भाजप आमदाराचा गौतमी पाटील हिच्यासोबत तुफान डान्स, वडेट्टीवारांकडून ‘तो’ व्हिडीओ ट्विट

BJP MLA Dance with Gautami Patil : भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी गौतमी पाटील हिच्यासोबत डान्स केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संबंधित व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

भाजप आमदाराचा गौतमी पाटील हिच्यासोबत तुफान डान्स, वडेट्टीवारांकडून 'तो' व्हिडीओ ट्विट
भाजप आमदाराचा गौतमी पाटील हिच्यासोबत डान्स
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 4:55 PM

काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार संदीप धुर्वे यांचा डान्सर गौतमी पाटील हिच्यासोबत नृत्य करतानाचा व्हिडीओ ‘एक्स’वर (X) शेअर केला आहे. या ट्विटमध्ये विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार संदीप धुर्वे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्या टीकेला संदीप धुर्वे यांनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे. दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत भाजप आमदार धुर्वे चांगलाच ठेका घेताना दिसत आहेत. ते गौतमी पाटील हिच्यासोबत मंचावर नृत्य करताना दिसत आहेत. संबंधित व्हिडीओ विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरुन ट्वीट करत समोर आणला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी नाचलो, अशी प्रतिक्रिया आमदार संदीप धुर्वे यांनी दिली आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“भाजपचे आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

“झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या – शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते”, असी भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

“आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? महायुती सरकार जितकं असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहेत. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार आहे”, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

व्हिडीओ पाहा :

आमदार संदीप धुर्वे यांची प्रतिक्रिया काय?

“माझ्या कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला होता. त्यांच्या आग्रहाखातर मी ठेका धरला. मी माझ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नाराज करु शकत नाही. गौतमी पाटील या खूप फेमस डान्सर आहेत. त्या कधीही कुणासोबत नाचत नाहीत. पण मी ठेका धरल्यानंतर त्यांनीसुद्धा माझ्यासोबत ठेका धरला. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. यावेळी प्रचंड तरुण मंडळी होती, ते वातावरण तसं होतं हे सत्य आहे. विरोध करणारे विरोधक त्यांचं कामच आहे”, अशी प्रतिक्रिया संदीप धुर्वे यांनी दिली आहे.

हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.
तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?
तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा.
दादांचे कट्टर समर्थक तुतारी फुंकणार? अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ अन्
दादांचे कट्टर समर्थक तुतारी फुंकणार? अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ अन्.
मुख्यमंत्रिपदावरून कुणी घातलं बाप्पाला साकडं? कोण मुख्यमंत्री होणार?
मुख्यमंत्रिपदावरून कुणी घातलं बाप्पाला साकडं? कोण मुख्यमंत्री होणार?.
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?.
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.