Maharashtra News LIVE Update | मुुंबईत कोरोना रुग्णांत वाढ, 11 इमारती सील
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
मुुंबईत कोरोना रुग्णांत वाढ, 11 इमारती सील
मुंबई : बीएमसीने गेल्या 7 दिवसात मुंबईत 11 इमारती सील केल्या आहेत.
कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर इमारती सील करण्यात आल्या आहेत.
-
ठाण्यात सहाय्यक आयुक्तांवर हल्ला, मनसेकडून सर्व फेरीवाले हटविण्यास सुरुवात
ठाणे : ठाण्यात सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्यानंतर मनसेकडून ठाण्यातील सर्व फेरीवाले हटविण्यास सुरुवात
झालेल्या भ्याड हल्ल्याचा मनसे निषेध करत असून फेरीवाल्यांना जोरदार उत्तर
ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक
मनसे नेते महेश कदम यांनी चंदनवाडी परिसरातील सर्व फेरीवाले हटवले
ठाण्यात मनसे फेरीवाल्यांना मनसे स्टाईलने उत्तर देणार
-
-
भर रस्त्यावर बीडमध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुखांवर जीवघेणा हल्ला
बीड : भर रस्त्यावर शिवसेना उपजिल्हा प्रमुखांवर जीवघेणा हल्ला
बीडच्या घोडका राजुरी जवळील घटना
उपजिल्हा प्रमुख हनुमान जगताप यांच्यावार हल्ला
-
नागपुरात आज 4 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 7 जणांनी केली कोरोनावर मात
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात आज 4 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
7 जणांनी केली कोरोनावर मात, तर शून्य मृत्यू
एकूण रुग्णसंख्या – 493023
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482843
एकूण मृत्यूसंख्या 10118
-
नाशिकमध्ये भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांची प्रतिक्रिया
नाशिक –
भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया –
– आताच्या काळात भाजपची नीतीमूल्य बदलली – पक्षात जी नवीन लोक आली ती चुकीचे वक्तव्य करतात. त्यामुळे हा वाद भाजपने स्वतः हून ओढून घेतला – शिवसैनिकाला हे करण्यास सांगायची गरज नसते. आमच्या कुटुंब प्रमुखाबद्दल असे शब्द वापरल्यास आम्ही गुपचुप बसणार नाहीत – आता भविष्य काळात त्यांनी जपून शब्द वापरावे – आमच्या दैवताबद्दल जर असं कोणी बोललं तर शिवसैनिकांची माथी फिरतीलच
-
-
नाशिकमध्ये मनसेच्यावतीने प्रतिकात्मक दहीहंडी, दहीहंडी फोडून निषेध व्यक्त
नाशिक –
मनसेच्यावतीने प्रतिकात्मक दहीहंडी
मनसे कार्यालयाबाहेर दहीहंडी फोडून केला निषेध
आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी
दहीहंडीवरून नाशिक मनसे आक्रमक
-
अण्णा हजारेंनी मंदिरे खुली करावी यासाठी नेतृत्व करावं, भाजप सामील होईल : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील –
अण्णा हजारेंनी मंदिरे खुली करावी यासाठी नेतृत्व करावं भाजप सामील होईल
काल दिवसभर अनिल देशमुखांना क्लीन चिटचा खोटा मेसेज फिरवला
अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवली यावरून राऊत जे बोललेत त्यावर त्यांना गंभीरपणे घेण्याची गरज नाही
-
कल्याणमध्ये तहसीलदार आणि लिपीक एसीबीच्या जाळ्यात
कल्याण :
तहसीलदार आणि लिपीक एसीबीच्या जाळ्यात
एका जमीनीच्या हरकतीच्या सुनावणी संदर्भात मागितले होते पैसे
1 लाख 20 हजार घेताना लिपीक मनोहर हर्डीकर यांना एसीबीने रंगेहात पकडले
कल्याण तहसीलदार दीपक आकडे आमि मनोहर हरड या दोघांच्या विरोधात कारवाई सुरु
-
औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
औरंगाबाद –
औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन सुरू
विभागीय आयुक्त कार्यालयावर शेकडो कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू
गेल्या दोन तासापासून जोरदार आंदोलन सुरू
-
मंदिरं खुली करण्यासाठी भाजप आक्रमक, राज्यभरात ठिकठिकाणी शंखनाद आंदोलन
BJP Protest : मंदिरं खुली करण्यासाठी भाजप आक्रमक, राज्यभरात ठिकठिकाणी शंखनाद आंदोलनhttps://t.co/YWldSa7AO5#BJP #Protest #Temple @BJP4Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2021
-
मंदिरं खुली करा, भाजप आक्रमक; चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मंदिरात केली आरती
Video | Pune BJP Protest | मंदिरं खुली करा, भाजप आक्रमक; चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मंदिरात केली आरती@ChDadaPatil #Maharashtra #Nagpur #BJP #Protest #ShankhnaadAndolan #ChandrakantPatil
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/hhFFa24Yp5
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2021
-
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार पोलिसांच्या ताब्यात
मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचे संपूर्ण राज्यभर शंखनाद आंदोलन
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार पोलिसांच्या ताब्यात
-
दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसे ठाम, ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात
दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसे ठाम, ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात
मनसेच्या दही हंडी स्थळ भगवती मैदानात येथे स्टेजवर मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव उपोषला बसले होते
LIVETV – दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसे ठाम, ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/5wwOS0tLSH
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2021
-
डोंबिवली गणेश मंदिर समोर मंदिर उघडण्यासाठी भाजपतर्फे शंखनाद आंदोलन
डोंबिवली गणेश मंदिर समोर मंदिर उघडण्यासाठी भाजपतर्फे शंखनाद आंदोलन
भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन
महाविकास आघाडी सरकार टिकली पाहिजे, अल्पसंख्यांकांची पाठराखण करण्यासाठी मंदिर उघडली जात नाहीत
आमदार रवींद्र चव्हाण यांचा ठाकरे सरकारवर घणाघात
-
अमरावतीत कारच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू
अमरावती –
– कारच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू
– राष्ट्रीय महामार्गावर शिवनगाव फत्तेपुर जवळील घटना
– रामराव खेरडे असे मृत शिक्षकाचे नाव आहे
– कार विरुद्ध दिशेने येऊन दुचाकीला दिली जबर धडक
– धडक भीषण असल्याने दिळूचाकीवर असलेल्या शिक्षकाला जबर मार लागला
– शिक्षक गंभीर असल्याने त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले
– डॉक्टरांनी शिक्षक रामराव यांना मृत घोषित केले..
– नांदगाव पेठ पोलिसांनी कार चालकाला सद्या ताब्यात घेतले आहे.
– कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सद्या सुरुय
-
नारायण राणे यांचे वकील अलिबागेमध्ये
रायगड
नारायण राणे यांचे वकील अलिबागेमध्ये
राणे यांचे वकील लोकल क्राईम ब्रँच कार्यालयात पोहोचले
वकील ऍड. चिकणे एलसीबी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या भेटीला
-
मंदिर सुरु करण्याच्या मागणीसाठी आज कोल्हापुरातही भाजपचे राज्यव्यापी शंखध्वनी आंदोलन
कोल्हापूर :
मंदिर सुरु करण्याच्या मागणीसाठी आज भाजपच राज्यव्यापी शंखध्वनी आंदोलन
कोल्हापुरातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते अंबाबाई मंदिरासमोर करणार आंदोलन
थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात
-
मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक
– मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक
– राज्यातील मंदिरं सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन सुरु
– पुणेकरांचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपती मंदिराबाहेर आंदोलन
– भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन
-
मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं शंखनाद आंदोलन
– मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं शंखनाद आंदोलन
– भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात आंदोलन
– कोराडी महालक्ष्मी जगदंबा माता मंदिरात आंदोलन
– ‘सात दिवसांत मंदिरं उघडले नाही तर स्वत: मंदिर उघडणार’
– चंद्रशेखर बावनकुळे यांचा सरकारला इशारा
– ‘उद्घव ठाकरे अधर्मी झालेय, ते दबावात मंदिरं उघडण्याचा निर्णय घेत नाही’
– ‘मंदिरं बंद असल्याने रोजगारावरंही परिणाम’
– ‘दारुची दुकानं उघडली, मग मंदिरं का नाही’
– नागपूर जिल्हयात आज ठिकठिकाणी भाजपचं शंखनाद आंदोलन
-
मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन
औरंगाबाद –
मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन
औरंगाबाद शहरातील गाजनन महाराज मंदिरासमोर भाजपचे आंदोलन सुरू
आंदोलनात भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी
-
भाजपचे कार्यकर्ते चढले मंदिराच्या गेटवर चढून आरती सुरु
औरंगाबाद –
भाजपचे कार्यकर्ते चढले मंदिराच्या गेटवर
मंदिराच्या गेटवर चढून आरती सुरु
मंदिर उघडण्यासाठी भाजप आक्रमक
-
अकोल्यात सकाळपासून जोरदार पाऊस, गेल्या 10 दिवसापासून दांडी मारलेल्या पावसाची पुन्हा जोरदार हजेरी
अकोला –
अकोल्यात सकाळपासून जोरदार पाऊस
गेल्या 10 दिवसापासून दांडी मारलेल्या पावसाची पुन्हा जोरदार हजेरी
या पावसामुळे सोयाबीन, उळीद, पिकांना धोका
रात्रीपासून होते ढगाळ वातावरण
सकाळपासून पावसाची रिमझिम रिमझिम सुरू आता पावसाचा जोरवाढला असून सध्या जोरदार पाऊस सुरु आहे
-
मुंबईच्या दिंडोशी परिसरात बिबट्याचा वावर, परिसरात भितीची लाट
मुंबईच्या दिंडोशी परिसरात बिबट्याचा वावर
परिसरात भितीची लाट
वावर सीसीटीव्हीत कैद
दिंडोशी इथे असलेल्या एस्टर टॉवरबाहेर पाहाटे 5.30 चा सुमारास बिबट्याचा मुक्त वावर
अर्धा तास रस्त्यावर फिरत होता बिबट्या
दिंडोशी अग्निशमन दलासमोर, गोकुळधाम, ओबेरॉय मॉलच्या समोरील बिल्डिंग कॅम्पसमध्ये दिसला बिबट्या
एचडीएफसी बँक वैद्य मार्ग जवळ फिरत होता बिबट्या
बिबट्याच्या शोधात वन खात्याकडून अलर्ट जारी
-
औरंगाबादेत मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन
औरंगाबाद –
मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन
औरंगाबाद शहरातील गाजनन महाराज मंदिरासमोर भाजपचे आंदोलन सुरू
आंदोलनात भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी
-
नाशकात भाजप अध्यात्मिक आघाडीचे आंदोलन सुरू
नाशकात भाजप अध्यात्मिक आघाडीचे आंदोलन सुरू
रामकुंडावर आंदोलनाला सुरुवात
साधू महंतांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरवात
साधू महंतांची घोषणाबाजी
मंदिर बंद विरोधात साधू महंत आक्रमक
-
नाशिक शहरात लॉकडाउनची पुन्हा अफवा
नाशिक शहरात लॉकडाउनची पुन्हा अफवा
सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या मेसेज मुळे व्यापाऱयांना भरली धडकी
आज पासून शहरात लॉक डाऊन होणार असल्याचे फिरत आहेत मेसेज
अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
-
नाशिक जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा, जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही 65 टक्केच पाणीसाठा
नाशिक जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा
जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही 65 टक्केच पाणीसाठा
गत वर्षीच्या तुलनेत हा साठा अद्यापही 12 टक्के कमीच..
दमदार पाऊस न झाल्यास आरक्षणाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
गंगापूर आणि दारणा समूहात मात्र समाधानकारक पाणीसाठा
-
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, स्थानिक स्वराज्य संस्थांसह 10 विधानसभा स्वबळावर लढवण्याचे संकेत
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांसह 10 विधानसभा स्वबळावर लढवण्याचे संकेत
कार्यकर्ता आढावा बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे सूतोवाच
आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटला अस समजून कामाला लागा
मुश्रीफ यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना
शाहू सभागृहात पार पडली आढावा बैठक
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी पुढाकार घेण्याचा बैठकीत निर्णय
-
“मंदिरे खुली करा”, या मागणीसाठी भाजपचे आज राज्यव्यापी शंखनाद आंदोलन
मंदिरे खुली करा या मागणीसाठी भाजपचे आज राज्यव्यापी शंखनाद आंदोलन…
अहमदनगर जिल्हयातही भाजपचे ठिकठिकाणी आंदोलन…
शिर्डी साईमंदिरासमोर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन….
तर आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हार भगवतीपूर येथे भगवती माता मंदिरासमोर आंदोलन….
मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आंदोलनात होणार सहभागी….
स.१०.३० वाजता होणार आंदोलनास सुरूवात….
-
मंदिरं उघडण्यासाठी नागपुरात भाजपचं शंखनाद आंदोलन
– मंदिरं उघडण्यासाठी थोड्याच वेळात भाजपचं शंखनाद आंदोलन
– भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात आंदोलन
– कोराडी महालक्ष्मी जगदंबा माता मंदिरात होणार आंदोलन
– नागपूर जिल्हयात आज ठिकठिकाणी भाजपचं शंखनाद आंदोलन
-
भारताच्या खात्यात पहिलं गोल्ड मेडल, महिला नेमबाज अवनी लेखराला सुवर्ण
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये (Tokyo Paralympics) भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला नेमबाज अवनी लेखराने (Avani Lekhara) सुवर्णवेध घेतला आहे. भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) आहे. अवनी लेखराने 10 मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. अवनीच्या या कामगिरीने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, अवनीवर स्तुतीसुमनं उधळली.
Phenomenal performance @AvaniLekhara! Congratulations on winning a hard-earned and well-deserved Gold, made possible due to your industrious nature and passion towards shooting. This is truly a special moment for Indian sports. Best wishes for your future endeavours.
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2021
-
पिंपरी-चिंचवड शहरात 14 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण
पिंपरी चिंचवड
– पिंपरी-चिंचवड शहरात 14 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण
-शहरात पालिकेच्या 69 आणि 132 खाजगी केंद्रांवर आतापर्यंत 14 लाख पेक्षा अधिक कोविड 19 लसीचे डोस देण्यात आले आहेत
-त्यात 10 लाख 40 हजार 442 लाभार्थ्यांना पहिला तर तीन लाख 70 हजार 274 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे
-जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लसीकरण मोहिमेने चांगली गती घेतली. या दोन महिन्यात सुमारे आठ लाख लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे
-आतापर्यंत 14 लाख 10 हजार 716 लाभार्थ्यांना लस देण्यात आलीय
-
श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारीही भीमाशंकर मंदिर बंदच
भीमाशंकर,पुणे
-आज श्रावण महिन्यातील चौथा सोमवार बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भिमाशंकरला कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मंदिर बंद ठेवण्यात आले त्यामुळे भाविकांविना श्रावण मासाचा हा उत्सव सुरुय
-चौथ्या सोमवारी पहाटेची महाभिषेक आरती झाल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले
-भीमाशंकर देवस्थानकडून शिवलिंग आणि गाभा-याला विविध रंगाच्या फुलमाळांनी सजविण्यात आले
-भिमाशंकरचा श्रावण मासातील सोहळा शिवभक्तांविना होत असला तरी उत्साह कायम पाहायला मिळत आहे
Published On - Aug 30,2021 6:35 AM
