AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! पुढील काही तास अत्यंत धोक्याची, बाहेर फिरणे टाळाच, हवामान विभागाचा मोठा इशारा

Maharashtra Rain Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला असून अनेक भागांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट हा देण्यात आला आहे.

सावधान! पुढील काही तास अत्यंत धोक्याची, बाहेर फिरणे टाळाच, हवामान विभागाचा मोठा इशारा
Heavy rain
| Updated on: Aug 18, 2025 | 9:24 AM
Share

राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस  पडताना दिसतोय. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळी वाढल्याचे बघायला मिळाले. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील काही तासात अतिमुसळधार पाऊस होणार असल्याने नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळाले. भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, आता पाऊस धुवाधारपणे सुरू आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी सर्तकेचा इशारा जारी केला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदात वर्तवण्यात आला असून रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पाऊस होणार आहे, यामुळे या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. सातारा, रायगड, पुणे, कोल्हापूरध्ये रेड अलर्ट आहे. तर मुंबई, ठाणे परभणी, नांदेड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, बीड जालना या भागात ऑरेंज अलर्ट आहे.

मुंबईमध्ये तिसऱ्या दिवशी रात्रभर पाऊस कोसळला आहे. मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा त्यामुळे मुंबई सह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत आहत. रात्रभरात ठिकठिकाणी 60 ते 100 मिमी पावसाची नोंद झालीये. मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने मध्य रेल्वे आणि हार्बल मार्गाची लोकल सेवा उशिराने सुरू आहे. पुढील 3 तासांत रायगडमधील आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुढील तासात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले.

जळगावच्या पारोळा तालुक्यात काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावांमध्ये मोठे नुकसान. पळसखेडा गावात दोन्ही गावांना जोडणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला. चिखलोड , म्हसवे तसेच शेळावे गावात चिखली नदीच्या पुराने अनेक घरांमध्ये दुकानामध्ये पाणी शिरल्याने नुकसान. पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिके जमीनदोस्त झाली असून मोठे नुकसान झाले आहे. पळसखेडा बुद्रुक येथे पिकांसह शेतातील जमीन वाहून गेली.

दोन दिवसांच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील जलसाठ्यात वाढ. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरण जलसाठ्यात सहा टक्क्यांनी वाढ. धरणातील जलसाठा 52 वरून पोहोचला 58 टक्क्यांवर मागील वर्षी यावेळी धरणातून केला होता पाण्याचा विसर्ग. दुसरीकडे नांदेडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हेच नाही तर मुंबईमध्येही सध्या पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...