Maharashtra Breaking News Live : भुजबळ अंतरवाली सराटीत का आले नाही- मनोज जरांगे पाटील

| Updated on: Nov 27, 2023 | 7:06 AM

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील.... राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी.... तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील आज घडणाऱ्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या... वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : भुजबळ अंतरवाली सराटीत का आले नाही- मनोज जरांगे पाटील

मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : आज रविवारचा दिवस आहे. मात्र बऱ्याच घडामोडींची शक्यता आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच मंत्री छगन भुजबळ हे ओबीसींच्या हक्कांसाठी लढताना दिसत आहेत. आधी जालन्यात मेळावा घेतल्यानंतर हिंगोतील आज ओबीसी मेळावा होत आहे. तसंच राज्यात आता ठिकठिकाणी गुलाबी थंडीची चाहूल लागतेय. पण राजधानी मुंबईत मात्र पावसाने हजेरी लावली आहे. अनपेक्षितपणे पाऊस आल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. यासह राज्यात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. राजकीय, प्रत्येक जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Nov 2023 04:47 PM (IST)

    रविकांत तुपकर यांना उपोषण मागे घेण्याची विनंती

    रविकांत तुपकर यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. चिखलीच्या तहसीलदारांनी त्यांची भेट घेतली. त्यांना अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर चिखली तालुक्यातील सोमठाना येथे त्यांचे आंदोलन सुरु आहे.

  • 26 Nov 2023 04:29 PM (IST)

    मग भुजबळ अंतरवाली सराटीत का आले नाहीत

    भुजबळ यांनी मराठा नेते क्षीरसागर यांना भेटायला गेले नाहीत. उलट संदीप क्षीरसागर हे रोहित पवार यांना भेटायला छत्रपती संभाजीनगरमध्ये गेले, असे सांगितले. त्यावर आपण कधीच बीडमधील जाळपोळीचं समर्थन केलं नाही, असे जरांगे यांनी सांगितले. पोलिसांनी अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांवर, आंदोलकांवर लाठीहल्ला केला त्यावेळी भुजबळ अंतरवाली सराटीत का आले नाही, असा सवाल त्यांनी केला.

  • 26 Nov 2023 04:25 PM (IST)

    त्यांना धनाजी-संताजीसारखा मीच दिसतो

    भुजबळांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. भुजबळ हे मंत्री आहेत. अभ्यासू आहेत. पण त्यांचे वय झाले आहेत. ते जुनाट नेते झाल्याचा टोला त्यांनी लगावला. भुजबळांना धनाजी-संताजीसारखा मीच दिसत असल्याचा चिमटा त्यांनी काढला. भुजबळांच्या जोडण्याच्या सल्ल्याचा पण त्यांनी समाचार घेतला. मराठा समाजाच्या हक्काचा आरक्षणाचा फायदा आताापर्यंत लाटला आणि आता जोडण्याची भाषा करु नका. आता मराठा तुमचे ऐकणार नाहीत, असे म्हणणे त्यांनी मांडले.

  • 26 Nov 2023 04:05 PM (IST)

    आमच्याकडे नोंदी आहेत पण तुमच्याकडे त्यापण नाहीत- मनोज जरांगे पाटील

    आमच्याकडे नोंदी आहेत पण तुमच्याकडे त्यापण नाहीत.  नोंदी रद्द होऊच  शकत नाही, भुजबळांचे केस पांढरे होऊन काही उपयोग नाही. भुजबळ बीडला गेले पण अंतरवाली सराटीला आले नाहीत. अंतरवालीत तुमचे लोक नाहीत का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

  • 26 Nov 2023 04:01 PM (IST)

    छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

    छगन भुजबळ यांनी हिंगोलीत एल्गार केल्यानंतर, त्यावर मनोज जरांगे यांनी पुन्हा जोरदार हल्लाबोल केला. बीड जिल्ह्यातील हिंसाचाराप्रकरणी छगन भुजबळ यांना आताच का पुळका आला, असा सवाल त्यांनी केला. गेल्या एक महिन्यापासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात विस्तव पण जात नाही. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघे सोडत नाही.

  • 26 Nov 2023 03:52 PM (IST)

    पांढरे झाले आणि काळे झाले तरी आंदोलनाचा उपयोग काय? मनोज जरांगे पाटील

    अंतरवली सराटी : बीड येथील घटना ही त्यांच्याच पाहुण्याने ते पेटवले आहे. मराठ्याने तुम्हाला मोठ्या पदावर बसवले ते आतापर्यंत जुळवले म्हणूनच. अंतरावलीमध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळी कुणी अश्रू पुसायला का आले नाही. हे असे पांढरे झाले का तुम्ही? सरकारच्या पदावर बसला आहात असे सल्ले द्यायचे गरज काय? डबल काळे करा. पांढरे ठेवून काय उपयोग? अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर केली.

  • 26 Nov 2023 03:47 PM (IST)

    जे घडले त्याची किमंत देशाने मोजली - उपमुख्यमंत्री अजित पवार

    बारामती : त्यावेळी जे घडायला नको होते. जे घडले त्याची किमंत देशाने मोजली आहे. अशा प्रकारचे भ्याड हल्ले होणार नाही. देशातील, राज्यातील जनतेने काळजी घेणे आवश्यक आहे अशी अपेक्षा संविधान दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

  • 26 Nov 2023 03:41 PM (IST)

    गावबंदी केली तर एक महिन्याची सजा, सरकार काही करणार की नाही?, भुजबळ यांचा सवाल

    हिंगोली : आमदार नारायण कुचे, भास्कर पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना गावबंदी करणार आणि राजेश टोपे आले, रोहित पवार आले त्यांचे स्वागत करणार? पोलिसांना दाखवतो आणि सरकारला हे संविधान गावबंदी काय सांगते? एक म्हीनायची सजा आहे. जर कुणाल गावबंदी केली आणि अडवले तर एक महिनायची सजा आहे. मग सरकार हे करणार की नाही? हे बोर्ड काढा आणि ज्यांनी जे बोर्ड लावले त्यांना एक महिन्याची सजा करा, अशी मागणी मंत्री भुजबळ यांनी हिंगोलीच्या सभेत केली.

  • 26 Nov 2023 03:33 PM (IST)

    आमची लायकी नव्हती? मग.. विविध जातींचा दाखला देत भुजबळ यांचा जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल

    हिंगोली : संविधान दिवस मानतो, देशाला मान्य आहे ते बाबासाहेब आंबेडकर दलित समाज होते. त्यांची लायकी नव्हती? पेशवे यांच्या सैनिकांना कापून काढले. ते भीमा कोरेगावचे शूर सैनिक होते. त्यांची लायकी नाही. मातीची भांडी कुंभार बनवतो. शेतीची अवजारे सुतार बनवतो. चपला वाहन चर्मकार बांधवानी बनविली. नाभिक केस कापतो. सोनार गाडीने घडवतो. वडार दगडावर घाव घालून पाटा वरवंटा बनवतो. माली समजा तुमच्या सत्काराचे हार तुरे बनवतो. आज कुणी काही बोलतो, याची लायकी नाही? यांची लायकी आहे का?

  • 26 Nov 2023 03:25 PM (IST)

    सरकारी नोकरीत ओबीसी समाज फक्त साडे नऊ टक्के, भुजबळ यांनी केली आकडेवारी जाहीर

    हिंगोली : सरकारी नोकरीत ओबीसी समाजाला फक्त साडे नऊ टक्के आहे. 1 लाख 30 हजार आमच्या जागा रिक्त आहेत. त्याचा फायदा मराठा समाजाने घेतला. सर्वात जास्त लाभ हा त्यांना झाला, असे सांगत मंत्री भुजबळ यांनी हिंगोली येथील सभेत आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली.

  • 26 Nov 2023 03:16 PM (IST)

    भुजबळ यांची सरकारवर मोठी टीका, त्या घटनेचा निषेध करायला हवा होता

    हिंगोली : बीडमधील घरे जळाली. त्याचा कुणी धिक्कार केला नाही. तिथे सर्वांनी जायला हवे होते. धीर द्यायला हवा होता. निषेध करायला हवा होता. पण, कुणी गेला नाही. मी गेलो तर म्हणे आग लावयला गेला. म्हणजे अश्रू पुसायलाही जायचे नाही, अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका केली.

  • 26 Nov 2023 03:09 PM (IST)

    केस जितके पांढरे आहेत. तितकी आंदोलने केली - भुजबळ

    हिंगोली : आता कोणी नवीन नेता आलाय. म्हणतो की भुजबळ म्हातारा झाला. होय बाबा म्हातारा झालो. कुणी जवान रहाणार नाही. पण, त्या नव्या नेत्याला सांगायचं की माझ्या डोक्यावरचे केस जितके पांढरे आहेत. तितकी आंदोलने या भुजबळने केली आहेत, असा टोला भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना लगावला.

  • 26 Nov 2023 03:06 PM (IST)

    मंत्री भुजबळ यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका

    हिंगोली : आम्ही कसं जगायचे? एक दगड कधी मारला? एक टायर कधी जाळला का? गेले दोन महिने आमचे कुटुंब शिव्या ऐकते आहे. काय चाललंय? पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. फोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केलीय.

  • 26 Nov 2023 01:58 PM (IST)

    सध्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण - धर्मराव बाबा आत्राम

    मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही जे आरक्षण सध्या आहे त्याला धक्का न लावता सगळ्यांना आरक्षण दिले पाहिजे असे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले आहे.

  • 26 Nov 2023 01:31 PM (IST)

    फडणवीस यांच्यावर टीका करण्याऐवजी सुप्रिया सुळेंनी पिताश्रींचा काळ आठवावा - प्रसाद लाड

    आपण सुप्रिया ताईंना आवाहन करतो की देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ आणि शरद पवार यांच्या कार्यकाळातील अपयश यावर खुल्या मैदानात चर्चा करूया गोवारी हत्याकांड,जातीय दंगली, दाऊदच्या माणसांसोबत विमान प्रवास या गोष्टींवर चर्चा करा अशी मागणी भाजपा नेते प्रसाद लाड यांनी केली आहे.

  • 26 Nov 2023 01:11 PM (IST)

    इंदापुरात दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांचे आंदोलन 

    दुधाला प्रति लिटरला 40 रुपये दर मिळाला पाहजे या मागणीसाठी पुण्याच्या इंदापूरात बाबा चौकात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. रस्त्यावर दूध ओतून देत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

  • 26 Nov 2023 12:58 PM (IST)

    आमदार रोहित पवार यांचा मोठा सवाल

    सराटी येथे जे मराठी मुले होती, त्यांच्यासमोर जर आई बहिणीवर पहिले लाठी चार्ज होत असेल तर ही पोर कशी शांत बसणार?, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

  • 26 Nov 2023 12:52 PM (IST)

    नितेश राणे यांचे विधान हास्यस्पद आहे- आमदार रोहित पवार

    नितेश राणे यांचे विधान हास्यस्पद आहे.  मला आता माझ्या एका कार्यकर्त्यांनी त्याच व्यक्तीचा फोटो नितेश राणे सोबतचा दाखवलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचासोबत ही कार्यकर्त्याचा फोटो आहे.

  • 26 Nov 2023 12:33 PM (IST)

    छगन भुजबळ काँग्रेसचे नेते स्वर्गीय राजीव सातव यांच्या घरी दाखल

    मंत्री छगन भुजबळ यांनी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे काँग्रेसचे नेते स्वर्गीय राजीव सातव यांच्या घरी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी राजू सातव यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले.

  • 26 Nov 2023 12:27 PM (IST)

    मंत्री छगन भुजबळ यांना दाखवण्यात आले काळे झेंडे

    हिंगोली मंत्री छगन भुजबळ यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. आता यावर महादेव जानकर यांनी भाष्य केले आहे.

  • 26 Nov 2023 12:19 PM (IST)

    शिवा संघटना आणि शिवाचार्य यांच्यातील वाद चव्हाट्यावर

    शिवा संघटना आणि शिवाचार्य यांच्यातील वाद चव्हाट्यावरआला आहे.  शिवा संघटनेचा मेळावा घेण्यास ट्रस्ट आणि शिवाचार्य यांचा विरोध बघायला मिळतोय. मेळावा उधळून दाखवा असे मनोहर धोंडे यांचे आव्हान. शिवा संघटना आणि शिवाचार्य अहमदपूर महाराज यांनीच कार्तिकी पाैर्मिला परंपरा अमलात आणली.

  • 26 Nov 2023 12:10 PM (IST)

    एका तरुणीचे अहरण झाल्याने मोठी खळबळ

    धुळे येथील साक्री दौलत नावाच्या बंगल्यावर रात्रीच्या सुमारास पाच ते सात दरोडेखोर यांनी सोने सह रोकड लंपास केली. तसेच घरातील एका तरुणीला आपल्यासोबत नेले. साक्री पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • 26 Nov 2023 11:58 AM (IST)

    Live Update : मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक

    मराठी पाट्यांवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ठाण्यातील मानपाडा या भागात असणाऱ्या कार शोरूम काळे फुगे काचेवर फेकून निषेध नोंदवण्यात आला. मनसेचे पदाधिकारी स्वप्निल महेंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

  • 26 Nov 2023 11:45 AM (IST)

    Live Update : लाखोंच्या अंमली पदार्थांसह तीन नायजेरियन आरोपींना अटक

    लाखोंच्या अंमली पदार्थांसह तीन नायजेरियन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 56 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत तुळींज पोलिसांनी कारवाई केली. नालासोपारा तुळींजच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना 55 लाख 92 हजार 200 रुपयांचा मेफेड्रोन आणि गांज्यासह 3 नायजेरियन आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे.

  • 26 Nov 2023 11:31 AM (IST)

    Live Update : हिंगोलीच्या मेळाव्याला जाताना भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

    हिंगोलीच्या मेळाव्याला जाताना भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज हिंगोली याठिकाणी भुजबळ यांचा एल्गार मेळावा आहे. ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • 26 Nov 2023 11:15 AM (IST)

    Live Update : तुकाराम ओंबळे यांच्या स्मूर्तीस्थळाला अभिवादन करण्यासाठी सुप्रिया सुळे

    मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मूर्तीस्थळाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

  • 26 Nov 2023 10:47 AM (IST)

    Maharashtra News : हिंगोलीच्या रामलीला मैदानावर आज ओबीसींचा महामेळावा

    हिंगोलीच्या रामलीला मैदानावर आज ओबीसींचा एल्गार महामेळावा पार पडणार आहे. जान्यामधील मेळाव्यानंतर आज ओबीसी समाजाची हिंगोलीत सभा होत आहे.

  • 26 Nov 2023 10:43 AM (IST)

    Maharashtra News : जागा वाटपाच्या निर्णयावर मी बोलणे अयोग्य- दिपक केसरकर

    जागा वाटपाचा निर्णय हा उच्च स्थरावर चर्चा करून घेतला जातो. असं म्हणत जागा वाटपाच्या निर्णयाबाबत मी बोलणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. किमान 40 जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचेही ते म्हणाले.

  • 26 Nov 2023 10:29 AM (IST)

    Maharashtra News : मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक

    मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. दहिसरमधील दुकानावरील इंग्रजी पाट्या मनसेनं फोडल्या आहेत. काही पाट्यांना काळंदेखील फासलं आहे.

  • 26 Nov 2023 10:22 AM (IST)

    Election 2024 : जागावाटपाच्या फॉर्मुल्यावर जवळपास एकमत- देवेंद्र फडणवीस

    लोकभेच्या 48 जागांबाबत तीनही पक्षांचे जवळपास एकमत झालं असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जिंकणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाईल मात्र हा शब्द अंतिम शब्द नसेल असेही ते म्हणाले. शिंदे गट आणि अजित पवार गट 22 जागा एकत्रीत लढवतील असेही ते म्हणाले.

  • 26 Nov 2023 10:14 AM (IST)

    Loksabha Election 2023 : राज्यात भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार- देवेंद्र फडणवीस

    महायुतीतील लोकसभेच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिंदे गट आणि अजित पवार गट 22 जागा लढवणार असल्याचेही ते म्हणाले.

  • 26 Nov 2023 10:07 AM (IST)

    Sanjay Raut : इंडिया आघाडीला राज्यात 40 प्लस जागा मिळतील- संजय राऊत

    इंडिया आघाडीला राज्यात 40 प्लस जागा मिळतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस आणि प्रादेशीक पक्ष एकत्र निवडून येतील असेही ते म्हणाले.

  • 26 Nov 2023 09:59 AM (IST)

    OBC News | हिंगोलीत ओबीसी नेत्यांची सभा

    हिंगोलीत ओबीसी नेत्यांची दुसरी सभा आज होत आहे. या सभेला छगन भुजबल उपस्थित राहणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील ओबीसी समाजबांधव या सभेला येणार आहे.

  • 26 Nov 2023 09:49 AM (IST)

    Pune News | मावळमध्ये रब्बी पेरणीस सुरुवात

    पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात रब्बी हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी आता कांदा ज्वारी, गहु, हरभरा, भाजीपाला पिकाची पेरणी करत आहे. कांदा पिकाचे क्षेत्र ही पवन मावळात मोठ्या प्रमाणात आहे.

  • 26 Nov 2023 09:36 AM (IST)

    Rohit Pawar | रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा परभणीत

    आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा जालना जिल्ह्यातून परभणीत दाखल झाली आहे. ठिकठिकाणी रोहित पवार यांचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथून सकाळी सहा वाजल्यापासून रोहित पवार यांनी पायी चालत यात्रेला सुरुवात केली.

  • 26 Nov 2023 09:16 AM (IST)

    Mumbai News | 26/11 मधील शहिदांना आदरांजली

    महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने गेटवे ऑफ इंडिया येथे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) कमांडो सुनील जोधा यावेळी उपस्थितीत होते.

  • 26 Nov 2023 09:02 AM (IST)

    Mumbai News | भिवंडीत दोन गटांत हाणामारी, आठ जण जखमी

    भिवंडीतील वाडा रस्त्यावरील महापोली येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. किरकोळ वादातून हातात चोपर तलवार नाचवित दहशत माजविण्याचा प्रयत्नातून हाणामारी झाली. यामध्ये आठ जण जखम झाले आहेत. परिसरात गणेशपुरी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

  • 26 Nov 2023 08:57 AM (IST)

    विजय वडेट्टीवार आज हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्याला जाणार?

    विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आज हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्याला जाणार होते.  मात्र अचानक ते हैद्राबाद कडे रवाना झाल्याची माहिती आहे. हैद्राबादवरून हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्याला पोहचणार का? याबद्दल प्रश्नचिन्ह आहे.  नागपूर विमानतळावरून हैद्राबादला रवाना झालेत.  तेलंगणामध्ये काँग्रेसचे काही कार्यक्रम असल्याने वडेट्टीवार हैद्राबादला गेल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • 26 Nov 2023 08:45 AM (IST)

    पुण्यातील 'या' भागाचे नाव बदला

    पुण्यातील महंमदवाडीचं नाव महादेववाडी करा, अशी मागणी शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे.  हडपसर भागातील महंमदवाडी गावचे नाव बदलण्याची मागणी भरत गोगावले यांनी केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गोगावले यांच्या मागणीची दखल घेतली गेली आहे.  याबाबत कागदपत्रांची तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आलेत.

  • 26 Nov 2023 08:30 AM (IST)

    शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन

    बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.  सोयाबीन , कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी तुपकर  बेमुदत आंदोलन करत आहेत.  काल तुपकर याना न्यायालयाने जामीन दिल्यावर तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसलेत. चिखली तालुक्यातील सोमठाना गावात आंदोलन सुरू आहे.  तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी 29 नोव्हेंबर ला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता.तुपकर यांनी आंदोलन करू नये, म्हणून पोलिसांनी काल अटक केली होती. मात्र न्यायालयाने तुपकर याना जामीनावर सोडलंय. त्यानंतर तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे.

  • 26 Nov 2023 08:15 AM (IST)

    पुण्यातील ससून रुग्णालयात सलाईनचा तुटवडा

    पुण्यातील ससून रुग्णालयात सलाईनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ससून रुग्णालयात तीन आठवडा पुरतील इतकेच सलाईन शिल्लक आहेत. सलाईनचा तीन आठवड्यांपुरताच साठा शिल्लक आहे. बाजारपेठांमध्ये सलाईनच्या बाटल्यांचा तुटवडा असल्याने पुरवठा कमी असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय.  वेळेत पुरवठा व्हावा यासाठी ससून रुग्णालयाची धावपळ होताना पाहायला मिळतेय. 100 मिलिमीटर क्षमतेच्या सलाईनचा ससून रुग्णालयात तुटवडा होणार आहे.

  • 26 Nov 2023 07:53 AM (IST)

    पुण्यात संविधान दिनानिमित्त "संविधान सन्मान दौड"

    पुण्यात संविधान दिनानिमित्त "संविधान सन्मान दौड" काढण्यात येणार आहे.  संविधान सन्मान दौडचं पुण्यात आयोजन करण्यात आलंय.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे पुण्यात संविधान दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे विद्यापीठातून संविधान दौडला सुरुवात होणार आहे.  संविधान दौडमध्ये अपंग बांधवांचा देखील सहभाग असणार आहे.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संविधान दौडचं उद्घाटन करणार आहेत.

  • 26 Nov 2023 07:47 AM (IST)

    एसटी बसला अपघात, जण गंभीर जखमी

    सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला अपघात झालाय.  सोलापुरातील उळे कासेगाव या ठिकाणी एसटी बस पलटी झाली.  सोलापूरहून नांदेडला निघालेल्या बसला पहाटे सहा वाजता अपघात झाला. अपघातामध्ये सात ते आठ लोक जखमी झाले असून तीन जण गंभीर जखमी आहेत. एसटी बसचा जॉईंट तुटल्याने हा भीषण अपघात झालाय. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Published On - Nov 26,2023 7:44 AM

Follow us
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.