Maharashtra News LIVE Update | नाशिकमध्ये रिक्षा-हायवा गाडीमध्ये अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 26, 2021 | 12:08 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | नाशिकमध्ये रिक्षा-हायवा गाडीमध्ये अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 25 Sep 2021 09:45 PM (IST)

  भाईंदरमध्ये पंजाब हॉटेलजवळ मुख्य जलवाहीनी फुटली, पाण्यचा कमी दाबाने पुरवठा

  भाईंदर: सायंकाळी शीळ फाटा येथे पूजा पंजाब हॉटेलजवळ मुख्य जलवाहीनी फुटली

  जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पिण्याच्या पाण्याची नासाडी

  जलवाहिनी फुटल्यामुळे मीरा भाईंदरला पाणीपुरवठा एमआयडीसीकडून पुन्हा खंडीत

  जलवाहिनी फुटल्याने कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणी प्राप्त होत असल्याने मिरा-भाईंदर शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशीराने होईल.

 • 25 Sep 2021 08:12 PM (IST)

  नाशिकमध्ये रिक्षा-हायवा गाडीमध्ये अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

  नाशिक – रिक्षा-हायवा गाडी यांची एकमेकांना जोरदार धडक – अपघातात ॲपे रिक्षातील पाच जण जागीच ठार

  – लासलगाव विंचूर रोडवरील मंजुळा पॅलेसजवळ अपघात

 • 25 Sep 2021 07:59 PM (IST)

  धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर, अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची केली पाहणी

  बीड: पालकमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर

  अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची केली पाहणी

  अंबाजोगाई तालुक्यातील सात बाधित गावांना भेटी

  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुंडेंचे आश्वासन

  तत्काळ पंचनामा करण्याचे दिले जिल्हा प्रशासनाला आदेश

 • 25 Sep 2021 07:27 PM (IST)

  भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग केला जातोय- नाना पटोले

  मुंबई - भाजप सत्तेचा दुरुपयोग करीत असून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करीत आहे.

  -   काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भाजपवर टीका

  अनिल परब यांच्यावर ईडी, सीबीआयमार्फत चौकशी करुण सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे.

  भाजपकडे दुसरे काम नाही, त्याांच्याकडे चौकशा लावणे हेच काम आहे- नाना पटोले

  जनतेचे मुळ प्रश्न भाजप विसरत आहे.

  कितीही ईडी व सीबीआय चौकशी तसेच कितीही नोटिशी पाठवल्या तरी महाविकास आघाडी सरकार चौकशीला पुढे जायला तयार आहे.

  नाना पटोले यांची भाजपवर टीका

 • 25 Sep 2021 07:18 PM (IST)

  संयुक्त राष्ट्रांना बळकट करणे गरजेचे आहे- मोदी 

  संयुक्त राष्ट्रांना बळकट करणे गरजेचे आहे- मोदी

 • 25 Sep 2021 07:15 PM (IST)

  समुद्रातील संसाधनांचा चांगला वापर करायला हवा- मोदी

  समुद्र हासुद्धा आपला वारसा आहे.

  समुद्रातील संसाधनांचा आपण योग्य पद्धतीने वापर करायला हवा.

  या संपत्तीला छळ करु नये- मोदी

 • 25 Sep 2021 07:11 PM (IST)

  जगातील प्रत्येक सहावा व्यक्ती हा भारतीय आहे- मोदी

  आज जगातील प्रत्येक सहावा व्यक्ती भारतीय आहे. जेव्हा भारतातील नागरिकाची प्रगती होते तेव्हा जगाची प्रगती होते. भारतात विकसित होत अकलेले तंत्रज्ञान जगासाठी उपयोगी ठरू शकते. आमचे यूपीआयद्वारे भारतात 300 कोटीपेक्षा जास्त ट्रन्झीशन्स होतात, असे देखील मोदी म्हणाले.

 • 25 Sep 2021 07:09 PM (IST)

  वैश्विक अर्थव्यवस्थेला व्यापक करण्याची गरज- मोदी

 • 25 Sep 2021 07:06 PM (IST)

  काही देश दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहेत- मोदी

  काही देश दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहेत. दहशतवाद त्यांच्यासाठीदेखील मोठा धोका आहे, हे त्यांनी ओळखलं पाहिजे.

 • 25 Sep 2021 06:41 PM (IST)

  भारतामध्ये शेकडो भाषा, हीच आमच्या सशक्ततेची ओळख- मोदी

  पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करत आहेत.  मागील दीड वर्षांपासून जग कोरोनाचा सामना करत आहे. आमची विविधता आमच्या सशक्ततेची ओळख आहे. आमच्या देशात शेकडो भाषा आहेत. वेगवेगळे राहणीमान आहे. हीच भारताची ओळख आहे. हीच भारताच्या लोकशाहीची ओळख आहे. एक छोटा मुलगा रेल्वे स्टेशनवर टी स्टॉलवर आपल्या वडिलांची मदत करायचा. आज तोच मुलगा आज भारताचा पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करत आहेत.

  मी गुजरातचा सर्वात जास्त कालावधीसाठी राहिलेला मुख्यमंत्री आहे. माझ्या हेड ऑफ गव्हर्नमेंच्या भूमिकेला तब्बल वीस वर्षे होत आहेत. एकात्म मानवतेचे प्रणते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आहे. एकात्म मानवता म्हणजे स्वत:तपासून समाजाच्या विकासापर्यंतची भावना होय. विकास हा सर्वसमावेशक, सर्वपोषक असावा अशी आमची प्रार्थना आहे. मागील सात वर्षांमध्ये भारतात 43 कोटी पेक्षा जास्त लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहे.  आज 36 कोटीपेक्षा जास्त लोकांना वीमा सुरक्षा कवच मिळालेले आहे. 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्य व्यवस्था देण्यात आली.

  भारताने तीन कोटीपेक्षा जास्त घर देऊन बेघर लोकांना घर दिलेले आहे. प्रदूषित पाणी हे पूर्ण जगासाठी मोठी समस्या आहे. भारतात या आव्हानाशी सामना करण्यासाठी आम्ही 17 कोटीपेक्षा जास्त घरांमध्ये पाईपद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे काम केले आहे. देशाचा विकास करायचा असेल तर त्या देशातील नागरिकांकडे त्यांची जमीन आणि घरांचे कागदपत्र असणे गरजे आहे. दुनियातील अनेक देशात जमीन तसेच घरांची मालकी नाही. आज मात्र भारतात 6 लाखापेक्षा जास्त गावात ड्रोनद्वारे मॅपिंग करुन आम्ही लोकांना डिजिटल रेकॉर्ड उपलब्ध करुन दिले आहे.

  आज जगातील प्रत्येक सहावा व्यक्ती भारतीय आहे. जेव्हा भारतातील नागरिकाची प्रगती होते तेव्हा जगाची प्रगती होते. भारतात विकसित होत अकलेले तंत्रज्ञान जगासाठी उपयोगी ठरू शकते. आमचे यूपीआयद्वारे भारतात 300 कोटीपेक्षा जास्त ट्रन्झीशन्स होतात. आमच्याकडे सुविधा नसतानाही लसीचा विकास आणि उत्पादनामध्ये काम करत आहे. भारताने जगातील पहिला डीएनए कोरोना लस विकसित केली आहे. ही लस 12 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना दिले जाऊ शकते. आमच्याकडे एम आएनए लस अंतिम टप्प्यात आहे. आमचे संशोधक नेझल लस निर्माण करण्याचे काम करत आहेत. आम्ही जगात गरजू लोकांना लस देणे पुन्हा सुरु केले आहे. आम्ही जगातील सर्व संशोधकांना आमंत्रित करतो. त्यांनी आमच्या देशात यावं आणि लस बनवावी, असे सर्वांना आमंत्रण देतो. आज तंत्रज्ञानाचे खूप महत्त्व आहे. कोरोना महामारीने जगाला खूप काही शिकवलं. आज भारत 450 गिगावॅट रिन्यूएबल उर्जा निर्मितीकडे वाटचाल करत आहे. आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला सांगावं लागणार आहे.

  आपल्याला विज्ञानाधारित कामावर भर द्यावा लागेल. भारत 75 उपग्रहांना आवकाशात पाठवणार आहे. हे सर्व उपग्रह भारतीय विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत.

  काही देश दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहेत. दहशतवाद त्यांच्यासाठीदेखील मोठा धोका आहे, हे त्यांनी ओळखलं पाहिजे.

 • 25 Sep 2021 06:38 PM (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात

  संयुक्त राष्टांच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे.

  ते महासभेला संबोधित करत आहेत.

 • 25 Sep 2021 06:33 PM (IST)

  संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 सत्रामध्ये मोदींचे काही क्षणात संबोधन

 • 25 Sep 2021 06:28 PM (IST)

  नरेंद्र मोदी यांचा संयुक्त ऱाष्ट्राच्या मुख्यालयात प्रवेश

  नरेंद्र मोदी यांचा संयुक्त ऱाष्ट्राच्या मुख्यालयात प्रवेश

  काही क्षणात मोदी यांचे संयुक्त राष्ट्राच्या महासभेत संबोधन

  काही क्षणात संबोधनाला सुरुवात होणार

 • 25 Sep 2021 05:41 PM (IST)

  एकवेळ कर्ज काढू मात्र महाराष्ट्र अंधारमय होऊ देणार नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊतांच मोठं वक्तव्य

  पुणे : कोळशाची टंचाई आहे म्हणून महाराष्ट्र कुठे अंधारमय झाला नाही

  एकवेळ कर्ज काढू मात्र महाराष्ट्र अंधारमय होऊ देणार नाही

  ऊर्जामंत्री नितीन राऊतांच मोठं वक्तव्य

  मात्र वीजबिल थकीत आहेत ती भरली पाहिजेत

  कोळसा टंचाईवर ऊर्जामंत्री नितीन राऊतांच स्पष्टीकरण

  कोळसा पुरेसा येत नाही, 30 ते 35 टक्केच कोळसा आला

 • 25 Sep 2021 05:40 PM (IST)

  गोव्यात चरस तस्करांवर मोठी कारवाई, तीन ठिकाणी NCB चे छापे

  पणजी : गोव्यात चरस तस्करांवर मोठी कारवाई

  गोव्यात तीन ठिकाणी NCB चे छापे

  अंजूना आणि मोर्जिम बीचजवळ छापे

  मुंबई आणि गोव्यातील शाखेची संयुक्त कारवाई

  30 ग्रॅम चरस केलं जप्त

  NDMA टॅबलेटसह एलएसडी पेपर्स जप्त

  NCB टीम कडून अधिक चौकशी सुरू

 • 25 Sep 2021 04:49 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 171 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 196 रुग्णांना डिस्चार्ज 

  पुणे कोरोना अपडेट

  दिवसभरात 171 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

  - दिवसभरात 196 रुग्णांना डिस्चार्ज

  - पुण्यात करोनाबाधीत 7 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 3

  - 185 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

  - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 500251

  - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1552

  - एकूण मृत्यू -9018

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 489681

 • 25 Sep 2021 04:45 PM (IST)

  नांदेडमध्ये एका व्यापाऱ्याची आयकर विभागाकडून झाडाझडती

  नांदेड: एका व्यापाऱ्याची आयकर विभागाकडून झाडाझडती

  व्यापारी बड्या नेत्याच्या जवळचा असल्याची सूत्राची माहिती

  यापूर्वी याच नेत्यांशी संबंधित दोन व्यापाऱ्यांकडे चौकशी झाल्याची माहिती

  नांदेड आयकर विभागाच्या रडारवर असल्याची चर्चा

 • 25 Sep 2021 04:43 PM (IST)

  दोन प्रभाग पद्धतीच्या मुद्द्यावर परत चर्चा होऊ शकते- बाळासाहेब थोरात

  दोन प्रभाग पद्धतीच्या मुद्द्यावर परत चर्चा होऊ शकते

  मात्र तीनचा प्रभाग हा निर्णय झालेला आहे

  याला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असं बंधन घालू नका

  बुधवारी बैठक आहे यामध्ये परत एकदा चर्चा होऊ शकते

  दोनचा प्रभाग असावा अशी चर्चा झालीये

  मात्र मंत्रिमंडळाचा निर्णय झालाय, परत चर्चा होऊ शकते

  काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरातांच मोठं विधान

 • 25 Sep 2021 04:25 PM (IST)

  वडुज येथे 100 बेडच्या पोर्टेबल कोविड हाॅस्पिटलचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन 

  सातारा -वडुज येथे 100 बेडच्या पोर्टेबल कोविड हाॅस्पिटलचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोविड हाॅस्पिटलची पाहणी

  वडुज येथील कोवीड रुग्णालयात 84 ऑक्सिजन बेड आणि 16 ICU  बेडची व्यवस्था

 • 25 Sep 2021 04:18 PM (IST)

  पुराचे पाणी रस्त्यावर येणार नाही याची काळजी घ्या- नितीन गडकरी

  सातारा : महाराष्ट्रात पाण्याची कमी नाही मात्र त्याच नियोजन योग्यपणे होत नाही- नितीन गडकरी

  मी दिल्लीत महाराष्ट्राचा ब्रँड अँबेसिडर आहे

  त्यामुळं काम दर्जेदार झालं पाहिजे

  काम करताना कॉन्ट्रॅक्टर त्रास देऊ नका

  पुराचा एक थेंब पाणी रस्त्यावर येणार नाही याची काळजी घ्या

 • 25 Sep 2021 04:14 PM (IST)

  ज्वेलरीच्या दुकानातील दागिने घेऊन अज्ञात चोरटे पसार, टिटवाळा येथील घटना

  ठाणे : टिटवाळा येथे धक्कादायक प्रकार

  ज्वेलरीच्या दुकानातील काही दागिने घेऊन अज्ञात लुटारू पसार

  शस्त्राचा धाक दाखवून केली लूट

  दागिने घेऊन तीन चोरटे पसार झाल्याची प्राथमिक माहिती

  घटना सीसीटीव्हीत कैद

  टिटवाळा येथील यूमना ज्वेलर्समध्ये घडला प्रकार

  टिटवाळा पोलिसांकडून तपास सुरू

 • 25 Sep 2021 12:46 PM (IST)

  उस्मानाबादेत आकाशातून पडला दगड, खळबळ आणि नागरिकांत भीतीचे वातावरण

  उस्मानाबाद - आकाशातून पडला दगड, खळबळ आणि नागरिकांत भीतीचे वातावरण

  उल्का की इतर वस्तू यांची चर्चा तर भूजल सर्वेक्षण विभाग करतोय तपासणी

  उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी गावाजवळ प्रभू माळी यांच्या शेतात बांधाच्या गवतावर आकाशातून पडला एक दगड पडला

  दगड अर्धवट जळालेल्या स्वरूपात असल्याने भीतीचे वातावरण

  उल्का की इतर काही हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार

  दोन किलो ३८ ग्रॅम वजनाचा सोनेरी रंगाचा दगड प्रशासनाने घेतला ताब्यात

 • 25 Sep 2021 11:08 AM (IST)

  परळीत एकाच कुटुंबातील दोघांची हत्या? कुटुंब प्रमुखाची देखील गळफास घेऊन आत्महत्या

  परळी :

  एकाच कुटुंबातील दोघांची हत्या? कुटुंब प्रमुखाची देखील गळफास घेऊन आत्महत्या

  मृतात पत्नीसह दोन वर्षीय मुलीचा समावेश

  परळी तालुक्यातील शिरसाळा येथील घटना, परिसरात खळबळ

  पोलीस घटनास्थळी दाखल असून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल

 • 25 Sep 2021 09:25 AM (IST)

  चोपड्याचे शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  जळगाव - चोपड्याचे शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  महिला नेत्या इंदिराताई पाटील यांचा देखील राष्ट्रवादी त प्रवेश

  अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

 • 25 Sep 2021 09:25 AM (IST)

  विश्रांतीसाठी थांबलेल्या चालकांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

  अहमदनगर

  विश्रांतीसाठी थांबलेल्या चालकांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

  धारदार हत्याराने मारहाण करून चालकांना लूटमार करत होते, याप्रकरणी तिघांना केली अटक

  आरोपींची गुप्त माहिती मिळताच छाप टाकून केली अटक

 • 25 Sep 2021 09:24 AM (IST)

  अहमदनगर महापिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर देवेंद्र फडणवीस यांनी नाव सुचवले

  अहमदनगर

  अहमदनगर महापिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर देवेंद्र फडणवीस यांनी नाव सुचवले ,

  भाजचे भैया गंधे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

  तर महापौर रोहिणी शेंडगे यांच्या कडे दिले गंधे यांच्या नावाची नियुक्ती केल्याचे पत्र

  लवकरच गंधे विरोधी पक्षनेते पदी विराजमान होणार

 • 25 Sep 2021 09:24 AM (IST)

  वैजापूर तालुक्यातील बोर नदीच्या पाण्यात दोन जण गेले वाहून

  औरंगाबाद -

  पुराच्या पाण्यात दुचाकी घालणे बेतले जीवावर

  वैजापूर तालुक्यातील बोर नदीच्या पाण्यात दोन जण गेले वाहून

  दुचाकी वाचवण्याच्या नादात दोन जण गेले वाहून

  कृष्णा बोर्डे आणि सिद्धार्थ पठारे अशी वाहून गेलेल्यांची नावे

  नदीला तुफाण पूर आला असतानाही पुलावरून घातली दुचाकी

  वाहून जाणारी दुचाकी वाचवण्याच्या नादात दोन जण गेले वाहून

  दोन तरुण वाहून जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

 • 25 Sep 2021 08:51 AM (IST)

  पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलिसांना सोमवार पासुन 8 तास ड्युटी

  पुणे

  पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलिसांना सोमवार पासुन 8 तास ड्युटी

  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केला हा आदेश जारी

  शहरातील एक हजारहून अधिक महिलां पोलिसांना होणार याचा लाभ

 • 25 Sep 2021 08:42 AM (IST)

  सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वास्तूंची झाली दुरावस्था

  बुलडाणा

  सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वास्तूंची झाली दुरावस्था,

  केंद्र आणि राज्य पुरातत्व विभागाच्या समन्वय नसल्याने ऐरिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गवार,

  तर विकास आराखड्यातील कामे ही रखडली,

  मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील चित्र,

  खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याने झाल्या आशा पल्लवित,

  मात्र यंत्रणा दखल घेईल का ? ही शंकाच आहे

 • 25 Sep 2021 08:41 AM (IST)

  राज्यात कोरोना व्हायरासप्रमाणे डेंग्यूचा व्हायरस रुप बदलतोय

  बुलडाणा

  राज्यात कोरोना व्हायरासप्रमाणे डेंग्यूचा व्हायरस रुप बदलतोय,

  मात्र बुलडाणा जिल्ह्याची स्थिती बरी,

  जिल्ह्यात गेल्या 9 महिन्यात डेंग्यूच्या केवळ 7 रुग्णाची नोंद,

  जिल्ह्यातून डेंग्यूच्या 66 संशयित रुग्णांचे तपासणी केली

 • 25 Sep 2021 08:41 AM (IST)

  लष्कर पोलिसांकडून पुण्यातील रिक्षा चालकांसाठी 'माझी रिक्षा, सुरक्षित रिक्षा' स्पर्धेचे आयोजन

  पुणे

  लष्कर पोलिसांकडून पुण्यातील रिक्षा चालकांसाठी 'माझी रिक्षा, सुरक्षित रिक्षा' स्पर्धेचे आयोजन

  गंभीर गुन्ह्यात रिक्षाचालक सामील झाल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन

  स्पर्धेत विजयी ठरलेल्या रिक्षा चालकांना रोख बक्षीसे देण्यात येणार

 • 25 Sep 2021 08:41 AM (IST)

  पाली गावाजवळ कारचा भीषण अपघात

  बीड: पाली गावाजवळ कारचा भीषण अपघात

  अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

  मृतात दिलीप भोसले आणि महेंद्र गायकवाड यांचा समावेश

  दिलीप भोसले हे शिव अंगणवाडीचे मराठवाडा अध्यक्ष

  कारचा ताबा सुटल्याने झाला अपघात

 • 25 Sep 2021 08:08 AM (IST)

  सोलापूर महावितरणने सक्तीचे वीजबिल वसुली थांबवावी

  सोलापूर महावितरणने सक्तीचे वीजबिल वसुली थांबवावी

  पूर्वकल्पना न देता तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत जोडावेत

  अन्यथा महावितरणचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रहार शेतकरी संघटनेचा इशारा

 • 25 Sep 2021 08:08 AM (IST)

  वाशिम जिल्ह्यात लसीकरण वाढविण्यासाठी 28 सप्टेंबरपासून धडक मोहीम

  वाशिम :

  जिल्ह्यात लसीकरण वाढविण्यासाठी 28 सप्टेंबरपासून धडक मोहीम

  लसीकरण मोहिमेसाठी प्रा. आरोग्य केंद्र स्तरावरील 26 रुग्णवाहिका, 8 लसीकरण वाहनांच्या आधारे गावामध्ये प्रभागनिहाय पद्धतीने निअर टू द होम पद्धतीने लसीकरण सत्रांचे आयोजन

  तालुकानिहाय पर्यवेक्षणासाठी नोडल अधिकाऱ्यांची होणार नेमणूक

  लसीकरण मोहिमेचा वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून संबधीत गावात दोन दिवस अगोदर दवंडी, किंवा स्पिकरद्वारे करण्यात येणार जनजागृती

  या मोहिमेत शिक्षक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आशा अंगणवाडी सेविका, महिला बचत गट संयोजिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, तलाठी, ग्राम पंचायत कर्मचारी व गावातील प्रतिषठीत व्यक्तींचा असणार सहभाग

 • 25 Sep 2021 08:07 AM (IST)

  सोलापुरात एसटी गाड्यांच्या वेळापत्रक नियोजनात आता चालत वाहकांचा सहभाग घेणार

  सोलापुरात एसटी गाड्यांच्या वेळापत्रक नियोजनात आता चालत वाहकांचा सहभाग घेणार

  एसटी गाड्यांचे मार्ग व वेळापत्रक ठरवण्यात वाहक व चालक यांचा सहभाग असणार

  यामुळे योग्य मार्गावर योग्य वेळेत सेवा मिळेल आणि एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल अशी प्रशासनाला आशा

  याआधी वेळापत्रक ठरवण्याचे काम होते अधिकाऱ्याकडे

 • 25 Sep 2021 07:50 AM (IST)

  ईडी तर्फे वाहतूक मंन्त्री अनिल परब यांना समन्स

  ईडी तर्फे वाहतूक मंन्त्री अनिल परब यांना समन्स

  समन्समध्ये 28 सप्टेंबर रोजी ईडी कार्यलयात हजर राहून जबाब नोंदविन्यास सांगितला आहे

  परब यांना हा दुसरा समन्स पाठविण्यात आला आहे

  यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी पाठविण्यात आला होता ईडी तर्फे परब यांना समन्स

  मात्र परब यांनी हजर रहन्यासाठी मगितला होता वेळ

 • 25 Sep 2021 07:42 AM (IST)

  औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाचा संवेदनाहीनपणा पुन्हा एकदा उघड

  औरंगाबाद -

  औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाचा संवेदनाहीनपणा पुन्हा एकदा उघड

  आजारी असलेला एक तरुण घाटी रुग्णालयाच्या दारात तीन तास होता पडून

  रुग्णालयाच्या दारात विव्हळणाऱ्या तरुणाला उपचारासाठी केली नाही मदत

  आरोग्य मित्रांनी घाटी रुग्णालयात जाऊन तरुणाला दाखल केलं रुग्णालयात

  मात्र घाटी रुग्णालयाने अत्यवस्थ रुग्णाची घेतली नाही दखल

  रुग्णालयाच्या दारातच तब्बल तीन तास व्हीव्हळत होता आजारी तरुण

  अक्षय दांडगे या आरोग्य मित्राने तरुणाला दाखल केलं रुग्णालयात

 • 25 Sep 2021 07:24 AM (IST)

  डेंग्यूचा नाशिक शहर आणि जिल्ह्यात हाहाकार

  नाशिक - डेंग्यूचा शहर आणि जिल्ह्यात हाहाकार

  मात्र डेंग्यूचा देखील व्हायरस बदलल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली

  डेंग्यूचा डेंव्ही 2 हा व्हेरिएंट जास्त धोकादायक असल्याचा तज्ञांचा दावा

  नव्या व्हेरिएंट चा लवकर उपचार न केल्यास ठरू शकतो जीवघेणा..

  महापालिकेकडून आरोग्य यंत्रणांना हाय अलर्ट

 • 25 Sep 2021 07:17 AM (IST)

  कै. अण्णासाहेब पाटील यांचे स्मारक उभारण्यास सोलापूर महापालिका सभेत मंजुरी

  कै. अण्णासाहेब पाटील यांचे स्मारक उभारण्यास सोलापूर महापालिका सभेत मंजुरी

  माथाडी कामगारांचे नेते कै अण्णासाहेब पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह जीवन कार्याची माहिती कोनशिलेच्या  माध्यमातून उभारण्यात येणार

  निराळेवस्तीतील माटे बगीच्या येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार

 • 25 Sep 2021 07:16 AM (IST)

  सोलापुरात मलेरिया विभागातील बारा कर्मचारी निलंबित

  सोलापुरात मलेरिया विभागातील बारा कर्मचारी निलंबित

  शहरात डेंग्यूची साथ असताना काहीच काम न केल्याचा आरोप

  पालिका आयुक्तांनी पी. शिवशंकर यांनी केले निलंबित

  मलेरिया विभागातील बारा क्षेत्र कार्यकर्त्यानी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका

  तर मानधनावरील 29 कर्मचाऱ्यांची सेवा केली समाप्त

 • 25 Sep 2021 07:15 AM (IST)

  पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलिसांना सोमवार पासुन 8 तास ड्युटी

  पुणे

  पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलिसांना सोमवार पासुन 8 तास ड्युटी

  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केला हा आदेश जारी

  शहरातील एक हजारहून अधिक महिलां पोलिसांना होणार याचा लाभ

 • 25 Sep 2021 07:14 AM (IST)

  पूर परिस्थिती ओसरताच गोदाघाटावरील कामांचा फज्जा

  नाशिक - पूर परिस्थिती ओसरताच गोदाघाटावरील कामांचा फज्जा

  सुशोभीकरणाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या फारशा गेल्या वाहून

  कोट्यवधी रुपयांचा पहिल्या पुरातच चुराडा

  स्मार्ट सिटीच्या कामांचे पैसे अक्षरशः पाण्यात

  नागरिकांकडून स्मार्ट सिटीच्या कामांबाबत नाराजी

  संपूर्ण कामाची चौकशी करण्याची सामाजिक संस्थांनी मागणी

 • 25 Sep 2021 07:14 AM (IST)

  नाशिकच्या सिडकोत पुन्हा एकदा ज्वेलरी शॉपमध्ये धाडसी चोरी

  नाशिकच्या सिडकोत पुन्हा एकदा ज्वेलरी शॉपमध्ये धाडसी चोरी

  भर दिवसा झाली 7 लाखांची सोन्याच्या दागिन्यांची चोरी

  समान घेण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने लांबवले दागीने

  पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

  वाढत्या चोरीच्या घटनेमुळे सिडको परिसरात नागरिकांमध्ये घबराट

 • 25 Sep 2021 07:13 AM (IST)

  राज्यात गेल्या चार वर्षात 24 वाघ आणि 56 बिबट्यांची शिकार!

  - राज्यात गेल्या चार वर्षात 24 वाघ आणि 56 बिबट्यांची शिकार!

  - राज्यात वाघ आणि बिबट्यांच्या भोवती शिकारीचा फास आवळला

  - गेल्या चार वर्षात वीजप्रवाह आणि विषप्रयोगामुळे २४ वाघ आणि ५६ बिबट सापळ्यात अडकले

  - शिकारी रोखण्यात वनखात्याची यंत्रणा अपयशी

  - माहिती अधिकारातून शिकारीचं धक्कादायक वास्तव उघड

  - गेल्या दोन महिन्यात नागपूर विभागात सुमारे २९ आरोपींना अटक करण्यात आली

 • 25 Sep 2021 06:52 AM (IST)

  मुंबई बँक घोटाळा आणि देशातील इतर नेत्यांच्या भ्रष्टाचाराबाबत सोमय्या का बोलत नाहीत - राजू शेट्टी

  कोल्हापूर

  मुंबई बँक घोटाळा आणि देशातील इतर नेत्यांच्या भ्रष्टाचाराबाबत सोमय्या का बोलत नाहीत

  विशिष्ट हेतू ठेवून इतरांना बदनाम का करताय

  माजी खासदार राजू शेट्टी यांचा सोमय्या यांचा सवाल

  भ्रष्टाचार करून भारतीय जनता पार्टीत येत पवित्र झालेल्यांच काय ?

  भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच मग तो कोणत्याही पार्टीने किंवा अधिकाऱ्याने केलेला असो

  भ्रष्टाचार करताना चाबकाचे फटके मारत रस्त्यावर आणलं पाहिजे

  शेट्टी यांनी व्यक्त केलं रोकठोक मत

 • 25 Sep 2021 06:51 AM (IST)

  1 ॲाक्टोबरपासून पेंच, बोर व्याघ्रप्रकल्प आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्य सुरु होणार

  - पर्यटकांसाठी आनंदाची बातमी

  - 1 ॲाक्टोबरपासून पेंच, बोर व्याघ्रप्रकल्प आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्य सुरु होणार

  - कोरोना प्रोटोकॅालनुसार मर्यादीत वाहनांनाच मिळणार प्रवेश

  - व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटनासाठी केवळ ॲाफलाईन बुकिंगची सोय

 • 25 Sep 2021 06:51 AM (IST)

  अखेर नागपुरातील खड्डे दुरुस्ती, खड्ड्यांचं डांबरीकरण, सिमेंटीकरण होणार

  - नागपूरकरांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेला जाग

  - अखेर नागपुरातील खड्डे दुरुस्ती, खड्ड्यांचं डांबरीकरण, सिमेंटीकरण होणार

  - शहरातील खड्डेमुक्तीसाठी मनपाने ४१.५० कोटींचा निधी केला मंजुर

  - अंतिम मंजुरीसाठी मनपाच्या २७ तारखेच्या सभेत प्रस्ताव ठेवणार

  - खड्ड्यांमुळे नागपूरात वाढलं होतं अपघाताचं प्रमाण

Published On - Sep 25,2021 6:49 AM

Follow us

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI