पोलीस भरतीचा घोळ फॉर्म भरण्यापासूनच सुरू, सर्व्हर डाऊनमुळे अडचणीच अडचणी

शंकर देवकुळे

शंकर देवकुळे | Edited By: महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Nov 29, 2022 | 12:49 AM

पोलीस भरतीच्या जागा निघाल्या असल्या तरी आता फॉर्म भरण्यापासूनच उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पोलीस भरतीचा घोळ फॉर्म भरण्यापासूनच सुरू, सर्व्हर डाऊनमुळे अडचणीच अडचणी

सांगलीः काही दिवसापूर्वी पोलीस भरतीची जाहिरात आल्यानंतर राज्यातील अनेक बेरोजगार युवक युवतींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. पोलीस भरती होण्यासाठी उमेदवारांकडून तयारी केली जात आहे. मात्र आता राज्यात 18 हजार पोलीस भरतीच्या जागा निघाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी उमेदावारांनी घाई केली आहे. मात्र तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे एका उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी किमान चार ते पाच दिवस लागत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पोलीस भरतीचा फॉर्म भरताना परीक्षार्थींना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी गडबड चालू केलेली असतानाच ज्या वेबसाईटवरून फॉर्म भरला जात आहे.

त्या वेबसाईटवर सर्व्हर डाऊन असल्यामुळे फॉर्म भरताना अनेक अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे एक फॉर्म सबमिट करताना किमान चार ते पाच दिवस लागत आहेत. सांगली जिल्ह्यातील उमेदवार जिल्ह्याच्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी पहाटे चार वाजता सांगलीत येत आहेत.

त्यामुळे दिवसभर थांबूनही फॉर्म सबमिट होत नसल्याने 30 तारखेपर्यंत फॉर्म भरले गेले नाहीत तर भरतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांचे प्रचंड नुकसान होणार आहे.

त्यामुळे 30 तारीख ही अंतिम मुदत न ठेवता ती वाढवण्यात यावी अशी मागणी आता या परीक्षार्थींनी केली आहे.

पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी शासनाकडून 30 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र आता सांगली जिल्ह्यात सर्व्हर डाऊन असल्यामुळे उमेदवार दिवस आणि रात्र नेट कॅफेमध्ये बसून आहेत. उमेदवारांकडून नेट कॅफेमधून फॉर्म भरतानाही अनेक अडचणी येत असून फॉर्मच अपलोड होत नाहीत ही समस्या निर्माण झाली आहे.

तर फी भरण्यासाठी पहाटे चारपर्यंत थांबावे लागत आहे. फॉर्म भरताना उमेदवारांचा मेल व्हेरिफाय न होणे, पेमेंट गेट वे होत नाही, तर एक अर्ज भरण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत आहेत. त्यामुळे शासनाकडूही फॉर्म भरण्याची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI