LIVE | गडचिरोलीमध्ये पिकआप-शिवशाही बसची समोरासमोर धडक, 4 जण ठार

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | गडचिरोलीमध्ये पिकआप-शिवशाही बसची समोरासमोर धडक, 4 जण ठार
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 28 Mar 2021 17:18 PM (IST)

  गडचिरोलीमध्ये पिकआप-शिवशाही बसची समोरासमोर धडक, 4 जण ठार

  गडचिरोली : अपघात पिकआप-शिवशाही बसची समोरासमोर धडक

  जागीच दोन मजुरांचा मृत्यू तर उपचारादरम्यान दोन मजुरांचा मृत्यू

  नागपूरहून अहेरी येथे येत असलेल्या शिवशाही बसला पिकआपची समोरासमोर धडक

  पिकआप वाहन चालकाचे संतुलन बिघडल्याने झाला अपघात

  अहेरी तालुक्यातील अहेरी येथील घटना

  गंभीर जखमी मजुरांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविले

 • 28 Mar 2021 17:05 PM (IST)

  चिंता वाढत आहे, आपण लॉकडाऊनच्या दिशेने- राजेश टोपे

  आरोग्यमंत्री राजेश टोपे  टीव्ही 9 मराठीशी बोलत आहेत. यावेळी त्यांनी कोरोनाबाबत बातचित केली. आज दुपारी 12.30 वाजता आमची बैठक झाली. सर्वांनी आपापली मतं व्यक्त केली. आज लागू असलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नाहीये, अशी चर्चा झाली. सध्या चिंता वाढत आहे. सध्या रुग्ण 10 टक्क्यांनी वाढत आहेत. त्यामुळे अशा स्वरुपाची वाढ होत असल्यामुळे आरोग्यव्यवस्थेचा ताळमेळ ठेवावा लागतोय. आज लगेचच ठरवलं असं काही नाहीये. लॉकडाऊन लागू केला तर काय काय परिणाम होतील यावर चर्चा झाली आहे. बंद केल्यानंतर काय काय चालू ठेवता येतील यावरसुद्धा चर्चा झाली.  रोजगार जिथे मिळतो त्या गोष्टी बंद करु नये तसेच मागच्यावेळी स्थलांतराचे जे प्रश्न निर्माण झाले होते ते आता होऊ नयेत, अशीही आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे.

  आपण  लॉकडाऊनच्या दिशेने जात आहेत. मात्र, लॉकडाऊन करावाच का ?, याबाबत आज चर्चा झाली आहे. राज्याच्या अर्थकारणावरही  आज चर्चा झाली. पूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू करावा असा निर्णय झालेला नाही. काही जिल्ह्यांत सध्या लॉकडाऊन सुरु आहे. खऱ्या अर्थाने साखळी सुरु करायची असेल तर कमीत कमी 15 दिवसांचा लॉकडाऊन  लागू करावा लागेल. मात्र, सध्या वेगवेगळे जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकाराखाली 5 दिवस 10 दिवसांचा लॉकडाऊन लागू करत आहे. आपापल्या पद्धतीने लॉकडाऊन लागू करणेसुद्धा योग्य नाही. मान्यता घेऊन लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. त्यामुळे यबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे.

 • 28 Mar 2021 15:59 PM (IST)

  राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो तो फक्त वैचारिक विरोधक असतो : जितेंद्र आव्हाड

  शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण 50 वर्षांच्या राजकीय जिवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहे. मग त्यातील कश्मीर चे फारूक अब्दुल्ला असतील उडीसा मधले बिजू पटनाईक असो बंगाल मधले जोती बसू असो ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र राहिलेत. आपल्या राज्यातील प्रमोद महाजन हे त्यांचे अत्यंत जवळचे होते त्यामुळे संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार आता नवीन पिढीच्या राजकारणात आलाय. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो तो फक्त वैचारिक विरोधक असतो, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले

 • 28 Mar 2021 14:22 PM (IST)

  मुंबईतील बोरिवली पूर्वमधील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर 5 वाहनांचा अपघात

  मुंबईतील बोरिवली पूर्वमधील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर सुधीर फडके ब्रीजवर जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीला पाच वाहनांचा अपघात झाला आहे. हा अपघात 1.30 वाजता झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनं हटवली आहेत. वाहतूक पूर्ववत सुरु झालीय.

 • 28 Mar 2021 13:54 PM (IST)

  मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक, भाजपकडून समाधान आवताडेंना उमेदवारी

  पंढरपूर : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक…
  भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांना उमेदवारी…
  आवताडे यांनी २०१४ ला शिवसेने कडून तर २०१९ ला अपक्ष निवडणूक लढवली होती….
  आवताडे हे उद्योजक आहेत….
  आमदार परिचारक गटाने त्यांना पाठिंबा दिल्याने आवताडे याना उमेदवारी……

  अधिकृत घोषणा पाच वाजता दिल्ली येथे होणार ..

 • 28 Mar 2021 13:26 PM (IST)

  आवाहन करुनही प्रतिसाद मिळत नसेल तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल : अजित पवार

  बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  जनतेला आवाहन करुनही प्रतिसाद मिळत नसेल तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं वक्तव्य पवार यांनी केले.
  आपापली जबाबदारी लक्षात घेवून नियमांचे उल्लंघन न करता होळी साजरी करा.सध्याची परिस्थिती पाहता शांतपणे होळी साजरी करा. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे. सध्या कुटुंबच्या कुटुंब कोरोनाबाधित आढळत आहेत ही चिंतेची बाब आहे. प्रत्येकानं नियमांचे पालन केलं पाहिजे. प्रशासन प्रयत्न करतंय, त्यामध्ये जनतेनेही मनावर घेतलं पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी केली.

 • 28 Mar 2021 13:18 PM (IST)

  तीन पक्षाचं सरकार असताना या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी अडचणीत आणणारी वक्तव्य करु नये: अजित पवार

  हे तीन पक्षांचं सरकार असून कुणाला मंत्री करायचं हा तीन्ही पक्षाच्या प्रमुखांना अधिकार आहे. राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचं हा शरद पवार यांचा अधिकार आहे. हे तीन पक्षाचं सरकार असताना या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांना अडचणीत आणणारी वक्तव्य करु नये. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत हे ठरवलं आहे. त्यामुळं महाविकासआघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

 • 28 Mar 2021 13:08 PM (IST)

  एनआयएची टीम ठाणे एटीएस कार्यालयात दाखल, दमणमध्ये ताब्यात घेतलेल्या गाडी प्रकरणी चौकशी

  एनआयएची टीम ठाणे एटीएस कार्यालयात दाखल झाली आहे. दमणमध्ये ताब्यात घेतलेल्या गाडी प्रकरणी चौकशी  करण्यात येणार आहे.  22 मार्चच्या मध्यरात्री दमण वरून MH 05 6789 वॉल्वो गाडी ठाणे एटीएसने ताब्यात घेतली होती. एनआयएदेखील त्या गाडीचा शोध घेत होते. एनआयए त्या गाडीसंदर्भात चौकशी करण्याची शक्यता आहे.

   

 • 28 Mar 2021 12:36 PM (IST)

   जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल : अनिल देशमुख

  माझ्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी जे आरोप केले आहेत, त्याची चौकशी करावी अशी मागणी मी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यांनी ती मान्य केली. त्यांनतर आरोपाची चौकशी रिटायर्ड हायकोर्ट जज यांच्यामार्फत होणार आहे. जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

  अनिल देशमुख यांनी संजय राऊत किंवा इतर प्रश्नांवर उत्तर देण्यास टाळले. फक्त परत एकदा जे स्वतः ट्विट केले होते. चौकशी करून खरे खोटे समोर येईल आणि ही मागणी आपणच केली असल्याचे म्हणत बाकी प्रश्नाचे उत्तरे न देता निघून गेले.

 • 28 Mar 2021 10:21 AM (IST)

  औरंगाबाद शहरातील पेट्रोल पंपावर तुफान गर्दी

  औरंगाबाद शहरातील पेट्रोल पंपावर तुफान गर्दी

  शेकडो वाहनांसह नागरिकांनी केली गर्दी

  पेट्रोल भरण्यासाठी उसळली वाहनधारकांची गर्दी

  लॉक डाऊनचा निर्णय झाल्यानंतर उसळली गर्दी

  पेट्रोल पंपाबाबत स्पष्ट निर्णय नसल्यामुळे वाहनधारकांची गर्दी

 • 28 Mar 2021 08:53 AM (IST)

  पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणारी महिला ताब्यात

  स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणारी महिला ताब्यात

  -भुजबळ चौक वाकड येथील ‘द ऍड्रेस कमर्शिया’ मॉल मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता.

  -पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने याठिकाणी छापा टाकून महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर, पाच पीडित महिलांची सुटका केली आहे

  -ही महिला आरोपी भुजबळ चौक वाकड येथील ‘द ऍड्रेस कमर्शिया’ मॉल मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत होती.स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पाच महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेत होते

 • 28 Mar 2021 08:51 AM (IST)

  पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पथारीवाल्यांचे सर्व्हेक्षण होणार, पाच संस्थांची नियुक्ती

  महापालिकेकडून पथारीवाल्यांचे सर्व्हेक्षण होणार, पाच संस्थांची नियुक्ती

  -पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी शहरातील पथारीवाल्यांचे केले जाणार सर्व्हेक्षण

  -याआधी महापालिकेने 2012-13 मध्ये शहरातील टपरी, हातगाडी, पथारी व फेरीवाल्यांचे केले होते सर्वेक्षण

  -शहरात अंदाजे 40 हजार पथविक्रेते असल्याचा अंदाज

 • 28 Mar 2021 08:37 AM (IST)

  नागपुरात मद्यपींवर भरारी पथकाची नजर

  होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली खास तयारी

  गोंधळबाज आणि मद्यपींवर असणार नजर

  आठ भरारी पथक ठेवणार नजर

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मध्यपान केल्यास कारवाई

  दोन दिवस मद्य विक्री बंद असल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर राहणार खास नजर

  केली जाणार कडक कारवाई

  शहर आणि ग्रामीण भागात राहणार पथक तैनात

 • 28 Mar 2021 06:24 AM (IST)

  अकोल्यातील जुन्या भाजी बाजारातील फरसाणच्या दुकानांना आग, 4 ते 5 दुकाने जळून खाक

  अकोला –

  अकोला शहरातील जुन्या भाजी बाजारात फरसाणच्या दुकानांना आग,

  आगीत 4 ते 5 दुकाने जळून खाक,

  अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी,

  आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

  आज सकाळी 5 च्या सुमारास लागली आग,

  गेल्या आठ दिवसातली ही दुसरी आगीची घटना

 • 28 Mar 2021 06:20 AM (IST)

  दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्‍याकडे

  अमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

  या प्रकरणाचा तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्‍याकडे

  सायंटिफिक तपास करण्याच्या दृष्टिकोनातून फॉरेन्सिक लॅबच्या दोन टीम धारनी रवाना

  अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांची माहिती

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI