Transgender : मनाची घुसमट, पुरूष म्हणून शिक्षकाची नोकरी, आता मात्र ‘त्या’ची झाली ‘ती’; वाचा, प्रवीण म्हणून जन्माला आलेल्या रियाचा प्रवास!

रिया जन्माला आली प्रवीण म्हणून. 6 वर्षे झाल्यानंतर प्रवीणला जाणवू लागले की आपण पुरूष नसून स्त्री आहोत आणि इथूनच तिच्या संघर्षाला सुरुवात झाली.

Transgender : मनाची घुसमट, पुरूष म्हणून शिक्षकाची नोकरी, आता मात्र 'त्या'ची झाली 'ती'; वाचा, प्रवीण म्हणून जन्माला आलेल्या रियाचा प्रवास!
रिया आळवेकरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 11:31 AM

सिंधुदुर्ग : काही काही जीवनप्रवास खूपच अद्भूत असतात. अर्थात असे जीवनप्रवास मार्गदर्शकही ठरत असतात. आता हेच बघा ना, तो जन्माला आला पुरूष (Male) म्हणून. शिक्षक म्हणून त्याने 12 वर्षे नोकरी केली. निसर्गाच्या चमत्काराने त्याची ‘ती’ बनली. हा प्रवास साधा नव्हता. संघर्ष करून त्याचे आणि त्या नंतरच्या तिचे जीवन सुरू असतानाच प्रश्न निर्माण झाला तो नोकरीचा. जिथे 12 वर्षे शिक्षक म्हणून काम केले तिथे आता अचानक शिक्षिका म्हणून कसे वावरायचे. या वेळी मदतीला आले ते प्रशासकीय अधिकारी. भारतातल्या एकमेव तृतीयपंथी (Transgender) सरकारी शिक्षकाची म्हणा किंवा शिक्षिकेची म्हणा ही संघर्षमय आणि तितकीच उत्कंठावर्धक अशी ही कहाणी आहे. आता ती समाजात सहजपणे वावरत आहे. शस्त्रक्रियेनंतर (Operation) नोकरीचा निर्माण झालेला प्रश्नही सुटला आहे.

‘मनाची सुरू झाली होती घुसमट’

रिया आळवेकर… ही सध्या तृतीयपंथामधली पहिली शिक्षिका आहे, असे बोलले जात आहे. रिया जन्माला आली प्रवीण म्हणून. 6 वर्षे झाल्यानंतर प्रवीणला जाणवू लागले की आपण पुरूष नसून स्त्री आहोत आणि इथूनच तिच्या संघर्षाला सुरुवात झाली. आता हे घरच्यांना सांगायचे कसे? सर्वजण मुलगा म्हणूनच पाहत होते. मनाची घुसमट सुरू झाली. शाळेत, कॉलेजात बाथरूमलाही जाताना भीती वाटायची. नेमके कुठल्या बाथरूममध्ये जायचे स्त्री की पुरुषांच्या? असे दिवस व्यतीत होत गेले. डी. एड्. झाल्यानंतर शिक्षक म्हणून नोकरीही मिळाली. शरीरात आणि मनात स्त्री वावरत असताना पुरुषी बनून तिला नोकरी करावी लागली. इथेही बाथरूमपासूनचे अनेक प्रश्न उभे राहिले. पण त्या ही स्थितीत मात करत जीवनप्रवास सुरू ठेवला. तब्बल 12 वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली.

‘शाळेतील मुले, समाज हे सहज स्वीकारेल का?’

शिक्षक म्हणून 12 वर्षांचा प्रवास सहज सोपा अजिबात नव्हता. त्यातच मनाची घुसमट वाढत चाललेली. अखेर कुटुंबीयांना सोबत घेऊन प्रवीणने लिंगाची शस्त्रक्रिया केली आणि प्रवीणची रिया झाली. आता पुन्हा प्रश्न उभा राहिला नोकरीचा. ज्या शाळेत 12 वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली तिथे अचानक शिक्षिका म्हणून कसे वावरायचे? शाळेतील मुले, समाज हे सहज स्वीकारेल का? मानसिकदृष्ट्या कठीण होते. पुन्हा घुसमट वाढली. अखेर मनाची तयारी करून रियाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्या.

हे सुद्धा वाचा

स्वीय सहाय्यकाची नोकरी

जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगून कसा मार्ग काढायचा, हे विचारले. कुटुंबीयानंतर आणि तिच्या गुरूनंतर सर्वात मोठा मदतीचा हात दिला तो या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी… लगेचच तिला शिक्षिका म्हणून पोस्ट देणे कठीण होते. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी रियाला आपली स्वीय सहाय्यक बनवले. गेले काही दिवस रिया सीईओंची पीए म्हणून काम करत आहे. शर्ट पँटीत वावरणारा प्रवीण आता साडीत लीलया वावरत आहे. तिच्या या जीवन प्रवासाबद्दल ठिकठिकाणी तिचा सत्कार केला जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.