LIVE | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण,एटीएसकडून क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांची चौकशी

| Updated on: Mar 19, 2021 | 3:58 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण,एटीएसकडून क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांची चौकशी
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Mar 2021 11:44 PM (IST)

    मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण,एटीएसकडून क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांची चौकशी

    मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसच्या हाती महत्वाची माहिती आल्याची प्राथमिक माहिती

    महाराष्ट्र एटीएसने क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी मनसुख हिरेन प्रकरणात चौकशीसाठी बोलावलंय

    सुनील माने कांदिवली क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक

    एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये चौकशी सुरू असल्याची माहिती

  • 18 Mar 2021 10:08 PM (IST)

    शिर्डीमध्ये पाच वाहनांचा विचित्र अपघात, कोणतीही जीवितहानी नाही

    शिर्डीमध्ये पाच वाहनांचा विचित्र अपघात

    नगर-मनमाड महामार्गावर झाला अपघात

    राहाता तालुक्यातील कोल्हार गावात अपघात

    पाच वाहने एकमेकांना धडकली, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही

    तीन ट्रक आणि दोन कारचा अपघात

    एका ट्रक चालकाला किरकोळ दुखापत

  • 18 Mar 2021 08:44 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 2752 नवे रुग्ण, मृतांचा आकडा पाच हजारांच्या पार

    पुणे कोरोना अपडेट

    - दिवसभरात पुण्यात 2752 कोरोना रुग्णांची वाढ

    - दिवसभरात 885 रुग्णांना डिस्चार्ज

    - कोरोनाबाधित 22 रुग्णांचा मृत्यू,  06 रूग्ण पुण्याबाहेरील

    - 440 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    - एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 226549

    - ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 16877

    - एकूण मृत्यू - 5002

  • 18 Mar 2021 08:01 PM (IST)

    नागपूरमध्ये ट्रॅव्हल्सची मालवाहू गाडीला धकड; मध्यप्रदेशातील दोघांचा मृत्यू

    नागपूर : नागपूर-सावनेर मार्गावरील पाटनसावंगी पुलावर भीषण अपघात घडला आहे. मध्यप्रदेशच्या इंदोर आणि भोपाळवरून प्रवाशांना घेऊन नागपूरला येत असलेल्या रॉयल स्टार नामक ट्रॅव्हल्सने मालवाहू गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून ते मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील रहिवासी आहेत. धनराज वानखडे आणि शिवराम चौरिया असे त्यांचे नाव आहे.

  • 18 Mar 2021 07:23 PM (IST)

    नागपुरात आज पुन्हा कोरोना ब्लास्ट, तब्बल 3796 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    नागपुरात आज पुन्हा कोरोना ब्लास्ट

    आज 3796 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता वाढली

    तर 1277 जण आज कोरोनामुक्त झाले

    एकूण रुग्ण संख्या - 182552

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 154410

    एकूण मृत्यू संख्या - 4528

  • 18 Mar 2021 07:22 PM (IST)

    माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना अखेरचा निरोप, कार्यक्रत्यांना अश्रू अनावर

    अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना अखेरचा निरोप

    गांधी यांच्या घरापासून निघाली अंतयात्रा, हजारो कार्यकर्त्यांची गर्दी

    दिलीप गांधी तीन वेळा नगर दक्षिण मतदारसंघातून निवडून आले होते. तर अटल बिहारी वाजपेयींच्या काळात ते केंद्रात राज्यमंत्री होते.

    गांधी यांना निरोप देतांना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

  • 18 Mar 2021 06:50 PM (IST)

    गडचिरोलीमध्ये आज 54 नवे कोरोनाबाधित,  ओलांडला 10 हजारांचा टप्पा 

    गडचिरोली : आज जिल्हयात 54 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आतापर्यंत बाधित 10020 पैकी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 9618 वर पोहचली आहे. तसेच सध्या 294 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्हयात एकूण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.99 टक्के  आहे.

  • 18 Mar 2021 06:03 PM (IST)

    LIVE | सचिन वाझे प्रकरणात एक स्कॉर्पिओ, एक इनोव्हा, दोन मर्सिडीज, NIA च्या हाती घबाड

    मुंबई : अनिल अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणाशी निगडीत तिसरी मर्सिडीज गाडी ताब्यात घेण्यात आली. स्कॉर्पिओ वगळता आणखी तीन म्हणजे एक इनोव्हा आणि दोन मर्सिडीज अशा एकूण गाड्या आहेत.

  • 18 Mar 2021 05:37 PM (IST)

    शर्जील उस्मानीची स्वारगेट पोलीस स्टेशनला हजेरी, पोलिसांनी जबाब नोंदवला

    - एल्गार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या शर्जील उस्मानीने आज पुन्हा स्वारगेट पोलीस स्टेशनला लावली हजेरी

    - आज सकाळी साडे अकरा ते दुपारी साडे तीन शर्जील स्वारगेट पोलीस ठाण्यात होता

    - एल्गार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार शर्जील उस्मानी आज पुन्हा पुणे पोलिसांसमोर हजर झाला.

    -  यावेळी शर्जिल याला जबाब नोंदवून  सोडण्यात आले

    - 22 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार असून त्यानुसार पुढील कारवाई होणार आहे.

    - सकाळी साडे आकरा ते दुपारी साडे तीन तो पोलीस ठाण्यात होता, असे उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले.

  • 18 Mar 2021 05:20 PM (IST)

    पुण्यात दुपारपर्यंत 5 हजार नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट 25 टक्क्यांच्या पुढे

    - पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतच 5 हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण

    - पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी सरासरी दर हा 25 टक्क्यांच्या पुढे

    - यामध्ये पुणे शहरातली रुग्णसंख्या 2500 पेक्षा जास्त

    पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 1200 नवे रुग्ण सापडले

    - संध्याकाळपर्यंत आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता

    - बुधवारी एकाच दिवसांत 2 हजार 587 नवीन कोरोना रुग्ण सापडण्याचा उच्चांक नोंदवला गेलाय.

  • 18 Mar 2021 04:40 PM (IST)

    'वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणताही दबाव नव्हता', नवाब मलिक यांनी सर्व आरोप फेटाळले

    माजी पोलिसा अधिकारी सचिन वाझे यांना सेवेत घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव होता असा आरोप केला गेला. मात्र, हे आरोप नवाब मलिक यांनी फेटाळून लावले आहेत. तसा कुठलाही  दबाव टाकण्या आला नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटलंय. तसेच जळगावमधील सत्तापरिवर्तनावरसुद्धा त्यांनी भाष्य केलंय. "जळगावमध्ये ज्या पद्धतीनं सत्तापरिवर्तन झाले त्यातून भाजपला बोध झाला असेल. सांगलीत‌ जे झाले तेच आता जळगावमध्ये झालं.  भाजप जे आधी करत होतं तेच आता त्यांच्याविरोधात होतंय," असं नवाब मलिक म्हणाले.

  • 18 Mar 2021 04:22 PM (IST)

    नांदगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, खबरदारी म्हणून तीन दिवसांचा जनता कर्फ्यु

    मनमाड : नांदगाव शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन दिवसांचा जनता कर्फ्यु

    येत्या शनिवारी ,रविवारी आणि सोमवारी राहणार जनता कर्फ्यु

    20 मार्च ते 22 मार्चपर्यंत राहणार जनता कर्फ्यु

    जनता कर्फ्युत दवाखाने, मेडिकल स्टोअर आणि दूध विक्री केंद्र वगळता इतर सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे नगरपरिषदने काढले आदेश

  • 18 Mar 2021 03:18 PM (IST)

    नितीन राऊत‌ यांचं मंत्रिपद धोक्यात, उर्जामंत्रिपदाचा कारभार नाना पटोलेंकडे?

    नवी दिल्ली : उर्जामंत्री नितीन राऊत‌ यांचं मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केला जात आहे. वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन मागील काही दिवसांपासून राऊत यांच्यावर विरोधकांनी सातत्याने टीका केली आहे. राऊत यांच्या जागी आता मंत्रिपदाचा कारभार काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज काँग्रेस नेत्यांची‌ दिल्लीतील हायकमांडसोबत बैठक सुरु आहे.

  • 18 Mar 2021 03:05 PM (IST)

    पोलीस अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका, चौकशीत बाधा येऊ नये म्हणून पोलीस आयुक्त बदलण्याचा निर्णय- अनिल देशमुख

    - आमच्या अधिकार्‍यांकडून गंभीर चुका झाल्या आहेत

    - एटीएस आणि एनआयएकडून याचा तपास सुरू आहे

    - चौकशीतून जे समोर येईल त्यानुसार जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल

    त्यामुळे चौकशीत बाधा येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बसून आम्ही आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला

    -- आयुक्तालयातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून चुका झाल्या म्हणून ही बदली करण्यात आली

  • 18 Mar 2021 03:01 PM (IST)

    जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा, महापौरपदी जयश्री महाजन, उपमहापौरपदी कुलभूषण पाटील

    जळगाव महानगरपालिकेचे महापौर उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली.  महापालिकेवर शिवसेनेने आपला भगवा फडकवला असून महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड करण्यात आलीये.  निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता जल्लोष सुरु आहे.

  • 18 Mar 2021 02:28 PM (IST)

    पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवळी पाटी येथे रास्ता रोको

    सोलापूर -

    वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

    पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवळी पाटी येथे रास्ता रोको

    वीज कनेक्शन तोडण्याचा ऊर्जामंत्र्यांचा चुकीच्या आदेशाचा ही करण्यात आला निषेध

    सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 18 Mar 2021 02:18 PM (IST)

    जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा

    जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष, करत सतरा मजली इमारतीसमोर फटाक्यांची आतषबाजी केली

  • 18 Mar 2021 01:37 PM (IST)

    शिवसेनेकडून जळगावात भाजपचा करेक्ट कार्यक्रम, सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती

    जळगाव महानगरपालिकेचे महापौर उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. त्यामध्ये शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन विजयी झाल्या आहेत. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी सेनेच्या उमेदवारांच्या विजयाचे बॅनर महानगरपालिके बाहेर लावण्यात आले होते.

  • 18 Mar 2021 01:06 PM (IST)

    चंद्रपुरातील पॅराकमांडो असलेल्या सैनिकाची आग्रा येथे आत्महत्या

    चंद्रपूर - पॅराकमांडो असलेल्या सैनिकाची आग्रा येथे आत्महत्या, जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथील रहिवासी, निखिल श्रावण बुरांडे- 25 असे आहे नाव, आग्रा सैन्य कॅन्टोनमेंट परिसरातील राहत्या खोलीत गळफास लावून केली आत्महत्या, आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट, आज मानोरा येथे आणला जाणार मृतदेह, सैन्य सन्मानात होणार अंत्यसंस्कार

  • 18 Mar 2021 01:00 PM (IST)

    भाजपा नगरसेवक संजय भोपींचे कोरोनामुळेच निधन

    पनवेल

    भाजपा नगरसेवक संजय भोपींचे कोरोनामुळेच निधन

    दोन महीन्यापासून घेत होते रुग्णालयात उपचार

    कोरोना काळात गोरगरीब गरजूंना मदतीचा हात

  • 18 Mar 2021 10:10 AM (IST)

    कोरोनाचा उद्रेक थांबेना, बीडमध्ये 266 नवीन रुग्णांची भर

    बीड-

    कोरोनाचा उद्रेक थांबेना, आज पुन्हा 266 नवीन रुग्णांची भर, बाधितांचा आकडा 21 हजार 224 वर, आतापर्यंत 19 हजार 469 रुग्ण कोरोनामुक्त, 597 जणांचा मृत्यू

  • 18 Mar 2021 10:09 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव शासनाच्या वेतनाव्यतिरीक्त अतिरिक्त भत्ता घेत घेत असल्याची माहिती उघड

    पुणे -

    - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव शासनाच्या वेतनाव्यतिरीक्त अतिरिक्त भत्ता घेत घेत असल्याची माहिती उघड

    - उच्च शिक्षण संचालनालयाने विद्यापीठाचे कुलगुरूंना पाठवली नोटीस

    - तात्काळ अहवाल सादर करण्याच्या दिल्या सूचना

    - उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.धनराज माने यांनी विद्यापीठाला बजावली नोटीस

    - विद्यापीठातील अनेक पदाधिकारी विद्यापीठ निधीतून अतिरिक्त भत्ते घेत असल्याची माहिती उघड

    - उच्च शिक्षण संचालनालयाने नोटीस पाठवल्यानं अनेकांचे धाबे दणाणले

    - विद्यापीठ काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष

  • 18 Mar 2021 09:43 AM (IST)

    बुलडाण्यात 885 नवीन रुग्ण आढळले

    बुलडाणा

    आज आढळले 885 नवीन रुग्ण,

    आजपर्यंत जिल्ह्यत 27805 रुग्ण आढळले,

    तर आजपर्यंग 229 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला

    4460 रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

  • 18 Mar 2021 09:36 AM (IST)

    शहापूर तालुक्यात आज नवीन 25 रुग्ण कोरोना बाधित

    शहापूर -

    शहापूर तालुक्यात आज नवीन 25 रुग्ण कोरोना बाधित

    शेणवे आश्रम शाळेलतील 10 मुली कोरोना बाधित झाल्या असून त्यांना विलगिकरणासाठी ठाणे येथे पाठवण्यात आले

    तर आज शहापूर तालुक्यातील सर्व आश्रम शाळेतील विद्यर्थ्यांची वैद्यकीय तपाणी केले जाणार आहे.

  • 18 Mar 2021 09:35 AM (IST)

    सोलापुरातील सात साखर कारखान्यांचे मालमत्ता जप्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    सोलापूर -

    सात साखर कारखान्यांचे मालमत्ता जप्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्यांवर साखर कारखान्यावर आरसीसीची कारवाई

    मालमत्ता जप्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना दिले आदेश

    शेतकऱ्यांचे थकीत पैसे कधी मिळणार हे आता तहसीलदारांच्या कारवाईवर आता अवलंबून

    सात कारखान्यामध्ये श्री विठ्ठल गुरसाळे, गोकुळ माऊली शुगर, सिद्धनाथ शुगर, विठ्ठल रिफायनरी, लोकमंगल शुगर, लोकमंगल शुगर इथेनॉल या साखर कारखान्यांचा समावेश

  • 18 Mar 2021 08:59 AM (IST)

    कोरोना परिस्थितीत नंदूरबारमधील भोंगऱ्या बाजार भरला

    नंदूरबार -

    दरवर्षी होळीच्या अगोदर भोंगऱ्या बाजार भरला जात असतो, मात्र यंदा कोरोना परिस्थिती पाहता हा बाजार रद्द करण्याच्या आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला, होळी हा सण आदिवासी समाजामध्ये सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जात असतो आणि त्यासाठी लागणाऱ्या साहित्य हे भोंगऱ्या बाजारात खरेदी करत असतात मात्र या वर्षी बाजार नसल्याने समाजामध्ये नाराजीच्या चित्र आहे

  • 18 Mar 2021 08:58 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा, दोन दिवस पुरेल इतकीच लस शिल्लक

    कोल्हापूर :

    जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा

    दोन दिवस पुरेल इतकीच लस शिल्लक

    सांगली जिल्ह्यातून लस मागवली जाणार

    गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 46 कोरोना रुग्ण

    सांगली जिल्ह्यातून 5 हजार लस मागवली जाणार

    आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात 2 लाख 500 लसींचे वितरण

  • 18 Mar 2021 08:57 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यातील 28 हजाराहून अधिक जणांना लसीकरण

    रत्नागिरी -

    जिल्ह्यातील 28 हजाराहून अधिक जणांना लसीकरण

    59 केंद्रावर लसीकरणाची सुविधा

    7 खासगी रुग्णालयात लसीकरणाची सुविधा

    दुसऱ्या टप्यातील लसीकरणाला सुरवात

  • 18 Mar 2021 08:56 AM (IST)

    नाशिक पोलिसांच्या कारवाईत 2 जण कोरोना पॉझिटिव्ह

    नाशिक -

    पोलिसांच्या कारवाईत 2 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह

    जे नागरिक मास्क वापरत नाहीत त्यांची केली जाते कोरोना चाचणी

    कालपासून शहर पोलिसांनी सुरु केली कारवाई

    144 जणांच्या चाचणी केल्या गेल्यात यात 2 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

  • 18 Mar 2021 08:55 AM (IST)

    नाशिक शहरात उद्या पाणी पुरवठ्याचा मेगाब्लॉक

    नाशिक -

    शहरात उद्या पाणी पुरवठ्याचा मेगाब्लॉक

    दुरुस्तीच्या कामांमुळे अनेक भागातील पाणी पुरवठा राहणार बंद

    शहरातील सर्व विभागाचा पाणीपुरवठा उद्या होणार विस्कटीत

    पाणी गळती रोखण्यासाठी उद्या शहरात दुरुस्तीच काम

  • 18 Mar 2021 08:54 AM (IST)

    नाशकात कोरोना संदर्भातील नियम पाळावे यासाठी पोलीस आयुक्त स्वतः मैदानात

    नाशिक -

    कोरोना संदर्भातील नियम पाळावे यासाठी पोलीस आयुक्त स्वतः मैदानात

    भद्रकाली,शालिमार,मेन रोड परिसरात आयुक्तांच ससनचलन

    मास्क न घालणाऱयांना केलं नियमांचं पालन करण्याचं आवाहन

    कोरोना चा वाढता आकडा बघता पोलीस आयुक्त एक्शन मोड मध्ये

  • 18 Mar 2021 08:52 AM (IST)

    नाशकात 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत रेकॉर्डब्रेक वाढ

    नाशिक -

    24 तासात कोरोना रुग्णसंख्येत रेकॉर्डब्रेक वाढ

    काल दिवसभरात जिल्ह्यात तब्बल २,१४६ जणांना कोरोनाची लागण तर ९ रुग्ण दगावले

    नाशिक शहर - १२९६, नाशिक ग्रामीण - ६३१, मालेगाव मनपा - १७४, जिल्हा बाह्य - ४५

    सर्व खाजगी आस्थापणानं 50 टक्केच मनुष्यबळ ठेवणे बंधनकारक

    आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

  • 18 Mar 2021 07:53 AM (IST)

    नागपुरात आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता

    नागपूर -

    नागपुरात आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण

    पावसाची शक्यता

    नागपूर हवामान खात्याच्या अंदाज नुसार 20 मार्च पर्यंत पावसाची शक्यता

    विदर्भ आणि मध्य प्रदेश च्या काही भागात पावसाची शक्यता

  • 18 Mar 2021 07:53 AM (IST)

    कोरोना मुक्त झाल्यानंतर पालकमंत्री भुजबळ घेणार आज बैठक

    नाशिक -

    कोरोना मुक्त झाल्यानंतर पालकमंत्री भुजबळ घेणार आज बैठक

    जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार कोरोना परिस्थितीचा आढावा

    तब्बल 15 दिवसांनंतर कोरोना वर मात करून भुजबळ पुन्हा मैदानात

    शहरात वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्वाची

  • 18 Mar 2021 07:52 AM (IST)

    नागपुरात कोरोनाचा धोका वाढताच, एकाच दिवशी 3,370 नवीन रुग्ण

    नागपूर -

    नागपुरात कोरोनाचा धोका वाढतच आहे

    काल एकाच दिवशी 3370 नवीन रुग्ण आणि 16 जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली

    तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी घटून 85.67 वर आली

    अक्टिव्ह रुग्ण संख्या 21 हजार वर पोहचली

    शहरात कोरोना चाचणीच प्रमाण वाढविण्यात आलं काल 15 हजार चाचण्या करण्यात आल्या

  • 18 Mar 2021 07:51 AM (IST)

    नागपुरात गृह विलगिकरणात असताना घराबाहेर फिरणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाला दंड

    नागपूर -

    गृह विलगिकरणात असताना घराबाहेर फिरणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाला दंड

    5 हजार रुपयांचा केला दंड ....

    तर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने १९ दूकाने प्रतिष्ठानांनवर केली कारवाई .

    १, लाख ४५ हजार चा दंड वसूल केला.

    पथकानी ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

  • 18 Mar 2021 07:50 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर, 1248 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

    पिंपरी चिंचवड

    - पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा कहर

    -एक दिवसात तब्बल 1248 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह,पाच रुग्णांचा मृत्यू

    -शहरातील आठही प्रभाग क्षेत्रात शंभर पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण

    -सध्या शहरात 897 कंटेन्मेंट झोन त्यापैकी 145 मेजर व 752 मायक्रो असे 897 कंटेन्मेंट झोन

  • 18 Mar 2021 07:49 AM (IST)

    अहमदनगर जिल्हयात कोरोनाचा कहर, एकाच दिवसात 611 रूग्ण

    अहमदनगर जिल्हयात कोरोनाचा कहर

    काल एकाच दिवसात 611 रूग्ण

    कंटेनमेंट झोन आणि सुक्ष्म कंटेनमेंट झोन मध्ये वाढ

    नगर शहरापोठोपाठ राहाता , कोपरगाव , संगमनेर आणि श्रीरामपुर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

  • 18 Mar 2021 07:49 AM (IST)

    कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा आज ऑनलाइन होणार

    पिंपरी चिंचवड

    -महापालिकेची सभा होणार ऑनलाइन

    -कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा आज ऑनलाइन होणार आहे

    -फेब्रुवारी महिन्याची तहकूब आणि मार्च महिन्याची नियमित सभा केली आज आयोजित

    - शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महासभा ऑनलाइन होणार आहे. नगरसेवक, अधिकारी ऑनलाइन पद्धतीने सभेला उपस्थित राहणार आहेत.

    -कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील महापालिका, नगरपालिकांच्या महासभा आणि आमसभा प्रत्यक्ष घेणे सध्या तरी शक्य नाही

  • 18 Mar 2021 07:48 AM (IST)

    शिर्डीतील राहूरी येथील तरुणाचा लोणीत डोक्यात दगड घालून निर्घून खून

    शिर्डी -

    राहूरी येथील तरूणाचा लोणीत निर्घून खून

    डोक्यात दगड घालून खून

    अर्जून पवार वय 19 अस खून झालेल्या तरुणाच नाव

    दोन जणांना लोणी पोलिसांनी घेतले ताब्यात

  • 18 Mar 2021 07:46 AM (IST)

    सहप्रवाशांना गुंगीचं औषध देवून लूटणाऱ्या भरत अशोकजी जैन याला सहा वर्षे कारावासाची शिक्षा

    बारामती :

    - रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्याला सहा वर्षे कारावास - सहप्रवाशांना गुंगीचं औषध देवून लूटणाऱ्या भरत अशोकजी जैन याला सहा वर्षे कारावासाची शिक्षा - भरत जैन हा राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील डेबुरीफाळणा येथील रहिवासी - बारामतीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. गाढवे यांनी ठोठावली शिक्षा

  • 18 Mar 2021 07:45 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 118 थकबाकीदारांना नोटिसा;मालमत्ता जप्तीचा आयुक्तांचा इशारा

    पिंपरी चिंचवड

    -महापालिकेच्या 118 थकबाकीदारांना नोटिसा;मालमत्ता जप्तीचा आयुक्तांचा इशारा

    -पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील 118 बड्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावल्या असून

    -पुढील आठवड्यात कारवाईची व्याप्ती वाढविली जाणार आहे.अंतिम नोटीशीद्वारे थकबाकी अदा न केल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला

    -आतापर्यंत 495 कोटींचा मालमत्ता कर जमा झाला ,31 मार्चपर्यंत 375 कोटींची रक्कम करदात्यांकडे थकीत आहे

  • 18 Mar 2021 07:45 AM (IST)

    मास्क न घालणाऱ्या अडीच लाख पुणेकरांवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई

    पुणे

    मास्क न घालणाऱ्या अडीच लाख पुणेकरांवर आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई

    त्यांच्याकडून १२ कोटी ६४ लाख रुपयांचा दंड वसूल

  • 18 Mar 2021 07:44 AM (IST)

    पुणे विभागात आजवर 80 लाखांहून अधिक थकबाकीदारांची वीज तोडण्यात आली

    पुणे

    पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील चार लाख घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे तब्बल २३ लाख ७० हजार ७०० ग्राहकांकडे १३८४ कोटी ५७ लाख रुपयांची थकबाकी

    वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरुच

    पुणे विभागात आजवर 80 लाखांहून अधिक थकबाकीदारांची वीज तोडण्यात आली

    पुणे जिल्ह्यात सर्वाधिक वीज ग्राहकांची थकबाकी

  • 18 Mar 2021 07:43 AM (IST)

    पुणे शहर परिसर आणि जिल्ह्यातही या आठवड्यात पूर्वमोसमी हलक्या पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज

    पुणे

    पुणे शहर परिसर आणि जिल्ह्यातही या आठवड्यात पूर्वमोसमी हलक्या पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज

    दरम्यान दिवसाच्या कमाल तापमानात घट होणार असली, तरी किमान तापमानात वाढ होणार असल्याने रात्रीचा उकाडा वाढणार

    पुणे शहर आणि परिसरात १८ मार्चपर्यंत आकाश अंशत: ढगाळ राहणार

    १९ मार्चला काही भागांत विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज

    त्यानंतर २० ते २३ मार्च या कालावधीत आकाश दुपारनंतर सामान्यत: ढगाळ राहणार

    याच कालावधीत मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता

  • 18 Mar 2021 07:32 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या 11 एप्रिलपासून सुरू होणार

    पुणे

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या 11 एप्रिलपासून सुरू होणार

    याबाबतची सविस्तर नियमावली विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रसिद्ध केली असून त्यानुसार रविवारी सुद्धा परीक्षा घेतल्या जाणार

    विद्यापीठाच्या कंपनीतर्फे परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन केले जाणार

    तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेत व्यत्यय आल्यास विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला जाणार

    मात्र, काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा या महाविद्यालय स्तरावर आयोजित कराव्यात, असे विद्यापीठाने केलं स्पष्ट

    तसेच प्रथम सत्र वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, विधी, एम.एड.,एम.पी.एड, बीएस्सी -बी.एड., बी.ए- बी.एड या अभ्यासक्रमाच्या परीक्षा संबंधित अभ्यास मंडळाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ७० टक्के अभ्यासक्रमावर होणार

  • 18 Mar 2021 06:45 AM (IST)

    पासपोर्ट कार्यालयातील अत्याधुनिक सेवांच्या धर्तीवर पुणे जिल्हा परिषदेतील काही सेवा सुरू करण्याचा जिल्हा परिषदेचा मानस

    पुणे

    पासपोर्ट कार्यालयातील अत्याधुनिक सेवांच्या धर्तीवर पुणे जिल्हा परिषदेतील काही सेवा सुरू करण्याचा जिल्हा परिषदेचा मानस

    यामुळे प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येण्याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना कमी वेळेत, कमी खर्चात सेवा उपलब्ध होऊ शकणार

    यासाठी पासपोर्ट कार्यालयातील सेवांचा आणि त्यासाठी वापरण्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने मुंढवा येथील पारपत्र कार्यालयाला भेट

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

  • 18 Mar 2021 06:44 AM (IST)

    पुण्यात रुग्णवाढीचा वेग पहिल्या लाटेपेक्षा दुपट्टीने अधिक

    पुणे

    पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरातील रेकॉर्ड ब्रेक म्हणजे तब्बल ४ हजार ७४५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    पंधरा दिवसांतच पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

    जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग पहिल्या लाटेपेक्षा दुपट्टीने अधिक

  • 18 Mar 2021 06:44 AM (IST)

    विरार राज्य कर अधिकारी मीना सांडये यांना 5000 ची लाच घेताना रंगेहाथ अटक

    विरार -

    विरार राज्य कर अधिकारी मीना सांडये यांना 5000 ची लाच घेताना रंगेहाथ अटक

    GST चा वार्षिक निर्धारण आदेश (असेसमेंट) देण्यासाठी एका वकीलाकडे 5000 मागितली होती लाच

    पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाही

    मीना सांडये ह्या विरार शाखेच्या राज्य कर अधिकारी (STO) म्हणून होत्या कार्यरत

  • 18 Mar 2021 06:23 AM (IST)

    राष्ट्रीय संपत्तीचे भवितव्य हाती उरले काय? - सामना अग्रलेख

    पंतप्रधान नरेद्रं मोदी व त्यांचे सहकारी राष्ट्राचा विचार करत असतील, तर ते राष्ट्रीय संपत्तीचा बोजवारा उडवणार नाहीत. ही सर्व संपत्ती गेल्या सत्तरेक वर्षात मोठ्या कष्टातुन उभी राहीली व त्यात भाजप किंवा मोदी सरकारच योगदान नाही. जे आपण कमावले नाही ते विकुन खायचे हा कोणता धर्म? पुन्हा ज्यांनी हे सर्व तुमच्यासाठी कमवुन ठेवले त्यांना रोज लाथा घालायच्या हेच सध्या सुरु आहे. स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव पुढच्या काळात साजरा होईल त्या वेळी 75 वर्षाच्या काळात निर्माण केलेल्या राष्ट्रीय संपत्तीचा लिलाव झालेला असेल . मग नवे काय उभे राहीले , तर एक हजार कोटी रुपये खर्च होणारे संसद भवन . संसद भवनाची मालकी तरी भविष्यात स्वतंत्र हिंदुस्थानाच्या लोकांकडे राहुद्या, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे

  • 18 Mar 2021 06:18 AM (IST)

    मुंबईत 2 हजार 377 नवे रुग्ण, एकुण रुग्णसंख्या 3,49,974 वर

    मुंबई कोरोना अपडेट

    आज मुंबईत 2 हजार 377 नवे रुग्ण आज मुंबईत 876 रुग्णांना डिस्चार्ज आज मुंबईत 8 रुग्णांचा मृत्यु एकुण रुग्णसंख्या 3 लाख  49 हजार 974

  • 18 Mar 2021 06:17 AM (IST)

    कुलाबा झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता

    कुलाबा झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता

    ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ककरण्यास अमेरिकास्थित विकासक इच्छुक

    राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

Published On - Mar 18,2021 11:44 PM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.