AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026 : महायुती जिंकली तर मुंबईचा महापौर कोण? सस्पेन्स संपला, बड्या नेत्याने थेट जाहीरच केलं!

मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मुंबईचा महापौर नेमका कोण होणार? असे विचारले जात आहे. याच प्रश्नाचे उत्तर महायुतीच्या नेत्याने दिले आहे.

BMC Election 2026 : महायुती जिंकली तर मुंबईचा महापौर कोण? सस्पेन्स संपला, बड्या नेत्याने थेट जाहीरच केलं!
devendra fadnavis and eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 04, 2026 | 9:30 PM
Share

BMC Election 2026 : मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला असल्याने आता प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. प्रचारसभांमध्ये नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. महायुतीचे नेते तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार आणि तिखट शब्दांत हल्लांबोल करताना दिसत आहेत. दरम्यान, शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरपूम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली असून महापौरपदावरही महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

मराठी आणि हिंदू व्यक्तीच मुंबई पालिकेच्या…

संजय निरुपम यांनी रविवारी (4 जानेवारी) मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी मोठा दावा केला आहे. त्यांनी काहीही झालं तरी या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल. तसेच या विजयानंतर मराठी आणि हिंदू व्यक्तीच मुंबई पालिकेच्या महापौरपदावर बसेल, असा ठाम विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे. हा विजय मुंबईतला मराठी माणूसच ठरवणार आहे, असेही पुढे निरूपम म्हणाले.

25 वर्षात मुंबईकरांना स्वच्छ पाणी मिळालेले नाही

पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी साधारण 25 वर्षे मुंबईच्या महापालिकेवर सत्ता गाजवली. परंतू मुंबईचा सर्वांगीन विकास होऊ शकला नाही. गेल्या 25 वर्षात मुंबईकरांना स्वच्छ पाणी मिळालेले नाही. सोबतच पुरेसे पाणीदेखील उपलब्ध झालेले नाही. मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती खूपच खराब आहे. रुग्णालयांचे व्यवस्थापनही व्यवस्थित केले जात नाहीये. शाळांची स्थिती बिकट आहे, असे अनेक आरोप निरुपम यांनी केले.

25 वर्षांत ठाकरे यांना विकास करता आला नाही

मुंबई आजही मूलभूत सोई-सुविधांसाठी झगडते आहे. गेल्या 25 वर्षांत ठाकरे यांना विकास करता आला नाही. आता ते मतदारांना पोकळ आश्वासनं देत आहेत, असाही हल्लाबोल त्यांनी केला.

दरम्यान, महायुती हिंदुत्त्व आणि विकासाच्या मुद्द्याला पुढे करून निवडणूक लढवत आहे. तर ठाकरे बंधूंनी मराठी माणूस हा मुद्दा लावून धरला असून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे इथे नेमकं कोण विजयी ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आव्हाडांमुळेच आघाडीत मिठाचा खडा, काँग्रेसच्या नेत्याच्या आरोपानं खळबळ
आव्हाडांमुळेच आघाडीत मिठाचा खडा, काँग्रेसच्या नेत्याच्या आरोपानं खळबळ.
बंडखोरीनंतर शिल्पा केळूस्करांना अधिकृत उमेदवारी मात्र...
बंडखोरीनंतर शिल्पा केळूस्करांना अधिकृत उमेदवारी मात्र....
मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणा भडकल्या अन् अजित दादांचं नाव घेत...
मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणा भडकल्या अन् अजित दादांचं नाव घेत....
बिनविरोध नगरसेवक निवडीवरुन मनसे कोर्टात, वकील असीम सरोदे थेट म्हणाले..
बिनविरोध नगरसेवक निवडीवरुन मनसे कोर्टात, वकील असीम सरोदे थेट म्हणाले...
...त्याशिवाय मुंबईचा महापौर शक्य नाही, नवाब मलिकांच्या दाव्यानं खळबळ
...त्याशिवाय मुंबईचा महापौर शक्य नाही, नवाब मलिकांच्या दाव्यानं खळबळ.
माघारीसाठी थेट उमेदवाराला फोन, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाचा ऑडिओ व्हायरल
माघारीसाठी थेट उमेदवाराला फोन, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाचा ऑडिओ व्हायरल.
अर्जांच्या गोंधळावरून पालिका अधिकाऱ्यांवर ठपका, कुलाब्यात घडलं काय?
अर्जांच्या गोंधळावरून पालिका अधिकाऱ्यांवर ठपका, कुलाब्यात घडलं काय?.
सत्ताधाऱ्यांची मनमानी अन् यंत्रणांचा उन्माद... 'सामना'तून टीकास्त्र
सत्ताधाऱ्यांची मनमानी अन् यंत्रणांचा उन्माद... 'सामना'तून टीकास्त्र.
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कधी लाँच होणार? कोणत्या मार्गावर धावणार?
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कधी लाँच होणार? कोणत्या मार्गावर धावणार?.
66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे आज हायकोर्टात, निवडणुकीपूर्वी...
66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे आज हायकोर्टात, निवडणुकीपूर्वी....