Bhendval Bhavishwani : पृथ्वीचा काही भाग… भेंडवळच्या त्या भविष्यवाणीने भरली धडकी, पिकपाण्याचे काय भाकीत?
Bhendval Prediction : बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील भविष्यवाणीने देशाच्या राजासाठी येणारा काळ कसोटी पाहणारा असेल असे भाकीत केले आहे. तर अजून एका भाकिताने मोठी धडकी भरवली आहे. पिकपाण्याविषयीच्या भविष्यवाणीने पण चिंता वाढवली आहे.

https://www.tv9marathi.com/international/pahalgam-terrorist-attack-pakistani-female-mp-palwasha-khan-provocative-statements-the-first-brick-of-the-babari-masque-will-be-laid-by-major-general-asim-munir-1395392.htmlबुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील भविष्यवाणीने देशाच्या राजासाठी कसोटीचा काळ असल्याचा दावा केला आहे. सध्याची परिस्थिती पाहता त्यात तथ्य असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पिकपाणी, आरोग्य, हवामानाविषयीच्या भाकिताने सुद्धा धडकी भरवली आहे. या भविष्यवाणीकडे पंचक्रोशीतीलच नाही तर राज्याचे लक्ष लागले आहे. देशातील मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशातील लोक सुद्धा या भविष्यवाणीकडे लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून भेंडवळमध्ये काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येत आहे.
भाकीत वर्तवण्याची जुनी पंरपरा




साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखात आज भेंडवळ येथे भाकीत वर्तविण्यात आले आहे. सारंगधर महाराज वाघ यांनी ही भविष्यवाणी केली आहे. कालच त्याची तयारी करण्यात आली होती. कालच घट मांडण्यात आले होते. देशावर मोठा संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र युद्ध होणार नाही. तसेच राजा हा तणावत राहिल असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.
पृथ्वीचा काही भाग नष्ट होणार
भेंडवळ येथे घटमांडणी करून भाकीत वर्तवण्याची जुनी परंपरा आहे. त्याला आता साडेतीनशे वर्षे झाली आहे. पाणी पाऊसाविषयी अनिश्चितता असेल असे सांगण्यात आले आहे. या भाकिताद्वारे पिकाची परिस्थिती ही सर्वसाधारण राहणार असल्याची माहिती पुंजाजी महाराज यांनी दिली तसेच पाऊस सुद्धा सर्वसाधारण राहील, असे भाकीत आहे. तर पृथ्वीचा काही भाग हा नष्ट होण्याची संकेत या भाकिताद्वारे वर्तविण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठावर भेंडवळ हे गाव आहे. या गावात 370 वर्षांपासून घटमांडणी करून भविष्य वर्तवण्यात येते. अक्षय तृतीय्येला घटमांडणी करण्यात येते. विविध धान्य, डाळी यांचा त्यासाठी वापर करण्यात येते. घट मांडणी करताना शेतात एक खड्डा करण्यात येते. त्यात घट बसवून त्या भोवती धान्य राशी, डाळी ठेवण्यात येतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी ते धान्य,डाळी यांचे निरीक्षण करून ठोकताळ्यानुसार भेंडवळचे भाकीत करण्यात येते.