Maharashtra News LIVE Update | जहाल महिला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण, शासनाने ठेवले होते 6 लाख रुपयांचे बक्षीस

| Updated on: Jun 24, 2021 | 6:56 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi

Maharashtra News LIVE Update | जहाल महिला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण, शासनाने ठेवले होते 6 लाख रुपयांचे बक्षीस
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 23 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Jun 2021 07:50 PM (IST)

    जहाल महिला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण, शासनाने ठेवले होते 6 लाख रुपयांचे बक्षीस

    गडचिरोली : पोलिसांपुढे एका जहाल महिला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

    शासनाने 6 लाख रुपयांचे बक्षीस केले होते जाहीर

    शशीकला ऊर्फ अंजू आसाराम आचला असे नक्षलवाद्याचं नाव

    शशिकला धानोरा तालुक्यातील मोठा झेलिया येथील रहिवासी

    चकमकीचे 15 जाळपोळ 1 व इतर 4 असे एकूण 20 गुन्हे आहेत दाखल

    २०२१ सालामध्ये एकुण 39 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले

  • 23 Jun 2021 07:16 PM (IST)

    डेल्टा प्लस कोरोना विषाणूबाधित सर्व रुग्णांना स्वतंत्र ठेवत आहोत : राजेश टोपे

    मुंबई : राज्यात एक लाख 23 हजार सक्रिय रुग्ण आहेत

    7 जिल्ह्यात 21 डेल्टा प्लस कोरोना विषाणूचे रुग्ण सापडले आहे.

    हा आकडा काळजीसारखा जरी नसला तरी, संसर्गाचा दर जास्त असू शकतो असे सांगितले आहे.

    अँटीबॉडीज चा प्रभाव न होऊ देण्याची ताकद डेल्टा प्लस कोरोना विषाणूमध्ये  आहे

    डेल्टा प्लसच्या सर्व रुग्णांना स्वतंत्र ठेवत आहोत. त्यांचं बारकाईने निरीक्षण करत आहोत.

    डेल्टा प्लस कोरोना विषाणूसंदर्भात कारवाई सुरू आहे, आतापर्यंत एक ही मृत्यू झालेला नाही.

    अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली

  • 23 Jun 2021 06:51 PM (IST)

    प्रदीर्घ कालावधीनंतर शनिवारपासून पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस सुरू होणार 

    पुणे - प्रदीर्घ कालावधीनंतर शनिवारपासून पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस  सुरू होणार

    - प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पहिल्यांदाच विस्ताडोम कोच जोडला जाणार

    - डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ही 25 जून रोजी मुंबईहून दुपारी 5 वाजून 10 मिनिटांनी निघेल

    - ऑक्टोबरपासून डेक्कन क्वीन सुरू करण्यात आली होती.

    पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने ही सेवा बंद केली होती

    - आता प्रवाशांची गैरसोय होणे थांबणार असून सर्वांना दिलासा मिळणार आहे

  • 23 Jun 2021 06:50 PM (IST)

    नवी मुंबई विमानतळ विकासकाचा मालकी हक्क आता अदानी समुहाकडे‌

    नवी मुंबई : विमानतळाच्या विकासकाचा मालकी हक्क आता अदानी समुहाकडे‌

    याआधी मालकीहक्क जीव्हीके ग्रुपकडे होता

    नवी मुंबई विमान अदानी समुह विकसीत करणार

    राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

  • 23 Jun 2021 06:32 PM (IST)

    ओबीसींच्या जागा असलेली निवडणूक पुढे ढकलावी, राज्य सरकार मुख्य सचिवांमार्फत निवडणूक आयोगाला विनंती करणार

    मुंबई : ओबीसींच्या जागा असलेली निवडणूक पुढे ढकलावी

    राज्य सरकार मुख्य सचिवांमार्फत निवडणूक आयोगाला विनंती करणार

    आजच्या बैठकीत घेण्यात आला निर्माण

  • 23 Jun 2021 06:24 PM (IST)

    पत्रा चाळीचा विकास करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

    मुंबई : पत्रा चाळीचा विकास करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

    पत्रा चाळीचा विकास आता बिल्डर ऐवजी म्हाडा स्वतः करणार

    आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय

    गेल्या दहा वर्षापासून हा प्रकल्प प्रलंबित

    स्थानिकांच्या आंदोलनानंतर स्वतः विकास करण्याचा म्हाडाचा निर्णय

  • 23 Jun 2021 05:03 PM (IST)

    2 दुचाकींची समोरासमोर धडक 3 ठार 1 जखमी, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील घटना

    चंद्रपूर : 2 दुचाकींची समोरासमोर धडक

    3 ठार 1 जखमी

    चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पारडी शिवमंदिराजवळ झाला अपघात

    अपघाताची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत पुरविली मदत

    मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी केले रवाना

    कोरपना पोलीस करत आहेत अधिक तपास

  • 23 Jun 2021 05:02 PM (IST)

      ओबीसींवर अन्याय होतोय, मराठा आरक्षण देण्यात हे सरकार फेल झालं : सुधीर मुनगंटीवार

    नागपूर :  ओबीसींवर अन्याय होतोय, मराठा आरक्षण देण्यात हे सरकार फेल झालं : सुधीर मुनगंटीवार

    या आंदोलनात आम्ही प्रतिकात्मक शक्ती प्रदर्शन करतो, पण पुढे हे आंदोलन तीव्र होईल

  • 23 Jun 2021 04:42 PM (IST)

    राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे : देवेंद्र फडणवीस

    मुंबई : राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढते आहे. राज्यपालांनी पत्र पाठवल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यावी लागते. हे सरकार विधानसभा अध्यक्षांची निवडणून घेत नाही. आम्ही संवैधानिक नियमांची पायमल्ली करणं हे संविधाला मोडणं आहे, ही बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तसेच सरकाकडून संवैधानिक जबाबदाऱ्या पाड पाडल्या जात नसल्याची बाब राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती आम्ही राज्यपालांकडे केली आहे.

    ओबीसींचं आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे तसेच वेळकाढूपणा केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. या सरकारने राज्यामध्ये ओबीसींना कोणतही राजकीय आरक्षण ठेवलेलं नाही. त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्याची आमची भूमिका होती. मात्र, आता जिल्हापरिषदेच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. त्यामुळे आम्ही राज्यपालांकडे या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.

  • 23 Jun 2021 04:15 PM (IST)

    ओबीसी आरक्षण रद्दच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरामध्ये भाजपचे 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन

    औरंगाबाद : राजकारणातील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरामध्ये 26 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्यावतीने तीव्र स्वरूपाचा चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. तशी माहिती भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल सावे यांनी दिली. ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय कुठल्याच निवडणुका घेऊ नयेत अन्यथा आम्ही तीव्र संघर्ष करू असेही भाजप आमदार अतुल सावे यांनी सांगितले

  • 23 Jun 2021 04:03 PM (IST)

    भाजप नेते राजभवनात दाखल, अतुल भातखलकर, मनीषा चौधरी, गिरीश महाजन यांचा सहभाग

    भाजप नेते राजभवानात दाखल

    आमदार अतुल भातखलकर, आमदार मनीषा चौधरी, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा राजभवनात दाखल

  • 23 Jun 2021 03:59 PM (IST)

    चार दिवसाच्या विश्रांतीनंतर सांगलीमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात

    सांगली : गेल्या चार दिवसाच्या विश्रांतीनंतर सांगलीमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात

    उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे आज थोडाफार दिलासा मिळाला

  • 23 Jun 2021 03:49 PM (IST)

    सांगली जिल्हा परिषदेस खिंडार, भाजपचे विद्यमान सदस्य नितीन नवले यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

    सांगली : भाजपची सत्ता असलेल्या सांगली जिल्हा परिषदेस खिंडार पडायला सुरुवात

    अंकलखोप गटातील भाजपचे विद्यमान सदस्य नितीन नवले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

    पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड व जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी या प्रवेशासाठी पुढाकार घेतला.

  • 23 Jun 2021 12:28 PM (IST)

    माकपच्या आंदोलनाला विडी कामगार महिलांची तुफान गर्दी

    सोलापूर -

    माकपच्या आंदोलनाला विडी कामगार महिलांची तुफान गर्दी

    सोलापूर जिल्हाधिकारी कार्यायलासमोर विडी कामगार महिला एकत्रित

    उच्च न्यायालयात धूम्रपानमुळे कोरोना होत आहे असा तर्क लावत स्नेहा मार्जाडी यांनी दाखल केली आहे याचिका

    याचिकेवर सरकारला उद्या 24 जून पर्यंत आपली बाजू मांडायची आहे

    सरकारने विडी कामगारांचा विचार करून आपली बाजू मांडावी अशी माकपची मागणी

    आंदोलन अद्याप सुरू नाही,मात्र महिला मोठ्या संख्येने एकत्रित जमल्या आहेत

  • 23 Jun 2021 11:50 AM (IST)

    पुण्यातील लक्कड रिअॅलीटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ग्रुपकडून ठेवीदारांची फसवणूक

    पुण्यातील लक्कड रिअॅलीटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ग्रुपकडून ठेवीदारांची फसवणूक,

    गुंतवलेल्या रकमेवर 15 टक्के परतावा देतो म्हणून घेतले पैसे, मात्र परतावा न दिल्यानं गुंतवणूकदारांची येरवडा पोलीसात तक्रार ,

    तपासानंतर गुंतवणूकदारांची रक्कम तब्बल 25 कोटी रुपये असल्याचं उघड, आणखी काही कोटींचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता,

    काल येरवडा पोलिसांनी कन्स्ट्रक्शनच्या मालकाला अमित लूक्कडला घेतलं ताब्यात,

    अमित लूक्कडला 7 दिवसांची पोलीस कस्टडी,

    पुण्यात डीएसकेनंतर लूक्कड ग्रुपचा फसवणूकीचा मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता,

    एमपीआयडी कायद्यांतर्गत अमित लुक्कडवर कारवाई,

    पुण्यातील एका ठेवीदारानं तक्रार केल्यावर घोटाळा बाहेर

  • 23 Jun 2021 11:48 AM (IST)

    माण तालुक्यात सातवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

    सातारा :

    माण तालुक्यात सातवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

    अल्पवयीन चुलत भाऊ आणि एकावर गुन्हा दाखल

    अल्पवयीन मुलगी 7 महिन्याची गरोदर

    दहिवडी पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल

  • 23 Jun 2021 11:48 AM (IST)

    येवला बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे सचिव कार्यालयात धरणे तर मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

    येवला

    - येवला बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे सचिव कार्यालयात धरणे तर मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

    - व्यापाऱ्याकडून शेतकरी मारहाण प्रकरणी आंदोलन

    - महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक

    - आंदोलनामुळे कांदा लिलाव पडले बंद

  • 23 Jun 2021 10:36 AM (IST)

    पांडवकडा परिसरात एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

    पांडवकडा परिसरात एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

    संध्याकाळी पांडवकडा धबधबा पाहण्यासाठी 3 मित्र गेले होते

    पांडवकडा परिसरात अनेक छोटे-मोठे धबधबे सुरु झाले आहे

    डोंगरात पाऊस पडल्यामुळे पाण्याच्या मोठा प्रवाह आला

    यात तिघे वाहून गेले होते त्यातील दोघांना वाचण्यात यश

    फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी रात्री 7 वाजता काढले बाहेर

  • 23 Jun 2021 10:35 AM (IST)

    मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा, मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस होणार सुरु

    मनमाड - मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

    जीवनवाहिनी समजली जाणारी मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस होणार सुरु

    येत्या 26 तारखेपासून होणार सुरु

    मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेसही 25 तारखेपासून होणार सुरु

    रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वे प्रशासनाने दोन्ही रेल्वे सुरु करण्याचा घेतला निर्णय

  • 23 Jun 2021 10:29 AM (IST)

    सरपंच पद रिक्त झालेल्या 15 ग्रामपंचायतीचे 29 जूनला फेरआरक्षण

    सोलापूर -

    सरपंच पद रिक्त झालेल्या 15 ग्रामपंचायतीचे 29 जूनला फेरआरक्षण

    15 ग्रामपंचायतीच्या ठिकाणी संबंधित प्रवर्गाच्या सदस्य नसल्याने सरपंच पद होते रिक्त

    त्यामुळे यापूर्वी करण्यात आलेले आरक्षण करण्यात आले रद्द

    29 जून रोजी तहसीलदारस्तरावर काढण्यात येणार आरक्षण

  • 23 Jun 2021 10:28 AM (IST)

    सातारा जिल्हा सत्र न्यायालयातुन आरोपीचे पलायन

    सातारा जिल्हा सत्र न्यायालयातुन आरोपीचे पलायन

    मात्र काही वेळातच पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

    सुरज राजु माने असे संशयित आरोपीचे नाव

    न्यायालयात पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आरोपीने केले कृत्य

  • 23 Jun 2021 10:27 AM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासनाकडून 300 कोटी रुपये वितरित

    औरंगाबाद -

    एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासनाकडून 300 कोटी रुपये वितरित

    कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दोन दिवसात रक्कम जमा होणार अशी सूत्रांची माहिती..

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मिळणार थकलेले वेतन..

    मे महिन्याचा पगार हा लांबणीवर गेला असल्याने कर्मचारी सापडले होते आर्थिक अडचणीत

    कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटी वितरित

  • 23 Jun 2021 10:23 AM (IST)

    कर्जत तालुक्यात व्याजाच्या पैशासाठी ट्रॅक्टर नेला ओढून

    अहमदनगर

    कर्जत तालुक्यात व्याजाच्या पैशासाठी ट्रॅक्टर नेला ओढून

    ट्रॅक्टर ओढून येणाऱ्या सावकार या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    महेंद्र उर्फ गणेश नाना नेटके अस आरोपीचे नाव

    वैभव अंकुश दळवी व त्यांच्या भावाने घेतलेले ५ लाख ५० हजार रुपये व त्यावरील व्याजासह 10 लाख रुपये द्या असे म्हणून लाथाबुक्याने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

  • 23 Jun 2021 10:22 AM (IST)

     नागपूर विद्यापीठ काढणार चार लाख विद्यार्थ्यांचा सामुहिक  विमा

    नागपूर विद्यापीठ काढणार चार लाख विद्यार्थ्यांचा सामुहिक  विमा

    - कोरोनामुळे विद्यार्थ्यांना बसला आर्थिक फटका
    - आजाराच्या संकटात संरक्षण मिळावं म्हणून देणार विमान कवच
    - विद्यापीठाने नेमलीय तज्ज्ञांची समिती
    -  नागपूर विद्यापीठाचा चांगला निर्णय, चार लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा
    नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॅा. संजय दुधे यांची माहिती
  • 23 Jun 2021 09:08 AM (IST)

    तिथीनुसार शिवराज्यभिषेक सोहळा नागपूरच्या महाल येथील शिवाजी चौकात साजरा

    नागपूर -

    तिथीनुसार दरवर्षी शिवराज्यभिषेक सोहळा नागपूरच्या महाल येथील शिवाजी चौकात साजरा करण्यात येतो..

    मात्र सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट शिवराज्याभिषेक सोहळ्यावर असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला...

    सर्वप्रथम शिवछत्रपतीच्या प्रतिमेला पंचामृताचा अभिषेक करण्यात आला...

    ज्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नवे वस्त्र धारण करण्यात आले

  • 23 Jun 2021 08:29 AM (IST)

    मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 103.63 रुपये तर डिझेल 95.72 रुपये प्रति लिटर

    - मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ, महागाईचा भडका

    - मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 103.63 पैसे इतकी आहे. डिझेलचा दर प्रति लिटर 95.72 पैसे आहे,

    - पेट्रोल 27 पैशांनी महागलंय

    - डिजेल २८ पैसे महागलंय

    - पावर पेट्रलचा आजचा दर 107.64 पैसे आहे

    - पेट्रल ११५ रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज यापुर्वीच तज्ञांनी वर्तवला होता

    - बोललं जातंय की पेट्रोल हे 120 रुपये प्रती लिटर पर्यंत जाऊ शकतं

    - महामारीच्या काळात सतत दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडतंय

    - राज्यात काही ठिकाणी भाज्यांचे दर गगनाला भिडलेयत

  • 23 Jun 2021 08:26 AM (IST)

    काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थीतीत कृषिविधेयक बिलांची होळी

    जळगाव -

    काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थीतीत कृषिविधेयक बिलांची होळी

    फैजपूर येथे पहिल्यांदा काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. त्याच ठिकाणाहून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्याला करणार सुरवात

  • 23 Jun 2021 08:25 AM (IST)

    मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसाची दांडी

    औरंगाबाद -

    मराठवाड्यावर कोसळणार दुबार पेरणीचे संकट

    मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसाची दांडी

    76 तालुक्यांपैकी 60 तालुक्यांवर दुष्काळाचे सावट

    पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

    पाऊस नसल्यामुळे लाखो शेतकरी झाले हवालदिल

    मराठवाड्यात खरिपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण

    पाऊस नसल्यामुळे सगळीच पिके वाया जाण्याची भीती

  • 23 Jun 2021 08:24 AM (IST)

    नवी मुंबईत आंदोलनासाठी पोलिसांचा नकार मात्र भूमिपुत्र आंदोलनावर ठाम

    नवी मुंबई

    नवी मुंबईत आंदोलनासाठी पोलिसांचा नकार मात्र भूमिपुत्र आंदोलनावर ठाम

    24 जून सिडको घेराव आंदोलनासाठी पोलिस प्रशासन सज्ज

    नवी मुंबई शहराला आले पोलीस छावणी चे स्वरूप गावो गावी पोलीसांचे मोकड्रिल सुरु

    एकिकडे पोलिसांचे मोकड्रिल तर दुसरी कडे भूमिपुत्रांच्या गावो गावी प्रचार फेऱ्या सुरु

    कायदा सु्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेशबंदी

  • 23 Jun 2021 08:17 AM (IST)

    शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना दिलासा, सहा महिन्यांच्या शिक्षेप्रकरणी उच्च न्यायालयात जामीन मंजूर

    औरंगाबाद -

    शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना दिलासा

    सहा महिन्यांच्या शिक्षेप्रकरणी उच्च न्यायालयात जामीन मंजूर

    पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकरणी झाली होती शिक्षा

    औरंगाबादच्या सत्र न्यायालयाने ठोठावली होती सहा महिन्यांची शिक्षा

    आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यावर होती अटकेची टांगती तलवार

    औरंगाबाद खंडपीठाने जमीन मंजूर केल्यानंतर प्रदीप जैस्वाल यांना दिलासा

  • 23 Jun 2021 08:04 AM (IST)

    खासदर नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राला स्थगिती मिळाल्यानंतर नाशकात जल्लोष

    नाशिक - खासदर नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राला स्थगिती मिळाल्यानंतर नाशकात जल्लोष..

    युवा स्वाभिमानी पक्षाने केला जल्लोष..

    पेढे वाटून, फटाके फोडून केला जल्लोष

    राणा यांना गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया देत केली घोषणाबाजी

  • 23 Jun 2021 08:03 AM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसीला धक्का

    - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसीला धक्का

    - निवडणूक जाहिर झाल्याने ओबीसी नेते संतप्त

    - सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच्या चिंतन बैठकीत गाजणार मुद्दा

    - नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ तर पंचायत समितीच्या ३१ जागांवर निवडणूक

    - निवडणूकीत ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं, सर्व जागा खुल्या वर्गातून

    - ओबीसी उमेदवारांना बसणार मोठा फटका

  • 23 Jun 2021 07:42 AM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसीला धक्का

    - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसीला धक्का

    - निवडणूक जाहिर झाल्याने ओबीसी नेते संतप्त

    - सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच्या चिंतन बैठकीत गाजणार मुद्दा

    - नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ तर पंचायत समितीच्या ३१ जागांवर निवडणूक

    - निवडणूकीत ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं, सर्व जागा खुल्या वर्गातून

    - ओबीसी उमेदवारांना बसणार मोठा फटका

  • 23 Jun 2021 07:41 AM (IST)

    भुजबळानंतर आता भाजप आमदार देवयानी फरांदे देखील ओबीसी लढाईच्या मैदानात

    नाशिक - भुजबळानंतर आता भाजप आमदार देवयानी फरांदे देखील ओबीसी लढाईच्या मैदानात

    भुजबळांच्या समता परिषदेला पाठिंबा नाही

    पण सगळ्या ओबीसी संघटना एकत्र आल्यास पाठिंबा देण्याचं आश्वासन

    26 तारखेला पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात आंदोलनाची हाक

  • 23 Jun 2021 07:40 AM (IST)

    ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळांची समता परिषद आक्रमक

    नाशिक - ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळांची समता परिषद आक्रमक

    शहरासह जिल्ह्यात राबवणार ' आरक्षण पे चर्चा ' कार्यक्रम

    ओबीसी नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना भूमिका मांडण्यास भाग पडणार

    मराठा आरक्षणाच्या लढाईनंतर आता ओबीसी नेते देखील आक्रमक

  • 23 Jun 2021 07:40 AM (IST)

    नाशिक महापालिकेच्या बहुचर्चित बससेवेची ट्रायल रन पूर्ण

    नाशिक - महापालिकेच्या बहुचर्चित बससेवेची ट्रायल रन पूर्ण

    प्रवाशांची चढ उतार करून धावल्या बस

    1 जुलै पासून प्रत्यक्ष बससेवेला होणार सुरुवात

    शहरातील पाच मार्गांवर पहिल्या टप्प्यात धावणार बस

    अडीच वर्षांपासून रखडलेल्या बस सेवेला अखेर मुहूर्त

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारला प्रकल्प

    सर्वपक्षीय विरोधानंतर देखील बससेवेला हिरवा कंदील

  • 23 Jun 2021 07:11 AM (IST)

    नाग नदीच्या पात्रात धारदार शस्त्राने एकाची हत्या

    - नाग नदीच्या पात्रात धारदार शस्त्राने एकाची हत्या

    - रक्ताने नाग नदिचं पात्र झालं लालं

    - अनैतिक संबंधातून योगेश डोंगरे ची हत्या

    - बघ्यांनी हत्येची लाईव्ह क्लिप मोबाईलमध्ये शुट

    - हत्येची थराराची व्हीडीओ क्लीप व्हायर

    - कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत घडलं हत्याकांड

    - दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

  • 23 Jun 2021 06:56 AM (IST)

    पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 'सिटी लायब्ररी' उभारण्याचे प्रस्तावित

    पुणे

    स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 'सिटी लायब्ररी' उभारण्याचे प्रस्तावित

    स्थायी समितीने या प्रकल्पाच्या सहा कोटी 71 लाख रुपयांच्या निविदेला दिली मंजुरी

    महापालिके ने केलेली राज्यातील ही पहिली 'सिटी लायब्ररी' ठरणार

    घोले रस्त्यावर महापालिके च्या महर्षी मामाराव दाते मुद्रणालयाची इमारतीच्या ठिकाणी उभारणार सिटी लायब्ररी

    सिटी लायब्ररीची प्रस्तावित इमारत तळमजला अधिक तीन मजले अशी असणार

  • 23 Jun 2021 06:43 AM (IST)

    परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा, नाशिक पोलिसांकडून अनिल परब यांना क्लीन चिट

    नाशिक - परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा

    नाशिक पोलिसांकडून अनिल परब यांना क्लीन चिट

    तक्रारदार गजेंद्र चव्हाण यांच्या तक्रारीवरून सुरू होती अधिकाऱ्यांची चौकशी

    पोलिसांनी तब्बल 12 जणांचा जवाब नोंदवला होता

  • 23 Jun 2021 06:43 AM (IST)

    पुणे शहरात मतदार यादीतील छायाचित्र अद्ययावतीकरणाचे काम सुरू

    पुणे

    शहरात मतदार यादीतील छायाचित्र अद्ययावतीकरणाचे काम सुरू

    यामध्ये एकट्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील 70 हजार 741 मतदारांची छायाचित्रे मतदार यादीमध्ये नसल्याच आलं समोर

    पुणे महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदार यादीतील छायाचित्र अद्ययावतीकरणाचे काम सध्या सुरू

    यात वडगाव शेरीमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या 430 यादी भागातील 70 हजार 741 मतदारांची छायाचित्रे नसलेली यादी, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध

  • 23 Jun 2021 06:43 AM (IST)

    पुण्यात रॅली काढून दहशत पसविणाऱ्या आणि गेली दोन महिने फरार असलेल्या आरोपीला अटक

    पुणे

    गुंड माधव वाघाटे याचा खून झाल्यानंतर त्याची अंत्यविधीची रॅली काढून दहशत पसविणाऱ्या आणि गेली दोन महिने फरार असलेल्या आरोपीला अटक

    गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने केली अटक

    सिद्धार्थ संजय पलंगे (वय २१, रा. गुलमोहर सोसायटी, बालाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव

    पलंगे याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, मारामारी असे ३ गुन्हे सहकारनगर, दत्तवाडी, बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल

  • 23 Jun 2021 06:41 AM (IST)

    मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा केवळ एकच शिफ्टमध्ये चालणार

    पुणे

    मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा केवळ एकच शिफ्टमध्ये चालणार

    आजपासून न्यायालयीन कामकाज सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित सुरू राहणार

    न्यायाधीश मात्र पूर्ण क्षमतेने कार्यरत असणार, या या निर्णयामुळे वकिलांमध्ये नाराजी

Published On - Jun 23,2021 6:30 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.