Maharashtra News Live Update : किराणा दुकान, सुपर मार्केमध्ये वाईन मिळणार, महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही-फडणवीस

| Updated on: Jan 27, 2022 | 11:09 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : किराणा दुकान, सुपर मार्केमध्ये वाईन मिळणार, महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही-फडणवीस
सांकेतिक फोटो

मुंबई : आज गुरुवार  27 जानेवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आजदेखील या दोन्ही पक्षांतील नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, उत्तराखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांची (Elections) घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर या राज्यांत मोठी उलथापालथ होत आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात कमालीचे बदल जाणवले असून पुन्हा हुडहुडी वाढली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Jan 2022 09:48 PM (IST)

    एमपीएससी परीक्षा लांबणीवर

    मुंबई : एमपीएससी (MPSC Exam) गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलल्याची माहिती एमपीएससी आयोगाकडून देण्यात आली आहे. 5 आणि 12 फेब्रुवारीला ही परीक्षा (MPSC Mains Exam) होणार होती.

  • 27 Jan 2022 06:09 PM (IST)

    महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही-फडणवीस

  • 27 Jan 2022 05:31 PM (IST)

    किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका

    किरीट सोमय्या मनोरंजन करणारे पात्र

    आम्ही सोमय्यांना गांभीर्याने घेत नाही

  • 27 Jan 2022 05:30 PM (IST)

    मंत्रिमंडळ बैटकीत मोठा निर्णय

    किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार

    नव्या शिक्षण धोरणावर कॅबिनेटमध्ये चर्चा-नवाब मलिक

  • 27 Jan 2022 03:42 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा आता टप्प्याटप्प्याने सुरू होणार

    जिल्ह्यातील शाळा 31 जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार

    जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी संयुक्तपणे काढले आदेश

    नववीचे वर्ग 31 जानेवारीपासून दररोज सुरू होणार

    पहिली ते आठवीचे वर्ग 5 फेब्रुवारीपर्यंत बंदच असणार

  • 27 Jan 2022 03:40 PM (IST)

    सुरेश धस यांची राष्ट्रवादी आणि सेनेवर टीका

    सुरेश धस- राष्ट्रीय पक्ष म्हणून घेणाऱ्या पक्षाला 50 मतांच्या वर मतदान घेता आले नाही.

    अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त आहे

    गोवा, मध्यप्रदेशात निवडणूक लढण्यास निघाले आहेत

  • 27 Jan 2022 03:14 PM (IST)

    जोगेश्वरीत निवासी इमारतीच्या सहाव्या मजल्याला आग

    जोगेश्वरी पश्चिम-अग्रवाल इंडस्ट्रियल स्टेज समोरील एबानी क्लासिक सोसायटीला आग लागली.

    घटनास्थळी दाखल झालेले अग्निशमन दल आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.

    इमारतीच्या 6 क्रमांकाच्या पॅलेसमधील किचनमध्ये आग लागली आहे.

    संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे,

    आगीत अडकलेल्या तीन ते चार जणांना बाहेर काढण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले.

  • 27 Jan 2022 02:54 PM (IST)

    नारायण राणे नवी दिल्लीतून कोकणाकडे रवाना

    केंद्रीय मंत्री नारायण राणे नवी दिल्लीतील निवासस्थानामधून बाहेर पडले

    नारायण राणे सपत्नीक निवासस्थानामधून बाहेर पडले

    माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास राणे यांचा नकार

  • 27 Jan 2022 12:41 PM (IST)

    नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

    नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टानं फेटाळला आहे.येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा आणि नियमित जामीन घ्या, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळल्यानं हा नितेश राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला हा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय मानला जात आहे. येत्या दहा दिवसांसाठी नितेश राणे यांना अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे.

  • 27 Jan 2022 12:18 PM (IST)

    टिपू सुलतान इंग्रजांसमोर कधी झुकले नाही, भाजपची दुटप्पी भूमिका- नवाब मलिक

    मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक माध्यामांशी बोलत आहेत. भारतीय जनता पार्टी टिपू सुलतानबाबात दुहेरी भूमिका घेत आहे. कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचे नेते येडियुरप्पा टिपू सुलतानची जयंती साजरी करत आले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी भूमिका बदलली. कर्नाटकच्या विधानसभेला जेव्हा साठ वर्षे पूर्ण झाले तेव्हा देशाचे राष्ट्रपतींनी टिपू सुलतानला एक बाहादूर शहिदाचा दर्जा आहे. देश त्यांना विसरु शकणार नाही, असे मत मांडले. टिपू सुलतान इंग्रजांसमोर कधी झुकले नाही. टिपू सुलताना लढताना शहीद झाले, त्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे

  • 27 Jan 2022 11:36 AM (IST)

    मुंबई-गोवा महामार्गावर महाविकास आघाडीचे चक्काजाम आंदोलन, उदय सामंतदेखील आंदोलनात सहभागी

    रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर महाविकास आघाडीचे चक्काजाम आंदोलन

    उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतदेखील आंदोलनात सहभागी

    उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतदेखील रस्त्यावर बसून करत आहेत आंदोलन

    मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन

  • 27 Jan 2022 11:05 AM (IST)

    सुप्रीम कोर्टावर खलिस्तानी झेंडा फडकवणार, खलिस्तानी संघटनेकडून पुन्हा एकदा धमकी

    नवी दिल्ली - खलिस्तानी संघटनेकडून पुन्हा एकदा धमकी

    सुप्रीम कोर्टावर खलिस्तानी झेंडा फडकवणार

    ब्रिटनहुन फोन कॉल करून धमकी दिल्याची माहिती

    महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ खलिस्तानी झेंडा लावणार

    सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना पुन्हा एकदा धमकीचा फोन

    सीख फॉर जस्टीस आणि एका दहशतवादी संघटनेकडून धमकी

  • 27 Jan 2022 10:46 AM (IST)

    नवी दिल्लीत 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; बलात्कारानंतर पीडित मुलीची धिंड काढली

    नवी दिल्ली - सरोजिनी नगरमधील धक्कादायक व्हिडिओ

    20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

    बलात्कारानंतर पीडित मुलीची धिंड काढली

    केस कापून धक्काबुक्की करत धिंड काढल्याची चर्चा

    महिला आयोगाने घेतली व्हिडिओची गंभीर दखल

    दिल्ली पोलिसांकडून लडकीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

    अवैध दारू विक्री करणाऱ्यांकडून अत्याचार झाल्याची चर्चा

    प्रजासत्ताक दिना दिवशी चा धक्कादायक व्हिडिओ टीव्ही नाईन मराठी कडे

  • 27 Jan 2022 10:34 AM (IST)

    हिम्मत असेल तर दंगल करुन दाखवा- संजय राऊत

    मुंबई : संजय राऊत माध्यमांना बोलत आहेत. महाराष्ट्रात कोण दंगे करणार. कोणामध्ये हिम्मत आहे. दंगल करुन धाखवा हे ठाकरे सरकार आहे. राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आम्ही ऐकून घेऊ. केंद्र सरकारचा समाजमाध्यमांवर कोणता दाबव आहे, ते आम्ही समजून घेऊ. मग प्रतिक्रिया व्यक्त करु. पुरस्कार हे मरणोपरांत दिले जातात. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण मरणोपरांत दिला जातो. निवडणूक पाहणून पुरस्कार दिला जातो

  • 27 Jan 2022 10:18 AM (IST)

    साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचं निधन

    ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचं निधन
    दीर्घ आजाराने आज निधन
    वयाच्या 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • 27 Jan 2022 08:25 AM (IST)

    झारखंडमध्ये रेल्वे मार्गावर पुन्हा नक्षलवाद्यांचा उपद्रव, रूळ उखडून टाकले

    झारखंड : रेल्वे मार्गावर पुन्हा नक्षलवाद्यांचा उपद्रव

    हावडा नवी दिल्ली रेल्वे मार्गावरील रूळ नक्षलवाद्यांनी उखडून टाकले

    चिचकी आणि चौधरीबंध रेल्वे स्थानकांदरम्यानचे रूळ उखडून टाकले

    हावडा-नवी दिल्ली मार्गावर रेल्वेसेवा थांबवली

    घटनास्थळी पोलीस आणि रेल्वेचे पथक दाखल

  • 27 Jan 2022 08:11 AM (IST)

    अकोल्यात पारा घसरला, तापमान 9 अंश सेल्सिअसवर  

    अकोला : अकोल्यात पारा घसरला

    तापमान गेले 9 अंश सेल्सिअसवर

    कालचे तापमान होते 10.06 अंश सेल्सिअस

  • 27 Jan 2022 07:54 AM (IST)

    नंदुरबारजिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी थंडीचा कहर, डोंगराळ भागात तापमान 4अंश सेल्सिअसवर  

    नंदुरबार: जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी थंडीचा कहर

    डोंगराळ भागात तापमान 4अंश सेल्सिअसवर

    सपाटी भागातील तापमान 8 अंश सेल्सिअस

    कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर परिणाम

    कडाक्याचा थंडीचा फळ बागांवर परिणाम

    केळी आणि पपई उत्पादक शेतकरी आडचणीत

  • 27 Jan 2022 07:28 AM (IST)

    वांद्रे कोसळला पाच मजली इमारत, सहा जणांना बाहेर काढण्यात यश

    मुंबईतील वांद्रे येथील बेहराम नगरमधील पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.

    त्यामध्ये अडकलेल्या सहा जणांची सुटका करण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, बचाव पथक आणि सहा अॅम्ब्युलन्स पोहोचल्या होत्या.

    - वांद्रे येथील बेहराम पाडा या झोपडपट्टीचा परिसरातील ही इमारत कोसळताच परिसरात एकच खळबळ माजली.

    सुरुवातीला या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली पाच जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

    अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्यास सुरुवात करुन ढिगाऱ्याखालून सहा जणांना सुरक्षित बाहेर काढलं.

    यापैकी चौघांना व्हीएन देसाई रुग्णालयात तर इतर दोघांना वांद्रे भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

  • 27 Jan 2022 07:06 AM (IST)

    नाशिक शहरात विना हेल्मेट चालकांवर कारवाईचा सपाटा सुरूच, 400 जणांवर कारवाई

    नाशिक- नाशिक शहरात विना हेल्मेट चालकांवर पोलिसांचा कारवाईचा सपाटा सुरूच -

    काल दिवसभरात 400 जणांवर कारवाई

    - पोलीस आयुक्तांच्या कडक हेल्मेट सक्ती मोहिमेमुळे जवळपास 75 ते 80 टक्के दुचाकी चालकांच्या डोक्यावर दिसतंय हेल्मेट

Published On - Jan 27,2022 6:19 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.