AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांची लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी घोषणा, टेन्शनच मिटवलं; सभेतच म्हणाले…

शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना हा बाळासाहेबांनी दिलेला मंत्र आहे. खुर्ची आपला अजेंडा नाही. ज्या लोकांनी आपणाला खुर्चीत बसवले त्यांच्यासाठी काम करायचे आहे, असे आवाहन शिंदे यांनी शिवसैनिकांना केले.

एकनाथ शिंदे यांची लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी घोषणा, टेन्शनच मिटवलं; सभेतच म्हणाले...
eknath shinde on ladki bahin yojanaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 28, 2026 | 9:24 PM
Share

Ladki Bahin Yojana : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. लाभार्थी महिलांना नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकूण 3000 रुपये मिळालेले आहेत. तर काही महिलांनी केवायसी पूर्ण न केल्याने तसेच इतर तांत्रिक अडचण आल्याने त्यांना हा लाभ मिळालेला नाही. म्हणूनच राज्य सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याचा पर्याया खुला करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे. ई-केवायसी चालत राहील, असे महत्त्वाचे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. असे असतानाच आता त्यांनी लातूर जिल्ह्यातील राजूर येथे सभेत बोलतानाच एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर दिली आहे.

गेल्या तीन वर्षापासून प्रवेशाचे सोहळे सुरू आहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातूरमधील राजूर येथे सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहीण योजना यावर महत्त्वाचं विधान केलं. महाराष्ट्रात मी जिथे जिथे जातो तिथे लोकांचे प्रेम, जिव्हाळा आनंद पहायला मिळतो. फटाके काही थांबत नाहीत. मी भाग्यवान आहे, गेल्या तीन वर्षापासून प्रवेशाचे सोहळे सुरू आहेत, असे म्हणत पक्षाचा विस्तार होत आहे, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांविषयी शिंदे नेमकं काय म्हणाले?

2022 ला इतिहास घडला आहे, लोकांच्या मनातील सरकार आणले. 30 जूनपर्यंत दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. पीक विमा योजनेबद्दलही विचार करीत आहोत. या भागात उद्योग धंदे,एमआयडीसी सुरू करायला सांगतो. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात दुष्काळ हटवण्याचा आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा शेतकऱ्याचा आहे. म्हणून शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल ते केले जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

लाडकी बहीण योजनेविषयी काय म्हणाले?

शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना हा बाळासाहेबांनी दिलेला मंत्र आहे. खुर्ची आपला अजेंडा नाही. ज्या लोकांनी आपणाला खुर्चीत बसवले त्यांच्यासाठी काम करायचे आहे. अतिवृष्टी झाली, जनावरे दगावली, लोक मृत्युमुखी पडले, शेती वाहून गेली, जमीन खरडून गेली तेव्हा आम्ही जे सांगितले ते केले. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही. दिवाळीपूर्वी शेतकरी कुटुंबांना मदत पोहचवली, अशी आठवणही एकनाथ शिंदे यांनी करून दिली. तसेच लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना त्यांनी कोणीही माईचा लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही. ही योजना सुरूच राहील, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल