Gulabrao Devkar | घरकुल प्रकरणात गुलाबराव देवकरांना उच्च न्यायालयाचा दिलासा, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा

जळगाव राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर (NCP Gulabrao Deokar) यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. धुळ्याच्या विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात गुलाबराव देवकर यांना दिलेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती मिळाली आहे.

Gulabrao Devkar | घरकुल प्रकरणात गुलाबराव देवकरांना उच्च न्यायालयाचा दिलासा,  जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा
gulabrao deokar

जळगाव : जळगाव राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर (NCP Gulabrao Devkar) यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. धुळ्याच्या विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात गुलाबराव देवकर यांना दिलेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती मिळाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराने गुलाबराव देवकर यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता गुलाबराव देवकर यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गुलाबराव देवकरांचा विजय

राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी नुकताच जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. मात्र, घरकुल प्रकरणात धुळे न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याबाबत जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत गुलाबराव देवकर यांच्या निवडीवर टांगती तलवार होती.

मात्र, धुळ्याच्या विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात गुलाबराव देवकर यांना दिलेल्या शिक्षेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आणि त्यांच्या जिल्हा बॅंकेच्या उमेदवारी अर्जावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन याचिका फेटाळून लावल्याने राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे जिल्हा बँकेचे संचालक पद अबाधित झाले असून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी देखील त्यांचे नाव चर्चेत असल्याने यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

संबंधित बातम्या :

धुळे-नंदुरबार विधान परिषद निवडणूक : भाजपचे अमरिश पटेल बिनविरोध, काँग्रेसच्या गौरव वाणींचा उमेदवारी अर्ज मागे

निवडणुकीचा धुरळा ! राज्यात 27 हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : बिनविरोध निवड झाल्यानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया

Published On - 7:40 am, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI