AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Konkan Region Election Result 2024 Highlights Updates : कोकणात महायुती की महाविकासआघाडी, कोणाची बाजी? पाहा A टू Z निकाल

| Updated on: Nov 24, 2024 | 9:37 AM
Share

Konkan Region MLA Vidhan Sabha Election Result 2024 Highlights Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या कोकणात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोकणातील 15 मतदारसंघांसाठी 128 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Konkan Region Election Result 2024 Highlights Updates : कोकणात महायुती की महाविकासआघाडी, कोणाची बाजी? पाहा A टू Z निकाल

Konkan Region Election Result 2024 Highlights Updates : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली. महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या कोकणात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, कोकण म्हणजे नारायण राणे अशी वाक्य कायमच राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनता कोणाला साथ देणार याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत होती. अखेर कोकणातील जनतेने महायुतीच्या पारड्यात यश टाकलं आहे. कोकणातील १५ पैकी १४ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी ठरले आहेत. तर एका जागेवर ठाकरे गट विजयी झाला आहे.

कोकण हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली होती. शिवसेनेचे सहा आमदार फुटून शिंदे गटात सामील झाले. यामुळे शिवसेनेत खूप मोठी फूट पडली. शिवसेनेची ताकद दोन गटांत विभागली गेली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना दिसत आहे. कोकणातील १५ मतदारसंघांसाठी १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Nov 2024 05:26 PM (IST)

    Konkan Election Result 2024 LIVE Updates : कोकण विभागात कोणत्या मतदारसंघात कोणाची आघाडी? वाचा संपूर्ण निकाल

    Konkan Election Result 2024 LIVE Updates : कोकण विभागात कोणत्या मतदारसंघात कोणाची आघाडी? वाचा संपूर्ण निकाल

    मतदारसंघ विजयी पराभूत
    दापोली रामदास कदम (शिवसेना शिंदे गट) संजय कदम (शिवसेना ठाकरे गट)
    गुहागर भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट) राजेश बेंडल (शिवसेना शिंदे गट)
    चिपळूण शेखर निकम (अजित पवार गट) प्रशांत यादव (शरद पवार गट)
    रत्नागिरी उदय सामंत (शिवसेना शिंदे गट) बाळ माने (ठाकरे गट)
    राजापूर किरण सामंत (शिंदे गट) राजन साळवी (ठाकरे गट)
    कणकवली नितेश राणे (भाजप) संदेश पारकर (ठाकरे गट)
    कुडाळ निलेश राणे (शिंदे गट) वैभव नाईक (शिवसेना ठाकरे गट)
    सावंतवाडी दीपक केसरकर (शिवसेना शिंदे गट) राजन तेली (शिवसेना ठाकरे गट)
    पनवेल प्रशांत ठाकूर (भाजप) बालाराम पाटील (अपक्ष)
    कर्जत सदाशिव थोरवे (शिवसेना शिंदे गट) सुधाकर घारे (अपक्ष)
    श्रीवर्धन अदिती तटकरे (अजित पवार गट) अनिल नवगणे (शरद पवार गट)
    उरण महेश बालदी (भाजप) प्रीतम म्हात्रे (अपक्ष)
    महाड भरत गोगावले (शिवसेना शिंदे गट) स्नेहल जगताप (शिवसेना ठाकरे गट)
    पेण रवीशेठ पाटील (भाजप) अतुल म्हात्रे (अपक्ष)
    अलिबाग महेंद्र दळवी चित्रलेखा (अपक्ष)
  • 23 Nov 2024 01:43 PM (IST)

    माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस – नारायण राणे

    माझ्या मतदारसंघातील ६ विधानसभेत महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे. माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. गेल्या ७२ वर्षाच्या काळात असा आनंद कधीही झाला नव्हता- खासदार नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया

  • 23 Nov 2024 11:17 AM (IST)

    Kankavli Election Result 2024 LIVE : नितेश राणे कणकवली विधानसभेतून आघाडीवर, विजयाचा जल्लोष सुरु

    कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे हे आघाडीवर आहे. सध्या नितेश राणे हे विजयी जल्लोष करताना दिसत आहे. कणकवलीच्या जनतेने आधीच ठरवलं होतं की तुम्ही चिंता करु नका. मी विचारलेल्या हिंदुत्ववादी विचारामुळे माझ्याविरोधात विषारी विचार केला. आता तुम्हाला कानकोपऱ्यात अल्लाहू अक्बर नाही, जय श्री राम ऐकायला मिळणार, अशा शब्दात नितेश राणे यांनी भाष्य केले.

  • 23 Nov 2024 10:07 AM (IST)

    Konkan Election Result 2024 LIVE Updates : कोकण विभागात कोणत्या मतदारसंघात कोणाची आघाडी? वाचा संपूर्ण निकाल

    मतदारसंघ कोण आघाडीवर कोण पिछाडीवर
    दापोली रामदास कदम (शिवसेना शिंदे गट) संजय कदम (शिवसेना ठाकरे गट)
    गुहागर भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट) राजेश बेंडल (शिवसेना शिंदे गट)
    चिपळूण प्रशांत यादव (शरद पवार गट) शेखर निकम (अजित पवार गट)
    रत्नागिरी उदय सामंत (शिवसेना शिंदे गट) बाळ माने (ठाकरे गट)
    राजापूर मतमोजणी सुरु आहे
    कणकवली नितेश राणे (भाजप) संदेश पारकर (ठाकरे गट)
    कुडाळ वैभव नाईक (शिवसेना ठाकरे गट) निलेश राणे (शिंदे गट)
    सावंतवाडी दीपक केसरकर (शिवसेना शिंदे गट) राजन तेली (शिवसेना ठाकरे गट)
    पनवेल बालाराम पाटील (अपक्ष) प्रशांत ठाकूर (भाजप)
    कर्जत सदाशिव थोरवे (शिवसेना शिंदे गट) सुधाकर घारे (अपक्ष)
    श्रीवर्धन अदिती तटकरे (अजित पवार गट) अनिल नवगणे (शरद पवार गट)
    उरण महेश बालदी (भाजप) प्रीतम म्हात्रे (अपक्ष)
    महाड भरत गोगावले (शिवसेना शिंदे गट) स्नेहल जगताप (शिवसेना ठाकरे गट)
    पेण रवीशेठ पाटील (भाजप) अतुल म्हात्रे (अपक्ष)
    अलिबाग मतमोजणी सुरु आहे
  • 23 Nov 2024 09:07 AM (IST)

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : कोकणात उदय सामंत, नितेश राणे आघाडीवर

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : कोकणातून शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत हे 4 हजार मतांनी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कणकवली मतदारसंघातून नितेश राणे हे 4400 मतांनी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 23 Nov 2024 08:47 AM (IST)

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : कोकणात महायुती 5 जागांवर आघाडीवर तर महाविकासाआघाडी 2 जागांवर आघाडीवर

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : कोकण विभागातून शिवसेना शिंदे गट 4 जागांवर आघाडीवर आहेत. तर अजित पवार गट 1 जागेवर आघाडीवर आहे. तर शिवसेना ठाकरे गट 1 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 23 Nov 2024 08:41 AM (IST)

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : कुडाळमधून निलेश राणे आघाडीवर

    Konkan Election Result 2024 LIVE : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 23 Nov 2024 08:30 AM (IST)

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : नितेश राणे आघाडीवर

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : कोकणातील विधानसभा निकालाचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:28 AM (IST)

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : कोकणातील पहिला कौल समोर, सावंतवाडी राजन तेली आघाडीवर

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : कोकणातील पहिला कौल समोर आला आहे. कोकणातील पहिला कौल हा शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून राजन तेली हे आघाडीवर आहेत

  • 23 Nov 2024 08:07 AM (IST)

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : कोकणात पोस्टल मतमोजणीला सुरुवात

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडल्या. यंदा कोकणात भरघोस मतदान झाले. अनेक चाकरमानी मतदानसााठी कोकणात दाखल झाले. अखेर आता कोकणात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

  • 23 Nov 2024 08:04 AM (IST)

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : कोकणवासिय पुन्हा राणे कुटुंबाला साथ देणार का?

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : मागील विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता. यंदा नारायण राणे यांचे थोरले पुत्र निलेश राणे शिवसेनेच्या (शिंदे) तिकीटावर येथून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे असा सामना रंगत आहे. तर दुसरीकडे कणकवली मतदारसंघात नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर अशी लढत होत आहे. त्यामुळे कोकणवासिय पुन्हा राणे कुटुंबाला साथ देणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

  • 23 Nov 2024 08:00 AM (IST)

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : कोकणात भरघोस मतदान

    Konkan Region Election Result 2024 LIVE Updates : महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडल्या. यंदा कोकणात भरघोस मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीकडे मुंबईकर मतदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. मात्र विधानसभेसाठी मुंबईकर मतदार यावेत यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मेहनत घेतली. त्यांची येण्याजाण्याची व्यवस्था आणि भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती.

  • 23 Nov 2024 07:32 AM (IST)

    Konkan Region Election 2024 : कोकणातील 15 मतदारसंघ आणि विद्यमान आमदार

    Konkan Region Election 2024 : कोकणात एकूण तीन लोकसभा मतदारसंघ आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड आणि मावळ. मात्र मावळ लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येतात. त्यामुळे तसा तो अर्धाच मतदारसंघ कोकणात येतो.

    रत्नागिरी जिल्हा

    • दापोली – संजय कदम (राष्ट्रवादी)
    • गुहागर – भास्कर जाधव (राष्ट्रवादी)
    • चिपळूण – सदानंद चव्हाण (शिवसेना)
    • रत्नागिरी – उदय सामंत (शिवसेना)
    • राजापूर – राजन साळवी (शिवसेना)

    सिंधुदुर्ग जिल्हा

    • कणकवली – नितेश राणे (काँग्रेस)
    • कुडाळ – वैभव नाईक (शिवसेना)
    • सावंतवाडी – दीपक केसरकर (शिवसेना)

    रायगड जिल्हा

    • पनवेल – प्रशांत ठाकूर (भाजप)
    • कर्जत – सुरेश लाड (राष्ट्रवादी काँग्रेस)
    • श्रीवर्धन – अवधूत तटकरे (राष्ट्रवादी)
    • उरण – मनोहर भोईर (शिवसेना)
    • महाड – भरत गोगावले (शिवसेना)
    • पेण – धैर्यशील पाटील (शेकाप)
    • अलिबाग – पंडित पाटील (शेकाप)

Published On - Nov 23,2024 7:29 AM

Follow Us
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....