Bhandara News : नेहमीप्रमाणे तरुण खदानीजवळ शौचासाठी गेला होता, बराच वेळ परतला नाही म्हणून घरचे पहायला गेले तर…

नेहमीप्रमाणे तरुण खदानीजवळ शौचाला गेला. मात्र तास होत आला तरी तो घरी परतला नाही. घरच्यांनी शोधाशोध केली असता धक्कादायक दृश्य समोर आलं.

Bhandara News : नेहमीप्रमाणे तरुण खदानीजवळ शौचासाठी गेला होता, बराच वेळ परतला नाही म्हणून घरचे पहायला गेले तर...
शौचास गेलेला तरुण खदानीत बुडालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 9:16 AM

भंडारा / 22 ऑगस्ट 2023 : भंडाऱ्यात बंद खादानींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बंद खदानीत अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच एक घटना भंडाऱ्यात घडली. शौचासाठी खदानीत गेलेल्यी तरुणाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील नवरगाव येथे घडली आहे. प्रशांत शामराव गणवीर असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालात पाठवला. याप्रकरणी अड्याळ पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शौचाला गेला असता पाय घसरुन पाण्यात पडला

नवरगाव येथील ही खदान गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. खदानीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे-झुडुपं आहेत. खदान बंद असल्याने गावातील नागरिक येथे शौचासाठी येत होते. प्रशांतही दररोज तेथे शौचासाठी जात होता. नेहमीप्रमाणे प्रशांत खदानीजवळ शौचाला गेला. यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

घरचे पहायला गेले असता घटना उघड

शौचाला गेलेला प्रशांत बराच वेळ झाला तरी घरी परतला नव्हता. यामुळे घरचे त्याला पहायला खदानीजवळ गेले. खदानीजवळ जाताच त्यांना जे दृश्य दिसले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रशांतचा खदानीत बुडून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी खदानीजवळ एकच गर्दी केली होती. अड्याळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतेदह ताब्यात घेतला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.