AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार? योजनेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार? योजनेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता
फोटो प्रातनिधिकImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2025 | 3:26 PM
Share

ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे  अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र मे महिना संपला तरी अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीयेत, तसेच त्याबाबत कोणती घोषणा देखील झालेली नाहीये, मे महिन्याचा हाफ्ता बँक खात्यामध्ये  कधी जमा होणार? याकडे आता लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मे आणि जून दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच मिळणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

दहा जूनला वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे दीड हजार आणि जून महिन्याचे दीड हजार असे तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये, त्यामुळे मे चा हाफ्ता कधी जमा होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

दरम्यान विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात पुन्हा आमची सत्ता आली तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळणाऱ्या हाफ्त्यामध्ये वाढ करू, रक्कम 1500 वरून 2100 रुपये करू असं अश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं, मात्र अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं अश्वासन या संदर्भात काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार ?  याकडे सर्व राज्याचंं लक्ष लागलं आहे.

त्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं

दरम्यान अर्ज छाणणीदरम्यान ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत, त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आता अशा महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात आली आहेत. तसेच ज्या महिला या योजनेच्या अटींमध्ये बसत नाहीत, अशा महिलांची नावं देखील काही दिवसांपूर्वी वगळण्यात आली होती.

Follow Us
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर.
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट.
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?.
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,.
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे.....
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे......
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या...
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या....
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं.
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम...