AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याचा शेवट चांगला ते..; मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी काय म्हणाले छगन भुजबळ?

नाशिकमधील येवला इथले आमदार छगन भुजबळ आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सकाळी दहा वाजता शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. उशीर झाला का? या प्रश्नावर भुजबळांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

ज्याचा शेवट चांगला ते..; मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी काय म्हणाले छगन भुजबळ?
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 20, 2025 | 12:43 PM

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात येणार असून धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश केला जाणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं,” असं ते यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांचे आभार मानले. मंत्रिमंडळात सध्या दोन जागा रिक्त आहेत. यापैकी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा रिकामी झाली होती. आज सकाळी 10 वाजता राजभवनात शपथविधी होणार आहे. भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा हेच खातं सोपविलं जाणार आहे.

शपथविधीला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो. मी लासलगाव, येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो. मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो. ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, त्या सर्वांचे मी आभार मानतो. हे सगळं आठ दिवसांपूर्वीच ठरलं होतं. तेव्हा आमची मिटींग झाली होती. तेव्हाच सगळं ठरलं होतं. आधी सोमवारी शपथविधी होणार असं ठरलं होतं. परंतु मंगळवारी सर्व मंत्री असतील म्हणून आजचा दिवस ठरवण्यात आला.” यावेळी त्यांना उशीर झाला का, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी “ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं” हीच प्रतिक्रिया पुन्हा दिली.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील एक प्रमुख ओबीसी चेहरा असलेल्या भुजबळांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं होतं. नाशिकमधील येवला इथले आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्याने जनतेत निराशा पसरली होती. त्यांनी यापूर्वी वेगवेगळ्या सरकारांमध्ये उपमुख्यमंत्रीपदासह कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केलं आहे. धनंजय मुंडे यांनी मार्च महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचं नाव प्रमुख आरोपी म्हणून समोर आलं होतं. या प्रकरणानंतर मुंडेंनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला होता.

पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?.
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?.
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय.
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.