AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेत भाजपा बॉस, पण कसा विजय मिळवला? वाचा 5 मोठी कारणं; कुठे गेम फिरला?

BJP BMC Election Victory Reason : मुंबईत पहिल्यांदाच भाजपने सत्ता मिळवली आहे. भाजप, शिवसेना आणि आरपीआय आठवले गटाने 125 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. या विजयाची प्रमुख कारणे जाणून घेऊयात.

मुंबई महापालिकेत भाजपा बॉस, पण कसा विजय मिळवला? वाचा 5 मोठी कारणं; कुठे गेम फिरला?
BMC BJP VictoryImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 6:16 PM
Share

राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. मुंबईत पहिल्यांदाच भाजपने सत्ता मिळवली आहे. भाजप, शिवसेना आणि आरपीआय आठवले गटाने 125 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता मुंबईत महायुतीचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे ठाकरे बंधुंना मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या या विजयामागे अनेक कारणे आहेत. यातील 5 प्रमुख कारणांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विकास- प्रचारा केंद्रस्थानी ठेवलेला मुद्दा.

भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी प्रचार करताना भाजप सरकारच्या काळात केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. मुंबईतील रस्ते, फ्लायओव्हर, मुंबईकरांसाठी घरे यासह अनेक अनेक मुद्यांवर महायुतीनी मते मागितली. याचीच पोचपावती त्यांना जनतेने दिली आहे. मुंबईकरांनी महायुतीच्या 125 पेक्षा जास्त उमेदवारांना विजयी केलं आहे.

ठाकरेंच्या मराठी अस्मितेला- हिंदू, मराठी महापौरने उत्तर

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधुंकडून मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मुंबई भाजपच्या हातात मराठी माणसाची कोंडी होईल असं ठाकरेंकडून सांगण्यात आलं, मात्र या भाजप आणि महायुतीकडून मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच होईल अशी ग्वाही मतदारांना दिली. त्यामुळेचे मराठी लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचे या निकालातून समोर आले आहे.

भाजपा, शिंदे यांची जोरदार निवडणूक रणनीती, प्लॅनिंग- सभा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदेंनी जबरदस्त तयारी केली होती. दोन्ही नेत्यांनी अनेक सभा घेतल्या. या सभांमधून विरोधकांवर टीका टाळत विकास कामांची माहिती जनतेला दिली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती या सभांच्या माध्यमातून जनतेला देण्यात आली. तसेच आगामी 5 वर्षांमध्ये भाजपाचा विकासाचा प्लॅन काय आहे याची हेही भाजपकडून पटवून देण्यात आले. त्यामुळे हा मोठा विजय मिळाला.

शिदेंची साथ- फायदा झाला

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकनाथ शिंदेंसोबत महायुती करत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. यामुळे एकनाथ शिंदेंच्या मागे असलेली ताकदही भाजपला मिळाली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे तळागाळापासून भाजपला फायदा झाला. याचेच फळ म्हणून आज महायुती मुंबईत विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

7 वर्षांपासूनची मेहनत- आशिष शेलार, अमित साटम यांची मेहनत

मुंबई महापालिकेसाठी भाजपने गेल्या 6-7 वर्षांपासून प्लॅनिंग केले होते. सुरूवातीला आशिष शेलार आणि त्यानंतर आता अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजपकडून रणनीती आखण्याचे काम केले होते. तळागळात कार्यकर्ते काम करत होते. भाजपने या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाल्याचे आता समोर आले आहे.

Follow Us
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...
धक्कादायक! तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...संभाजीनगरात हाय वोल्टेज ड्रामा!
शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!
Sunil Tatkare | शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!
भाजपाला सर्वात मोठा धक्का, गोकुळ गीतेंची माघार नाहीच, बाप काढल्याने...
भाजपाला सर्वात मोठा धक्का, गोकुळ गीतेंची माघार नाहीच, बाप काढल्याने नाशकात संघर्ष अटळ!