…तर राज्य सरकारच्या माध्यमातून लस निर्मिती करु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवार) नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. (Uddhav Thackeray Press Conference)

...तर राज्य सरकारच्या माध्यमातून लस निर्मिती करु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

नंदुरबार : राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यावर लॉकडाऊन हा मार्ग आहे. नवा स्ट्रेन महाराष्ट्रात अद्याप नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज (शुक्रवार) नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी ही माहिती दिली. (CM Uddhav Thackeray Press Conference at Nashik Nandurbar Tour)

लस घेतली तरी मास्क वापरणं बंधनकारक

“राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यावर सध्या लॉकडाऊन हा मार्ग आहे. मात्र जनता मला सहकार्य करणार याची खात्री आहे. कोरोना लस ही एक ढाल आहे. त्यामुळे लोकांनी ही लस टोचून घ्यावी. कोणतीही भीती मनात ठेवू नका. पण लस घेतली तरी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

महाराष्ट्र सरकारकडून लस निर्मिती

“महाराष्ट्रात कोरोना लस कमी पडणार नाही, याची खात्री केंद्र सरकारने दिली आहे. केंद्राने पुरवठा नियमित होईल असे सांगितले आहे. तसेच ICMR मार्गदर्शनाखाली भारत बायोटेक जी कोरोना लस बनवत आहे. तिचं उत्पादन महाराष्ट्रात करु इच्छितो, तर त्याला परवानगी द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केले आहे. यावर पंतप्रधान मोदींनी याबाबतचा प्रस्ताव द्या त्याला मंजूरी देतो, असे सांगितले आहे.

त्यानुसार येत्या काही दिवसात हा प्रस्ताव पाठवला जाईल. या प्रस्तावावर सकारात्मक परवानगी मिळाली तर येत्या काही महिन्यात ही लस बनवली जाणार आहे. हाफकीन माध्यमातून, महाराष्ट्र सरकार लस निर्मिती करेल,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray Press Conference at Nashik Nandurbar Tour)

मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य केंद्रांची पाहणी

दरम्यान  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंनी सकाळी नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या मोलगी आणि धडगाव येथील आरोग्य केंद्रांची पाहणी केली. उद्धव ठाकरे यांचा दौऱ्याला नाशिकमधील ओझरहून सुरुवात झाली. तिथून ते नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या मोलगी आणि धडगावला पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी कोरोना लसीकरणाच्या संदर्भातील माहिती घेऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

(CM Uddhav Thackeray Press Conference at Nashik Nandurbar Tour)

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्री नाशिक-नंदुरबार दौऱ्यावर, सातपुडा डोंगररांगांतील आरोग्य केंद्रांची पाहणी करणार

Maharashtra Covid-19 New Guidelines | राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी, ऑफिसात 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना

दारु पिण्यासाठी कोरोनाग्रस्त कोव्हिड सेंटरबाहेर, मद्यधुंद होऊन रस्त्यावर पडला, बुलडाण्यातील प्रकार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI