श्रीनिवास काकांनी जी भूमिका मांडली, ती…; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

NCP MLA Rohit Pawar on Shreeniwas Pawar Sharad Pawar Group : सख्ख्या भावाचा विरोध, काकांना साथ; श्रीनिवास पवार यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार काय म्हणाले? विजय शिवतारे यांनी घेतेलेल्या निर्णयावर रोहित पवार यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर...

श्रीनिवास काकांनी जी भूमिका मांडली, ती...; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 3:59 PM

किशोर पाटील, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, चोपडा, जळगाव | 19 मार्च 2024 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवार कुटुंबाची भूमिका काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली. शरद पवार यांच्या बाजूने ते उभे राहिले. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जी भूमिका श्रीनिवास काकांनी मांडली. तीच भूमिका अख्या महाराष्ट्राची आहे. सामान्य लोकांना कुठे तुम्ही विचारलं की, काय वाटतं. तर त्यांचे हेच मत आहे की, आपल्या काकाला सोडून जाणं हे योग्य नव्हतं. तीच भूमिका श्रीनिवास काकांनी दाखवून दिलेली आहे, असं रोहित पवार म्हणाले.

अजितदादांना एकटं पाडलंय?

पवार म्हणून आम्ही विचारा बरोबर आहोत. विचार जर कोण जपत असेल तर आदरणीय पवार साहेब आहेत. अख्खं पवार कुटुंब हे विचाराबरोबर साहेबांबरोबर आहे. अजितदादांनी वेगळे भूमिका घेतलेली आहे. दादा आणि त्यांचं जवळच जे कुटुंब आहे. त्याच्यामध्ये काकी आणि दोन मुलं आहेत. त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्याचा पवार कुटुंबांनी त्यांना एकटं पाडलं नाही. त्यांनी स्वतः निर्णय घेऊन बाजूला होऊन स्वतःला एकट पाडलेल कुठेतरी दिसत आहे, असं रोहित पवार म्हणाले.

विजय शिवतारेंच्या भूमिकेवर रोहित पवार म्हणाले…

विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. विजय शिवतारे हे मंत्री राहिलेले आहेत. कदाचित त्याच्यामुळेच आणि पूर्वीचे काही संबंध असल्यामुळे अजित दादांना ते जास्त ओळखत असावे. त्या अनुषंगाने त्यांनी त्या बाबतीतला वक्तव्य केलेलं आहे. सत्तेत असणारा एक व्यक्ती जो एकनाथ शिंदे साहेबांचा जवळ आहे. तेच जर म्हणत असेल की तिथं अजित दादांचा पराभव होईल. याच्यावरूनच समजून घ्या की, दुर्दैवाने दादा वेगळे झाल्यामुळे स्वतःला त्यांनी एकटा कुटुंबातून पाडलं आणि सत्तेत असणारे नेते सुद्धा त्यांच्याबरोबर नाहीत, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

सध्या महायुतीतील परिस्थिती पाहता मला वाटत नाही की महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि दादांची जी राष्ट्रवादी त्याचा एक सुद्धा उमेदवार निवडून येईल असं आम्हाला वाटत नाही. या उलट महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने निवडबन येईल, असं रोहित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.