जुन्नरला Leopard safari व्हावी, Atul Benke यांचे Ajit Pawar यांना पत्र
जुन्नर (Junnar) तालुका हा बिबटप्रवण (Leopard) क्षेत्र आहे. बिबट सफारी ही बारामतीला होणार अशी बातमी आली. त्यामुळे ती जुन्नरलाच व्हावी यासाठी पत्र दिले आहे, अशी माहिती जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी दिली आहे.
जुन्नर (Junnar) तालुका हा बिबटप्रवण (Leopard) क्षेत्र आहे. बिबट सफारी ही बारामतीला होणार अशी बातमी आली. त्यामुळे ती जुन्नरलाच व्हावी यासाठी पत्र दिले आहे, अशी माहिती जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी दिली आहे. अजित पवार हे आमचे नेते आहेत. जुन्नरमध्ये बिबट सफारी व्हावी यासाठी एक इच्छा आहे, ती कुठे जाऊ नये, अशी आमची मागणी आहे. तालुक्यात 350 बिबटे, शेतात, वाडीत बिबटे आहेत. माणसासोबत त्यांचा संघर्ष होतो, त्यामुळे बिबट्याबद्दल भावना तीव्र आहेत. बिबट्याचा बंदोबस्त होईल, यासाठीच बिबट्या सफारीची मागणी केली, असे ते म्हणाले. अजितदादांकडे भावना व्यक्त केली आहे. जुन्नरला सफारीसाठी पत्र दिले आहे. अजितदादा सकारात्मक भूमिका घेतील असे वाटते. त्यांच्याकडे एखादी गोष्ट मागितली, की ते नाही म्हणत नाहीत, असेही बेनके यावेळी म्हणाले.
