Eknath Khadse : ‘हो, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, पण…’, घर वापसीवर एकनाथ खडसे काय म्हणाले?

Eknath Khadse : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता एकनाथ खडसे यांनी त्यांची देवेंद्र फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? त्या बद्दल सांगितलं.

Eknath Khadse : 'हो, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, पण...', घर वापसीवर एकनाथ खडसे काय म्हणाले?
Eknath Khadse-Devendra fadnavis
Follow us
| Updated on: Feb 05, 2025 | 1:11 PM

माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर स्वत: एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं. “मी मतदार संघातील विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. भाजपमध्ये जाणं किंवा भाजपमध्ये प्रवेश करणे किंवा कुठलीही राजकीय चर्चा फडणवीस यांच्यासोबत झालेली नाही” असं सांगत एकनाथ खडसे यांनी सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. तुमच्यासोबत गिरीश महाजन होते, असा प्रश्न विचारल्यानंतर “माझ्यासोबत कोणीही नव्हतं, मी एकटा होतो” असं एकनाथ खडसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

“मी मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. माझ्या मतदारसंघात सहकारी तत्वावर सूत गिरणी, मंदिर, इंजिनिअरींग कॉलेज असे काही विषय आहेत. मी त्यांना पत्र दिलं. पण राजकीय विषयांवर कुठली चर्चा झाली नाही” असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. एकनाथ खडसे सध्या शरद पवार यांच्या पक्षात आहेत. अधून-मधून ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरु असतात. मागच्यावर्षी सुद्धा एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार, त्यांना राज्यपाल पदाची जबाबदारी मिळणार अशी चर्चा होती.

म्हणून भाजपची साथ सोडली

मागच्यावर्षी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी खासदार आणि केंद्रात मंत्री असलेल्या सून रक्षा खडसे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी सुद्धा एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. राज्यात विशेषतः खानदेशात भाजपची पाळंमुळं घट्ट करण्यात नाथाभाऊंचा मोठा वाटा आहे. 40 वर्षात त्यांनी विविध पदांवर भाजपचे नेतृत्व केले. पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. पण पक्षातील अंतर्गत कुरबुरु वाढल्या. व्यथित होऊन नाथाभाऊंनी पक्ष सोडला. ते शरद पवार यांच्यासोबत गेले.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....