Maharashtra News Live Updates : सीरम इन्स्टिट्युटनं लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला ‘WHO’कडून मंजुरी

| Updated on: Dec 18, 2021 | 6:12 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

Maharashtra News Live Updates : सीरम इन्स्टिट्युटनं लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला ‘WHO’कडून मंजुरी
Breaking

महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron)  वेरियंटचे रु्ग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 32 वर पोहोचली आहे.   तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरु आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 17 Dec 2021 11:21 PM (IST)

  आरेतील सरकारी गोदामातून मोठ्या प्रमाणात सरकारी धान्य जप्त, भाजप कार्यकर्त्यांवर संशयाची सुई

  आरेतील सरकारी गोदामातून मोठ्या प्रमाणात सरकारी धान्य जप्त करण्यात आले आहे, एकूण ६ ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे, भाजप कार्यकर्त्यांवर संशयाची सुई जात असल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 • 17 Dec 2021 10:57 PM (IST)

  कराड

  कोयना भूकंपमापन केंद्रात सौम्य भुकांपाची नोंद

  3.1 रेकटर स्केल सौम्य भुकंपाची नोंद

  भुकंपाचा केंद्रबिंदू कोयनाधरणापासुन 20 किलोमिटर वारणा खोऱ्यात जावळे गावाच्या दक्षिणेला 4 किलोमिटर अंतरावर जमिनीत खोली 7 किलोमिटर

  भुकंप कोठेही जाणवला नाही

  सांयकाळी 5.17 वाजता भुकंपाची झाली नोंद

 • 17 Dec 2021 10:53 PM (IST)

  मुंबई

  हिवाळी अधिवेशन तोंडावर मुख्यमंत्री यांनी आज विधान भवनात भेट दिली

  विधान भवनच्या दारापासून विधान सभेच्या सभागृहात मुख्यमंत्री चालत गेले

  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आज चालत जाऊन पाहिले

  हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्यामुळे त्यासाठी तयारी

 • 17 Dec 2021 10:02 PM (IST)

  चंद्रपूर

  चंद्रपूर जिल्ह्यात नगर पंचायत निवडणुकीची धामधूम,

  गोंडपिपरी येथे पालकमंत्री वडेट्टीवारांची तुफान फटकेबाजी,

  दिल्लीतील आजचे सत्ताधीश स्वातंत्र्य आंदोलनात इंग्रजाचे पाय चाटत होते असे वक्तव्य ,

  महागाईच्या मुद्यावर वडेट्टीवारांनी केंद्र सरकारवर चढविला हल्ला,

  केंद्रीय गृहराज्यमंत्री पुत्राने चिरडलेल्या शेतक-यांचा मुद्दाही उचलला

 • 17 Dec 2021 09:54 PM (IST)

  अहमदनगर

  कर्जत येथे राष्ट्रवादीचा भाजपला आणखी एक धक्का

  प्रभाग 14च्या भाजपा उमेदवार शिबा सय्यद यांचा राष्ट्रवादी प्रवेश

  राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

  माजी मंत्री राम शिंदे यांची आमदार रोहित पवारांवर टीका

  मविआ सरकारकडून लोकशाहीची सारीच मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. कर्जत नगरपंचायतीत धमकावून अनेकांना अर्ज मागे घ्यायला लावले. आज प्रभाग 14च्या भाजपा उमेदवार शिबा सय्यद यांना राकाँत प्रवेश दिला. सकाळीच त्यांच्या प्रचारार्थ सभा झाली होती. हा सत्तेचा दहशतवाद जनता तुम्हाला माफ करणार नाही!

 • 17 Dec 2021 09:40 PM (IST)

  पुणे

  सीरम इन्स्टिट्युटनं लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला (Covovax) ‘WHO’कडून मंजुरी

  12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना लवकरच मिळू शकणार लस

 • 17 Dec 2021 09:28 PM (IST)

  अकोले / अहमदनगर

  अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायत निवडणुक........ बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थीतीत कॉग्रेसचा प्रचार शुभारंभ.. नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी फिस्कटली.... शिवसेना राष्ट्रवादीची युती मात्र कॉग्रेसला डावललं.. कॉग्रेसकडे जागा मागणा-यांनी पलटी मारली... राजकारणात काही गोष्टींची काळजी घेतली पाहीजे... राजकारणात शब्दाला जागलं पाहीजे.... शिवसेना आणि राष्ट्रवादीवर महसुल मंत्र्यांची अप्रत्यक्ष टिका ... भारतीय जनता पक्षाला दुर ठेवण्यासाठी आघाडी करावी ही कॉग्रेसची भुमिका... परंतु आपला पक्ष वाढवण ही आपली जबाबदारी आपण विसरु शकत नाही.... जे झालय ते झालय जे आता आपले सात उमेदवार आहेत त्यांना निवडून आणन्याची जबाबदारी आपली आहे... महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कॉग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन....

 • 17 Dec 2021 09:28 PM (IST)

  हिंगोली

  ह्रदय विकाराच्या झटक्याने वाहकाच निधन

  मेस्मा च्या कार्यवाहीच्या धसकीने ह्रदविकाराचा झटका आल्याचा आंदोलकांचा आरोप

  आर बी बेंद्रे अस ह्रदय विकाराचा झटका आलेल्या वाहकाचं नाव

  कळमनुरी आगारात होते कार्यरत

 • 17 Dec 2021 07:52 PM (IST)

  पुणे

  दिवसभरात 73 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात रुग्णांना 74 डिस्चार्ज. - पुणे शहरात करोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00. एकूण 00 मृत्यू. -85 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 508114 - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 862 - एकूण मृत्यू -9109 -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 498143 - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6219

 • 17 Dec 2021 07:42 PM (IST)

  धनंजय मुंडे

  रोहित आणि हार्दिक मला लगेच क्रिकेट च ग्राउंड आठवलं

  संकटाच्या काळात तुमच्या विरोधात इथले मंत्री होते, मात्र दुष्काळाच्या काळात तुम्ही पाणी द्यायचं काम केलं

  सामाजिक न्याय विभागात सर्वात जास्त पत्र रोहित पवारांचे

  आम्ही स्वप्न पाहिले आमचे मतदारसंघ बारामती सारखे व्हावे, तेच स्वप्न रोहित पवारांनी पाहिले

  येत्या काळात हा मतदारसंघ दिल्लीत पोहचेल

  संकटाच्या काळात रोहित पवारांनी पाणी दिल

  तर दोन वर्षात कोविडच्या काळात देखील कोविड सेंटर उभारले, सर्व मद्दत केली

  मोठ्याच पोरग जरी असले तरी आज तुम्हाला तुमच वाटतय

 • 17 Dec 2021 07:33 PM (IST)

  पुणे

  राज्यात आतापर्यंत 40 रुग्णांची नोंद

  पुण्यातील 6 रुग्णांपैकी 4 जण दूब ईवरून आलेले तर 2 जणांना यांच्या सहवासातून लागण,

  मुंबईतील रुग्ण अमेरीकेवरून परतलेला तर कल्याण डोंबिवलीचा रुग्ण हा नायजेरीयावरून परतलेला,

  29 ते 45 वर्ष वयोगटातील रुग्णांचा समावेश,

  सर्वांच लसीकरण पुर्ण !

 • 17 Dec 2021 07:31 PM (IST)

  पुणे

  राज्यात आज 8 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोट,

  6 पुण्यात तर मुंबई 1 आणि कल्याण डोंबिवली,

  राज्यात आतापर्यंत 48 रुग्णांची नोंद !

 • 17 Dec 2021 07:30 PM (IST)

  धनंजय मुंडे

  सर्व केंद्रीय संस्था सरकारच काम करताय

  ईडीचे तर चव घातली

 • 17 Dec 2021 07:28 PM (IST)

  धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री

  रोहित दादा तुमच नाव जेव्हा ठेवलं तेव्हा त्याचा संस्कृत अर्थ तुमच्या आई वडिलांना देखील माहीत नसेल

  रोहित म्हणे सूर्याचं किरण

  काही म्हणाले महाविकास आघाडीच सरकार आलं आणि ओबीसी आरक्षण गेले

  त्यांनी इतिहास तपासावा व्ही पी सिंग यांनी आणलेला आयोग जसाचा तसा स्वीकारली Obc ची केस चालली त्यांच्या काळात, साक्ष आमच्या काळात आम्ही दोषी कसे

  बरेच लोक आमच्या सरकारवर टीका करतात... आमच्यामुळे OBC चे आरक्षण गेले... ObC आरक्षण ची केस चालली त्यांच्या काळात, साक्षी-पुरावे झाले त्यांच्या काळात... मग निकाल आमचं सरकार आल्यावर लागला तर दोषी कोण ?..

 • 17 Dec 2021 07:28 PM (IST)

  संजय दत्त

  कैसे है मामु पासून केली सुरवात

  मी विजय दर्डा याना विचारलं एवढं लंब भाषण तुम्ही कसं देता , आम्ही डोयलॉग लिहून घेत असतो

  मला भाषण देता येत नाही तेव्हा मी डायलॉग बोलतो

  तुम्ही संजू सिनेमा पहिला असेल तर त्यातल्या दोन चार गोष्टी घ्या आणि आई वडिलांची इज्जत करणे शिका

  मुन्ना भाई तीन ची मी प्रतीक्षा करत आहो

  गडकरी सारखा नेता मी अजून बघितला नाही , माझ्या वडीला नंतर ते गुण मी गडकरी मध्ये बघतो जो नेता फक्त जनतेचा विचार करतो

 • 17 Dec 2021 07:24 PM (IST)

  नितीन गडकरी

  भारतीय चित्रपट सृष्टी ने देशाला मोठे संदेश दिले , हे समाज प्रबोधनाच साधन आहे

  अमिताभ बच्चन याना मी भेटलो तेव्हा त्यांना आनंद सिनेमा बद्दल सांगितलं तो मी अनेकदा पहिला

  संजय दत्त याना कॅन्सर डिटेक्त झाला होता मात्र आता त्यांनी सांगितलं आता ते पूर्णतः त्यातून मुक्त झाले

  लोकांचा इतका प्रतिसाद आहे की आम्हाला डिजिटल प्रवेशिका देणं बंद करावा लागल

  विदर्भातील कलाकारांना यात आम्ही बोलावलं त्यांना संधी दिली जात आहे

  या आयोजनात माझे फोटो जास्त लावले ते मला आवडलं नाही , एक दोन फोटो ठीक आहे ... कारण हे आयोजन सगळ्याच आहे

  कोविड मुळे काही मर्यादा आहे त्याच पालन करावे

 • 17 Dec 2021 07:16 PM (IST)

  हार्दिक पटेल

  गुजरात मध्ये आम्ही भाजपला पाणी पाजलं ,इथे देखील तेच करूया

  रोहित पवारांमुळे आम्हाला गुजरात ला देखील कर्जत-जामखेड ओळख निर्माण झाली

  हार्दिक पटेल यांची मोदींवर टीका

  गुजरात मॉडेल खोटं

  गुजरात मध्ये 50 हजार शेकऱ्यांनी आत्महत्या केली

  गुजरात मध्ये 50 हजार करोडचा ड्रग पकडले गेले, मात्र कुठे आले नाही

  रोहित पवार शरद पवारांचे नातू असले तरी त्यांनी कधी दाखवलं नाहीं ते स्वतःला सिद्ध केलं

  शरद पवार यांच्या परिवाराला दिल्लीत बसलेले लोक त्रास देताय त्यांना धडा शिकवा

  हार्दिक पटेल यांनी राम शिंदे यांच्यावर टीका

  पालकमंत्री असतांना देखील कामे केली नाही, रस्ते खराब असल्याने मला उशीर झाला

  मी चोरांच्या सोबत लढता लढता 9 महिने जेल मध्ये होतो

  दिल्ली पुढे कधी महाराष्ट्र झुकला नाही

  स्वाभिमान आणि अभिमानाने आज पर्यत महाराष्ट्र लढला

 • 17 Dec 2021 07:15 PM (IST)

  नितीन गडकरी 

  खासदार सांस्कृतिक मोहत्सव दोन वर्षे कोरोना मुळे होऊ शकला नाही

  कोरोना मुळे अनेकांनी आपले नातेवाईक गमावले मात्र आपल्याला काळजी अजूनही घेण्याची गरज आहे

  ज्ञान विद्यान आणि तंत्रज्ञान सोबतच आपल्या कला जिवंत राहिल्या पाहिजे पाहिजे

  संजय दत्त आले , संजय दत्त त्यांचे वडील बाळा साहेब ठाकरे यांच्या जवळचे होते

  संजय दत्त यांच्या जीवनात अनेक संकट आली अन्याय झाला मात्र आता ते संकट टळलं आहे

  संजू सिनेमाने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला

  अतिशय मोठा कलाकार आहे संजय दत्त , सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचं मोठं योगदान आहे

 • 17 Dec 2021 07:04 PM (IST)

  रोहित पवार

  माझा प्रयत्न आहे बारामती सारखी एमआयडीसी झाली पाहिजे

  विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलो त्यामुळे विकास करायचा

  विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका

  विरोधक काहीही बोलले तरी घरकुल होणार

  तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही

  माझी खरी दहशत पाहीची असेल तर इथल्या सामान्य नागरिकाला हात लावला तर खरी दहशत कळेल

  ईडीचे प्रवक्ते येणार आहेय, किरीट सोमय्या यांचं नाव न घेता टीका

  अजित पवारांना काही बोलले तर आम्ही माफ करणार नाही

 • 17 Dec 2021 06:49 PM (IST)

  रोहित पवार

  माझ्या साठी कर्जतचे लोक कधी शांत बसले नाही

  कोरोनाचा काळ असला तरी अनेक प्रलंबित प्रश मार्गी लावले

  इथल्या नागरिकांना विकास हवाय

  मात्र भाजपच्या लोकांना प्रश्नच आठवत नाही, ते अतिशय खालच्या पातळीवर बोलताय

  कोणी कितीही अफवा फसरवल्या तरी मी तुमच्यासाठी झटत राहील

  मी हार्दिक पटेल यांच्याकडून मार्गदर्शन घेतो

 • 17 Dec 2021 06:44 PM (IST)

  कल्याण

  नायझेरियाहून आलेले चार जण होते कोरोना पोजिटिव्ह

  चौघाना केडीएमसीच्या कोव्हिडं सेंटर मधून मिळाला डिस्चार्ज

  आज 12 वाजता चौघाना  दिला डिस्चार्ज

  आज सायंकाळी पाच वाजता चौघांमधीलन एकाचा  ओमायक्रोन पोसिटीव्हचा आला रिपोर्ट ,तिघांचा रिपोर्ट बाकी

  चौघांची प्रकृती उत्तम ,सहा दिवसांचा होम कवारंटाईन

 • 17 Dec 2021 06:44 PM (IST)

  पुणे 

  - पुण्याहून सुटणाऱ्या 10 रेल्वे गाड्यांचा फेस्टिव्हल दर्जा काढून सामान्य गाडीचा दर्जा,

  - त्यामुळे त्या गाडीचे तिकीट दर पूर्वी प्रमाणे होणार,

  - ३० मार्चपासून होणार अंमलबजावणी,

  - कमी तिकीट दरात प्रवास कारण्यासाठी प्रवाशांना आणखी 3 महिने वाट पाहावी लागणार,

  - यामध्ये पुणे - दरभंगा, दरभंगा -पुणे , पुणे - लखनऊ ,लखनऊ - पुणे, पुणे - गोरखपूर व गोरखपूर - पुणे, पुणे -बनारस व बनारस -पुणे, पुणे - लखनऊ व लखनऊ - पुणे, या गाड्यांचा समावेश.

 • 17 Dec 2021 06:43 PM (IST)

  भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मदतीला धावली शिवसेना

  मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत प्रवीण दरेकरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेची माघार

  नागरी बँका गटातून प्रवीण दरेकरांसाठी शिवसेनेच्या अभिजीत अडसूळांची माघार

  मजूर संस्था गटातून विरोधकांनी उमेदवारीला आक्षेप घेतल्यानं प्रवीण दरेकरांची उमेदवारी आली आहे धोक्यात, सहकार विभागानेही याप्रकरणी दरेकरांकडे मागितलंय स्पष्टीकरण

  प्रवीण दरेकरांनी मजूर संस्था गट आणि बँकींग गट अशा दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता

  मजूर संस्था गटातून प्रवीण दरेकर सोमवारी अर्ज मागे घेतील

  मजूर नसतानाही मजूर संस्था गटातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचा आक्षेप घेतला गेलाय.

  नागरी बँक गटातून शिवसेनेच्या अभिजीत अडसूळ यांनी माघार घेतल्यानं प्रवीण दरेकर या गटातून बिनविरोध निवडले गेलेत

  अभिजीत अडसूळ हे सेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव असून ते सध्या ईडीच्या रडारवर आहेत

  अभिजीत अडसूळ यांना मुंबई जिल्हा बँकेत स्वीकृत संचालक म्हणून घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

 • 17 Dec 2021 06:25 PM (IST)

  लखनऊ अमित शाह

  # सहकाराला बळकट करण्यासाठी आम्ही मंत्रालय स्थापन केल

  # माझ्यासाठी सौभाग्य हे की मी देशाचा पहिला सहकार मंत्री झालो, त्याची जबाबदारी मोठी आहे

  # सहकार कस टिकेल अशी चर्चा केली जाते पण, लिज्जत पापड ही पण सहकाराची एक यशस्वी गोष्ट आहे, अमूल दूध पण सहकाराच यश आहे

 • 17 Dec 2021 06:22 PM (IST)

  लखनऊ

  गृहमंत्री अमित शाह

  # मी अनेक वर्षांपासून सहकार खात्याशी जुळलो आहे, देशात सहकार रुजवणारी एकमेव संस्था म्हणजे सहकार भारती आहे, सहकाराला मजबूत करून देशाच्या विकासात भर घालण्याचे काम सहकार भारती ही संस्था करतेय

 • 17 Dec 2021 06:22 PM (IST)

  लखनऊ

  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाषण 

  # सहकार हा भारताचा आत्मा आहे, सहकार शिवाय संस्कार नाहीत आणि संस्कार शिवाय सहकार नाही

  # सहकार भारतीने लखनऊची निवड केली आम्ही त्यांचे आभार मानतो

  # पंतप्रधान मोदींनी देशाला दिशा दिली, सहकार मंत्रालय निर्मिती करून सहकार चळवळीला बळ दिलं गेलं

  # कोरोना काळात सगळा भारत मोदींच्या पाठीशी होता, जगातील अनेक देश कोरोना मूळ उध्वस्त झाले

  # शाह यांच्याकडे सहकाराचा मोठा अनुभव आहे

 • 17 Dec 2021 06:21 PM (IST)

  चंद्रपूर

  जिल्ह्यातील चिमूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार,

  चिमूर एमआयडीसी गदगाव मार्गावर शेत शिवारातील घटनेने खळबळ,

  स्वतःच्या शेतात गवात कापत असलेल्या शेतकरी देविदास गायकवाड 39 झाला ठार,

  गुरुवारी रात्रीच घरी परत न आल्याने सुरू केली होती शोध मोहीम,

  आज वनपथकाला काही दूर अंतरावर आढळले शरीराचे काही अवयव,

  उत्तरीय तपासणी करून शव नातेवाईकाच्या केले स्वाधीन,

  वनविभागाच्या नियमानुसार तातडीची मदत म्हणून 25 हजार रुपयाची दिली गेली मदत

 • 17 Dec 2021 06:21 PM (IST)

  चंद्रकांत पाटील

  - सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे पेपरफुटीमुळे विद्यार्थ्याची मानसिकता काय होत असेल ते सरकारला दिसत नाही,

  - एस टी कर्मचारी असू द्या, शेतकरी असू द्या, विद्यार्थी असू दे सगळ्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे,

  - 100 प्रश्न असे आहेत ज्यात सरकार बरखास्त करावे लागेल, परंतु ते घडणार नाही,

  - पेपरफुटी प्रकरणाची निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी व्हावी येत्या विधान सभा अधिवेशनात आम्ही हा प्रश्न उपस्थित करणार,

  - परंतु गोंधळ घालून अधिवेशनाचे कामकाज होऊ द्यायचं नाही असा याधीचा अनुभव आहे मुळात अधिवेशन होणार का आणि झाले तर किती दिवसांचे होणार हा ही प्रश्न आहे

 • 17 Dec 2021 05:36 PM (IST)

  पुणे

  टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांना 23 डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी

 • 17 Dec 2021 05:35 PM (IST)

  नारायण राणे

  या जिल्ह्यात उद्योगाच जाळ पसरवणार आहे.महिलांसाठी विविध योजना आणत आहोत.

  30 जानेवारी पर्यंत मेस्माचे अधिकारी जिल्ह्यात येऊन विविध योजनांवर काम करतील.

  जर कोण पुढे येत असेल तर मीडियाने त्याचे पाय कापू नयेत.

  जे मला इथल्या पत्रकार परिषदेत दिसले.

  लोकसभेतील प्रश्नावर मीडियाने राऊत आणि राणे जे काही सतत दाखवलं त्याबद्दल धन्यवाद.

  ओबीसी आरक्षण थांबवणं हे सेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीच काम आहे.

  जैतापूरला आम्ही जमिनी घ्यायला गेलो नाहीत यांच्या जमिनी किती आहेत बघा.स्था

  निकांना हा प्रकल्प हवा आहे.स्थानिक लोक मला भेटून गेले.

  भाजपने बँका बुडवल्या नाहीत तर राष्ट्रवादीने बुडवल्या.कारखाने बुडवले.

  भाजपने बुडवलेला एक कारखाना किंवा एक बँक दाखवा.

  यांच्याच कार्यकिर्दीत पेपर फुटतात कसे?हे सरकार म्हणजे सावळा गोंधळ

 • 17 Dec 2021 05:06 PM (IST)

  नारायण राणे

  अपुऱ्या रुग्ण सेवेमुळे जे कोरोनात रुग्ण दगावले त्याला जबाबदार ठाकरे सरकार आहे.

  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षांवर संचयनीची केस सुरू आहे.

  भ्रष्टाचारी लोकांच्या हातात आपली बँक देणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही.

  हे राज्य सुरक्षित नाही.

  या जिल्ह्यात उद्योगाच जाळ पसरवणार आहे.महिलांसाठी विविध योजना आणत आहोत.

 • 17 Dec 2021 04:56 PM (IST)

  अहमदनगर

  कर्जात नगरपंचायत निवडणूक

  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांची जाहीर सभा

  आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात नगरपंचायत निवडणूक

  थोड्याच वेळात जाहीर सभेला होणार सुरवात

 • 17 Dec 2021 04:44 PM (IST)

  दत्तात्रेय जगताप, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद 121 (टीईटी परीक्षा घोटाळ्याचे तक्रारदार)

  - ज्या मुलांनी परीक्षा दिली होती त्यामध्ये घोटाळा झाला असेल तर त्यांची चौकशी केली जाणार,

  - पुणे पोलिसांनी आम्हाला विद्यार्थ्यांची लिस्ट दिली तर आम्ही कारवाई करू,

  - टीईटी परीक्षेची जबाबदारी ज्या कंपनीकडे होती, त्या सॉफ्टवेअर कंपनीला मी काळ्या यादीत टाकले होते,

  - जे लोकं दोषी असतील त्यांच्यावर पुणे पोलीस कारवाई करेल

 • 17 Dec 2021 04:44 PM (IST)

  पिंपरी चिंचवड

  -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आवारात मानधनावर आरोग्य विभागात कामाला असलेल्या डेंटिस्ट कडून अंगावर डिझेल टाकत आत्महत्या करण्याचा प्रयत्न

  -महेंद्र चाटे असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचे नाव

  -डॉ महेंद्र चाटे यांचा पगार कापला,अन्य डॉक्टर व्यवस्थित वागणूक देत नव्हते त्यामुळे हे पाऊल उचल असल्याची प्राथमिक माहिती

  -पिंपरी पोलिसांनी घेतले ताब्यात.पुढील तपास सुरू

 • 17 Dec 2021 04:43 PM (IST)

  नागपूर

  नागपूरकरांसाठी खुश खबर ,

  नागपूर मेट्रो च्या रिच 4 ची आज घेण्यात आली प्राथमिक टेस्ट

  सीताबर्डी स्टेशन पासून प्रजापती नगर पर्यंत घेतली टेस्ट

  नागपूर मेट्रो च्या दृष्टीने ही टेस्ट महत्वाची

  शहराच्या मध्य भागातून ही लाईन जात असल्याने याचा होणार मोठा फायदा

  आधी सुरू झालेल्या मेट्रो ला मिळत असलेला प्रतिसाद बघता रिच 4 महत्वाचा ठरणार

 • 17 Dec 2021 04:36 PM (IST)

  अजित पवार

  इतर बाबतीत सर्वात जास्त शेतकऱ्याची केळीची या विषयावर ते निवेदन आली आहेत

  तमाम शेतकर्यांना समजू शकतो परिस्थिती सुधारत चालली आहे महा विकास आघाडी जे बोलले आहे ते शंभर टक्के देईल

  राष्ट्रवादी पक्ष हा सर्व समाजाला न्याय देणारे पक्ष आहे सर्व घटकांना घेऊन चालणारा पक्ष आहे

 • 17 Dec 2021 04:35 PM (IST)

  सांगली

  मेस्मा च्या संकेतानंतरही एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम

  सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका

  मेस्मा चा मुहूर्त काढण्यापेक्षा विनिकरणाचा मुहूर्त काढा

  महिन्यात चार वेळा अलटीमेंटम दिला

  त्याच्या अलटीमेंटम ला कर्मचारी घाबरणा नाही

  कामगारांनी कामगारासाठी आंदोलन उभारलं

  कोणत्या राजकीय पक्षाच हे आंदोलन नाही

  सांगण्यावर आंदोलन करायला आम्ही दूध खुळे नाही

  सांगलीतील संपात सहभागी कर्मचाऱ्यांच परिवहन मंत्री परब त्यांना प्रत्युत्तर

 • 17 Dec 2021 04:31 PM (IST)

  पुणे

  - टीईटी परीक्षा घोटाळ्यातील तक्रारदार दत्तात्रेय जगताप,

  - जगताप सध्या महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष,

  - टीईटी परीक्षा घेणाऱ्या कंपनीला काळया यादीत जगताप यांनी टाकले होते

 • 17 Dec 2021 04:29 PM (IST)

  अजित पवार

  नाथांभाऊच्या पक्ष प्रवेशानंतर मी प्रथम जळगाव जिल्ह्यात आलो आहे

  कार्यकर्ता हा पहिल्यानंतर आलेला असा भेदभाव करतात सर्व मिळून काम करा

  जिल्ह्यातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल

  ओबीसी आरक्षणासंदर्भात तीन महिन्यात डेटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न

  बाबासाहेब आंबेडकर यांची घटना एक कायदा एक सघ राहिला आहे आहे

  घरकुल लाभार्थींना नागरिकांना स्वतःचे घर मिळाला पाहिजे

  मी शब्दाचा पक्का आहे मी जे बोलतो ते करतो

  जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे

  निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे आणि प्रवेश केला असता तर बर झाल असतं

  जळगाव जिल्ह्यात आज परिस्थिती वेगळी असते

  एकनाथ खडसे यांच्यावर भाजपात असताना खोटेनाटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला

 • 17 Dec 2021 04:20 PM (IST)

  अजित पवार

  जळगाव जिल्ह्यातील सोन्याची किंमत सर्वांनाच कळते असे नाही

  एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्याने सर्वांना आनंद झाला

  नाथाभाऊ यांनी चाळीस वर्षापासून जीवाची परवा न करता एका पक्षाचे काम केले

  जिल्हा राष्ट्रवादी मय करायचा आहे

  अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना मेळाव्यात केले आव्हान

  जळगाव जिल्ह्यात सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्याचा तुम्ही मुंबईला आहे आपण मार्ग काढू

 • 17 Dec 2021 04:14 PM (IST)

  एकनाथ खडसे

  जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सर्वांवर राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करायची आहे

  जळगाव जिल्हा राष्ट्रवादी मय करायचा आहे

 • 17 Dec 2021 04:12 PM (IST)

  एकनाथ खडसे

  इतक्या वर्षापासून मी भाजपामध्ये काम केले हा पक्ष मला झाला नाही तर तुम्हाला काय होईल

  भुसावळ पक्ष मेळाव्यात पक्षप्रवेश हे फक्त ट्रायल आहे पिक्चर अभी बाकी है

 • 17 Dec 2021 04:04 PM (IST)

  धुळे

  धुळे आगारातील आंदोलनकर्ते वाहक संजय यशवंत सोनवणे यांचा हृदयविकाराचा झटका आंदोलन सुरू असताना झाला मृत्यू आंदोलन कर्त्यांमध्ये हळहळ सरकारबद्दल तीव्र असंतोष

 • 17 Dec 2021 04:03 PM (IST)

  अनिल परब

  आजच्या बैठकीत आढावा घेतला.. अधिकारी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

  20 तारखेला न्यायालयात प्राथमिक अहवाल सादर होईल त्यानंतर निर्णय

  त्यामुळे आम्ही मेस्मा संदर्भात निर्णय त्यानंतर घेऊ

  कामगारांना भरकटवल जात आहे कोणाच एकायच हे त्यांनी ठरवलं पाहिजे

 • 17 Dec 2021 03:57 PM (IST)

  मुंबई

  शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांची उद्या पत्रकार परिषद

  उद्या दुपारी 12 वाजता प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद

  रामदास कदम यांची राजकीय पत्रकार परिषद

  रामदास कदम मोठा खुलासा करणार असल्याची माहिती

  रामदास कदम यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष

 • 17 Dec 2021 03:53 PM (IST)

  जळगाव

  भुसावळ 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात येत आहे

  एकनाथ खडसे यांचा हा भाजप ला मोठा जोरदार धक्का

  एकनाथ खडसे यांचे हे अजित दादा पवार यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न

  मुक्ताईनगर येथील 2 पंचायत समितीच्या सदस्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

  सावदा नगरपालिकेतील नकरध्यक्ष व 14 नगरसेव प्रवेशचा प्रवेश

 • 17 Dec 2021 03:37 PM (IST)

  नाशिक

  मनसेच्या सायकल रॅली ला सुरुवात

  थोड्याच वेळात पोहोचणार जिल्हाधिकारी कार्यालयावर

  पेट्रोल डिझेल भावाढी विरोधात मनसेचा मोर्चा

 • 17 Dec 2021 03:35 PM (IST)

  भुसावळ

  राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत भुसावळ नगरपालिकेचे 21 सावदा नगरपालिकेच्या 8 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत होणार प्रवेश

  भाजपाला एकनाथ खडसे यांचा जिल्ह्यामध्ये आणखी एक धक्का देण्याचा प्रयत्न.असणार

 • 17 Dec 2021 03:31 PM (IST)

  जळगाव 

  जळगावात राष्ट्रवादीचा भाजपला धक्का

  खडसे समर्थक भाजप नगरसेवक व पदाधिकारी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्व भुसावळ च्या भाजप नगराध्यक्षांसह 22 नगरसेवक व सावदा नगरपरिषदेच्या भाजपा नगराध्यक्षा अनिता येवले यांच्या 6 नगरसेवकांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश

 • 17 Dec 2021 03:30 PM (IST)

  नागपूर 

  नागपूरात एका शाळकरी विद्यार्थ्याला कोरोनाची लागण,

  कामठी मार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूल शाळेतील विद्यार्थी,

  शाळकरी विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यानं पालकांमध्ये खळबळ,

  कोरोना बाधित विद्यार्थी गृह विलिनीकरणात,

  संपूर्ण शाळेचं केलं निर्जंतुकीकरण, शाळा राहणार एक आठवडा बंद ,

  नागपूर शहर आणि ग्रामीणमधील सर्व शाळा सुरू

 • 17 Dec 2021 03:28 PM (IST)

  मुंबई

  एसटी महामंडळात परिवहन मंत्री अनिल कार्यकारी संचालक शेखर चन्ने आणि एसटी कामगार संघटना च्या प्रतिनिधी बैठक

  मेस्मा कायदा आणि वेतन निश्चिती संदर्भात चर्चा

  एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे आणि हिरेन रेडकर एसटी कामगार सेना प्रतिनिधी उपस्थित बैठक सुरू

 • 17 Dec 2021 03:21 PM (IST)

  भाजप किसान मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारीणीची रविवारी बैठक

  भाजप किसान मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक येत्या रविवारी गुरुग्राममध्ये होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन होईल तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

 • 17 Dec 2021 02:41 PM (IST)

  पालघर

  सातपाटी ग्राम पंचायतचे पाणी पुरवठा सभापती कांचन प्रकाश पाटलांवर गुन्हा दाखल

  सातपाटी कारांच्या विश्वासाला मोठा धक्का,

  सातपाटी पोलिस ठाण्यात भादवी कलम 420 सहित अन्य पाच कलमान्वे गुनाह दाखल,

  चेक चोरी करून बनावट सह्या द्वारे अढीच लाख रुपये काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल,

  ग्रामसेवक आणि सरपंचांनी दिली होती फिर्याद

  आरोपी कांचन पाटील ला पोलिसांनी केली अटक

 • 17 Dec 2021 02:32 PM (IST)

  मीरा भाईंदर

  आदिवासी पाड्यातील शाळेच्या आवारात बिबटयाचा वावर

  मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील माशाचा पाडा या आदिवासी पाड्यात असलेल्या महापालिकेच्या शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळी चक्क बिबट्याचा वावर होत आहे. स्थानिकांनी हा बिबट्या शाळेच्या आवारात जात असल्याचे मोबाईलमध्ये चित्रित केले आहे.

  दोनच दिवसांपूर्वी शाळा पुन्हा एकदा सुरु झाल्या असताना आता शाळेच्या आवारात बिबट्या येत असल्याचे समजल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  काशी मिरा भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागूनच माशाचा पडा ही आदिवासींची वस्ती हे दोन दिवसांपूर्वी या परिसरात बिबट्याचा वावर होत असल्याचे येथील रहिवाशांच्या लक्षात आले.

  लगतच्या संजय गांधी उद्यातून हा बिबट्या याठिकाणी येत आहे. यापैकी काहींनी बिबट्याला आपल्या मोबाईलमध्येही चित्रित केले आहे.

  बिबट्या कच्च्या रस्त्यावरुन शाळेच्या संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन आता जात असल्याचे या चित्रफितीमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

 • 17 Dec 2021 02:32 PM (IST)

  जळगाव

  भुसावळ उपमुख्यमंत्री अजीतदादा यांच्या कार्यक्रमात भाजप चे नेते उपस्थित

  भाजप चे आमदार संजय सावकारे खासदार रक्षा खडसे व्यासपीठावर

  नागरिकांमध्ये संम्रभ अनेक दिवसांपासून भुसावळ चे भाजप चे आमदार सावकारे राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा रंगत आहे

 • 17 Dec 2021 02:19 PM (IST)

  कोल्हापूर

  कोल्हापुरात गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी

  राधानगरी तालुक्यातील गैबी येथील घटना

  हल्ल्यात अलका चौगुले ही महिला जखमी

  शेतात दबा धरून बसलेल्या गव्याने केला हल्ला

  कोल्हापुरात गव्यांच्या हल्ल्याचे प्रकार वाढले

 • 17 Dec 2021 02:12 PM (IST)

  आशिष शेलार ऑन ओबीसी

  महाविकास आघाडी हे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी तर ठरलेच आहेत पण आता त्यांच्या राजकीय संधीचेही मारेकरी त्यांनी ठरू नयेत - आशिष शेलार

  आशिष शेलार ऑन शिवसेना

  शिवसैनिकांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी आणि स्वता मुख्यमंत्र्यांनीही आता खरच आत्मचिंतन गंभीरपणे केल पाहिजे करण्याची वेळ आली आहे

  आमच्याशी चर्चा करताना समसमान संधी द्या, समसमान खाती द्या अशी झोंबाझोंबी केली तर मग आता या सरकारमध्ये स्वताला किती टक्क्यांवर आणून ठेवल याच आत्मचिंतन तुम्हीच करा

  आमच्याशी चर्चा कररताना म्हारे छाती फुगवून अर्धी संधी, अर्धी पद हे सगळ बोलत होते तर आता काय झाल, तुम्ही सत्तेत असताना सुद्धा तुमच्या मंत्र्यांच्या खात्याला निधीच मिळत नाही आणि अशोक चव्हाण म्हणतात आमच्यामुळे सरकार आहे बोलत आहेत तर याचा विचार त्यांनीच करावा

  ४२० कोटीवर मी भाष्य करत नाही - शेलारांचा आदित्य ठाकरे यांना टोला किमान आमच्या आदित्य ठाकरे यांचा तरी या सरकारनं विचार करायला हवा होता, एक युवा नेतृत्व काम करण्याचा प्रयत्न करतय , प्रत्यक्षात किती होतय हा भाग वेगळा पण किमान त्यांचा तरी सन्मान करायला हवा होता

  युवामंत्र्यांच्या मागणीचा सन्मान होणार नसेल तर सामान्य माणसाबद्दल काय विचार होणार

  अधिवेशनच होत नसल्यान आमदारांचा प्रगतीपुस्तकच मांडता येत नाहीये, केंद्राच अधिवेशन पुर्ण होतय पण म हाराष्ट्राच दुर्दैव सर्वाधीक कमी अधिवेशन घेण्यासाठी ठाकरे यांची नोंद होईल

  माझा शब्द अंडरलाईन करा हे सरकार साखरझोपेत आहे जनतेच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात कुणी मंत्री आहेत का ? हे सरकार संपुर्णपणे हरवलय असच चित्र दिसतय

  मुंबई महापालिकेनं २०२० पासून पालिकेनं लपवलेल्या मृत्यू कारण आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, चेरी पिकींग म्हणजे फक्त चांगल आहे ते निवडून घेत त्यावर आपल्या कामाचा डोलारा उभा करण्याचा हा प्रकार आहे

  सोशिअल मिडीयातून इमेज बनवत खोट्या गोष्टी दाखवल्या जात आहेत

 • 17 Dec 2021 02:02 PM (IST)

  मेस्मा लावण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा करणार, अनिल परब

  राज्य सरकारनं एसटी संपाच्या बाबतीत ज्या गोष्टी करणं शक्य होतं, त्यापेक्षा जास्त गोष्टी केल्या आहेत. पगारवाढ आणि वेळच्या वेळी वेतन अशासंदर्भात निर्णय घेतले आहेत. विलीनीकरणाचा निर्णय कोर्टानं नेमलेल्या त्रिसदस्यीय समिती कडून होणार आहे. काही वकिलांनी एसटी कर्मचाऱ्यांना 20 तारखेला विलीनीकरणाचा निर्णय होईल असं सांगितलंय. आजच्या बैठकीत एसटी संपासंदर्भात मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला जाईल, असं अनिल परब म्हणाले.

 • 17 Dec 2021 01:55 PM (IST)

  ओबीसींसाठी राखीव ठेवलेल्या जागांवरील निवडणूक जाहीर

  गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतमोजणी पुढे ढकलली...

  -19 जानेवारीला होणार मतमोजणी.... ओबीसी प्रवर्ग व्यतिरिक्त इतर जागांसाठी 21 डिसेंबरला होणार मतदान.....

  -तर इतर ओबीसी जागांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार तिढा सोडवत 18 जानेवारीला होणार मतदान.....

  -या दोन्ही मतदानाचा एकत्रीत 19 जानेवारीला होणार मतमोजणी....

  -प्रशासनावर मतपेटी सांभाळून ठेवण्याचा वाढला ताण.....

 • 17 Dec 2021 01:15 PM (IST)

  टुमदार पुण्याचं आक्राळ विक्राळ रुप झालंय, राज ठाकरेंचं वक्तव्य

  टुमदार पुण्याचं आक्राळ विक्राळ रुप झालंय, राज ठाकरेंचं वक्तव्य

  टुमदार पुण्याचं आक्राळ विक्राळ रुप झालंय. महानगरपालिका कुठपर्यंत निधी पुरवणार हा प्रश्न आहे, असं राज ठाकरे म्हणाले मात्र, माझ्या पक्षाचे नगरसेवक असल्यास तेही करु शकतात, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

 • 17 Dec 2021 01:13 PM (IST)

  ओबीसींवर आता डबल अन्याय करण्यात येतोय: पंकजा मुंडे

  भाजप नेते आशिष शेलार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांनी राज्य निवडणूक आयुक्त यांना भेटून ओबीसी आरक्षणासंदर्भात आरक्षण दिलं आहे. एससी एसटी च्या आरक्षणाशिवाय ओपन प्रवर्गातील उमेदवार अर्ज करु शकतात. ओबीसींवर या निमित्तानं डबल अन्याय केला जात असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

 • 17 Dec 2021 12:37 PM (IST)

  ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये असं पत्र आयोगाला दिलं, विजय वडेट्टीवार

  राज्य मंत्रिमंडळाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिल्याची माहिती ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

 • 17 Dec 2021 12:26 PM (IST)

  भाजपचे लोक ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात गेले: छगन भुजबळ

  संसदीय समितीला केंद्र सरकारं जनगणनेचा डाटा 99 टक्के बरोबर असल्याच सांगितलं. तर, सुप्रीम कोर्टात केंद्रानं वेगळी भूमिका मांडली. भारत सरकारनं कोर्टात ओबीसीचा डाटा नसल्याचं सांगितलं. भाजपचे सरचिटणीस राहुल वाघ कोर्टात गेले आहेत. भाजपचे लोक आरक्षण मिळू नये म्हणून कोर्टात जातात, असं छगन भुजबळ म्हणाले.

 • 17 Dec 2021 11:55 AM (IST)

  विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटल्यावरुन नागपुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंपली

  - विधानपरिषद निवडणूकीत मतं फुटल्यावरुन नागपुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंपली

  - ‘विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीचे मतं फुटल्याचं खापर काँग्रेसवर’

  - ‘नियोजन नसल्याने काँग्रेसचे 40 पेक्षा जास्त मतं फुटले’

  - राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा गौप्यस्फोट

  - ‘महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसला मतदान केलं’

  - ‘काँग्रेसच्या नगरसेवकांनीच काँग्रेस उमेदवाराला मतदान केलं नाही’

 • 17 Dec 2021 11:35 AM (IST)

  कोल्हापूरमध्ये एसटीची सेवा त्वरित सुरू करण्यासाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर

  एसटीची सेवा त्वरित सुरू करण्यासाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर

  शहरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित घटनास्थळी पोलिस दाखल

  कोल्हापूर जिल्ह्यातील कळे इथले विद्यार्थ्यांचे आंदोलन

  एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान

  यावेळी एसटी सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली

  ज्येष्ठ नागरिकांनी देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात घेतला सहभाग

 • 17 Dec 2021 11:35 AM (IST)

  अजित पवार जळगाव दौऱ्यावर

  जळगाव जिल्हा दूध सहकारी संघाच्या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती

  जळगाव जिल्हा दूध सहकारी संघात नवीन आधुनिक दूध प्रक्रिया व पॅकिंग प्लॅन्ट आणि नवीन दुग्धजन्य पदार्थ

  यावेळी दुग्ध पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार ' राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व सर्व आमदार खासदार यांची उपस्थिती राहणार आहे.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व सर्व आमदार खासदार यांची उपस्थिती राहणार आहे.

 • 17 Dec 2021 11:01 AM (IST)

  टीईटी परीक्षा गैरप्रकार प्रकरणी तुकाराम सुपे सोबत अभिषेक सावरीकरला अटक

  टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण 2 जणांना अटक

  तुकाराम सुपे बरोबर अजून  दोघांना अटक

  शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर अटक

 • 17 Dec 2021 10:41 AM (IST)

  अहवाल येईपर्यंत एसटीचे विलिनीकरण नाही - अजित पवार

  एसटी कर्मचाऱ्यांनी सामान्य  नागरिकांचा अंत पाहू नये

  ताणल्याने तुटते, अधिक ताणू  नका

  अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

  जळगाव जिल्हाच्या सिंचनाचा प्रश्न लवकरच सुटणार

  कुठल्याही शेत्रात आर्थिक शिस्त महत्वाची

  शेतकऱ्यांनी वीज वापरली असेल, तर बिल भरावेच लागेल

  वीजबिल भरपाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया

 • 17 Dec 2021 10:35 AM (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषद

  अजित पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

  कामावर हजर व्हा, अन्यथा नोकरीचा प्रश्न

  सरकार नवीन भरीत करू शकते - अजित पवार

  पगार वाढीची हमी देऊनही संप सुरूच आहे  - पवार

 • 17 Dec 2021 10:09 AM (IST)

  निवडणुकांबाबत आता आम्हाला सरकार म्हणून आणि निवडणूक आयोगाला विचार करावा लागेल - भरती प्रकरणात जो दोषी असेल त्याला शिक्षा होईल

  - एक वेळेस निवडणूक घ्या ही सगळ्यांची इच्छा - येणाऱ्या निवडणुकांबाबत आता आम्हाला सरकार म्हणून आणि निवडणूक आयोगाला विचार करावा लागेल - भरती प्रकरणात जो दोषी असेल त्याला शिक्षा होईल - यासाठी पॅनल वर असलेल्या संस्थांवर आमचं ओबजेक्शन - विश्वासहार्य आणि योग्य संस्थेला जवाबदारी दिली पाहिजे

 • 17 Dec 2021 10:08 AM (IST)

  ओबीसी आरक्षणप्रश्नी राज्य सरकार कमी पडलं नाही: बाळासाहेब थोरात

  बाळासाहेब थोरात - राज्य सरकार कमी पडला नाही - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या जागेला स्थगिती दिली - निवडणूक आयोगाला निवडणूक थांबवण्याची विनंती केली - सगळ्या निवडणूक एकत्र घ्या असा आमचा आग्रह - पण थांबणार नसतील तर उमेदवार उभे आहेत, उघड्यावर थोडीच सोडता येणार - म्हणून आम्ही प्रचाराला लागलो

 • 17 Dec 2021 08:38 AM (IST)

  वैभववाडी घाटातील करुळ घाटात ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात

  सिंधुदुर्गच्या वैभववाडी करूळ घाटात ट्रक व टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात.अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान मात्र सुदैवाने जीवितहानी नाही.टेम्पो ट्रॅव्हलर मधील 6 प्रवासी किरकोळ जखमी.पुणे येथील टेम्पो ट्रॅव्हलर पर्यटकांना घेऊन मालवण कडे जात होता तर ट्रक कोकणातून कोल्हापूरच्या दिशेने जात होता.करूळ घाटात रात्री 3 च्या सुमारास हा अपघात घडला.अपघात एवढा भयंकर होता की समोरासमोर धडक दिल्यानंतर ट्रकने खाल्ली पलटी.जखमींना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 • 17 Dec 2021 08:13 AM (IST)

  रत्नागिरी जिल्ह्यात शेवटच्या टप्यातील लसीकरण रखडले

  रत्नागिरी जिल्ह्यात शेवटच्या टप्यातील लसीकरण रखडले

  18 वर्षावरील 91 टक्के नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

  रुग्ण संख्या घटल्याने नागरिक झाले बेफिकीर

  30 नोव्हेंबर पर्यत पहिला डोसचे 100 टक्के उद्दीष्ट अपूर्ण

 • 17 Dec 2021 07:57 AM (IST)

  रिफायनरी प्रकल्प विदर्भाला द्या, डॉ. आशिष देशमुख यांची मागणी

  - विदर्भात रिफायनरी प्रकल्प व्यवहार्य असून त्याबाबतचे सादरीकरण मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी बघावे

  - माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांची सरकारकडे पत्राद्वारे विनंती

  - उद्योगमंत्र्यांना पत्र लिहून हिवाळी अधिवेशनादरम्यान सादकरीकरणासाठी मागितली वेळ

  - ‘रिफायनरी व पेट्रोकेमिकल कारखान्याकरिता विदर्भाची मागणी किती रास्त’

 • 17 Dec 2021 07:56 AM (IST)

  नागपूर विभागातील निलंबीत एसटी कर्मचाऱ्यांची चौकशीला दांडी 

  - नागपूर विभागातील निलंबीत एसटी कर्मचाऱ्यांची चौकशीला दांडी

  - संपात सहभागी झालेल्या नागपूर विभागातील 435 कर्मचारी निलंबीत

  - निलंबीत कर्मचारी चौकशीसाठी गैरहजर

  - नागपूर विभागात रोजंदारी गटातील 90  कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

  - विभागातील 32  एसटी कर्मचाऱ्यांची बदली

  - कारवाई नंतरंही कर्मचारी संपावर ठाम

 • 17 Dec 2021 07:14 AM (IST)

  नागपुरात गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली 1 कोटी रुपयांची प्रतिबंधित सुपारी

  नागपुरात गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली 1 कोटी रुपयांची प्रतिबंधित सुपारी,

  पूर्व नागपुरातील ट्रान्सपोर्ट प्लाझा येथे छापा टाकून जप्त केली सुपारी,

  राजेश पाहुजा या व्यापाऱ्याच्या गोदामात सापडली 120 पोती प्रतिबंधित सुपारी,

  नागपूरात आणखी काही व्यापाऱ्यांकडे प्रतिबंधित सुपारी लपवून ठेवल्याची माहिती

 • 17 Dec 2021 07:13 AM (IST)

  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सहा जागा बिनविरोध

  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक पदाच्या 21पैकी सहा जागा बिनविरोध

  आतापर्यंत 27 उमेदवारांनी निवडणुकीतून घेतली माघार

  उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 22 डिसेंबरपर्यंत मुदत

  22 डिसेंबरनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार

 • 17 Dec 2021 06:59 AM (IST)

  बेळगावात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला

  बेळगावात एक तर राज्यात एकाच दिवशी एकूण पाच ओमिक्रोन रुग्ण आढळले...

  देशात सर्व प्रथम कर्नाटकची राजधानी बेंगळुर शहरात ओमिक्रोनचे दोन रुग्ण आढळून आले होते.आज आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या माहिती नुसार राज्यात नव्या पाच ओमिक्रोन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये नायजेरिया हून बेंगळुर मार्गे बेळगावला आलेल्या 52 वर्षीय व्यक्तीला ओमिक्रोनची लागण झाली आहे. बेळगावात ओमिक्रोन रुग्ण आढळून आल्या मुळे प्रशासनाची काळजी वाढली आहे.

 • 17 Dec 2021 06:15 AM (IST)

  काँग्रेस नेते हार्दिक पटेल पुण्यात दाखल

  काँग्रेस नेते हार्दिक पटेल पुण्यात दाखल,

  उद्या कर्जत नगरपंचायतीच्या प्रचाराला लावणार हजेरी,

  काँग्रेस युवक कार्यकर्त्यांनी विमानतळावर केलं स्वागत .

Published On - Dec 17,2021 6:12 AM

Follow us
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन.
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप.
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना.
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?.
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार.
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?.
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं.
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास.
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.