Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीवर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 5:45 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. “राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदराची आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहोत. त्यामुळे सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपली प्रथा आहे. या प्रथेनुसार अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले आहेत”, असं एकनाथ खडसे म्हणाले. तसेच “कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम असेल की सर्वपक्षीय नेत्यांची जाण्याची आपल्या राज्याची एक चांगली परंपरा आहे”, अशीदेखील प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

एकनाथ खडसे यांनी परभणीतील घटनेवरही प्रतिक्रिया दिली. “संविधानाचा अपमान कोणी करत असेल तर भावना दुखावणे स्वभाविक आहे. पण यातून हिंसाचार करणे, बसेस जाळणे, या घटना काही संयुक्त नाही”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. यावेळी एकनाथ खडसे यांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.

‘कोणालाही गृहमंत्री नेमा आणि…’

“महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे तरी कुठे? आमदाराच्या मामाला पळवलं जातं आणि खून केला जातो. राज्यात अलिकडे पाहिले तर दिवसाढवळ्या खून, चोऱ्या, दरोडा हा व्हायला लागलेला आहे. राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे? मुख्यमंत्री आहे की नाही? हेच लक्षात येईनासे झालं आहे”, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी पुण्याच्या आणि परभणीच्या घटनेवरून नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. “कोणालाही गृहमंत्री नेमा आणि राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात आणा”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे ऑपरेशन लोटसवर काय म्हणाले?

यावेळी एकनाथ खडसे यांना ऑपरेशन लोटस याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फक्त एका वाक्यात उत्तर दिलं. “चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सांगितलेलं आहे की, आम्ही असं कुठलंही ऑपरेशन राबवणार नाहीय”, असं एकनाथ खडसे म्हणाले. शिवसेनेची शक्ती कमी करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न एकनाथ खडसे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ही “अजून तर सुरुवात आहे, एकमेकांविरुद्धच्या अविश्वासाची. आगे आगे देखो होता है क्या”, अशी प्रतिक्रिया दिली.

‘त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल’

यावेळी एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही प्रतिक्रिया दिली. “राज्यात महायुतीला बहुमत मिळून बरेच दिवस झाले आहेत. एक गठ्ठा बहुमत असताना सुद्धा त्यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ लागत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी व्हायला सुद्धा वेळ लागला. महायुतीतील तीनही पक्षांमध्ये मतभेद नसावेत. एकमेकांविषयी अजूनही अविश्वासाची भावना नसावी. प्रत्येकाचा आपापल्या पक्षाला अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न असावा. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

‘ज्याचे जास्त आमदार त्याला जास्त वाटा मिळणार हे नैसर्गिक’

खातेवाटपात भाजपचा वरचष्मा असल्याची चर्चा आहे. त्यावरही एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. “भाजपचे आणि त्यांना पाठिंबा देणारे अशी जवळपास 137 आणि 138 आमदार त्यांच्याकडे आहेत. बहुमतापर्यंत भारतीय जनता पार्टी आज आहे. त्यामुळे ज्याचे जास्त आमदार त्याला जास्त वाटा मिळणार. हे यामध्ये नैसर्गिक आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

खडसे यांच्याकडून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

एकनाथ खडसे यांनी यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “शरद पवार विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठात अनेक विषय त्यांनी शिकवलेले आहेत. या विषयांच्या संदर्भात ज्ञान इतरांना दिलेलं आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि असंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला पुढील कालखंडात मिळावं. त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, अशी प्रार्थना सर्वांच्या माध्यमातून देवाकडे करतो”, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी शुभेच्छा दिल्या.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त एकनाथ खडसे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. “गोपीनाथ मुंडे आणि माझ्यात अत्यंत प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध होते. माझ्या राजकीय जीवनामध्ये मला जे मिळालं, यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा खूप मोलाचा वाटा राहिलेला आहे”, असं गोपीनाथ मुंडे म्हणाले.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.