India-Pakistan War : युद्धाचे ढग गडद, सिगारेट ओढणे सुद्धा बेतेल जीवावर, आपत्कालीन परिस्थितीत काय कराल? संरक्षण तज्ज्ञांचा सल्ला काय?
Mock Drill in India : भारतात 1971 नंतर मॉक ड्रिल होत आहे. तब्बल 54 वर्षानंतर युद्धाचे सावट देशावर आले आहेत. अशावेळी नागरिकांनी साध्या साध्या गोष्टींची दक्षता बाळगणे आवश्यक आहे. संरक्षण तज्ज्ञांनी याविषयी दिलेला सल्ला तुमच्या उपयोगी पडेल.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणल्या गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यामागील सर्वांना धडा शिकवण्याचा कडक संदेश दिला आहे. तेव्हापासून युद्धाचे ढग गडद झाले आहेत. केव्हा पण युद्धाला तोंड फुटेल, असा दावा पाकिस्तानचे नेते, मंत्री करत आहेत. भारतात 1971 नंतर मॉक ड्रिल होत आहे. तब्बल 54 वर्षानंतर युद्धाचे सावट देशावर आले आहेत. अशावेळी नागरिकांनी साध्या साध्या गोष्टींची दक्षता बाळगणे आवश्यक आहे. संरक्षण तज्ज्ञांनी याविषयी दिलेला सल्ला तुमच्या उपयोगी पडेल.
उद्या मॉक ड्रिल, पाकची धडधड वाढली
केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना सुरक्षा मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून देशव्यापी मॉक ड्रिल होणार आहे. 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये सर्व सरकारी यंत्रणा सहभागी होणार आहेत. हवाई हल्ल्याचे सायरन वाजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थी, नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्या, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हल्ला झाल्यास एकाचवेळी काळोख, अंधार करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वपूर्ण संस्था आणि प्रतिष्ठांनां सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्या. हल्ल्यावेळी सुरक्षित स्थळी जाण्यासाठीच्या योजना आखून तयारी करण्याचे निर्देश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत.
एक सिगारेट बेतेल जीवावर
निवृत्त कर्नल आणि सरंक्षण तज्ज्ञ अभय पटर्वधन यांनी आपत्कालीन स्थितीत काय काय धोके होऊ शकतात याविषयीची सविस्तर माहिती टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली. ज्यावेळी शत्रू राष्ट्राची विमानं आकाशात घिरट्या घालतील अथवा त्यांचे मिसाईल टार्गेट निश्चित करतील अशावेळी सदर शहरांमध्ये काळोख करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शत्रू राष्ट्र हल्ला करण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी लाईट बंद करणे आवश्यक असतात. अशा भागात वाहनं सुद्धा फोकस लाईट बंद करून चालवावे लागतात. वाहनाच्या आतील दिवे बंद करावे लागतात. इंडिकेटर लावावे लागत नाही. घरातील दिवे बंद करावे लागतात. उजेड, प्रकाशाचा एक सिग्नल, इंडिकेटर हल्ल्यासाठी कारणीभूत ठरेल असे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर एखाद्या व्यक्तीने सिगारेट सुद्धा शिलगावली तर हा शत्रू साठी महत्त्वाचा दुवा ठरू शकते. आता प्रगत तंत्रज्ञानामुळे सीमावर्ती भागात असा धोका अधिक असल्याचे समोर आले आहे. मध्य भारतासह दक्षिणेकडील राज्यांवर युद्धाचा थेट धोका नसला तरी काळजी घेणे आवश्यक असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
आपत्कालीन स्थिती काय कराल?
निवृत्त कर्नल आणि सरंक्षण तज्ज्ञ अभय पटर्वधन यांनी आपत्कालीन स्थितीत काय करावे, काय दक्षता घ्यावी याची माहिती दिली आहे. एखादी मिसाईल शहराच्या दिशेने येण्याची खात्री पटते. तेव्हा सायरन वाजण्यास सुरुवात होते. तेव्हा नागरिकांनी सुरक्षित जागी आश्रय घ्यावा. आपल्याकडे अजून असे शल्टर नाहीत.
सायरन वाजला तर नागरिकांनी मोकळ्या पटांगणात धाव घ्यायची. त्यांनी जमिनीवर झोपायचे.
घरात तळमजला, तळघर असेल तर तिथे आश्रय घ्यायचा.
संरक्षण भिंत असेल, आडोश्याची जागा असेल पण मोठी इमारत नसेल अशा ठिकाणी लपायचे. जीव वाचावायचा.
युद्धाचा मॅाकड्रील म्हणजे काय असते?
युद्धाचा मॅाकड्रील म्हणजे काय असते? मॅाकड्रील मध्ये लोकांना काय काय सुचना दिल्या जातात? तुमच्यावर हल्ला झाला तर कशी काळजी घ्यायची? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. सायरन वाजल्यावर काय करायचं? ब्लॅकआऊट बाबत सर्वांना उद्या माहिती देण्यात येईलच. हा युद्धा पूर्वीचा सराव आहे.
विमानतून हल्ला झाल्यावर नागरिकांनी स्व संरक्षणासाठी करायच्या उपाय योजनांसाठी मॅाकड्रील करण्यात येते. सर्व नागरिकांनी मॅाकड्रील मध्ये सहभागी होणं बंधनकारक असतं सायरन वाजल्यावर आप आपल्या ठिकाणहून बाहेर पडायचं आणि आडोसाला जायचं, असे नियोजन आहे. युद्धाचे ढग गडद होत असताना मॉकड्रील सर्वांसाठी महत्त्वाची आहे.
