राज्यात ‘या’ जिल्ह्यात पोहोचली कोरोनाची लस; आता काऊंटडाऊन सुरू!

महाराष्ट्रात कोरोना लस पोहोचली असून लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी येथील प्रशासनाने कंबर कसली आहे. (Corona vaccination Maharashtra update)

राज्यात 'या' जिल्ह्यात पोहोचली कोरोनाची लस; आता काऊंटडाऊन सुरू!
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 3:21 PM

मुंबई : केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सीरमच्या दोन कोरोना लसींना (Corona Vaccine) परवानगी दिल्यानंतर आता येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून (serum institute) देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातही कोरोना लस पोहोचली असून लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी येथील प्रशासनाने कंबर कसली आहे. (Corona vaccination in Maharashtra current update of all district)

मुंबईत सकाळीच लस पोहोचली

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला साठा आज (13 जानेवारी) सकाळीच मुंबईत दाखल झाला आहे. महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. मुंबईत कांजूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये लस साठवली जाणार होती, मात्र या स्टोअरेज सेंटरचे काम अपूर्ण असल्याने लसीचा साठा परेलमधील एफ साऊथच्या पालिका कार्यालयात ठेवला आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत.

नाशिक विभागात कोरोना लस पोहोचली 

आज (13 जानेवारी) राज्यात कोरोना 8 उपसंचालक कार्यालयांमध्ये पोहोचत आहे. त्यानंतर येथून ही लस जिल्ह्याचे अधिकारी रेफ्रिजेटेड व्हॅनमधून घेऊन जातील. ही प्रक्रिया 14 जानेवारीपर्यंत पार पाडेल. सध्या नाशिक विभागात कोरोना लस पोहोचली आहे. नाशिक विभागााला एकूण 1 लाख 32 हजार कोव्हीड लसीचे डोस मिळाले आहेत. या विभागांतर्गत नाशिकसह एकूण पाच जिल्ह्यांमध्ये लसीचे वितरण होणार आहे. धुळे जिल्ह्याला 12430 डोस, जळगाव जिल्ह्याला 24320 डोस, नंदुरबार जिल्ह्याला 12410 डोस, तर नाशिक जिल्ह्याला 43,440 कोरोना लसीचे डोस मिळणार आहेत. सध्या अहमदनगर जिल्ह्याला 39290 कोरोना लसीचे डोस प्राप्त झाले आहेत.

औरंगाबादेत सकाळीच कोरोना लस दाखल

औरंगाबाद विभागाला मिळणाऱ्या कोरोना लसींचे डोसही आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात दाखल झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्याला लसीचे एकूण 64 हजार 500 डोसेस मिळाले आहेत. येथे सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. कित्येक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रत्यक्षात दाखल झाल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जातेय.

कोल्हापूरला लस पोहोचली

कोल्हापूर विभागीय कार्यलयांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. येथील विभागीय कार्यालयातही लस पोहोचली आहे. कोल्हापुरात लसीकरणासाठी आरोग्य प्रशासनाकडून 20 आरोग्य केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये तालुका पातळीवर 12 ठिकाणांवर लसीकरण होईल. तर महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 8 ठिकाणी 80 आरोग्य कर्मचारी कोरोना प्रतिंबधक लस देतील.

संबंधित बातम्या :

Corona Vaccine | मुख्य डेपो ते आठ डेपो, तुमच्यापर्यंत लस कधी पोहोचणार, राजेश टोपेंनी मायक्रोप्लॅन सांगितला

कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल, परेलमध्ये साठवणूक, एका दिवसात किती जणांना लस?

सीरमसाठी भावनिक, तर देशासाठी ऐतिहासिक क्षण, अदर पुनावालांकडून संपूर्ण टीमचा फोटो शेअर

(Corona vaccination in Maharashtra current update of all district)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.