपण पाहतोय”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

“निरपराध लोकांचा जीव जातोय. पुण्यामध्ये एका श्रीमंत माणसाने नशेमध्ये दोन लोकांना चिरडून मारलं. अशी परंपरा महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती. पण भाजपच्या या भ्रष्टाचारी व्यवस्थेने जनतेला लुटण्याचं आणि व्यसनाधीन करण्याचं पापं केलं आहे. त्याचे परिणाम आपण पाहतोय आणि म्हणून पुण्यामध्ये एका श्रीमंत माणसाच्या गाडीखाली नशेमध्ये धुंद असलेल्या माणसाने निरपराध दोघांना चिरडून मारण्याचा पाप केलंय. त्यामुळे पोलिसांपेक्षा महाराष्ट्र सरकारचा जास्त दोष आहे. म्हणून या सरकारलाच आता सत्तेतून बाहेर काढा”, अशी भूमिका जनतेच्या मनात आहे.

“सत्तेमध्ये काहीही करू शकतात. निरपराध लोकांना फाशीवर चढवू शकतात. अनेक प्रकरणं महाराष्ट्रात झाली. जे लोक दोषी आहेत त्यांना निरपराध कसं करता येईल? तोही प्रयत्न हे लोक करतात. त्यामुळे हे काहीही करू शकतात आणि सत्तेच्या दुरुपयोग कसा करायचा हा भाजपप्रणित सरकारच्या दृष्टिकोन आहे. या घटनेच्या निमित्ताने हे लक्षात येतं”, असा दावा नाना पटोले यांनी केला.

Non Stop LIVE Update
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....