Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावच्या राजकारणात भूकंप, भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात प्रवेश

जळगावच्या राजकारणात आता मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे सध्याचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांची ही नाराजी भाजपला डोकेदुखी ठरु शकते. कारण उन्मेष पाटील यांची चाळीसगावात चांगली ताकद आहे.

जळगावच्या राजकारणात भूकंप, भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात प्रवेश
भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात प्रवेश
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 3:38 PM

जळगावच्या राजकारणात आता मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण सध्याचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे आता ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. भाजपकडून उन्मेष पाटील यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी बारा वाजता उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत पारोळा माजी नगराध्यक्ष करन पवार हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांनी आज सकाळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे.

उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे खासदार आहेत. त्यांनी याआधी 2014 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि ते चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदार होते. मात्र यावेळी उन्मेष पाटील यांना भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळता स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा होती. याच नाराजीतून त्यांनी आज ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली आहे.

महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटासाठी सुटला आहे. ठाकरे गटाकडून या जागेसाठी उमेदवाराची घोषणा झालेली नाही. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते हर्षल माने, नुकतंच भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या नेत्या ललिता पाटील आणि इतर काही इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत होती. मात्र उन्मेष पाटील आणि करण पवार हे जर शिवसेना ठाकर प्रवेश करत असतील तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून नेमकी उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडून कोणाला मिळते ते पाहावे लागेल.

‘संजय राऊत हे उन्मेष पाटील यांचे मित्र’, स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया

“संजय राऊत हे उन्मेष पाटील यांचे मित्र असल्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी उन्मेष पाटील हे गेले आहेत. त्यामुळे मला अजूनही असं वाटत नाही की उन्मेष पाटील हे असा काही निर्णय घेणार नाहीत. मी प्रचारामध्ये आहे. त्यामुळे मी अशी कुठली बातमी बघितली नाही. मात्र माझा अजूनही ठाम विश्वास आहे की अशा कुठल्याही घडामोडी ह्या घडणार नाहीत. कोणी कसं जीवन जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मात्र मी माझ्या तत्वांशी आजपर्यंत तडजोड केली नाही. एकनिष्ठ राहिले. पक्षासोबत एकनिष्ठा राहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्तेच्या पाठीशी जनता ही उभी राहील”, अशी प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी दिली.

‘जनता माझ्या पाठीशी राहील’

“भाजपचे पदाधिकारी जरी ठाकरे गटात गेले आणि ते स्वतः उमेदवार असले तरी जनता माझ्या पाठीशी राहील असा मला विश्वास आहे. त्यामुळे काही झालं तरी मोदींनी जो विकास केलेला आहे त्यामुळे जनता माझ्या पाठीशी राहील. मी प्रचंड मताधिक्याने निवडून येईन, असा माझा ठाम विश्वास आहे. मोठमोठे भाजपचे पदाधिकारी जरी ठाकरे गटात गेले तरी आमच्यासोबत मोदी आहेत. विकास कामे आहेत. त्यामुळे त्याचा फरक पडणार नाही”, अशी भूमिका स्मिता वाघ यांनी मांडली.

“फोटो असणे आणि नसणे यामुळे तुमचं काम कमी होत नसतं. फोटोसाठी आम्ही कधी अडून राहिलो नाही. फोटोवरून तुमचं मूल्यमापन होत नसतं. तुमचं मूल्यमापन हे कामावरून होत असतं. भाजपच्या बैठकीसाठी मी सुद्धा त्यांना फोन केला होता. मात्र त्यांनी फोन रिसीव केले नव्हते. त्यानंतर मी त्यांच्या सहाय्यकांना फोन केला होता. त्यामुळे बैठकीचा फोन नव्हता असं ते म्हणू शकत नाही. भाजपात अंतर्गत कुठेही नाराजी नाही. भाजप एकसंघ पद्धतीने काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे भाजपमध्ये कुठेही दुफळी नाही”, अशी प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी दिली.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.