शिंदे-फडणवीस सरकार टिकणार नाही; तुम्ही मुंगेरीलालचे स्वप्न पाहणं बंद करा; खडसे-पाटील मुक्ताई मंदिरावरुन खडाजंगी

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे हे वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यामुळे ते सतत टीका करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने शपथ घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकार टिकणार नाही अशी टीका करण्यात येत आहे,

शिंदे-फडणवीस सरकार टिकणार नाही; तुम्ही मुंगेरीलालचे स्वप्न पाहणं बंद करा; खडसे-पाटील मुक्ताई मंदिरावरुन खडाजंगी
राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांमध्ये खडाजंगीImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 8:43 PM

जळगावः शिवसेनेतून बंडखोरी (Shivsena Rebel MLA) करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास कारणीभूत ठरलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका होते, टीका करण्यामध्ये आधी भाजपात असलेले आणि आता राष्ट्रवादीचे आमदार झालेले एकनाथ खडसे (NCP MLA Eknath Khadase) भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करण्याची कोणतीच संधी सोडत नाहीत. सध्या मुक्ताईनगरच आमदार चंद्रनगर पाटील आणि आमदार एकनाथ खडसे यांचा कलगीतुरा रंगला आहे. मुक्ताई मंदिर काम थाबंवल्यामुळे आमदार एकनाथ खडसे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकात पाटील (Muktainagar MLA Chandrakant Patil) यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळे हा वाद विकोपाला जाण्याची चिन्हं दिसत आहेत.

एकनाथ खडसे यांनी मंदिराचे काम चंद्रकांत पाटील यांच्यामुळे थांबल्याचा आरोप केल्यानंतर त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी जाहीर आवाहन देत खडसेंवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

एकनाथ खडसे हे वैफल्यग्रस्त

यावेळी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे हे वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यामुळे ते सतत टीका करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने शपथ घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकार टिकणार नाही अशी टीका करण्यात येत आहे, त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, तुम्ही मुंगेरीलालचे स्वप्न पाहणं बंद करा, शिंदे सरकार उद्या पडेल, परवा पडेल ते पूर्ण अडीच वर्षे चालणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पुरावा दाखवा मी जाहीर माफी मागेन

आता राष्ट्रवादीचे असेलेल मात्र त्याआधी भाजपात असलेले आमदार एकनाथ शिंदे यांनी भाजप सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस, आशिष महाजन यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. भाजपमधील अंतर्गत राजकारणावर बोलताना त्यांनी अनेक नेत्यांवर जोरदार टीका केली होती, त्याविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले की, तुमच्या आयुष्यात जेवढं भाजप पक्षांने तुम्हाला दिलं तेवढे तिसरं कोणाला मिळाले नसेल अशी खोचक टीकाही त्यांच्यावर केली. मुक्ताई मंदिराच्या कामाला मी जर स्टे आणला असेल तर पुरावा दाखवा मी जाहीर माफी मागेन असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

कुठलाही निधी मी थांबवला नाही

मुक्ताई मंदिरचा विकास कामाचा कुठलाही निधी मी थांबवला नाही मात्र खडसेंना तिसऱ्या डोळा आहे असं महंत पाप आम्ही कधी करणार नाही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा खडसे यांचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. मी निवडून आल्यापासून त्यांची मानसिकता चलबिचल झाली आहे एकाच घरात राष्ट्रवादी, एकाच घरात भाजप हा चमत्कार फक्त खडसेंनाच जमतो असा टोलाही त्यांनी यावेळी लगवला. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा मुक्ताईच्या विकास कामांना स्टे आणल्यावरून राष्ट्रवादी व शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खडाजंगी जुंपली असल्याचे चित्र दिसत आहे.

मंदिर विकास कामांना स्टे

तर एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविषयी बोलताना सांगितले की, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिर विकास कामांना स्टे आणून करंटेपणा केला आहे. चंद्रकांत पाटील यांचे राजकारण म्हणजे अल्पसंख्यांक लोकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न स्थानिक आमदारांकडून केला जातो अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.

नाथाभाऊंनी विकास कामे केले

नाथाभाऊंनी विकास कामे केले तेव्हा तुम्हाला जाग का आली नाही? मुक्ताईनगरचे आमदार हे कोणाच्या भरोशावर निवडून गेले हे तुम्ही एक मुखाने सांगा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. चंद्रकांत पाटील यांच्या आमदाकीविषयी आणि त्यांना निवडून आणण्याता कुणाचा वाटा होतो हे सांगताना एकनाथ खडसे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांना आमदार करण्यासाठी मदत केली आहे, आता उद्धव ठाकरे यांना सोडून तुम्ही एकनाथ शिंदे गटकडे गेला आहात मग गद्दारी कोणी केली? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.