वीजवाहक तारांच्या घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या, 10 ते 12 एकर ऊसासह ट्रक्टरचा कोळसा

वीजवाहक तारांच्या घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या, 10 ते 12 एकर ऊसासह ट्रक्टरचा कोळसा

| Updated on: Feb 02, 2022 | 1:29 PM

पुणे (Pune) जिल्ह्यातल्या मावळ नाणे गावातील शेतकऱ्यांचा तोडणीला आलेला ऊस (Sugercane) वीजवाहक तारांच्या झालेल्या घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या पडून खाक झाला आहे. वीस ते पंचवीस एकरातील ऊस या घटनेमुळे जळून खाक (Burn) झाला. या आगीमुळे शेकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुणे (Pune) जिल्ह्यातल्या मावळ नाणे गावातील शेतकऱ्यांचा तोडणीला आलेला ऊस (Sugercane) वीजवाहक तारांच्या झालेल्या घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या पडून खाक झाला आहे. वीस ते पंचवीस एकरातील ऊस या घटनेमुळे जळून खाक (Burn) झाला. या आगीमुळे शेकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संत तुकाराम साखर कारखान्याने नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी या शेतकऱ्याने केली आहे. वेळीच साखर कारखान्याने ऊसाची तोडणी केली असती, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसते. आधीच कमी दर आणि जळिताची कपात अशआ दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. तोडणीला आलेला ऊसही कारखान्यांकडून लवकर घेतला जात नाही, त्यास अनावश्यक उशीर केला जातो. आता ही घटना घडल्यानंतर झालेले नुकसान कारखाना भरून देणार आहे का, असा सवाल शेतकऱ्याने केला आहे.