Maharashtra News LIVE Update | रिसोडचे नगरपरिषद सदस्य पवन चित्तरका यांच्यावर जीवघेणा हल्ला 

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | रिसोडचे नगरपरिषद सदस्य पवन चित्तरका यांच्यावर जीवघेणा हल्ला 
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 31 Aug 2021 23:11 PM (IST)

  अकोला शहरात गवळीपुरा परिसरात किरकोळ वादातून चाकूहल्ला

  अकोला : अकोला शहरातल्या गवळीपुरा परिसरात किरकोळ वादातून चाकू हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. तर जखमीला झालेल्या तरुणाला रुग्णालयात हलविण्यात आलेय. रामदास पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 • 31 Aug 2021 21:55 PM (IST)

  रिसोडचे नगरपरिषद सदस्य पवन चित्तरका यांच्यावर जीवघेणा हल्ला 

  वाशिम : रिसोड शहरातील नगरपरिषद सदस्य पवन चित्तरका यांच्यावर अज्ञात व्यक्तीने केला जीवघेणा हल्ला

  रिसोड शहरातील आंबेडकर चौकातील अडत दुकानात झाला हल्ला

  घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस घटनास्थळी दाखल

  प्रकृती चिंताजनक असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात केले दाखल

   

 • 31 Aug 2021 20:48 PM (IST)

  नागपुरात वनविभागाची धडक कारवाई, वाघ तसेच इतर प्राण्यांच्या अवयवांसह 4 आरोपींना अटक

  नागपूर -नागपूर वनविभागाची आणखी एक धडक कारवाई

  वाघ आणि इतर प्राण्यांच्या अवयवांसह 4 आरोपींना अटक

  गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून करण्यात आली कारवाई

  आरोपीच्या घराची झडती घेतली असता वाघासह इतर वन्य प्राण्यांचे अवयव सापडले

  काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमधील बिछावासाहनी येथे धाड टाकून केली होती काही आरोपींना अटक

  त्यांच्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीवरून करण्यात आली ही कारवाई

 • 31 Aug 2021 19:59 PM (IST)

  मंत्री परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, चित्रा वाघ यांची मागणी

  मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांचा इंटरेस्ट त्यांच्या खात्यापेक्षा गृह खात्यात आहे.

  मंत्री परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

  त्यांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा

  भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी

  साक्री आगारातील कर्मचारी आत्महत्या प्रकरणी चित्रा वाघ यांची धुळ्यात मागणी

 • 31 Aug 2021 19:32 PM (IST)

  झोपाळा खेळत असताना पिंपरी चिंचवडमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

  पिंपरी-चिंचवड -पिंपरी चिंचवडमध्ये झोपाळा खेळ खेळत असताना एका आठ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

  सुमैय्या शकील शेख असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव

  -सुमैय्याचे आई-वडील पिंपरी बाजारात खरेदीला गेले असताना घडली घटना

  -सुमैय्या घरात ओढणीच्या सहाय्याने खेळत होती

  -दरम्यान तिला अचानक लागला गळफास

  -सुमैय्याच्या बहिणीने तिला वाचवण्याचा केला प्रयत्न

  – उपचारापूर्वीच झाले निधन

 • 31 Aug 2021 19:30 PM (IST)

  कोरोना रुग्ण वाढल्याने पंढरपुरात आणखी सात गावांत कडक निर्बंध

  पंढरपूर दहा पेक्षा अधिक कोरोना रुग्ण वाढल्याने पंढरपूर तालुक्यातील आणखी सात गावात कडक निर्बंध

  वाखरी ,सोनके, शेळवे, सिद्धेवाडी, कान्हापुरी, तिसंगी, पिराची कुरोली या गावांचा समावेश

  तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वीच तालुक्यातील 21 गावात केले होते कडक निर्बंध जाहीर

  आता आणखी सात गावांमध्ये कोरोना बांधितांची संख्या दहापेक्षा जास्त असल्याने या गावात केले कडक निर्बंध जाहीर

  अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना राहणार बंद

  उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली माहिती

 • 31 Aug 2021 18:56 PM (IST)

  नागपुरात आज 7 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  नागपूर कोरोना अपडेट

  नागपुरात आज 7 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  एकाचा मृत्यू तर 2 जणांनी केली कोरोनावर मात

  चाचण्या – 4424

  एकूण रुग्णसंख्या – 493030

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482845

  एकूण मृत्यूसंख्या – 10119

 • 31 Aug 2021 17:52 PM (IST)

  औरंगाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दहीहंडी साजरी करण्याचा प्रयत्न

  औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दहीहंडी साजरी करण्याचा प्रयत्न

  दहीहंडी साजरी करणाऱ्या मनसे सैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

  दहीहंडी साजरी करणाऱ्या मनसे सैनिक आणि पोलिसात झटपट

  औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर परिसरात घडला प्रकार

  राज्य सरकारच्या विरोधात मनसेची जोरदार घोषणाबाजी

  मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 • 31 Aug 2021 17:39 PM (IST)

  सचिन वाझेंना रूग्णालयात करण्यात आलं दाखल, होऊ शकते बायपास सर्जरी

  भिवंडी : सचिन वाझेंना रूग्णालयात करण्यात आलं दाखल

  एस एस रूग्णालय़ात दाखल करण्यात आलं

  सचिन वाझे हृदय विकारानं त्रस्त

  सचिन वाझे यांची होऊ शकते बायपास

 • 31 Aug 2021 17:32 PM (IST)

  एकदिवसीय लसीकरणाचा नवा रेकॉर्ड, दिवसभरात तब्बल 2 लाख लोकांचे लसीकरण   

  पुणे : एकदिवसीय लसीकरणाचा नवा रेकॉर्ड

  पुणे जिल्ह्यात आज तब्बल 2 लाख लोकांचे लसीकरण

  पुणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 80 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण

  राज्यातला लसीकरणाचा नवा विक्रम

  पुणे झेडपी सीईओ आयुष प्रसाद यांची माहिती

  सीएसआर फंडातून झेडपीला मिळाले होते दिड लाख डोस

  लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात अव्वल

 • 31 Aug 2021 16:47 PM (IST)

  औरंगाबादेत पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सेना-भाजपच्या महिलांचा राडा

  औरंगाबाद : पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सेना-भाजपच्या महिलांचा राडा

  शिवसेना आणि भाजपच्या महिला कार्यकर्त्या आमनेसामने

  भाजप कार्यकर्त्याने पुंडलिक नगर भागात महिलेचा विनयभंग केल्याचा सेनेचा आरोप

  भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

  तर शिवसवनेच्या विरोधात भाजपची महिला आघाडीही पोलीस ठाण्यात दाखल

  शिवसेना भाजपच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यासमोर राडा सुरू

 • 31 Aug 2021 16:46 PM (IST)

  फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमात कल्याणमध्ये सोशल डिस्टसिंगचा फज्जा

  कल्याण- फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमात सोशल डिस्टसिंगचा फज्जा

  कृष्ण जन्माष्टमीनिमित्त कल्याणच्या एका हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम

  व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल

  एकीकडे दहीहंडीवर बंदी तर दुसरीकडे अशा कार्यक्रमाना मुभा का ?

  महापालिका आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह

 • 31 Aug 2021 16:45 PM (IST)

  कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, राज्याच्या सीमेवर तपासणी नाके सुरु करण्याचा विचार- विजय वडेट्टीवार

  सोलापूर — कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे

  त्यामुळे काही निर्बंध लावणे गरजेचे

  राज्याच्या सीमेवर तपासणी नाके सुरु करण्याचा विचार

  येणारे दिवस  सणासुदीचे

  त्यामुळे काळजी घेणे गरजेचे-विजय वडेट्टीवार

 • 31 Aug 2021 15:30 PM (IST)

  मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, 2 सप्टेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

  मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा क्रांती मोर्चा आणि शिवसंग्राम संघटना पुन्हा आक्रमक

  – मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यासाठी 2 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करणार

  – यावेळी अशोक चव्हाण यांची तातडीने उपसमिती वरून हकालपट्टी करावी ही प्रमुख मागणी असणार आहे

  – शिवाय राज्य मागासवर्गीय आयोगावर सर्वच्या सर्व सदस्य हे मराठाविरोधी असल्याने सदर आयोग त्वरित बरखास्त करून नवीन समतोल सदस्यांना घेऊन पुनःर्गठन करण्याची मागणी.

 • 31 Aug 2021 11:55 AM (IST)

  यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा यांना कळेल – राज ठाकरे

  ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला

  पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल

  यांची मस्ती उतरवली पाहिजे

  यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा यांना कळेल, यांची हिम्मत कशी होते?

  निषेधाने हे सुधारणारे नाहीत.

  यांची हिम्मत कशी होते? तुम्ही बोटं छाटता?

  आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे?

  सरकारने यावर बंधणं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही.

  इतक्या वर्षात कुणाची हिम्मत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार.

  यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल.

 • 31 Aug 2021 11:50 AM (IST)

  लॉकडाऊन आवडे सरकारला, कोरोना निर्बंधांवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल

  गेल्यावेळी आणि आताच्या स्थितीमध्ये फरक आहे

  लॉकडाऊन आवडे सरकारला, कोरोना निर्बंधांवरुन राज ठाकरेचा हल्लाबोल

  मेळावे, राजकीय यात्रा सुरुच, मग फक्त सणांवर बंदी का

  गर्दी कुठेही कमी झालेली नाही

  जन आशीर्वाद यात्रा चालली, तेव्हा लॉकडाऊन नाही

  सण आला की लॉकडाऊन, फक्त सणांमध्येच कोरोना पसरतो? आम्ही सण साजरे करायचे नाही?

  मीच आदेश दिले कार्यकर्त्यांना की जोरदार दहीहंडी साजरी करा

  मंदिरं उघडली गेलीच पाहिजे

  नियम सगळ्यांना एकच असला पाहिजे

  सणांमधून रोगराई पसरते, यात्रेंमधून, हाणामाऱ्यांमधून नाही का? यांना जेव्हढं हवं आहे, तेव्हढं करायचं आणि लोकांना घाबरवून ठेवायचं.

  अस्वलाच्या अंगावर केस किती तसं आम्ही आमच्यावरील केस मोजत नाही. हे सर्व सूडबुद्धीने सुरु आहे. हे विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत.

  आजचा दिवस होऊदे, आम्ही बैठक घेऊन मंदिराची भूमिका घेऊ, मंदिराबाहेर घंटानाद करु.

  नियम सर्वांसाठी एक लावा, वेगवेगळे नको

  बाहेर पडायला यांची फाटते त्यात आमचा काय दोष?

  हे सर्व निवडणुकीसाठी सुरु आहे, यांची आखणी झाली की निवडणुका जाहीर करायच्या, बाकीचे तोंडावर पडतील म्हणून.

 • 31 Aug 2021 08:57 AM (IST)

  चाळीसगाव-कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला

  औरंगाबाद –

  चाळीसगाव-कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी

  ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला

  तर कन्नड चाळीसगाव घाटात कोसळली दरड

  कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार

  धगफूटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना आला पूर

  कन्नड तालुक्यातील 10 ते 12 गावांचा तुटला संपर्क

 • 31 Aug 2021 08:56 AM (IST)

  कन्नड तालुक्यातील अंजना नदीवरील पूल गेला वाहून

  औरंगाबाद –

  कन्नड तालुक्यातील अंजना नदीवरील पूल गेला वाहून

  पळशी बुद्रुक, पळशी खुर्द आणि साखर वेल या गावांचा तुटला संपर्क

  अंजना नदीला आला मुसळधार पूर

  पुराच्या पाण्यात पूल गेला वाहून

  पूल वाहून गेल्यामुळे तीन गावांचा तुटला संपर्क

  कन्नड तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच

 • 31 Aug 2021 08:55 AM (IST)

  पुणे-बंगळुरु महामार्गावरील सातारा ते कागल सहापदरी करण्याचं काम तीन महिन्यात सुरू होणार

  कोल्हापूर

  पुणे-बंगळुरु महामार्गावरील सातारा ते कागल सहापदरी करण्याचं काम तीन महिन्यात सुरू होणार

  132 किलोमीटरच्या कामाची निविदा मंजूर

  प्रस्तावित सहापदरी करण्यासाठी साडेचार हजार कोटींची तरतूद

  जमीन संपादनाच्या 97 टक्के काम ही पूर्ण

  महापुराच पाणी महामार्गावर येऊ नये यासाठी ही विशेष उपाययोजना केल्या जाणार

  केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांची दिल्लीत माहिती

 • 31 Aug 2021 08:55 AM (IST)

  पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडी सलग दुसऱ्या वर्षी रद्द

  कोल्हापूर

  पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडी सलग दुसऱ्या वर्षी रद्द

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयोजन समितीचा निर्णय

  बक्षिसाच्या रकमे सह संयोजनाची रक्कम पूरग्रस्तांना देणार

  धनंजय महाडिक युवाशक्ती चे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांची माहिती

  गोकुळ जन्माष्टमी च्या निमित्ताने दरवर्षी दसरा चौकात होते युवाशक्ती ची दहीहंडी स्पर्धा

  लाखोंच्या बक्षीस आणि तरुणाईची गर्दी असते स्पर्धेच आकर्षण

 • 31 Aug 2021 08:15 AM (IST)

  भिलदारी पाझर तलाव फुटल्यानंतर नागद परिसरात भीषण पूर

  औरंगाबाद –

  भिलदारी पाझर तलाव फुटल्यानंतर नागद परिसरात भीषण पूर

  पूर आल्यानंतर मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून नागरिकांनी काढले बाहेर

  नागद गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिरात घडला प्रकार

  पूर आल्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा झाला होता पूर्णपणे बंद

  दरवाज बंद झाल्यानंतर स्लॅब फोडून पुजाऱ्याला काढले बाहेर

  मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांनीच राबवले रेस्क्यू ऑपरेशन

 • 31 Aug 2021 08:15 AM (IST)

  नागपूर मेट्रोमधील पदभरती घोटाळा प्रकरण, ओबीसींना डावलल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक

  – नागपूर मेट्रोमधील पदभरती घोटाळा प्रकरण

  – ओबीसींना डावलल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक

  – ‘मेट्रोने चुक दुरुस्त करत ओबीसी, एससी, एनटीच्या जागा भराव्या’

  – अन्यथा मेट्रोच्या कार्यालयाबाहेर मोठ्या आंदोलनाचा इशारा

  – राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आंदोलनाचा इशारा

 • 31 Aug 2021 08:09 AM (IST)

  पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर, ‘या’ गोष्टींवर निर्बंध

 • 31 Aug 2021 08:07 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची प्रशासनाकडून तयारी

  कोल्हापूर :

  जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची प्रशासनाकडून तयारी

  ऑक्सीजन सह 10 हजार बेड तयार

  लहान मुलांसाठी राखीव बेड तर बाराही तालुक्यात होणार ऑक्सिजन प्रकल्प

  दिवसाला उच्चांकी 29 हजार रुग्ण होण्याची भीती गृहीत धरून प्रशासनाच नियोजन

  15 ऑक्टोबर पर्यंत तिसरी लाट येण्याची तज्ञानी वर्तवला अंदाज

 • 31 Aug 2021 08:05 AM (IST)

  वैजापूर तालुक्यातील अलापूरवाडी गावात शेतकऱ्यांचा दोन गटात भीषण मारामारी

  औरंगाबाद –

  वैजापूर तालुक्यातील अलापूरवाडी गावात शेतकऱ्यांचा दोन गटात भीषण मारामारी

  मारामारीत 7 ते 8 शेतकरी झाले गंभीर जखमी

  जखमी शेतकऱ्यांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू

  बांधाच्या वादावरून झाली भीषण हाणामारी

  मारहाण प्रकरणी शिउर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  मारहाणीत काही शेतकरी गंभीर जखमी

 • 31 Aug 2021 08:03 AM (IST)

  नाशकात ऐतिहासिक मुरलीधर मंदिरात कृष्णजन्म सोहळा उत्साहात

  नाशिक –

  ऐतिहासिक मुरलीधर मंदिरात कृष्णजन्म सोहळा उत्साहात

  रात्री 12 वाजता भजन कीर्तनाच्या गजरात झाला कृष्णजन्म

  निर्बंध असल्याने भाविकांची संख्या मात्र कमी

 • 31 Aug 2021 07:53 AM (IST)

  विधानसभा उपाध्यक्ष, आमदार यांच्या नावावर पैसे लाटणारा ठकसेन पोलिसांच्या ताब्यात

  विधानसभा उपाध्यक्ष, आमदार यांच्या नावावर पैसे लाटणारा ठकसेन पोलिसांच्या ताब्यात

  राहुल दिलीप आहेर अस तोतया चे नाव

  विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले कोरे नोट पॅड वापरून केली फसवणूक

  नोटपॅड आणि ओळ्खपत्राचा गैरवापर करत शाळेला अनुदान देतो अशा द्यायचा भूलथापा

  तुमच्या शाळेला अनिदान मिळवून देतो,अस सांगत घेतले दीड लाख रुपये

  संशयित आरोपी दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावचा रहिवासी

  वणी पोलिसांनी केली संशयित आरोपीला अटक

  3 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश

 • 31 Aug 2021 07:53 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील भिलदारी पाझर तलाव मध्यरात्री 3 वाजता फुटल्याची माहिती

  औरंगाबाद –

  औरंगाबाद जिल्ह्यातील भिलदारी पाझर तलाव फुटल्याची माहिती

  मध्यरात्री 3 वाजता पाझर तलाव फुटल्याची माहिती

  धरण फुटल्यामुळे गडदगड नदीला आला जोरदार पूर

  नदीला पूर आल्यामुळे नागद परिसरातील 10 ते 12 गावांचा तुटला संपर्क

  नदीच्या पाण्यात काही गुरं आणि शेतकऱ्यांचे साहित्य वाहून गेल्याची माहिती

 • 31 Aug 2021 07:30 AM (IST)

  धान घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा, भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांची मागणी

  – धान घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा

  – भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांची मागणी

  – सुनील मेंढे यांनी केंद्र सरकारकडे केलीय CBI चौकशीची मागणी

  – सुनील मेंढे यांनी लोकसभेत लावून धरला होता धान घोटाळ्याचा विषय

  – केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भेटून धान घोटाळ्याची दिली माहिती

  – घोटाळ्यात बडे नेते आणि त्यांचे निकटवर्तीय अडकण्याची शक्यता

 • 31 Aug 2021 07:25 AM (IST)

  बार्शी येथील दुकान फोडी प्रकरणी चार आरोपींना बार्शी पोलिसांनी केली अटक

  सोलापूर – बार्शी येथील दुकान फोडी प्रकरणी चार आरोपींना बार्शी पोलिसांनी केली अटक

  28 तारखेच्या पहाटे बाजारपेठेतील पाच ते सहा दुकाने फोडून चोरट्यांनी केला होता लाखो रुपयांचा ऐवज लंपास

  चोरटे सीसीटीव्ही झाले होते कैद

  चोरटे नवी मुंबई येथील यादीवरील सराईत सराईत गुन्हेगार

  चौघांनी मिळून टेंभुर्णी करमाळा माढा परिसरात घरफोडी केल्याची सुद्धा दिली कबुली

  चोरीसाठी वापरलेली कार ही पोलिसांनी केली जप्त

 • 31 Aug 2021 07:25 AM (IST)

  नागपुरात चक्क बस स्टॅाप चोरीला गेलाय, शहरातील म्हाळगीनगर परिसरात सिटीबसचं बस स्टॅाप चोरीला

  – नागपुरात चक्क बस स्टॅाप चोरीला गेलाय

  – शहरातील म्हाळगीनगर परिसरात सिटीबसचं बस स्टॅाप चोरीला

  – काही दिवसांपूर्वी जिथं बसस्टॅाप होतं, तिथे आता फक्त मोकळी जागा

  – एक एक वस्तू गायब होत, संपूर्ण बस स्टॅापंच चोरीला गेलंय

  – बस स्टॅाप चोरीला गेल्यानं प्रवाशांची प्रचंड गैरसोय

  – म्हाळगीनगरचं सिटी बसस्टॅाप चोरीला गेल्यानं बस कुठे थांबवायची?

  – बसचालकांना पडला प्रश्न

  – चोरीला गेलेल्या बस स्टॅापची चौकशी कधी होणार

 • 31 Aug 2021 07:22 AM (IST)

  मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली

  मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली

  मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून अधूनमधून पाऊस पडत आहे.

  सध्या कुठेही पाणी साचलेले नाही.

 • 31 Aug 2021 07:21 AM (IST)

  कुरनूर धरण शंभर टक्के भरले

  सोलापूर –

  कुरनूर धरण शंभर टक्के भरले

  रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात अचानक पाणीसाठा वाढला

  कुरनुर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

  पाणीसाठ्यात  48 टक्क्यांनी वाढ

  सध्या  822 दशलक्ष घनफूट पाणीसाठा

  थोड्याच वेळात धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात येणार

 • 31 Aug 2021 07:20 AM (IST)

  अकरावीच्या पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस मुदतवाढ

  पुणे –

  – अकरावीच्या पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस मुदतवाढ,

  – त्यामुळे पहिल्या फेरीत निवड होऊनही अद्याप प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार,

  – विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्याअभावी प्रवेशासाठी अडचणी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

 • 31 Aug 2021 07:20 AM (IST)

  नागपुरकरांसाठी धोक्याची घंटा, प्रत्येक दहाव्या घरी डेंग्यूच्या अळ्या

  – नागपुरकरांसाठी धोक्याची घंटा, प्रत्येक दहाव्या घरी डेंग्यूच्या अळ्या

  – शहरात 61273 घरी डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने प्रशासन हादरलं

  – शहरात 500 पेक्षा जास्त डेंग्यू रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाला आली जाग

  – मनपाने सर्वेक्षण सुरु केल्यानंतर 61273 घरी आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

  – ६१२७३ घरी डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने लोकांमध्ये भितीचं वातावरण

 • 31 Aug 2021 07:09 AM (IST)

  यंदाही गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा लागणार, पुणे पोलिसांकडून आचरसंहिता जारी

  पुणे –

  – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात यंदाही गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा लागणार,

  – त्यासंदर्भात पुणे पोलिसांकडून आचरसंहिता जारी,

  – गणेश मुर्ती खरेदी, प्रतिष्ठापना, दर्शन, आणि विसर्जनबाबत मंडळांना नियमांचं बंधन,

  – श्रीच्या आमगनाच्या वेळी मिरवणुकांवर बंदी,

  – मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी विविध उपक्रम,शिबिरं आयोजित करण्याचे आवाहन

 • 31 Aug 2021 07:07 AM (IST)

  तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही, नागपूर जिल्ह्यात कोरोना चाचण्या घटल्या

  – तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही, नागपूर जिल्ह्यात कोरोना चाचण्या घटल्या

  – जिल्हयात पाच हजारांवरील कोरोना चाचण्या आल्या दोन हजारांवर

  – गेल्या २४ तासांत २४१७ चाचण्यातून चार नव्या रुग्णांची भर

  – संस्थात्मक विलीगीकरण अनिवार्य केल्याने चाचण्यांकडे कमी कल

  – लोक कोरोना चाचण्या करत नसल्याने धोक्याची घंटा

 • 31 Aug 2021 06:50 AM (IST)

  ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने फुटली दहीहंडी

  ठाण्यात कोरोना निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचेच्या वतीने लक्ष्मी पार्क वर्तकनगर येथे दहीहंडी उभारत चार थराची हंडी फोडण्यात आली . गोविंदांनी हे निर्बंध झुगारत ही हंडी फोडुन मनसेचा झेंडा फडकवला.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI