Maharashtra News LIVE Update | जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचे थेमान,आढळले 26 रुग्ण  

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचे थेमान,आढळले 26 रुग्ण  
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 28 Aug 2021 23:19 PM (IST)

  अहमदनगरमध्ये राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते बास्केटबॉल कोर्टचे लोकार्पण

  अहमदनगर : राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते बास्केटबॉल कोर्टचे लोकार्पण

  यावेळी स्वतः अदिती तटकरे यांनी घेताना बास्केटबॉल खेळण्याचा आनंद

  अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील क्रीडा विकासासाठी भरीव मदत करू

  आदिती तटकरे यांचे आश्वासन

 • 28 Aug 2021 21:29 PM (IST)

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे थोड्याच वेळात कुडाळमध्ये आगमन

  सिंधुदुर्ग- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे थोड्याच वेळात होणार कुडाळमध्ये आगमन

  नारायण राणे यांचा ताफा कुडाळच्या शिवसेना शाखा समोरून जाणार

  कुडाळच्या शिवसेना शाखेत जमलेले शिवसैनिक

  शिवसेनेच्या शाखेबाहेर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

 • 28 Aug 2021 20:06 PM (IST)

  जळगाव महानगरची कार्यकारिणी बरखास्त, शरद पवार यांच्या बैठकीत अनेक तक्रारी

  जळगाव – जळगाव महानगरची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे

  शरद पवार यांच्या बैठकीत जळगाव महानगरच्या अनेक तक्रारी

  लवकरच नवीन कार्यकारिणी घोषित होणार असल्याची माहिती

 • 28 Aug 2021 20:04 PM (IST)

  खंडणीरुपी 35 लाख रुपये घेतल्याप्रकरणी इचलकरंजीमध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल

  सोलापूर : इचलकरंजी शहरामध्ये 35 लाख खंडणी घेतल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

  एका व्यापाऱ्याकडे पाच जणांनी मागितली होती खंडणी

  शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

  लिंबू चौक परिसरातील मदन जाधव अमोल आरसुळ अनिकेत देसाई प्रणव पाटील दोघांवर झाला गुन्हा दाखल

  शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

 • 28 Aug 2021 18:29 PM (IST)

  जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचे थेमान,आढळले 26 रुग्ण  

  जळगाव – जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले

  तीन महिन्यात 26 रुग्णांची नोंद झाल्याचे आढळून आले

  जळगावात तब्बल 16 हजारांपेक्षा अधिक घरांमध्ये डेंग्यूचाच्या अळ्या आढळल्या

  ताप-थंडीचे अधिक रुग्ण आढळल्याने सरकारी आणि खासगी रुग्णालय भरले.

   

 • 28 Aug 2021 18:15 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 244 कोरोना रुग्णांची वाढ, 261 रुग्णांना डिस्चार्ज 

  पुणे कोरोना अपडेट

  दिवसभरात 244 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

  – दिवसभरात 261 रुग्णांना डिस्चार्ज

  – पुण्यात करोनाबाधीत 9 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04

  – 208 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

  – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 494968

  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2289

  – एकूण मृत्यू -8912

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 483767

 • 28 Aug 2021 18:06 PM (IST)

  नाशिकमध्ये दिवसभरात 92 रुग्ण कोरोनामुक्त, दिवसभरात 98 रुग्णांची वाढ

  नाशिक कोरोना अपडेट

  आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 92

  आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 98

  नाशिक मनपा- 40

  नाशिक ग्रामीण- 52

  मालेगाव मनपा- 04

  जिल्हा बाह्य- 02

  नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8572

  आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 02

  नाशिक मनपा- 01

  मालेगाव मनपा- 00

  नाशिक ग्रामीण- 01

  जिल्हा बाह्य- 00

 • 28 Aug 2021 18:01 PM (IST)

  पोलीस आयुक्त दिपककुमार पांडेय यांच्या बदलीची चर्चा, नारायण राणेंविरोधातील कारवाई महागात पडणार ?

  नाशिक – पोलीस आयुक्त दिपककुमार पांडेय यांच्या बदलीची जोरदार चर्चा..

  नारायण राणेंविरोधात कारवाई पोलीस आयुक्तांना महागात पडणार ?

  याबाबत बोलण्यास पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नकार.

 • 28 Aug 2021 17:34 PM (IST)

  मालमत्ता जप्तीबाबतचे लेखी पत्र आम्हाला अद्याप नाही, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी केलं खंडण

  मुक्ताईनगर- एकनाथ खडसेंची मालमत्ता ईडीकडून जप्त असल्याचे ऐकतोय

  ईडीचा जप्तीचा विषय आम्ही मीडियातून ऐकत आहोत

  मालमत्ता जप्तीबाबत लेखी पत्र आम्हाला अद्याप नाही

  एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी केलं या विषयाचं खंडण

 • 28 Aug 2021 16:32 PM (IST)

  नाशिकमध्ये थोड्याच वेळात होणार भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात

  नाशिक – थोड्याच वेळात होणार भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात

  – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत निघणार यात्रा

  – पाथर्डी फाटा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निघणार जनआशीर्वाद यात्रा

 • 28 Aug 2021 16:04 PM (IST)

  नागपूर मनपा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेणार- सुप्रिया सुळे

  नागपूर- मनपात एकत्र निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेणार

  राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची माहिती

  – प्रभाग पद्धत बाद झाल्याने फायदा तोट्याचा प्रश्न नाही

  – निवडणुकीत पक्षातील सर्वांना एकत्र घेऊन चालणार

  – राजनाथ शिंह ज्येष्ठ नेते, ते काय बोलले हे मी ऐकले नाही. त्यामुळे बोलणं योग्य नाही

  – पुण्याच्या गॅंगरेपमधील सर्व आरोपींना अटक झालीय, फास्ट ट्रॅक कोर्टात पिडीतेला न्याय मिळवून देणार

  – छेडछाडमुक्त महाराष्ट्र यासाठी आजही पुढाकार, कॅालेजमध्ये याबाबत जनजागृती कार्यक्रम सुरु व्हावे

 • 28 Aug 2021 15:39 PM (IST)

  अग्निशमन दलाच्या वाहनाला धक्का मारण्याची वेळ, जवानांची त्रेधातिरपीट

  पिंपरी चिंचवड -अग्निशमन दलाच्या वाहनाला धक्का मारण्याची जवानांवर वेळ आली आहे. या निमित्ताने  पिंपरी चिंचवड महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय.

  फुगेवाडीमधील घर कोसळलेल्या ठिकाणी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अग्निशमन दलाचे वाहन रेस्क्यू ऑपरेशन करण्यासा.ठी आले होते. रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर हे वाहन सुरू होत नव्हते. त्यावेळी त्याला जवानांना धक्का मारावा लागला

 • 28 Aug 2021 13:29 PM (IST)

  कोल्हापूर रत्नागिरी रोड वरील इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग

  कोल्हापूर

  कोल्हापूर रत्नागिरी रोड वरील इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग

  केर्ले गावा जवळील मुख्य रस्त्या लगतच्या दुकानातील घटना

  इलेक्ट्रॉनिक बोर्ड बनवत असताना घडली दुर्घटना

  सुदैवाने जीवितहानी नाही मात्र इलेक्ट्रॉनिक साहित जळून खाक

 • 28 Aug 2021 12:56 PM (IST)

  औरंगाबादेत छेडछाडीच्या भीतीने तरुणीने रिक्षातून मारली उडी

  औरंगाबाद –

  औरंगाबादेत तरुणीने मारली रिक्षातून उडी

  छेडछाडीच्या भीतीने रिक्षातून मारली उडी

  औरंगाबादच्या मोंढा नाका ते आकाशवाणी चौक दरम्यानची घटना

  रिक्षा चालकाकडून अपहरण आणि छेडछाड होण्याच्या भीतीने मारली उडी

  तरुणीला एकटं पाहून बदलले होते रिक्षा चालकाचे हावभाव

  रिक्षा थांबवायला सांगितल्या नंतरही रिक्षा चालवली जोरात

  धावत्या रिक्षातून तरुणीने मारली उडी

  तरुणी गंभीर जखमी

 • 28 Aug 2021 09:42 AM (IST)

  पिंपरी-चिंचवड शहरात ‘कोविशिल्ड’ची लस 68 केंद्रांवर तर ‘कोव्हॅक्सिन’लसीचा दुसरा डोस 08 केंद्रावर मिळणार

  पिंपरी चिंचवड

  -आज शहरात ‘कोविशिल्ड’ची लस 68 केंद्रांवर तर ‘कोव्हॅक्सिन’लसीचा दुसरा डोस 08 केंद्रावर मिळणार

  -शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना आज ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा तर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे

  -ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे

 • 28 Aug 2021 09:42 AM (IST)

  औरंगाबाद मनपाच्या लसीकरण केंद्रावरील 120 डेटा ऑपरेटर पाच महिन्यांपासून पगारापासून वंचित

  औरंगाबाद –

  मनपाच्या लसीकरण केंद्रावरील 120 डेटा ऑपरेटर पाच महिन्यांपासून पगारापासून वंचित

  दोन दिवसांत पगार न झाल्यास दिला काम बंदचा इशारा

  कंत्राटी कामगारांना दरमहा साडे नऊ हजारांचे ठरवले होते मानधन

  डॉक्टर आणि शिक्षकांना डेटा अपलोड चे प्रशिक्षण दिले जात असल्याने नौकरी जाण्याचीही कर्मचाऱ्यांना भीती

  पाच महिन्यांपासून पगार होत नसल्याने आर्थिक संकट वाढल्याने पगार न झाल्यास थेट केले जाणार काम बंद

 • 28 Aug 2021 09:41 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा होणार कायापालट

  औरंगाबाद –

  औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा होणार कायापालट

  मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरे यांनी दिले सूतोवाच

  मुख्यमंत्र्यांनी दिले समावेशक आराखडा, संकल्पना तयार करण्याचे निर्देश..

  मुंबईतील वर्षा निवासस्थानी पैठण उद्यानाच्या कायापालटाविषयी झाली बैठक..

  मंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रयत्नांना यश

  नूतनीकरण करून उद्यान विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागारांची नियुक्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश..

 • 28 Aug 2021 09:40 AM (IST)

  पिंपरी-चिंचवडमध्ये व्हिडीओ गेम पार्लरमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा, तिघांना अटक

  पिंपरी-चिंचवड

  – व्हिडीओ गेम पार्लरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; तिघांना अटक

  – ही कारवाई श्रीनगर रहाटणी फाटा चौकात लक्की व्हिडीओ गेम पार्लर मध्ये करण्यात आलीय

  – अली दस्तगीर पटेल,राहुल मल्लेश राठोड, देवा मोहन चव्हाण अशी अटक केलेल्या आरोपींची नावे

  – श्रीनगर रहाटणी फाटा चौकात लक्की व्हिडीओ गेम पार्लर मध्ये हार-जितचा जुगार सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गेम पार्लरवर छापा मारून कारवाई केली. त्यावेळी आरोपी व्हिडीओ गेम मशीनवरील आकड्यांवर पैसे लावून हारजितचा जुगार खेळत होते

 • 28 Aug 2021 09:39 AM (IST)

  औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने एसटी कर्मचारी आर्थिक संकटात

  औरंगाबाद

  एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने एसटी कर्मचारी आर्थिक संकटात..

  एसटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे थकीत वेतन देण्यासाठी निधी द्यावा अशी इंटक संघटनेची मागणी..

  जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या थकीत वेतनासाठी सहाशे कोटी रुपये देण्याची इंटकने परिवहन मंत्र्यांकडे केली मागणी..

  कोरोना काळात एसटी महामंडळाला आठ हजार कोटींचा संचित तोटा झाल्याने राज्य सरकारने मदत करण्याची मागणी..

 • 28 Aug 2021 09:38 AM (IST)

  राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज नागपूर दौऱ्यावर

  – राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज नागपूर दौऱ्यावर

  – आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज राष्ट्रवादीच्या बैठका

  – सुप्रिया सुळे साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

  – मनपा निवडणूकीच्या तयारीचाही घेणार आढावा

  – नागपूर ग्रामीण आणि शहरातील कार्यकर्त्यांच्या आज बैठका

  – अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत पार पडणार बैठक

  – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न

 • 28 Aug 2021 09:37 AM (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा

  बारामती :

  – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा..

  – पहाटे सहा वाजल्यापासून अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात..

  – शहरातील विविध विकासकामांची अजितदादांकडून पाहणी..

  – कामे वेळेत आणि दर्जेदार करण्याच्या अजित पवार यांच्या सुचना..

 • 28 Aug 2021 09:37 AM (IST)

  नाशकात भाजपाची आज जनशीर्वाद यात्रा

  नाशिक – भाजपाची आज जनशीर्वाद यात्रा..

  केंद्रीय मंत्री भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा आज निघणार शहरातून..

  दुपारी 3 वाजता पाथर्डी फाटा इथून निघणार यात्रा

  यात्रेचा समारोप काळाराम मंदिरा जवळ..

  यात्रेच्या पार्शवभूमीवर पोलोसांचा शहरात मोठा बंदोबस्त

 • 28 Aug 2021 09:36 AM (IST)

  मनसे नेते अमित ठाकरे आज पुन्हा नाशकात घेणार कार्यकर्त्यांच्या बैठका

  नाशिक – मनसे नेते अमित ठाकरे आज पुन्हा घेणार कार्यकर्त्यांच्या बैठका..

  सकाळी 11 वाजेपासून मनसे च्या राजगड कार्यालयात चालणार बैठकांचे सत्र..

  दुसरीकडे बाळा नांदगावकर , संदीप देशपांडे देखील साधणार कार्यकर्त्यांशी संवाद..

 • 28 Aug 2021 09:35 AM (IST)

  नागपूर महानगरपालिका कंत्राटी पद्धतीनं घेणार 100 फायरमॅन

  – नागपूर महानगरपालिका कंत्राटी पद्धतीनं घेणार १०० फायरमॅन

  – नियुक्तीच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी

  – नागपूर मनपाच्या अग्निशामक विभागात सध्या अपुरं मणुष्यबळ

  – मोठी आपत्ती आल्यास मणुष्यबळासाठी करावी लागते तारेवरची कसरत

 • 28 Aug 2021 09:35 AM (IST)

  आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे महावितरणने सर्वच थकबाकीदार ग्राहकांवर सुरू केली कारवाई

  सोलापूर –

  आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे महावितरणने सर्वच थकबाकीदार ग्राहकांवर सुरू केली कारवाई

  पाणीपुरवठा व दिवाबत्तीची देयके भरणे बाबत सर्व ग्रामपंचायतींना महावितरणने काढल्या नोटिसा

  देयके न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा इशारा

  सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचे 3833 व दिवाबत्ती चे पाच हजार 776 थकबाकीत असून 534 कोटींची थकबाकी

 • 28 Aug 2021 09:34 AM (IST)

  पुणे महापालिकेच्या पथदिव्याच्या विजेचा शॉक लागल्याने ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू

  पुणे

  महापालिकेच्या पथदिव्याच्या विजेचा शॉक लागल्याने ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू

  कतारवाडी भारत नगर येथे शुक्रवारी दुपारी घडली घटना

  पार्वतीबाई हिरामण झेंडे या 70 वर्षीय महिलेचा शॉक लागून झाला मृत्यू

  झेंडे यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी

 • 28 Aug 2021 09:33 AM (IST)

  भारतीय सैनिक करणार पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या प्रतीकात्मक मूर्तीची स्थापना

  पुणे

  भारतीय सैनिक करणार पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या प्रतीकात्मक मूर्तीची स्थापना

  भारतीय लष्करातील एक आणि सहा मराठा बटालियनचे सैनिक अरुणाचल प्रदेश आणि पंजाब मधील पठाणकोट येथे करणार दगडूशेठच्या प्रतिकात्मक मूर्तीची स्थापना

  दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे गणपती ची खुप खुप दोन फुटी प्रतीकात्मक मूर्ती केली तयार

  तयार झालेली मूर्ती अरुणाचल प्रदेश आणि पठाण कोहकडे करण्यात आली रवाना

 • 28 Aug 2021 09:32 AM (IST)

  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 25 टक्क्यांची घसघशीत वाढ

  पुणे

  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 25 टक्क्यांची घसघशीत वाढ

  कोरोनामुळे गेली दीड वर्षापासून महापालिका कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता करण्यात आला होता बंद

  पूर्वी हा भत्ता 164 टक्के होता आता तो 189 टक्के दिला जाणार आहे

 • 28 Aug 2021 09:32 AM (IST)

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर

  पुणे

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर

  त्यानुसार दहावीची पुरवणी परीक्षा २२ सप्टेंबपासून, तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार

  या दोन्ही परीक्षा लेखी स्वरुपात होणार

  सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर प्रसिद्ध

 • 28 Aug 2021 08:12 AM (IST)

  सोलापूर महानगरपालिकेच्या 30 कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

  सोलापूर महानगरपालिकेच्या 30 कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

  मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते फवारणी आणि धुरावणी

  यात हलगर्जीपणा केल्याचा 30 कर्मचाऱ्यावर ठपका

  वारंवार सांगून सुद्धा प्रशासनाच्या नियमाचा पालन न केल्याचा यातील कर्मचाऱ्यावर ठपका

  महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची पगार कपात होईल तर कॉन्ट्रॅक्टवर असणार्‍या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याची पालिका आयुक्तांची माहिती

 • 28 Aug 2021 07:49 AM (IST)

  शिवसेना नेते संजय राऊत आज नाशिकमध्ये

  नाशिक –

  शिवसेना नेते संजय राऊत आज नाशिकमध्ये

  दुपारी 12 वाजता पत्रकारांशी साधणार संवाद

  सेना भाजप तणावाच्या पार्शवभूमीवर राऊत नाशिकमध्ये

  संजय राऊत करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

  सेना भाजप मध्ये वाढणाऱ्या तणावाच्या पार्शवभूमीवर राऊतांच्या दौऱ्याकडे राज्यच लक्ष

 • 28 Aug 2021 07:42 AM (IST)

  सोलापुरातील कुर्डूवाडीत  उपनगराध्यक्षांच्या मुलालाच डेंग्यूची लागण

  सोलापूर –

  कुर्डूवाडीत  उपनगराध्यक्षांच्या मुलालाच डेंग्यूची लागण

  कोरोनाचा  प्रभाव कमी होत चालला असला तरी डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले

  त्यातच डेंगूचा पहिला रुग्ण  उपनगराध्यक्ष यांच्या घरातच निघाला

  त्यामुळे पालिका प्रशासन काय उपाययोजना करते असा शहरवासीयांचा सवाल

  उपनगराध्यक्षा उर्मिला बागल यांच्या मुलाचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह

  कोरोनामुळे  भयभीत झालेले नागरिक पुन्हा झाले डेंग्यूने हैराण

 • 28 Aug 2021 07:41 AM (IST)

  20 वर्षांत नागपूरचे 10 तलाव अतिक्रमणाने गिळले

  – 20 वर्षांत नागपूरचे 10 तलाव अतिक्रमणाने गिळले

  – नागपूर शहरात नैसर्गिक संपत्तीची सर्रास लूट

  – मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत

  – गुगल मॅपच्या मदतीनं केलेल्या सर्वेक्षणातून वास्तव समोर

  – वाडी परिसरातील चार तलावापैकी एक तलाव बिल्डरने बुजवला

 • 28 Aug 2021 07:40 AM (IST)

  महामेट्रोत आरक्षण डावलून पदभरतीच्या घोटाळ्याचं प्रकरण, पदभरती घोटाळ्याबाबत शिवसेना आक्रमक

  – महामेट्रोत आरक्षण डावलून पदभरतीच्या घोटाळ्याचं प्रकरण

  – पदभरती घोटाळ्याबाबत शिवसेना आक्रमक

  – ‘शिवसेना खा. कृपाल तुमाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे करणार तक्रार’

  – ‘बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणाला मेट्रोकडून तिलांजली’

  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून चौकशीची करणार मागणी

  – ‘एससीच्या १३२ जागा असताना केवळ ४२ उमेदवारांना नोकरी’

  – ‘ओबीसीच्या २३८ जागा असताना केवळ ११३ जणांना नोकरी’

  – ‘खुल्या वर्गात ३५७ जागा असताना ६५० उमेदवारांना दिली नोकरी’

  – खुल्या प्रवर्गावर मेट्रो प्रशासन मेहरबान का?

  – ‘आरक्षणाच्या धोरणाला मेट्रोकडून तिलांजली’

  – शिवसेना खा. कृपाल तुमाने यांचे महामेट्रोवर गंभीर आरोप

 • 28 Aug 2021 07:19 AM (IST)

  एकनाथ खडसेंचे पुणे-सुरतमधील फ्लॅट जप्त, गोठवलेल्या अकाऊंटमधील रक्कम किती?

 • 28 Aug 2021 07:13 AM (IST)

  मानवतेचा खून करण्याची शिकवण कुठलाच धर्म देत नाही, काबूलच्या रक्तपातावर राऊतांचा ‘विचारी’ अग्रलेख

 • 28 Aug 2021 07:12 AM (IST)

  नागपूर महानगरपालिका कंत्राटी पद्धतीनं घेणार 100 फायरमॅन

  – नागपूर महानगरपालिका कंत्राटी पद्धतीनं घेणार 100 फायरमॅन

  – नियुक्तीच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी

  – नागपूर मनपाच्या अग्निशामक विभागात सध्या अपुरं मणुष्यबळ

  – मोठी आपत्ती आल्यास मणुष्यबळासाठी करावी लागते तारेवरची कसरत

 • 28 Aug 2021 06:59 AM (IST)

  मुलीचा बालविवाह प्रकरणी पाथर्डीत गुन्हा दाखल

  अहमदनगर

  मुलीचा बालविवाह प्रकरणी पाथर्डीत गुन्हा दाखल

  पती, सासरा, सासू, मुलीचे वडील यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  विशेष म्हणजे लग्न लावणारे पुरोहित, मंडप, सजावटकार तसेच विवाहास उपस्थित असणाऱ्या काही व्यक्तींवर देखील गुन्हा दाखल

  मुंबईतील मर्जी संघटना आणि नगरमधील चाईडलाईन संघटनेने दिली पोलीस व पाथर्डीतील शिरसाटवाडीच्या सरपंचांना माहिती

  बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 • 28 Aug 2021 06:51 AM (IST)

  कलाकार गौरव दीक्षितला अटक एनसीबीकडून अटक

  कलाकार गौरव दीक्षितला अटक
   एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने केली अटक
  आज केली अटक
  गौरव दीक्षित याच्या घरातून एम डी ड्रग्स केलं जप्त
  कलाकार एजाज खान यांच्या चौकशीत गौरव दीक्षित याच नाव उघडकीस आलं होतं
  त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI