“मी भाजपाची बदनामी करतो असे एखादं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावं” ; भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यानं फडणवीसांना आव्हान दिलं

चाळीस वर्षे हमाली करून ऐनवेळी माझं तिकीट कापून मला विजन वासात पाठवण्याचा डाव होता त्यावेळी राष्ट्रवादीने मला एमएलसी देऊन आमदार केलं त्यामुळेच मला राजकारणात अजून राहता आले असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मी भाजपाची बदनामी करतो असे एखादं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावं ; भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यानं फडणवीसांना आव्हान दिलं
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 5:21 PM

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वाकयुद्धामुळे जळगावसह राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. खडसे-महाजन हा वाद टोकाला गेला असतानाच राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे भविष्यात आता राष्ट्रवादी आणि भाजप हा वाद टोकाला जाणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. खडसे, महाजन यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालू असतानाच आता एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन जोरदार हल्लाबोल केल्याने आता राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून भाजपवर सडकून टीका केली जात आहे. त्याचवेळी गिरीश महाजन आणि खडसे वाद आता विकोपाला गेल्यानंतर एकमेकांवर त्यांनी पातळी सोडूनही टीका केली होती.

तर एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाहिररित्या आवाहन दिल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, मुख्यमंत्रीपदावर मी भाजपला नको होतो म्हणून मला दहा ते बारा खाती दिली होती. एकनाथ खडसे यांनी जाहिररित्या देवेंद्र फडणीस यांच्या आरोपाला प्रतिउत्तर दिले असल्याने राजकीय वातावरणात आता खळबल उडाली आहे.

एकनाथ खडसे यांच्या गौप्यस्फोटामुळे आता राजकीय चर्चेलाही उधान आले आहे. यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, पक्षातील 40 वर्षाचे फळ म्हणून मला मिळालेली खाते हा माझा अधिकार होता मात्र माझ्यावर राजकारण करुन मला ऐनवेळी डावलण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

ज्यांचं भाजपमध्ये योगदान नाही त्यांनादेखील चार-पाच खाते दिली जातात असा आरोपही त्यांनी भाजपमधील नेत्यांवर केला आहे. तसेच भाजपवर माझा कधीच रोष नाही ज्या एक दोन लोकांमुळे भाजप बदनाम होत आहे त्यांच्यावर माझा रोष असल्याचेही एकनाथ खडसे यांनी बोलताना सांगितले.

चाळीस वर्षे हमाली करून ऐनवेळी माझं तिकीट कापून मला विजन वासात पाठवण्याचा डाव होता त्यावेळी राष्ट्रवादीने मला एमएलसी देऊन आमदार केलं त्यामुळेच मला राजकारणात अजून राहता आले असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तसेच मी भाजपाची बदनामी करतो असे एखादा उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावं असं आवाहनही त्यांनी यावेली केले आहे. मला भाजपमध्ये डावलण्यात आले असले तरी राष्ट्रवादीने मला आमदार केलं म्हणून मी राजकारणात जिवंत आहे असंही त्यांनी भावूनकपणे बोलताना मत व्यक्त केले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.