Maharashtra News Live Update : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा-सूत्र

| Updated on: May 17, 2022 | 11:13 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा-सूत्र
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज मंगळवार 17 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटलांची देवेंद्र फडणवीसांवर टिका केली आहे. हे सगळे विकृत लोक आहेत. देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे त्यांच त्यांना कळतं का ? राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी आमच्या कार्यकर्त्यांना जाऊन घोषणाबाजी करा आणि मार खा ? स्वतःच्या बायकोला लोक बोलली तर इतरांना पुढे करता का ? इतरांच्या महिलांना मारहाण होते तेव्हा काय ? विचारला सवाल रुपाली पाटलांची उपस्थित केला. आता गुन्हा दाखल झालाय अटक कारवाई करा, आता सुरुवात आहे अजून करारा जवाब मिळेल. आम्ही जगदीश मुळीकांच आव्हान स्वीकारलंय, त्यांनी सांगावं आम्ही कुठं यायचंय? महिलांवर हात उगारणं ही त्यांची संस्कृती आहे. मात्र आम्ही त्यांना सोडणार नाही. रुपाली पाटलांचा गुन्हा दाखल झाल्यानंतर इशारा

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 May 2022 10:37 PM (IST)

    ओवेसींच्या या धमकीला हिंदू भीक घालणार नाहीतच;हिंदू महासंघाकडून कारवाईची मागणी

    ओवेसीवर कारवाई करा

    हिंदूंनी काशी विश्वेश्वरचा पाठ पुरावा सोडला नाही तर या देशात पुन्हा 1980/ 1990 सारख्या दंगली घडतील अशी सरळ धमकी

    मध्यंतरी राज्यात सापडलेली हत्यारे ही देशभरातील त्यांच्या चालू असलेल्या तयारीचाच भाग असावा अशी शंका हिंदू महासंघने सुरवातीलाच व्यक्त केली होती

    ओवेसींच्या या धमकीला हिंदू भीक घालणार नाहीतच पण तरीही सरकारने पिसाळलेल्या ओवेसी वर कारवाई करावीच

  • 17 May 2022 08:09 PM (IST)

    साईबाबांना दोन कोटींचे सोनं दान

    हैद्राबाद येथील भक्ताकडून कोट्यावधीचे दान… हैद्राबाद येथील साईभक्त पार्थसार्थ यांनी केलं सोनं अर्पण… साईमुर्तीच्या चौथ-यासाठी सोन्याची महिरप दान… चार किलो सोन्यापासून बनवली गेलीय महिरप… संस्थानच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांचेकडे दान सुपूर्द.

  • 17 May 2022 08:08 PM (IST)

    राज ठाकरे पुस्तक खरेदी करणार 

    - पुण्यातील अक्षरधारा गॅलरीत पुस्तक खरेदी करणार,

    - राज ठाकरे येणार म्हणून कडक पोलिस बंदोबस्त तैनात

  • 17 May 2022 07:39 PM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live

    सुप्रिया सुळेंनी सर्वांबाबत असे निर्णय घेतले पाहिजेत

    आमच्या नेत्यावर हल्ले झाल्यावर त्या काही बोलल्या नाहीत

    शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे राजेंना पाठिंबा द्यायचा की नाही हा त्यांचा विषय

  • 17 May 2022 07:37 PM (IST)

    खासदार सुप्रिया सुळे यांनी आदिशक्ती मुक्ताईचे घेतलं दर्शन

    सुप्रिया सुळे यांचे मुक्ताई संस्थांकडून टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत

    सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मुक्ताईची करण्यात आली आरती

  • 17 May 2022 07:36 PM (IST)

    नाशिक - अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठचे अण्णा साहेब मोरे यांच्या अडचणीत वाढ

    स्वामी समर्थ केंद्राची अंधश्रद्धांच्या माध्यमातून सुरू असलेल्या आर्थिक शोषणाची चौकशी करा..

    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

    अध्यात्माच्या नावाखाली जादूटोणा,करणी, चमत्कार आणि भोंदूगिरीचे प्रकार भक्तांच्या मनात बिंबवत असल्याचा अनिसचा दावा..

    धार्मिक श्रद्धांच्या, अज्ञानाच्या नावाखाली भाविकांचे आर्थिक शोषण होत असल्याचा अनिसला संशय ..

    केंद्रावर कठोर कारवाईची अनिस ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ..

    जिल्हाधिकारी आणि धर्मदाय आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष ..

    महेंद्र दातरंगे, अंधश्रध्दा निर्मूलन समिती,महाराष्ट्र राज्य

  • 17 May 2022 07:35 PM (IST)

    मंत्र्यांच्या बंगल्यातील वीजपुरवठा पूर्ववत

    त्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्याचा वीजपुरवठा तब्बल तासभर खंडीत झाला होता

    अशाप्रकारे विद्युतपुरवठा खंडीत होण्याची ही पहिलीच वेळ आहे

    या बाबत उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलून याची चौकशी करण्याची हसन मुश्रीफ यांची मागणी

  • 17 May 2022 06:16 PM (IST)

    राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा-सूत्र

    राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असेल

    छ्त्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचा उमेदवारीसाठी विचार करण्यात येईल

    शिवसेनेअंतर्गत निर्णय

    राज्यसभेसाठी शिवसेनेची छत्रपती संभाजीराजेंपुढे पक्षप्रवेशाची अट

    राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा

    शनिवारी ठाकरे-पवार झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती

  • 17 May 2022 06:12 PM (IST)

    राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा

    राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असेल

    राज्यसभेसाठी शिवसेनेची छत्रपती संभाजीराजेंपुढे पक्षप्रवेशाची अट

    छ्त्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचा उमेदवारीसाठी विचार करण्यात येईल, शिवसेनेअंतर्गत निर्णय

    राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा

    शनिवारी ठाकरे-पवार झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती

  • 17 May 2022 05:51 PM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा

    40 ते 60 टक्क्यांनी होतोय जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा

    मनमाड येथून डिझेल पुरवठा होत नसल्याचे पेट्रोल असोसिएशनचा आरोप

    लोडशेडिंग किंवा स्टोक नसल्याचं कारण देऊन डिझेल पुरवठा करत नसल्याचा आरोप

    पेट्रोल पंप असोसिएशनने पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा

    डिझेल तुटवड्यामुळे औरंगाबाद शहरावर इंधन संकट निर्माण होण्याची शक्यता

  • 17 May 2022 05:43 PM (IST)

    जळगावात खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यातील आजी माजी मंत्र्यांची घेतली तातडीची बैठक

    बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटबाजीबाबत घेतली तातडीची बैठक

    सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यात गटबाजी बाबत माहिती समोर आल्याने सुप्रिया सुळे यांनी तातडीने घेतली बैठक

    बैठकीत जिल्ह्यातील आजी-माजी नेत्यांशी व पदाधिकाऱ्यांशी सुप्रिया सुळे यांनी साधला स्वतंत्रपणे संवाद

    जिल्ह्यातील पक्षांतर्गत वादावर सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केल्याची सुत्रांची माहिती

  • 17 May 2022 05:31 PM (IST)

    पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीची राज्य महिला आयोगाकडून दखल

    पुणे पोलिसांनी कार्यवाही करून राज्य महिला आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश... अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे पुणे पोलिसांना आदेश... राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर राज्य महिला आयोगानं घेतली दखल...

  • 17 May 2022 04:59 PM (IST)

    मालेगांव : वादग्रस्त ठरलेले मटण मार्केट अखेर काढले...

    नांदगाव नगरपरिषदेची अतिक्रमण मोहिमेअंतर्गत कारवाई.. लेंडी नदीची पूरपरिस्थिती व रेल्वे अंडरपासच्या वाहतुकीला ठरत होते अडथळा...

  • 17 May 2022 04:45 PM (IST)

    संभाजीनगरला औरंगजेबाच्या कबरीला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवली, निर्लज्जपणाचा कळस : गजानन काळे, प्रवक्ते, मनसे

    शिवरायांच्या स्वराज्यावर चालून येणाऱ्या, संभाजी महाराजांचा अतोनात हाल करणाऱ्याच्या थडग्याला सुरक्षा?... लाज वाटली पाहिजे सरकारला हा निर्णय घेताना... शिव-शंभू प्रेमी या हिंदूद्वेषी सरकारला धडा शिकवा... मनसे प्रवक्ते गजानन काळेंचा ठाकरे सरकारवर निशाणा...

  • 17 May 2022 04:31 PM (IST)

    अहमदनगर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधीच सत्तेवर येणार नव्हते : राम शिंदे

    मात्र अनैसर्गिक पद्धतीने सत्तेवर आले केतकी चितळेने केलेली पोस्ट चुकीच त्याला समर्थन नाही मात्र ज्या पद्धतीने केतकी वर कारवाई केली तशी इतरांवर देखील केली पाहिजे

  • 17 May 2022 04:30 PM (IST)

    वाराणसी : वाराणसी कोर्टाने अजय मिष्रा यांना पदावरून हटवले...

    ज्ञानवापी मशीद प्रकरणा ते होते कोर्ट कमिशनर

  • 17 May 2022 04:29 PM (IST)

    भाजप खासदार बृजभूषण सिंह Live

    त्यांनी माफी मागूनच यावंं, बृजभूषण सिंह ठाम

  • 17 May 2022 04:28 PM (IST)

    अहमदनगर : दहशतवाद आणि दबाव गेल्या अडीच वर्षांपासून कर्जत जामखेडची जनता पाहतेय : राम शिंदे

    एखाद्याने ऐकले नाही तर त्याच्यावर दबाब आणायचा... शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहिला आहेय त्यांना 1 लाख अनुदान दिले पाहिजे... मात्र यावर रोहित पावर काही बोलत नाही तर कुठे कंपास वाटणे पैठणीचा खेळ करणे हेच काम सुरू आहे...

  • 17 May 2022 04:27 PM (IST)

    अमरावती : लहुजी शक्ति सेनेचा जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा...

    कडक उन्हात जिल्हाधिकारी कार्यालया समोर अर्धनग्न होऊन.थेट रस्त्यावर आंदोलकांचे लोटांगण... मातंग समाज व अनुसूचित जातीच्या उपेक्षित समाजाच्या विविध मागण्यासाठी मोर्चा... अनुसूचित जाती मध्ये आरक्षनाच्या अ ब क ड नुसार स्वतंत्र आरक्षण आदी मागण्यांसाठी निघाला हलगी मोर्चा. वयोवृद्ध बँड कलाकारांना पाच हजार मानधन द्यावे... औरंगाबाद सिडको येथील मनोज आव्हाड या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा ही मागणी...

  • 17 May 2022 04:25 PM (IST)

    अहमदनगर : गुंडगिरी आणि दहशतवाद तातडीने थांबवून कायद्याला त्याचे काम करून घ्यावे- राम शिंदे माजी मंत्री

    धुडगूस आणि दहशतवाद माजविणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडून मिळाल्याने पोलिसांचे हात बांधले गेले आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सत्ताधाऱ्यांच्या प्रोत्साहनातुन ठिकठिकाणी कायदा हातात घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार सुरू केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात दहशत माजविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न अभिनेत्रीस अटक केल्यानंतर मारहाण करण्याचा प्रयत्न

  • 17 May 2022 04:24 PM (IST)

    भाजप खासदार बृजभूषण सिंह Live

    राज ठाकरेंनी माफी मागूनच अयोध्येत यावं

    अन्यता त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही

    हे बरोबर की चूक हे वेळच सांगतेल

    मात्र हा धार्मिक दौरा नाही हा राजकीय दौरा

    साध्वी कांचनगिरी राज ठाकरेंच्या समर्थनार्थ उभ्या

    कोणी चूक सुधारुन येत असेल तर त्यांना येऊद्या

    अशी अडवणूक करणे योग्य नाही

  • 17 May 2022 04:23 PM (IST)

    औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा डॉ. भागवत कराड यांना टोला

    भागवत कराड यांना मी नगरसेवक केलं होतं त्यांना महापौर पण मी केलं होतं ते आता मला म्हणतात खैरे अज्ञानी नेते आहेत पण एका राज्यमंत्र्याला दिल्लीत काहीही किंमत नसते

  • 17 May 2022 04:22 PM (IST)

    येवला : उकीरड्याला लागलेल्या आगीचा कांदा चाळीत शिरकाव, कांदयाचे नुकसान...

    या आगीत शेळी देखील भाजल्याची घटना येवला तालुक्यातील गवंडगाव येथे घडली अंदाजे पन्नास क्विंटल कांदयाचे आगीत नुकसान.. उकीरडा जळून खाक झाल्याने खताचे देखील नुकसान .... येवला अग्निशमन बंबाने वेळीच आग अटोक्यात आणल्याने 400 चारशे क्विंटल कांद्याची होणारी मोठी हानी टळली...

  • 17 May 2022 04:20 PM (IST)

    औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

    तुमचं सरकार होत तेंव्हा तुम्ही औरंगाबाद शहराचं नाव का बदललं नाही : चंद्रकांत खैरे आता तुमचं सरकार आल्यास नाव बदलू म्हणता : चंद्रकांत खैरे मग सत्ता होती तेंव्हा नाव का बदललं नाही : चंद्रकांत खैरे

  • 17 May 2022 04:19 PM (IST)

    अहमदनगर : राज्यात विकासा पेक्षा आकसबुद्धि, एकमेकांची खुन्नस काढण्यांच काम सुरू : राम शिंदे

    शरद पवारांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवादी मजलाय उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांनी वेठीस धरून गुंडगिरी सुरू राज्यात शरद पवारांच्या आशीर्वादाने दहशतवाद सुरू आहे, जो धुडगूस सुरू आहे तो त्वरित थांबला पाहिजे

  • 17 May 2022 04:10 PM (IST)

    21 तारखेला होणाऱ्या राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला परवानगी मिळण्यासाठी मनसेचे डेक्कन पोलिसांना पत्र

    पुण्यातील मुठा नदीपात्रात सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी दिले पत्र... यासाठी संबधीत विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करण्याची मनसेची हमी... स्टेज उभारणीसाठी आणि बॅरिकेटिंग करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी दिले पत्र... नदीपात्रात सभा घ्यायची असल्यास संबधीत विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर पुणे पोलीस सभेला परवानगी देणार...

  • 17 May 2022 04:05 PM (IST)

    महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्यासाठी रयत क्रांती संघटना 5 लाख पत्र केंद्र सरकारला लिहिणार

    रयत क्रांती संघटनेतर्फे 25 मेपासून 5 लाख पत्र केंद्र सरकारला पाठवण्याचे अभियान चालवणार महाविकास आघाडीतर्फे लोकप्रतिनिधींच्या वरतीच हल्ला करण्याचा सपाटाच जणू चालू असल्याची टीका राज्यातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते भानुदास शिंदे यांची टीका

  • 17 May 2022 04:04 PM (IST)

    तुमच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये सभा घेऊन नोटापेक्षा कमी मतं मिळाली होती, लक्षात आहे ना? - योगेश खैरे

    सेनेच्या दीपाली सय्यद यांना मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांचे प्रत्युत्तर... सभा घ्यायच्या असतील तर अयोध्यात घेऊन दाखवा, पुण्यात तर सेना नगरसेवक पण सभा घेतात, तेही जास्त गर्दी करून... दीपाली सय्यद यांची राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर टीका...

  • 17 May 2022 03:42 PM (IST)

    नाशिक - अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठचे अण्णा साहेब मोरे यांच्या अडचणीत वाढ..

    स्वामी समर्थ केंद्राची अंधश्रद्धांच्या माध्यमातून सुरू असलेल्या आर्थिक शोषणाची चौकशी करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी...

    अध्यात्माच्या नावाखाली जादूटोणा,करणी, चमत्कार आणि भोंदूगिरीचे प्रकार भक्तांच्या मनात बिंबवत असल्याचा अनिसचा दावा..

    धार्मिक श्रद्धांच्या, अज्ञानाच्या नावाखाली भाविकांचे आर्थिक शोषण होत असल्याचा अनिस ला संशय ..

    केंद्रावर कठोर कारवाईची अनिस ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ..

    जिल्हाधिकारी आणि धर्मदाय आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष ...

  • 17 May 2022 03:25 PM (IST)

    ज्ञानव्यापी मस्जिदिवरील कारवाईच्या विरोधात औरंगाबादेत आंदोलन

    औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू

    औरंगाबाद शहरातील मुस्लिम बांधवांकडून आंदोलन सुरू

    मस्जिदिवरील कारवाई थांबवण्याची आंदोलकांची मागणी

  • 17 May 2022 03:12 PM (IST)

    औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी केली बंद

    औरंगजेब समाधीला वाढवली सुरक्षा

    कबरीवरून वाद झाल्यामुळे सुरक्षेत करण्यात आली वाढ

    औरंगजेब समाधीची अज्ञातकडून मोडतोड होण्याच्या शक्यतेने प्रशासन अलर्ट मोडवर

  • 17 May 2022 03:09 PM (IST)

    येत्या दोन दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा अंदाज...

    येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात सोसाट्याचा वारा, गडगडाट व विजांसह पाऊस पडण्याची शक्यता... नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूचना...

  • 17 May 2022 03:07 PM (IST)

    शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

    यवतमाळ : शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून... यवतमाळ शहरातील माळीपुरा भागातील घटना... राहुल बाचलकर असे मृतकाचे नाव.. लहान भाऊ सतीश बाचलकर याने चाकूने वार करून केला खून, आरोपी अटकेत...

  • 17 May 2022 02:56 PM (IST)

    वसई उप प्रादेशिक परिवहन कार्यालय भंगार वाहनांचे गोदाम झाले आहे.

    विरार:- वसई उप प्रादेशिक परिवहन कार्यालय भंगार वाहनांचे गोदाम झाले आहे.

    कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासह पूर्ण आवार हा भंगार वाहनांनी भरून गेला आहे.

    मोटार वाहन कायद्या नुसार केलेल्या विविध गुन्ह्यातील ही वाहन आहेत. मागच्या 5 ते 6 वर्षांपासून ही वाहन कार्यालयाच्या आवारातच अक्षरशा सडून गेली आहेत.

    मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केलेल्या 367 वाहनावर आरटीओ प्रशासनाने कारवाही करून त्यांना अटकावून ठेवलेली आहेत. पण ती वाहन सोडवून घेतली नसल्याने भंगारात निघाली आहेत.

    या वाहना मुळे आरटीओ कार्यालयात येणाऱ्या वाहनधारकांना वाहन लावण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे वसई चे आरटीओ कार्यालय हे वाहन नोंदणी साठी आहे की भंगार वाहनांच्या गोदामासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • 17 May 2022 02:55 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर हल्ला करण्याचा कट होता का

    राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर हल्ला करण्याचा कट होता का...

    पुणे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

    विनयभंगाचा कोणताही प्रकार घडलेला नाही, खोटा गुन्हा दाखल केलाय

    प्रमोद कोंढरे या कार्यकर्त्याने मारहाण केली नाही तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय

    राष्ट्रवादीचे लोक पुण्यात कोणती राजकीय संस्कृती रुजवू पाहत आहेत

  • 17 May 2022 02:55 PM (IST)

    प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत असलेले विद्यार्थी आले अपर आयुक्तांच्या दालनात..

    2021 ते 2022 च्या शैक्षणिक सत्रातील पंडित दिन दयाल स्वयंम योजनेतील डी बी टी च्या मागणीसाठी अमरावतीच्या आदिवासी अपर आयुक्त कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांची धडक.

    प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत असलेले विद्यार्थी आले अपर आयुक्तांच्या दालनात..

    तात्काळ डी बी टी देण्याची विद्यार्थ्यांची मागणी...

    डी बी टी मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणी;विद्यार्थ्यांचा आरोप

    फ्रेम दिली आहे....

  • 17 May 2022 02:48 PM (IST)

    ज्ञानवापी संदर्भातला निर्णय दुपारी 4 वाजता, कोर्ट नेमका काय निकाल देणार ?

    ज्ञानवापी संदर्भातला निर्णय दुपारी 4 वाजता, कोर्ट नेमका काय निकाल देणार ?

    वाराणसी कोर्टात दुपारी चार वाजता निकाल येणार

    दिवार खोललं पाहिजे

    ही एक नवीन कहाणी आहे

    माननीय न्यायालय आज जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे

  • 17 May 2022 02:45 PM (IST)

    ज्ञानवापी संदर्भातला निर्णय दुपारी 4 वाजता, कोर्ट नेमका काय निकाल देणार ?

    ज्ञानवापी संदर्भातला निर्णय दुपारी 4 वाजता, कोर्ट नेमका काय निकाल देणार ?

  • 17 May 2022 02:40 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर हल्ला करण्याचा कट होता का? : जगदीश मुळीक

    पुणे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

    विनयभंगाचा कोणताही प्रकार घडलेला नाही, खोटा गुन्हा दाखल केलाय

    प्रमोद कोंढरे या कार्यकर्त्याने मारहाण केली नाही तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय

    राष्ट्रवादीचे लोक पुण्यात कोणती राजकीय संस्कृती रुजवू पाहत आहेत

  • 17 May 2022 02:15 PM (IST)

    निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी

    निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी.

    ज्या भागात पाऊस कमी त्या भागात निवडणूका घ्यायला काय अडचण आहे.

    सर्वोच्च न्यायालयाकडून विचारणा.

    निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा.

  • 17 May 2022 02:06 PM (IST)

    अमरावती महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर....

    अमरावती महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर....

    33 प्रभागा पैकी केवळ 7 प्रभागाचे नाव बदलले....

    पूर्वी अमरावती मनपात होते 22 प्रभाग नवीन रचनेनुसार प्रभागांची संख्या झाली 33

    पूर्वी अमरावती मनपात होते 87 नगरसेवक आता संख्या 98 होणार..

    अमरावती मनपात 11 प्रभागा सह 11 नगरसेवक वाढले.....

    अमरावती महानगरपालिका पक्षीय बलाबल

    भाजप - 45 शिवसेना - 7 काँग्रेस - 15 एमआयएम - 10 बीएसपी - 5 रिपाई (आठवले गट )- 1 स्वाभिमानी पार्टी - 3 अपक्ष - 1 ------------------------------. पूर्वीची एकूण संख्या-87

  • 17 May 2022 02:04 PM (IST)

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांना सवाल

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांना सवाल

    रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल?

    वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या पवार साहेब यांनीच ही संस्कृती NCP कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच 'हात' आहे?

    भाजपानं महाराष्ट्राची संस्कृती बिघडवू नये अशा पद्धतीचं केलं होतं ट्टीट

    पुण्यातील राड्यावरून चंद्रकांत पाटील आणि रोहीत पवारांमध्ये जूंपली !

  • 17 May 2022 01:36 PM (IST)

    महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडे केली तक्रार

    पुणे

    काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीची महिला आयोगाकडे तक्रार

    भाजपा पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी

    संगीता तिवारी काँग्रेस उपाध्यक्षा यांनी केली तक्रार.

    महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडे केली तक्रार

  • 17 May 2022 01:35 PM (IST)

    यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला यास स्वतः तिथे जाऊन हात तोडुन हातात देईन

    यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला यास स्वतः तिथे जाऊन हात तोडुन हातात देईन

    पुण्यातील स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्ता कडून राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे भडकल्या

    भाजप पक्षातील एक कार्यकर्ता महिलेवर हात उचलतो त्या पक्षाला लाज वाटली पाहिजे

    भाजपने महिलेवर हात उचलणाऱ्या कार्यकर्त्यास पक्षातून बाहेर काढले पाहिजे

    असे कृत्य महाराष्ट्रात कधीही झाले नाही मात्र महाराष्ट्रात असे कृत्य भाजपने केले आहे

    भाजपकडून महिलांवर अन्याय होत राहिल्यास आम्ही आमच्या भाषेत त्यांना शिकवू

    महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका काल महिलेच्या अंगावर एकदा हात उगारला पुन्हा उगारू नका कारण आता अती झाला आहे.

    बेटी बचाव बेटी पढाव संस्कृती सांगणाऱ्यांची ही संस्कृती आहे का ?

    माझ्या महिला कार्यकर्त्यांने चुकी केली असती तर मी स्वतः स्मृती इराणी यांची माफी मागितली असती

    त्यांना माफी मागण्यांमध्ये काही कमीपणा नव्हता जे चूक आहे ते चूक आहे मात्र एखादी घोषणा दिल्याने हात उगारला जातो हाच यांचा पुरुषार्थ आहे का ?

  • 17 May 2022 01:18 PM (IST)

    औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असंख्य महिलांनी आज हंडा मोर्चा काढला होता

    औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असंख्य महिलांनी आज हंडा मोर्चा काढला होता देवगाव रंगारी या गावांमध्ये पाणी नसल्यामुळे गावातील महिलांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालय गाठून डोक्यावरच्या अंडेगाव घेऊन मोर्चा काढला होता या मोर्चामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

  • 17 May 2022 12:49 PM (IST)

    महाविकास आघाडी एकत्र काम करीत आहे

    महाविकास आघाडी एकत्र काम करीत आहे

    सगळ्यांनी एकत्र राहणं अभिप्रेत आहे

    भाजपशी लढायचं असेल तर, एकत्र राहणं गरजेचं आहे

    पोलिसांनी दिलेल्या नियमावलीनुसार त्यांनी सभा घ्यावी

    त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे

    मला नाव घ्यायचं नाही, परंतु त्यातून तिची मानसिकता दिसते

    सदाभाऊ खोत यांनी भूमिका बदललेली आहे

    आमचे वरीष्ठ याबाबत निर्णय घेतील

    याच्या संदर्भात औरंगाबादचे पोलिस सक्षम आहेत. ते निर्णय घेतील

    गोंदीया आणि भंडारामध्ये जे काही घडलं..

    राज्य पातळीचा प्रश्न आहे असं वाटतं नाही

    पुण्यातील राज ठाकरेंच्या भाषणाबाबत वरीष्ठ निर्णय घेतील

    देशात भाजपच्या विरोधात जी लोक आहेत, त्यांनी विरोधात काम करायला पाहिजे

    सोशल मीडियासाठी काही कायदे तयार करावे लागतील

    सायबर सेल अशा गोष्टींवर लक्ष ठेऊन आहे

    हा मामला सुप्रिम कोर्टात गेला आहे...

    पोलिस त्यांच्या पध्दतीने काम करीत आहेत

    याबरोबर मी नांदेडच्या पोलिसांशी बोलणं केलं आहे.

  • 17 May 2022 12:45 PM (IST)

    महाविकास आघाडी एकत्र काम करीत आहे , सगळ्यांनी एकत्र राहणं अभिप्रेत आहे - दिलीप वळसे पाटील

    महाविकास आघाडी एकत्र काम करीत आहे

    सगळ्यांनी एकत्र राहणं अभिप्रेत आहे

    भाजपशी लढायचं असेल तर, एकत्र राहणं गरजेचं आहे

    पोलिसांनी दिलेल्या नियमावलीनुसार त्यांनी सभा घ्यावी

    त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे

    मला नाव घ्यायचं नाही, परंतु त्यातून तिची मानसिकता दिसते

    सदाभाऊ खोत यांनी भूमिका बदललेली आहे

    आमचे वरीष्ठ याबाबत निर्णय घेतील

    याच्या संदर्भात औरंगाबादचे पोलिस सक्षम आहेत. ते निर्णय घेतील

    गोंदीया आणि भंडारामध्ये जे काही घडलं..

    राज्य पातळीचा प्रश्न आहे असं वाटतं नाही

    पुण्यातील राज ठाकरेंच्या भाषणाबाबत वरीष्ठ निर्णय घेतील

    देशात भाजपच्या विरोधात जी लोक आहेत, त्यांनी विरोधात काम करायला पाहिजे

  • 17 May 2022 12:27 PM (IST)

    आज दुपारी राज ठाकरे पुण्यात पोहोचणार

    आज दुपारी राज ठाकरे पुण्यात पोहोचणार

    आज वैयक्तिक भेटीगाठीचा कार्यक्रम

    रात्री उद्याच्या कार्यक्रम ठरेल

    पक्षात कोणीही नाराज नाही

    21 ते 28 मे या दरम्यान, राज ठाकरे यांची सभा होणार

    पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण 20 ठिकाणी सभेच्या जागेसाठी पाहणी करून पत्र दिली आहेत

    राज ठाकरे उद्या सभेचे ठिकाण वेळ जाहीर करतील

  • 17 May 2022 12:27 PM (IST)

    450 वर्षानंतर हिंदू बांधवांना मुळ शिवलिंगाच दर्शन झालं याचा आनंदोत्सव

    450 वर्षानंतर हिंदू बांधवांना मुळ शिवलिंगाच दर्शन झालं याचा आनंदोत्सव

    ज्ञानवापी मस्जिदीच्या ठिकाणी सापडलेल्या शिवलिंगाचं दर्शन झाल्याचा आनंदोत्सव

    पौराणिक नागेश्वर मंदिरात पुजेचं आयोजन

    शास्त्रोक्त पुजेचं आयोजन

    हिंदू महासंघाकडून आयोजन

  • 17 May 2022 12:26 PM (IST)

    पाम बीच मार्गावर सानपाडा येथे भीषण अपघात

    पाम बीच मार्गावर सानपाडा येथे भीषण अपघात

    मोराज सर्कल जवळ झाला अपघात कारने डीवायडरला जोरदार धडक दिली

    i20 white कार होती

    कार अतिवेगात असल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती

    कार मध्ये एक महिला आणि पुरुष असल्याची माहिती प्राथमिक माहिती

    दोघंही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर वाशी एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत

  • 17 May 2022 12:10 PM (IST)

    महागाईचा रोष व्यक्त करण्यासाठी तिथं जमले होतो - विद्याताई चव्हाण

    महागाईचा रोष व्यक्त करण्यासाठी तिथं जमले होतो

    त्याचा आज मी इशारा ऐकला

    वैशाली नागवडे हीच्या श्रीमुखात भडकावल्या

    निवेदन त्यांच्या हातात होतं

    डिझेलचे आणि पेट्रोलचे भाव सध्या अधिक झाले आहेत

    पोटात आग पडलेली आहे, पोरांना खायला कसं घालायचं

    भाजपाला याचा हिशोब द्यावा लागणार आहे

    महागाई कमी करा

    काय महागाई वाढलेली आहे, अबकी बार मोदी सरकार

    महागाई कधी कमी होणार

    सदाभाऊ खोत महागाई समर्थन करत आहेत

  • 17 May 2022 12:08 PM (IST)

    सायबर पोलीस लॅपटॉप आणि मोबाईल च्या सहाय्याने करत आहे पुढील तपास.

    ठाणे गुन्हे शाखेने अबीनेत्री केतकी चितळे हिच्या घरातून ताब्यात घेतलेल्या लॅपटॉप आणी मोबाईल सायबर पोलिसांकडे देण्यात आला आहे...

    सायबर पोलीस लॅपटॉप आणि मोबाईल च्या सहाय्याने करत आहे पुढील तपास.

    सायबर पोलिसाकडून लॅपटॉप आणि मोबाईल चा रिपोर्ट गुन्हे शाखेकडे देण्यात येईल..

    लॅपटॉप आणि मोबाईलच्या रिपोर्ट मधून काही महत्वाचे खुलासे समोर येण्याची शक्यता..

    तर आजच्या दिवसात रिपोर्ट गुन्हे शाखेकडे सादर होणार...

  • 17 May 2022 11:10 AM (IST)

    ज्ञानवापी मध्ये जो तपास चाललाय तो नवीन नाही - श्री गोविंददेवगिरी महाराज

    - अयोध्येचा राम सगळ्यांचा - कोणालाही दर्शनाला प्रतिबंध नसावा - रावण जरी असेल तरी दर्शनाला विरोध नसावा - फक्त यात राजकीय हेतू पेक्षा श्रद्धा असावी

    ऑन ज्ञानवापी - ज्ञानवापी मध्ये जो तपास चाललाय तो नवीन नाही - असे अनेकने इतिहासिक पुरावे - नंदीचे तोंड मस्जिदकडे - त्यामुळे त्याठिकाणी शिवलिंग मिळणे स्वाभाविक - तीन मंदिर द्या, देशातील इतर कोणत्याही मंदिराचा वाद उदभवणार नाही - मुस्लिम समाजातील पपरिपकव समाजाला वाटत की वाद मिटावा

    ऑन ताजमहल - मी विद्यार्थी अवस्थे पासून तेजोमहालय हे पुस्तक वाचलं आहे - आम्हाला विश्वास आहे की त्याही ठिकाणी राजपुतांनी बांधलेलं शिवमंदिर होत - त्याच तेजोमहालय नाव असावं - केवळ शहाजहान ने बांधलेला मकबरा नव्हता तर हिंदूंनी बांधलेली वास्तू होती - ज्या खोल्या बंद आहेत, त्या उघडून त्याच शूटिंग करून घ्यावे म्हणजे जे आहे ते समोर येईल

    ऑन समान नागरी कायदा - युनिफॉर्म सिव्हिल कोड नसणे हे रानटी पणाचे लक्षण - जगातील कोणत्याही देशात या दृष्टीने भेदभाव नाही - सर्वांसाठी एक कायदा असणं हे नॅचरल - यालाच सेक्युलर म्हणता येईल

    ऑन अयोध्या मंदिर खुल होणार - 2024 च्या फेब्रुवारी मध्ये आम्ही भगवान रामलाललांची नूतन गर्भगृहात स्थापणा करणार ही गोष्ट नक्की - याचा अर्थ मंदिराचे काम पूर्ण होईल असं नाही - गर्भगृह होईल, पहिला मजला होईल आणि लोकांच्या दर्शनाची व्यवस्था होईल

  • 17 May 2022 11:03 AM (IST)

    शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय ?

    शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय ?

    जमीनदोस्त करा हे थडग ... म्हणजे या अवलादी तिथे माथा टेकायला येणार नाहीत.

    माननीय बाळासाहेब ही हेच म्हणाले होते,बाळासाहेबांचे काहीच ऐकायचे नाही आहे का?

    नाही तरी औरंगाबादच्या नामांतरावरून सरळ सरळ पलटी मारली आहेच.

  • 17 May 2022 10:42 AM (IST)

    गडचिरोली कोरची भागात बिबट्याचा हैदोस दोन हल्ल्यात दोन इसम जखमी

    गडचिरोली कोरची भागात बिबट्याचा हैदोस दोन हल्ल्यात दोन इसम जखमी

    गडचिरोली जिल्ह्यात एक नरभक्षक वाघ व 1 बिबट्याने हैदोस घातलेला आहे

    आज कोरची मार्गावर बिबट्याने हल्ला करून एक दुचाकीस्वाराला जखमी केला

    आज पहाटे बिबट्याने नागपुर वरून गडचिरोली कोरची कडे येणाऱ्या पेपर गाडीवर हल्ला केला

    या पेपर गाडीच्या चालकाला उजव्या बाजूला दुखापत झाली असून गंभीर जखमी झाला आहे

    प्राथमिक उपचार करून नागपूर येथे पुढील उपचारासाठी या चालकाला पाठवण्यात आले

    बिबट्या मुळे आज कोरची कुरखेडा मार्गावर दोन घटना घडल्या

  • 17 May 2022 10:39 AM (IST)

    पूरग्रस्तांना नुकसान भरपाई वाटपात जिल्ह्यात करवीर तालुक्याची आघाडी

    पूरग्रस्तांना नुकसान भरपाई वाटपात जिल्ह्यात करवीर तालुक्याची आघाडी

    तालुक्यात 56 कोटी 68 लाखांचा मदत निधीचं पूरग्रस्तांना वाटप

    पिकांचे नुकसान, घरांची पडझड सानुग्रह अनुदान आणि नुकसान झालेल्या व्यापारात पर्यंत पोचवली मदत

    कोरोना काळातही कृषी आणि महसूल विभागाकडून वेळेत केले गेले पंचनामे

    जुलै 2019 मध्ये आलेल्या महापुरात करवीर आणि शिरोळ तालुक्यात झालं होतं सर्वाधिक नुकसान

  • 17 May 2022 10:38 AM (IST)

    राज ठाकरेंचा आजचा पुणे दौरा काही कारणासाठी रद्द

    राज ठाकरेंचा आजचा पुणे दौरा काही कारणासाठी रद्द

    रात्री उशीरा राज ठाकरे पुण्यात दाखल होणार

    उद्या घेणार पदाधिकाऱ्यांच्या बैठका

    रात्री उशीरा पुण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती

  • 17 May 2022 10:38 AM (IST)

    मनसे नेते वसंत मोरेंची उद्या राज ठाकरेंसोबत भेट

    मनसे नेते वसंत मोरेंची उद्या राज ठाकरेंसोबत भेट

    राज ठाकरे वसंत मोरेंची पक्षांतर्गत असणारी नाराजी दूर करणार का ?

    राज ठाकरेंनी फोन करून वसंत मोरेंना भेटीसाठी बोलावलं

    आज रात्री राज ठाकरे पुण्यात येणार

    उद्या राज ठाकरेंची आणि वसंत मोरेंची होणार भेट

    शिवतीर्थवरील भेटीत राज ठाकरेंनी तुला निवांत वेळ देतो असं सांगितलं होतं

    उद्या राज ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता

  • 17 May 2022 10:37 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या तयारीसाठी उद्या मुंबईत महत्वाची बैठक..

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या तयारीसाठी उद्या मुंबईत महत्वाची बैठक..

    उद्या बैठकीस औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि शिवसैनिक राहणार उपस्थित..

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या तयारीच्या उद्याच्या बैठकी संदर्भात सूत्रांनी दिली माहिती..

    औरंगाबाद मध्ये शिवसैनिकांकडून आणि प्रमुख नेत्यांकडून सभेसाठी तयारी सुरू..

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही सभा होणार लक्षवेधी..

  • 17 May 2022 10:37 AM (IST)

    औरंगाबादचे नाव बदलणे हे महाविकास आघाडीच्या अजेंड्याचा विषय नाही

    औरंगाबाद शहराच्या नावावरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला असला तरी औरंगाबाद या शहराच्या नावाला संभाजीनगर करण्याचा किंवा शहराचा नाव बदलण्याचा महाविकास आघाडीचा आणि सरकारच्या अजेंड्याचा विषय नसल्याचे म्हणत टोपे यांनी यांनी स्पष्ट केले, शिवसेनेला संभाजीनगर म्हणायला आवडतं त्यात त्यांना आनंद आहे,मात्र औरंगाबादचे नाव बदलणे हे महाविकास आघाडीच्या अजेंड्याचा विषय नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

  • 17 May 2022 10:35 AM (IST)

    नाशिकच्या ग्रामदैवत भद्रकाली मंदिरात करणार दर्शन

    नाशिक - महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास योजनेचे कोषाध्यक्ष श्री गोविंददेवगिरी महाराज नाशिक दौ-यावर..

    नाशिकच्या ग्रामदैवत भद्रकाली मंदिरात करणार दर्शन

    आज आणि उद्या अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

  • 17 May 2022 10:34 AM (IST)

    पुण्यातील काल झालेल्या राड्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक देवेंद्र फडणवीसांना देणार माहिती

    पुण्यातील काल झालेल्या राड्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक देवेंद्र फडणवीसांना देणार माहिती

    पोलिसांनी एका बाजूनं गुन्हे दाखल केले

    विनयभंगासारखा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला ही पुण्यात महाविकास आघाडीची मोगलाई सुरू झालीये

    आम्ही ही या विरोधात तक्रार करणार

    स्मृती इराणींच्या गाडीवर धावताना ,शाई फेकताना अंडी फेकताना कुठं गेली होती तुमची संस्कृती

    राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्या कार्यक्रमात येऊन राडा घालताता ही आहे का तुमची संस्कृती

    राष्ट्रवादी काँग्रेसचं संस्कृती बिघडवण्याचं काम करतीये आमदार रोहित पवारांवर जगदीश मुळीकांची टिका

    पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेला प्रकार निंदनीय

    राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बालिश पद्धतीची वक्तव्य करतात

    जगदीश मुळीकांचा टोला

  • 17 May 2022 09:06 AM (IST)

    मनसे नेते वसंत मोरेंची उद्या राज ठाकरेंसोबत भेट

    मनसे नेते वसंत मोरेंची उद्या राज ठाकरेंसोबत भेट

    राज ठाकरे वसंत मोरेंची पक्षांतर्गत असणारी नाराजी दूर करणार का ?

    राज ठाकरेंनी फोन करून वसंत मोरेंना भेटीसाठी बोलावलं

    आज रात्री राज ठाकरे पुण्यात येणार

    उद्या राज ठाकरेंची आणि वसंत मोरेंची होणार भेट

    शिवतीर्थवरील भेटीत राज ठाकरेंनी तुला निवांत वेळ देतो असं सांगितलं होतं

    उद्या राज ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता

  • 17 May 2022 09:06 AM (IST)

    राज ठाकरेंचा आजचा पुणे दौरा काही कारणासाठी रद्द

    राज ठाकरेंचा आजचा पुणे दौरा काही कारणासाठी रद्द

    रात्री उशीरा राज ठाकरे पुण्यात दाखल होणार

    उद्या घेणार पदाधिकाऱ्यांच्या बैठका

    रात्री उशीरा पुण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती

  • 17 May 2022 08:34 AM (IST)

    राज्यात वीज मीटरचा तुटवडा

    राज्यात वीज मीटर चा तुटवडा

    वीज मीटर तुटवड्यामुळे महावितरणकडे हजारो कनेक्शन प्रलंबित

    महावितरण कडून ग्राहकांना खुल्या बाजारात नवीन मीटर खरेदीची मुभा

    मात्र खुल्या बाजारात होतेय ग्राहकांची लूट

    कोल्हापूर जिल्ह्यात 5 हजार ग्राहक कनेक्शन च्या प्रतीक्षेत

  • 17 May 2022 08:33 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा,गतवर्षीपेक्षा 6 टक्के कमी पाणी,जूनअखेरपर्यंत पुरेल पाणी

    -पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा,गतवर्षीपेक्षा 6 टक्के कमी पाणी,जूनअखेरपर्यंत पुरेल पाणी

    -यंदा उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने पवना धरणांमधील पाण्याची मागणी वाढलीय,धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे

    -आजमितीला धरणात 30.75 टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 6 टक्क्यांनी कमी आहे. हा पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल. परंतु, पावसाने ओढ दिल्यास पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून केले जात आहे

  • 17 May 2022 08:25 AM (IST)

    पूरग्रस्तांना नुकसान भरपाई वाटपात जिल्ह्यात करवीर तालुक्याची आघाडी

    पूरग्रस्तांना नुकसान भरपाई वाटपात जिल्ह्यात करवीर तालुक्याची आघाडी

    तालुक्यात 56 कोटी 68 लाखांचा मदत निधीचं पूरग्रस्तांना वाटप

    पिकांचे नुकसान, घरांची पडझड सानुग्रह अनुदान आणि नुकसान झालेल्या व्यापारात पर्यंत पोचवली मदत

    कोरोना काळातही कृषी आणि महसूल विभागाकडून वेळेत केले गेले पंचनामे

    जुलै 2019 मध्ये आलेल्या महापुरात करवीर आणि शिरोळ तालुक्यात झालं होतं सर्वाधिक नुकसान

  • 17 May 2022 08:25 AM (IST)

    सिन्नर मध्ये मोकाट कुत्र्यांचा एका लहान मुलावर हल्ला

    नाशिक - सिन्नर मध्ये मोकाट कुत्र्यांचा एका लहान मुलावर हल्ला - हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी घटना cctv कॅमेरात कैद - दोन दिवसापूर्वी घडली घटना cctv आज आले समोर - सिन्नरच्या सार्वजनिक वाचनालय परिसरात घडली घटना - काही नागरिकांनी वाचवले मुलाचे जीव - कुत्र्याचा हल्ल्यात मुलगा जखमी झाल्याने मुलावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू

  • 17 May 2022 08:24 AM (IST)

    कोल्हापूरातील लक्षतिर्थ वसाहत येथे झालेल्या खुनी हल्ल्यात दोन युवक जखमी

    कोल्हापूरातील लक्षतिर्थ वसाहत येथे झालेल्या खुनी हल्ल्यात दोन युवक जखमी

    वाढदिवसाच्या डिजिटल फलक फाडल्याच्या रागातून केला तलवार हल्ला

    मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना

    हल्ल्यात संतोष बोडके आणि कृष्णात बोडेकर हे दोघे गंभीर जखमी

  • 17 May 2022 08:05 AM (IST)

    रत्नागिरी-कोकण किनारपट्टीवर मान्सुनची चाहूल देणाऱ्या बदलांना सुरवात

    रत्नागिरी-कोकण किनारपट्टीवर मान्सुनची चाहूल देणाऱ्या बदलांना सुरवात

    मान्सुन सक्रीय होण्याच्या दृष्ट्रीन महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी

    मान्सुन कधी येणार यांचे मच्छिमार बांधत असतात ठोकताळे

    समुद्राच्या लांटामधून किनारपट्टीवर मातीच्या रंगाची फेणी म्हणजे फेस येण्यास सुरवात

    केवळ मान्सुन सक्रीय होण्याच्या पंधरा ते वीस दिवस आधी दिसते फेणीचे पाणी

    दक्षिणेच्या दिशेने वेगवान वारे वाहण्यास सुरवात

    मान्सुन अंदमानात दाखल झाल्याची हवामान खात्याची माहिती

    समुद्रात सुरु झालेल्या बदलानुसार  ४ ते ७ जून दरम्यानं मान्सुन कोकणात येण्याचा मच्छिमारांचा अंदाज

  • 17 May 2022 08:05 AM (IST)

    राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अर्जावर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी

    ब्रेक - राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अर्जावर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी …

    - आयोगाने या अर्जात महानगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात घेण्यात याव्यात, असे म्हटले आहे.

    - राज्य निवडणूक आयोगाने कोणताही सल्लामसलत न करता सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडी सरकारची कोंडी झाल्याचं बोललं जात होतं..

    - ओबीसी आरक्षण रद्द ठरवल्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारसमोर पेच, ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका घेण्यासाठी राज्यकर्ते अनुकूल नाहीत…

    - आता आज १७ मे रोजी सर्वोच्च न्यायालय यासंदर्भात काय निकाल देणार, हे पाहावे लागेल…

  • 17 May 2022 08:05 AM (IST)

    अमरावती-अचलपूर दंगल प्रकरणी सत्यशोधक समितीचा अहवाल सादर....

    अमरावती-अचलपूर दंगल प्रकरणी सत्यशोधक समितीचा अहवाल सादर....

    १३ नोव्हेंबर ला अमरावती शहरात तर १७ एप्रिलला अचलपूर मध्ये झाली होती दोन गटात दंगल...

    २ मे ते ४ मे दरम्यान सहा सदस्यीय समितीने समितीने शोधली दंगलीची कारणे.

    सत्यशोधक समितीत जेष्ठ पत्रकार निवृत्त पोलीस अधिकारी यांचा होता समावेश...

    अचलपूर मध्ये झेंडा लावण्यावरून दोन गटात झाला होता राडा..

    काय म्हटलं आहे समितीच्या अहवालात.?

    अचलपूर आणि परतवाडा या शहरात खूप मोठ्या प्रमाणात अवैध धंधे सुरु आहेत. त्यावर एका समुदायाचे वर्चस्व आहे.

    अमरावतीमध्ये झालेल्या दंगलीचा उर्वरित भाग अचलपूर मध्ये घडविण्यात आला इतके त्यात साम्य आहे.

    बहुतांश रस्ते हे अतिक्रमणाने आकुंचित झाले आहे.

    शहरातील सीसीटीव्ही कार्यान्वित नाहीत.

    अंमली पदार्थाचे वितरण, विक्री आणि सेवने उघडपणे होत आहे.

    बंदी घातलेल्या अतिरेकी संघटना या नव्या बॅनरखाली शहरात कार्यरत आहेत.

    शहरात उद्योगधंद्याची वाढ होत नसताना लोकसंख्येची वाढ अनैसर्गिक आहे, त्यात एका समुदाया ची संख्या जास्त आहे असा दावा व्यापारांनी आणि स्थानिक पत्रकारांनी केला अस समितीच्या अहवालात आहे.

  • 17 May 2022 06:56 AM (IST)

    नागपूर जिल्हा परिषदेत सुरक्षा ठेव घोटाळा प्रकरण

    - नागपूर जिल्हा परिषदेत सुरक्षा ठेव घोटाळा प्रकरण

    - जिल्हा परिषदेतील १२ कंत्राटदारांना टाकणार काळ्या यादीत

    - एका सुरक्षा ठेवीवर अनेक कामं घेतली, कंत्राटदारांविरोधात पोलीस तक्रार

    - २०१८ ते २०२१ झालेल्या विकास कामांच्या चौकशीतील कामं संशयास्पद

    - तब्बल ५४ कामं संशयास्पद असल्याचं आढळून आलंय

    - घोटाळ्यातील कंत्राटदारांकडून पुन्हा बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभागाची कामं मिळवण्याचा प्रयत्न

Published On - May 17,2022 6:41 AM

Follow us
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.